✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अपत्य संगोपन-समाधान कीं समस्या?

स
सुधीर काळे यांनी
Wed, 11/18/2009 - 12:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14949 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

हम्म

सुनील
Wed, 11/18/2009 - 12:34 नवीन
स्फोटक मसाला ठासून भरलाय ह्या लेखात. मज्जा येणार आहे प्रतिसाद वाचायला!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

स्फोटक

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/18/2009 - 12:46 नवीन
स्फोटक मसाल्याची थोडी उदाहरणं प्रतिसादात द्यायचीत ना! आजच्या धकाधकीच्या जीवनात ३००० शब्द फारच होतात हो सुनील भौ! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

सहमत आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/18/2009 - 18:49 नवीन
>>आजच्या धकाधकीच्या जीवनात ३००० शब्द फारच होतात हो हम्म ! सहमत आहे. आजकाल इंजिनियरिंग किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं म्हटलं तर सोपं झालंय.....इथपर्यंत वाचलं. पुढे जरासा कंटाळा आला. सॉरी हं.... पुढे वेळ मिळेल तसा लेख वाचून काढीन. आणि मग प्रतिक्रिया लिहीन. -दिलीप बिरुटे (आळशी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पढेगा उसकाभी भला, नहीं पढेगा उसका भी भला!

सुधीर काळे
Wed, 11/18/2009 - 20:49 नवीन
पढेगा उसकाभी भला, नहीं पढेगा उसका भी भला! ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बक्षीस

श्रावण मोडक
Wed, 11/18/2009 - 12:36 नवीन
या निबंधाला बक्षीस मिळालं होतं का? परीक्षक कोण-कोण होते? इतर विजेते निबंध कुठं (फुकटात) वाचायला मिळतील का?
  • Log in or register to post comments

हा निबंध शब्दसंख्या जास्त असल्याने स्पर्धेत नव्हताच.

सुधीर काळे
Wed, 11/18/2009 - 12:42 नवीन
हा निबंध शब्दसंख्या जास्त असल्याने स्पर्धेत नव्हताच. इतर निबंनाहींत.आतापर्यंत वाचलेले नाहींत. (distortion of gmbn) इतर निबंधही मी आतापर्यंत वाचलेले नाहींत. आता पुण्याला गेलो कीं तो अंक आणायचा विचार आहे. उत्तम कथा बहुतेक नेटवर नसतो. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ओह्ह!

श्रावण मोडक
Wed, 11/18/2009 - 12:58 नवीन
ओह्ह... अरेरे... शुद्धलेखनालाच भारी महत्त्व या जगात... :( चालायचंच. आता तो अंक बघतो आंतरजालावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

लेख

पर्नल नेने मराठे
Wed, 11/18/2009 - 12:37 नवीन
लेख आवडला!!! चुचु
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

प्रमोद देव
Wed, 11/18/2009 - 12:46 नवीन
काळेसाहेब लेख सर्वांगसुंदर झालाय. आवडला. कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments

सुंदर लेख झालाय...

sneharani
Wed, 11/18/2009 - 13:00 नवीन
छान झालाय लेख. आवडला.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख !

अवलिया
Wed, 11/18/2009 - 13:10 नवीन
सुरेख लेख ! जियो सुधीर शेट ! जियो ! मस्त लेख ! आवडला !! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

पसंतीच्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद

सुधीर काळे
Wed, 11/18/2009 - 13:35 नवीन
देवसाहेब, चुचु, स्नेहाराणी (उच्चार बरोबर आहे ना?), अवलिया-सेठ: आपल्या पसंतीच्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद. हा लेख माझ्या व माझ्या सौ.चा (मी लिहिलेल्या लेखांतला) सर्वात आवडता लेख आहे. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हॅहॅहॅ ...

