हे सगळं वाचून मला तिरंगा मधल्या शेवटच्या डायलॉगची आठवण झाली..
आपला नाना म्हणतो...."पहले लाथ, फिर बात फिर मुलाकात.."
यावर जानी म्हणतो.."नही नही जानी, हमारा उसूल है पहले मुलाकात, फिर बात अगर उससे बात ना बने तो फिर लाथ..."
उदा घ्यायचे म्हणून मनसेचे घेतो...आधी पत्रकं वाटली आवाहनाची की मराठीतून शपथ घ्या म्हणून सगळ्या आमदारांना...मग मुद्दामहून ऐकून नाही ऐकलं करणार्या अबूच्या दिली ठेऊन कानाखाली ....(हे वर सगळं लिहिलय ह्याचा अर्थ असा नाही की मी विचारवंत झालो.....पण राडे सुद्धा विचार करूनच करायचे असतात..नाहीतर त्या राड्यांच्या मागचे कार्य सिध्दीस जात नाही...)
असच एकदा समज-निवेदन दिले असते निखिल वागळेला आणी मग न ऐकल्यावर फोडला असता तर जास्त बरं झालं असतं...नाहीतरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नसतेच..(हे वाक्य वागळ्याचा बोलण्याने वाघास त्रास होत नसतो असे वाचावे...आणी त्रास होत असेल तर अबूची अस्थी-दंत विम्याची पॉलीसी केस टार्याकडे कशी काय नाही आली???)
आजकाल खुप कमी वृत्तपत्रे/वाहिन्या राहिल्या आहेत ज्या पक्षनिरपेक्ष पत्रकारिता करतात. प्रत्येक वृत्तपत्राची/वाहिनीची नाळ ही कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या सतत जवळची असत आलेली आहे.
नाही म्हणायला बरेचशे पत्रकार असतातही पक्षनिरपेक्ष ....त्यांनी तसेच वागावे ही सामान्यजनांची हीच अपेक्षा असते..पण सगळ्या म्हशी भरवश्याच्या असतीलच असेही नाही...
वृत्तपत्रीय स्वातंत्र्याच्या नावाने टाळी वाजवायची की शिमगा करायचा हा ज्याचा त्याचा वैचारीक प्रश्न आहे.
आपल्या मिपावरच सुध्दा काही पत्रकार आहेत.जे माझे मित्र/गुरू आहेत.ते जे मित्र/गुरू आहेत ते मात्र वैयक्तीक पातळीवर. व्यावसायीक दृष्ट्या माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यांचा या विषयावरचा उहापोह ही वाचायला/ऐकायला आवडेल मला..सगळ्यांनाही आवडेल असं वाटतय...अजूनही त्यांनी ह्यावर भाष्य केले नाहीये..मे बी ते कोणती बाजू घ्यावी ह्या डायलेमात असतील.
बाकी बाळासाहेबांच्या नवाखाली संजय राउतांनी मनाला येईल ते खरडू नये ही इश्चरचरणी प्रार्थना करून २ शब्द संपवतो.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
बाकी बाळासाहेबांच्या नवाखाली संजय राउतांनी मनाला येईल ते खरडू नये ही इश्चरचरणी प्रार्थना करून २ शब्द संपवतो.
हजार टक्के सहमत!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
अर्वाच्य भाषा वापरल्याबद्द्ल ठाकरे ग्यांग ने वैतागून जाणे म्हणजे.... कोणते उदा. चपखल बसेल बरे... हा.. शक्ती कपूर ने सिनेमात कमी-बटबटीत विनोद असावे अशी मागणी करण्यासारखे आहे.
गुंडांचा निषेध.
निखील वागळे म्हणतो की आमच्या शूर सहकार्यांनी हल्ला परतवून लावला आणि ७ हल्लेखोर आम्ही पकडले.
म्हणजे आयबीएन फेकमत मधील लोक पण एक प्रकारे बंडच आहेत. (त्याच तोलामोलाचे आहेत.)
बाकी निखील जेव्हा बोलतो तेव्हा समोरच्याला उचकावयाच्या भाषेतच बोलतो. आपण पाहणार्यांच्या डोक्यातही काही वेळा तिडीक जाते त्याच्या बोलण्याची. खरा पत्रकार असले अरबटचरबट बोलेल की नाही अशी शंका वाटते. मला वाटते तो त्याच्या पत्रकारीतेचे शस्त्र म्हणून उपयोग करतो.
अवांतर: काही पत्रकार/ वृत्तपत्र काही ठिकाणाहून पैसे मिळाले नाही तर त्याच्या विरुद्ध बातम्या छापतात. त्यातलाच हा प्रकार असावा.
--------------------
काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा.
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|
असले हल्ले करून अनावश्यकरीत्या विरोधकांना फुकट प्रसिद्धी मिळवून देण्या पेक्षा, शिवसेनेने स्वत: च मराठी न्युज चॅनेल काढून त्या द्वारे धर्म निरपेक्षता, व्यक्तिनिरपेक्षता, पक्षनिरपेक्षतेचा आव आणणार्यांना उघडं पाडावं.
शेवटी असल्या तोडफोडीचा आणि हे करणार्यांचा बागुलबुवा(भिती) मतदारांना दाखवूनच "तथाकथित चांगले, कर्तुत्ववान ?" पक्ष/नेते वर्षानुवर्षे सत्ता मिळवतात.
बिचारा निखिल वागळे उगाच सेनावाल्यानी त्याला मारले.तो जसे तोंडाला येईल तसे बोलतो म्हणुन जर त्याला मारले असेल तर ते चुकीचे आहे.
गेले एक दोन महिने सेनेचे मुखपत्र सामनातले अग्रलेख वाचा,त्यातली भाषा किती गचाळ आणि मुर्खपणाची आहे ते लक्षात येईल. बाळासाहेबानी संजय राऊताला अधिकार दिले म्हणुन त्याने काहीबाही खरडावे हे चुकीचे आहे.चक्क मराठी माणसाला शिव्या देणे,सचिनचे बोलणे नीट समजावुन न घेता त्याला फटकारणे हे अतिशय चुकीचे आहे. वागळेला मारणारे शिवसैनिक वाटतच नाहीत,ते भाडोत्री गुंडच वाटतात. हे सगळे ज्याने केले आहे तो आजकाल सेना चालवत आहे असे वाटते. उध्दव ठाकरे नेहमीप्रमाणे फॉरेन टुर वर गेले असावेत.आजकाल जो तो उठतो व सेनेला गुद्दे घालतो हे लक्षण ठिक वाटत नाही.
जी पत्रकारिता वागळे करीत आहे तिचाच कित्ता संजय राऊत गिरवत आहेत. दोघाचाही जाहिर निषेध .
वेताळ
प्रतिक्रिया
लाथ, बात आणी मुलाकात
बाकी
.
अर्वाच्य
निखील
.
निखिल
असले
बोल्ड टॅग
चांगले झाले.
चांगले झाले.
आइया हाच
हो तोच निखिल वागळे चुचु तै
Pagination