लाल टपोऱ्या त्या फुलांचा
रंग चटकदार ऐसा शोभतो
वाळक्या त्या जंगलामधे
गुलमोहोर ऐटीत मिरवतो
बहर आला असा फुलांना
लाल दहकत्या रंगाला
वैशाखात ही दिमाखाने
सजत डोलत उभा राहिला
बहरला गुलमोहोर तरी
प्रिया माझी का येईना
वैशाख वणावा अंतरीचा
उरातुनी त्याचा दाह जाईना
प्रसन्ना जीके
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1531
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपले नाव
आपले नाव प्रसन्ना जीके आहे का ? :)
कविता सुंदर आहे .. अगदी कविताच्या प्रेमात पडावं अशी :)
- टारझन
मस्तच
In reply to आपले नाव by टारझन
मस्तच !
आपल्या काव्यप्रतीभेचा गुलमोहोर आजकल अप्रतीम बहरु लागला आहे.
पहिल्या दोन्ही अप्रतीम प्रतिक्रीया, ह्या टार्या आणी पर्या ह्यांच्या लाभल्याने आपल्या कवितेचे भविष्य उज्ज्वल आहे ह्यात शंका नाही.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
व्वा !!!
सुरेख .. शेवटची ओळ मस्तच जमली आहे !!