Skip to main content

(पिवळा बाज)

लेखक चेतन यांनी बुधवार, 25/11/2009 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
जयवी ताईंची सुंदर कविता हिरवा साज वाचुन परत एकदा आज विडंबनाची कंड सुटली डिस्केमिअरः (२६/११/२००९) सारखच् असो... मधूनच घाऊक बरसतो कसा मालक टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक पुपे कविता पाडती अन टिंग्या ही चतुर संपादकही खोडकर, उडवण्यास आतूर पेशवाईचे नगारे नित्य बुधवारी फाटे बडवुनी ही भुई, साप म्हणोनी धोपटे जिरवतो जुना कंड, हा घालुन विरजण टंकणारी ती माकडे टुल्ल शिवास पिउन ३_१४ संक्षिप्त ताईजी बसे दुर्बीण रोखून पाडे उतारा विडंबन शनिवार पाहून टीळा लावियला भाली, टार्‍या माळ घालून टंके प्रतिसाद सरळ म्हणे आलो सुधारून चेतन अवांतर: वरील कवितेला "जिरवा खाज" किंवा "मिरवा माज" अशी शिर्षके सुचली होती पण डांबिसकाकांचे विडंबन वाचुन "पिवळा बाज" जास्त बर वाटलं ;)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5215
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by धमाल मुलगा

एऽऽकदम कऽडक --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अरे मस्त रे चेतन्या. वेलकम टू धी क्लब ऑफ सिटिंग इन वातानूकुलीत हापिस अ‍ॅन्ड पाडिंग कविता विडंबान. :) पुण्याचे पेशवे अवांतरः नगाडा हा हिंदी शब्द वाटतो त्याला मराठी शब्द नगारा असा आहे. आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

पण यमकात बसवायला पहिल्याच ओळीत काही शब्द इकडे तिकडे करता येतीलः
मधुनच बरसतो कसा मालक घाऊक टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक
याऐवजी मधूनच घाऊक बरसतो कसा मालक टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक हे जास्त योग्य वाटेल. बाकी आमचं नाव विडंबनात पाहून काय वाटलं हे मी लिहीण्यासाठी जागा सोडत आहे. अदिती

छान ! जास्त सविस्तर प्रतिसाद दिला तर लेटेष्ट संपादक धापा टाकतील म्हणुन थांबतो --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

वाह चेतनराव !! काय खंगरी लिहीलंय हो ! कसं काय सुचतं तुम्हाला एवढं चपखल ? अतिशय सुंदर काव्यात्मक रचना .. चाल लावुन वाचता आलय ओ आपली सध्य स्थितीवर बारिक नजर आहे .. आवडलेच .. बाकी "जिरवा खाज" हे आम्हालाही सुचलं होतं .. पण त्याचा आम्ही मर्डर केला हे तुम्ही जाणताच. असो बदलिन - टारझन

In reply to by टारझन

चेतनराव लैच बेष्ट झालय.... तुमच्या अभ्यासाला आणि काव्य प्रतिभेला सलाम! श्री. टारझण यांस, भाड्या चक्क टारझन अशी सही??????? "मधुनच बरसतो कसा मालक घाऊक" हे खरे की काय? कवटी

मिपा प्रशासनावरची विडंबनं वाचून उबग आलाय पण हे चांगलं जमलंय..

बल्लवाचार्य गणपा, धम्या, प्रभो, टिंग्या, टुकुल, अमृतांजन, अवलिया, सू हा स, डांबिस काका, टार्‍या, कवटी, शहारुख धन्यवाद मालक उर्फ विसोबा खेचर उर्फ आणिबाणिचा प्रशासक स्पेशल धन्यवाद पुपे बदल केलायं (इथे मेवाडी मध्ये सुद्धा नगारा असाच शब्द आहे) धन्स आदिती ताई सुंदर बदल आवडला धन्यवाद चेतन