टारझन
Wed, 11/18/2009 - 13:39 नवीन
हॅहॅहॅ ... लेख न वाचता केवळ किबोर्डावरचं एन्ड बटन दाबून समोर दिसलेल्या टेक्स्ट बॉक्सात टाईप केलेली प्रतिक्रिया ;) बरोबर ना नाना ? असो !! सहज रावांच्या संयमी वाचनक्षमतेला सादर प्रणाम :) थोडक्यात , सहजरावांच्या प्रतिक्रियेतुन लेखाची कल्पना आली !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

लहान लेख चालला असता

सहज
Wed, 11/18/2009 - 13:29 नवीन
>या समस्येला कसे समजून घ्यायचे, तिला कसे सामोरे जायचे, "विन-विन" पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा व अशा सगळ्याच अडचणींना तोंड देता येईल असे उत्तर त्यातून कसे मिळवायचे हे एक आव्हानच आपल्यासमोर उभे आहे. लेख सुरु झाला अपत्य संगोपन म्हणून शेवट मात्र वृद्ध पालकांचे काय यावर येउन ठेपला. :-) त्यामुळे दोन वेगळे निबंध एकत्र झाले आहेत असे वाटते. त्यातपरत पाश्चात्य व पौर्वात्य संस्कृती / रहाणीमान, संस्कार/मुल्य, आर्थिकनिती याचा वरवर उहापोह / टिका नेहमीचीच. विषय चांगला आहे. पण वन शू फीट्स ऑल नसावे. एकपेक्षा जास्त उत्तरे असणार व प्रत्येक कुटूंबाला आपापली उत्तरे शोधावी लागणार. तसेही ओल्ड एज होम संकल्पना भारतातदेखील झपाट्याने पसरत आहे :-) आज ज्याने त्याने आपापल्यापुरता विचार करुनही आज मानवाची संख्या ६.७ अब्ज आहे. अगदी आदिमानव पासुन परग्रहावर जाउन राहणारा एवढी प्रगती केली आहे. त्यामुळे मनुष्य या प्रजातीपुढे "संगोपन" तरी फारशी काही समस्या आहे असे दिसत नाही. आता पुढचे ध्येय निसर्गावर (मानवाच्या शत्रुवर) संपूर्ण विजय. ह्या भूमीकेतुन पहाता, वर उपस्थीत केलेले प्रश्न एकदम वैयक्तिक वाटत आहेत. आणी हो, निकोप संगोपन जमत नसताना (friend from peshawar) अपत्य जन्माला घालण्यापेक्षा अपत्यविरहित फ्रेंच जोडपी चांगला मार्ग निवडत आहेत असे वाटते. लेख लहान व ठराविक मुद्यांना धरुन असता तर चर्चा अजुन सखोल झाली असती.
  • Log in or register to post comments

समाधान आणि समस्या-दोन्ही पालकांचेच मुद्दे आहेत!

सुधीर काळे
Wed, 11/18/2009 - 14:17 नवीन
खरं तर समाधान काय किंवा समस्या काय, दोन्ही पालकांचेच मुद्दे आहेत व संपूर्ण निबंध या विषयावरच लिहिला आहे. यातली परदेशातील उदाहरणे माझ्या समोरची आहेत, काल्पनिक नाहींत! कुणाला पटतील कुणाला नाहीं! पण खरी आहेत, जोन्सबाई धरून! तिच्या घरी मी व सौ जाऊन आलोय्. लेख नक्कीच लांब झालाय्. लिहायला बसलो आणि एका बैठकीत लिहिला. नंतर पॉलिश करायला वेळ लागला. पण काहीच काढवेना. असो! ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

बरोबर हो

सहज
Wed, 11/18/2009 - 14:22 नवीन
>यातली परदेशातील उदाहरणे माझ्या समोरची आहेत, काल्पनिक नाहींत! कुणाला पटतील कुणाला नाहीं! पण खरी आहेत, जोन्सबाई धरून! तिच्या घरी मी व सौ जाऊन आलोय्. काल्पनिक नाही म्हणत हो कोणी पण परदेशातील जे उदाहरण/स्थिती तुम्ही म्हणता आहात त्या जवळपास सगळ्याच देशात आढळतील. आपली किंवा परकी अशी काही ही समस्या विभागता येणार नाही इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

