Skip to main content

पनीर माखनवाला

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी गुरुवार, 19/11/2009 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १/२ कि. पनीर , १/२ कि. कांदा , आलं पेस्ट , लसूण पेस्ट , हळद , लाल तिखट , काजू पेस्ट ( १ वाटी ) , तेल , तूप , मावा , साखर , मीठ , टमाटू प्युरी १/२ वाटी , लवंग , काळी मिरी , दालचिनी , तमालपत्र , मासाला वेलची . खायचा रंग ( लाल ) , कोथिंबीर. कृती : प्रथम कांदा लांबडा चिरून घ्यावा , पनीरचे बारीक तुकडे करावे . कढईमधे थोडं तेल गरम करून त्यात लवंग , काळी मिरी , दालचिनी , तमालपत्र , मासाला वेलची घालून तडतडू लागलं की त्यात चिरलेला कांदा घालून तो लाल होइपर्यंत परतून घ्यावा , हा कांदा गार करून मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावा. आता दुस-या पातेल्यात तेल व तूप एकत्र करून ते तापल्यावर त्यात वाटलेला कांदा घालून परतावा ( कांद्याचे पाणी जावून तो बाहेर उडायला लागतो ) हे वाटण चांगले परतल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घालून ती नीट शिजेपर्यंत अजून परतत रहावे. नंतर त्यात काजूची पेस्ट घालून किमान १५ मि. ती पेस्ट परतली जायला हवी . नाही तर नंतर ती कच्ची रहिल्याचा वास येतो.काजू पेस्ट चांगली शिजल्यावर त्यात टमाटू प्युरी घालून मिश्रण एकजीव होइपर्यंत ढवळावे. अगदी थोडी हळद व लाल तिखट घालून ( तिखटही कमीच घालावे कारण हा पदार्थ गोड असतो ) ढवळत रहावे. थोडा रंग घालून एकजीव झाल्यावर त्यात २ चमचे साखर व १/२ वाटी मावा घालून मावा विरघळेपर्यंत ढवळत रहावे. सर्वात शेवटी कच्चा पनीर घालून तो शिजला की कोथिंबीरीने सजवून पोळी , पराठा , नान इ. बरोबर गरम सर्व करावे.

वाचने 7824
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

व्व्वा !!! संतोष राव .. "हे आमचं पनीर माखनवाला .. ह्याच्यावर आमचा भारी जीव" ... खल्लास आयटम आहे हा :) त्यात आपल्या हातची चव अप्रतिम आहे हे ठाणे कट्ट्यात कळलं होत .. :) लाजवाब !! अवांतर : नाव वाचून दोन सेकंद दुनियादारी मधली "मिनु मकवाना " आठवली होती :) - श्रीयुत टारझन चापेकर

डीष भारी हो जोशीबुवा. पण सध्याचा रागरंग पाहता तुम्ही अस्सल मराठमोळ्या पाककृती द्या हो. ते एकदा खाल्ल्यावर बराच काळ अंगावर ठाणं मांडून बसणारी "नॉर्थ इंडीयन" डीश नको. ;-)

मस्त पा़कृ जोशी साहेब धन्यवाद अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा


In reply to by दिपक

8| गागो चुचु

जोशीबुवा, मस्त हो. लेकीची आवडती डिश. :) तंदुरी रोटीची पण कृती द्यान राव.

मला आवडणार्‍या पदार्थाची कृती दिल्याबद्दल धन्यवाद श्रीयुतराव.

मस्तच

सर्वांना धन्यवाद हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सुंदर......भूक लागली सकाळ सकाळ.. --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!