Skip to main content

मी आणी पाउस

लेखक प्रभो यांनी सोमवार, 23/11/2009 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस होता अंधारलेला आणी रात्रही उजाडलेली झाडे होती उघडी बोडकी , किंचीत पानेही गळलेली अशाच काही क्षणी येते आठवण तुझी माझ्या हळव्या मनी खोल साठवलेली मनास धुंद करून जातो तुझा एकच स्पर्श नभासही सार्‍या होतो निमिषात एक कुंदसा हर्ष अशाच एका पावसातील ती पहिली भेट आपली तुला न्याहाळणारा मी आणी तू चिंब भिजलेली त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं तेंव्हापासून माझं आणी पावसाचं आहे वेगळं असं एक नातं
काव्यरस

वाचने 8656
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

अशाच एका पावसातील ती पहिली भेट आपली तुला न्याहाळणारा मी आणी तू चिंब भिजलेली झकास्स्स... ;) मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo

सभ्यतेच्या चौकटीत राहून तरल श्रुंगाराची उत्कट अनूभुती देणारी हळूवार परंतु सशक्त कविता !!

ऑनसाईट ला एकटे आले की बर्‍याच तरल भावनाना शब्द फुटतात. बाकी कविता एकदम मस्त...

कविता चांगली आहे, चित्रदर्शी आहे. पण पावसामुळे एकदम बँकेतले रिकरिंग खाते कसे काय उगवले? !

पावसामुळे एकदम बँकेतले रिकरिंग खाते कसे काय उगवले? ! यालाच म्हणायचे कोडजोड्या ...... आय टी ची देन आहे ही. डॉट कॉम व्यवसायातून रीकरिंग खाते.... Doing correct things is Management. Correcting the things done is an Leadership

हे कोरडं भिजणं थांबवून खरंखुरं कधी भिजणार ते सांगा राव? ;-) मस्त रे ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

तेंव्हापासून माझं आणी पावसाचं आहे वेगळं असं एक नातं भारी... binarybandya™

एका केशरी संध्याकाळी, घाबरत घाबरत धरला होता तुझा हात. थरथरुन शहारला तो , जणु गवताच पात. मउ लुसलुशीत, कोवळा कोवळा. तु बिलगलीस, अन मी झलो होतो, बावळा, बावळा. --------- जयपाल ************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

हम्म... खुप एकटं वाटतयं काय रे तिकडे ??? --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

सुंदर ... तेंव्हापासून माझं आणी पावसाचं आहे वेगळं असं एक नातं आवडली.

तुझा लवेरिया अजुन बरा नाही का झाला. आता विठोबाच्या देशात आहेस तर तिथेच एखदी चांगली डागदरीण शोध....;)

In reply to by गणपा

हेच्च म्हणतो. (अधिक माहितीसाठी श्री.Nile ह्यांना संपर्क करावा ;) ) बाकी, ब्यांक-रिकरिंग सोडुन कविता झ्यांटॅम्याटिक रे! :) चालु दे तुझा कारखाना, आम्ही आहोत तुझ्या कविता वाचायला :) (ह्याची सेटलमेंट पूनममध्ये करावी लागेल हे आपल्याला ज्ञात असेलच ;) )

In reply to by धमाल मुलगा

माननीय धमाल मुलगा ह्यांच्याशी असहमत आहे. त्यांच्या ह्या प्रतिक्रेयेवरुन त्यांना नवकवितेतील शश्म काही कळत नाही हेच सिद्ध होते.
त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं
ह्या वाक्यानी कविता हृदयाला भिडली आहे. अशीच खाती उघडत रहा. ©º°¨¨°º© हमाल मुलगा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

माननीय परिकथेतील राजकुमार ह्यांच्याशी असहमत आहे. त्यांच्या ह्या प्रतिक्रेयेवरुन त्यांना प्रेमकवितेतील व कवितेतील शश्म काही कळत नाही हेच सिद्ध होते. त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं ह्या वाक्यानी कविता मस्तकाला भिडली आहे. अशीच माथी फोडत रहा. ©º°¨¨°º© कपाल फुटला ©º°¨¨°º© हानतय पर्‍या आज

मरायला आलय तेज्यायला !! सू हा स...

आहाहा !! काय सुंदर काव्य आहे श्री प्रभो .. आज वाचन सुरू केल्यापासून एक से एक सुंदर धागे वाचावयास मिळत आहे .. बहुदा गॉगल काढल्याचा परिणाम :) असो ,.,. सुंदर काव्याने आनंद मिळाला ! - टारझन

सर्व वाचकांचे आणी प्रतिसादकांछे आभार.. पूनममधेही काही जणांसाठी आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. :) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

मस्तच कविता..! तात्या.