फरक आणि साम्य दोन्ही मी लिहिली आहेत

सुधीर काळे
Wed, 11/18/2009 - 16:05 नवीन
फरक आणि साम्य दोन्ही मी लिहिली आहेत व हेही लिहिलं आहे कीं आपल्या देशात आता परदेशी आहे तशी परिस्थिती होऊ लागली आहे. आणि म्हणूनच कांहींसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्या पालकांनी १८व्या वर्षापासून मुलांना स्वतंत्र केलं त्यांना संगोपन तसं कमी करावं लागलं व अपेक्षाही कमी असतात. या उलट संगोपनात तन-मन-धन या तीन्ही गोष्टी invest केल्यावर जर पालकच शेवटी सांपत्तिक दृष्ट्या असहाय झाले व ज्यांच्यात invest केले त्यांच्याकडून return on investment मिळालं नाहीं तर त्यातून मार्ग काय? "cradle-to-grave" पद्धतीच्या विम्याचीही सोय नाहीं मग काय करणार? प्रश्नच प्रश्न आहेत व उत्तरे नाहींतच. इंडोनेशियात तर याहून जास्त भयानक परिस्थिती आहे. भारतीय व पाश्चात्य यातलं वाईट ते घेतलं गेलेलं मी पहातो. शिल्लक नाहीं, विमा नाहीं व म्हातारपणी फारच असहाय झालेले वृद्ध दिसतात इथे. नववृद्ध व अतिवृद्ध यावरच्या लेखांचा उल्लेख केला आहे तोही याच दृष्टिकोनातून. ८५-९० वर्षाचे अतिवृद्ध लोक आज समाजात आहेत व त्यांना साठीतले लोक सहाय्य करताहेत. ते चित्र जर बदलले तर अतिवृद्धांची हालत जोन्सबाईसारखी होईलच कीं नाहीं? अशी होऊ द्यावी कां आपण? सगळ्या समस्यांना उपाय देण्याची माझी क्षमता नाहीं, कदाचित् कुणाचीच नसेल. पण भारतियांनी आतापर्यंत अनुसरलेली पद्धती मला योग्य वाटते व मी तेच शेवटी सुचविले आहे. पिढीप्रमाणे त्याबद्दल एकवाक्यता वा मतभेद होतील यात शंका नाहीं. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

कौटुंबिक हिंसाचार

प्रकाश घाटपांडे
Wed, 11/18/2009 - 14:02 नवीन
आता वृद्ध आईवडिलांचा सांभाळ न करणार्‍या मुलांना न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार कायद्याधारे फटकारायला सुरवात केली आहे. वसंत व्याखानमालेत एक किस्सा ऐकला. परदेशातील मुलाने भारतात आल्यावर गोड गोड बोलुन आईवडिल रहात असलेली सदनिका विकुन परदेशात घेउन जाण्यासाठी विमानतळावर नेले आन तो केव्हाच विमानाने गेला आणि ते केवळ विमानतळावर वाट पहात बसले. हातात काहीच नाही .आभाळ कोसळले त्यांच्यावर. आपली मुल आपल्याला सांभाळतील या भ्रमात आता कुणी राहु नये. संपत्ती ही आपल्या पश्चात द्यावी. भावनेच्या भरात हयातीत देउ नये. आता मुल व आई वडिल जवळजवळ सदनिका घेउन राहतात. पण एकत्र राहत नाहीत. म्हटल तर एकत्र म्हटल तर वेगळे अशा मोड मध्ये रहातात. घरोघरी मातीच्या चुली हा एक चित्रपट या वर आधारला आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

परदेशातील

पर्नल नेने मराठे
Wed, 11/18/2009 - 14:08 नवीन
परदेशातील मुलाने भारतात आल्यावर गोड गोड बोलुन आईवडिल रहात असलेली सदनिका विकुन परदेशात घेउन जाण्यासाठी विमानतळावर नेले आन तो केव्हाच विमानाने गेला आणि ते केवळ विमानतळावर वाट पहात बसले. हातात काहीच नाही .आभाळ कोसळले त्यांच्यावर. माझा विश्वास नाहि बसतेय :o असे होण्यापेक्षा मुले नकोचत :( चुचु
  • Log in or register to post comments

