Skip to main content

शनिवारचा उतारा: ((संभवित) तह)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 20/11/2009 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
तर आमचा हा संभवितपणा (आमचा यावर अजिबात जीव नाही!) व्यक्त करण्यासाठी आम्ही या कुबड्या वापरल्या. लेखणी दाबून आपुली खरडी उडवत जाऊया, विचार दाबूनी लेखन 'तिकडे' आपण पाडीत जाऊया॥ सोडूनी मूळ स्वभाव आणिक परीटघडीचे लिहूया, एकच मुद्दा अनेक लेख प्रतिसादे वरती काढूया॥ कवितांगण सोडून आता फॉक्स न्यूज वाचूया दिसेल त्याला सहमती देवोनी इनो थोडे चाखूया॥ शांत राहूनी अंमळ थोडे नवे मार्ग शोधूया, हिंसा-शस्त्रे नाय कामाची उपहास थोडा लिहू या॥ थकलो तरी प्रयत्न व्यर्थ उपडा घडा पाहू या, मौजेस मित्रा अंत ना रे, सदर आपण चालवू या॥ आमचे परममित्र (कोण ते विचारू नका, अपमान होईल) यांचे दु:ख न पहावल्याने शनिवारचा उतारा या आठवड्यात अंमळ लवकरच आला. -- अदितीबेन गॉन-धी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7090
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

अदिती, तुमचे हृदय परिवर्तन होते आहे हे पाहून आनंद वाटला. पण अंमळ फालतू कविता आहे. असो. तुम्हाला पाककृतीप्रमाणे कविताही जमत नसाव्यात. पण तारे बघणे आणि दाखवणे जमते हे या कवितेतून जाणवले. पुलेशु पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सहमत. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहमत निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by निखिल देशपांडे

लै वेळा सहमत! :) >>तारे बघणे आणि दाखवणे जमते. ह्म्म...हेच काय ते एकम्..शाश्वत...पुर्णसत्य!!! :D

In reply to by धमाल मुलगा

सहमत *आता हा धागा कोण अप्रकाशीत करनार?? --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

छान 'सभा टाकली' आहे.
शांत राहूनी अंमळ थोडे नवे मार्ग शोधूया, हिंसा-शस्त्रे नाय कामाची उपहास थोडा लिहू या॥
--- क्या बात है! हे मनसेच्या आंदोलनाला उद्देशून आहे काय?
थकलो तरी प्रयत्न व्यर्थ उपडा घडा पाहू या, मौजेस मित्रा अंत ना रे, सदर आपण चालवू या॥
--- ये हुई ना बात! 'जो जे वांछिल, तो ते...'

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


शनिवारचा उतारा शुक्रवारीच? आंतरराष्ट्रीय वार रेषा पुण्यातून जाते काय? Doing correct things is Management. Correcting the things done is an Leadership

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शनीवारचा उतारा हा शुक्रवारीच प्रसिद्ध झाला तर ते वांद्र्याच्या थोरल्या साहेबानी म्हंटल्याप्रमाणे तू मारल्या सारखे कर मी मेल्या सारखे करतो असेच होते ना Doing correct things is Management. Correcting the things done is an Leadership

सोडूनी मूळ स्वभाव आणिक परीटघडीचे लिहूया, एकच मुद्दा अनेक लेख प्रतिसादे वरती काढूया॥ कवितांगण सोडून आता फॉक्स न्यूज वाचूया दिसेल त्याला सहमती देवोनी इनो थोडे चाखूया॥ जबरद्स्त , खतरनाक ई. शब्द अपुरे पडले म्हणुन दया, क्षमा आणि शांती पुजक *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

कवितेला प्रतिक्रीया देणे बंद करावे अशा विचारत होतो, पण हा उतारा असल्याने राहावले नाही. ह्या उतार्‍याचा काहि उपयोग होवो हि अपेक्षा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

बुधवारचा हँगओव्हर गेला एकदाचा.

आमचा हँगओव्हर डबल झाला ... हॅ हॅ हॅ ...छान उतारा ...असा उतारा असल्यावर कविता चढली की नाही हे कसे समजावे !! सू हा स...

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

आमचा हँगओव्हर टिब्बल झाला ... (शरदिनीतैंची कविता पण वाचली ना) ;)

In reply to by गणपा

हँगओव्हर कसला कळले नाही. पण सगळे म्हणतात तर बहुदा बरोबरच असेल ;) तह आवडला, अदितीबै, हुषार आहात. पण आधी लढाई कधी झाली तेच कळले नव्हते.

In reply to by Nile

मॉडर्न लढाया कागदावर खेळल्या जातात म्हणे. आणि लढाई झालीच नाही, म्हणून तर तह संभवित आहे ना! ;-) (भुरटी) अदिती