परदेशी

अमोल नागपूरकर
Wed, 11/18/2009 - 14:30 नवीन
परदेशी लोकांची पद्धत वेगळी असते. १६-१८व्या वर्षी त्यांची मुले घराबाहेर पडतात. आपल्या शिक्षणाची जबाबदारी ही मुले स्वत:च उचलतात. बारीक-सारीक नोकर्‍या करून, प्रसंगी एक-दोन वर्षे "ड्रॉप" घेऊनसुद्धा! त्यांची मुले अठरा वर्षाची झाली, सज्ञान झाली की सुटी होतात व स्वत:च्या पायावर उभी राहिलेली दिसतात. मुलांचे भलते लाड ते करत नाहीत, कदाचित ते त्यांना परवडतच नाहीत. पण असे केल्याने मुले स्वतन्त्र होतत. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची आणि त्यान्चे परिणाम भोगण्याची क्षमता त्यान्च्यात निर्माण होते, असे नाही का वाटत? »
  • Log in or register to post comments

चांगल्या कल्पनांचं नेहमीच स्वागत

सुधीर काळे
Wed, 11/18/2009 - 15:37 नवीन
तुम्ही म्हणता आहात त्यात खूपच तथ्य आहे. असं स्वतंत्र झाल्यामुळं ही मुलं कणखर होतातच, त्या मानाने आपली मुलं जरा जास्तच सुरक्षित वातावरणात वाढतात व त्याचे तोटे आहेतच. तीन वर्षें मी तीन अमेरिकन लोकांबरोबर काम केलं (त्यातला एक माझा बॉस) त्या काळात त्यांच्यातले अनेक गुण मला आढळले जे भारतीय लोकांच्यात नाहींत. उदा. आपल्याला एकादी गोष्ट येत नसेल तर आपण कुणाला तरी मित्रांत विचारतो व प्रश्न सोडवतो. हे अमेरिकन स्वतः सगळं शोधायचे. दुसर्‍यावर अवलंबून न रहाता स्वतः शक्य तो आपल्या समस्या सोडवायच्या हा त्यातला एक गुण मी पाहिला. पाश्चात्य ते सगळं वाईट असं मी म्हणत नाहीं, पण आज जी संक्रमणावस्था आली आहे तिकडे निकडीने पाहिले पाहिजे असं मला वाटतं. लेखाचा शेवट हा पर्याय दिल्याशिवायच झाला आहे, कारण प्रत्येक कुटुंबाला 'फिट्ट' बसेल असा एक पर्याय मिळणे अशक्यच. वाचकांनी आपल्या कल्पना द्याव्यात कारण चांगल्या कल्पनांचं नेहमीच स्वागत असतं. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल नागपूरकर

लेखात अनेक विषय हाताळले आहेत

अमृतांजन
Wed, 11/18/2009 - 15:28 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

लेखात अनेक विषय हाताळले आहेत

अमृतांजन
Wed, 11/18/2009 - 15:27 नवीन
काळेसाहेब, लेखाचे नाव वाचून जी मनोधारणा होते ती लेख वाचतांना चूकीची आहे हे समजायला लागते. लेखात अनेक विषय हाताळले आहेत त्यामुळे मुख्य विषय भरकटला गेला आहे. तुम्ही तो पुन्हा जागेवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही मांडलेल्या समस्येला भारत, भारताबाहेर पश्चिमेकडील देश, मध्यपूर्व देशातील स्थलांतरीतांचे प्रश्न, अशा किनारी आहेत. अनेक समस्या वरवरुन जरी सारख्या वाटत असल्यातरी, त्या तशा नाहीत असे म्हणायला जागा आहे का? का त्या एकच स्वरुपाच्या आहेत?- असे काही तुमचे मत तुम्ही मांडायला हवे होते असे वाटते. लेखाची बांधणी हा एक विषय घेऊन जर वरील लेखावर नजर त्रयस्थाच्या नजरेने टाकलीत तर तुम्हाला मी काय म्हणते आहे ते कळेल.
  • Log in or register to post comments

पहातो प्रयत्न करून!

सुधीर काळे
Wed, 11/18/2009 - 15:39 नवीन
पहातो प्रयत्न करून! ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन

आपले प्रयत्न

प्रकाश घाटपांडे
Wed, 11/18/2009 - 16:04 नवीन
पहातो प्रयत्न करून!
पहा! आमचे दृष्टीने विषय वा आपण भरकटणे हे सर्वस्पर्शी होण्याकडे जाते. व्यापकतेकडे वाटचाल. आपले भरकटणे आम्हाला चांगला वैचारिक प्रवास घडवुन आणते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

स्वतःचे अनुभव

आनंद घारे
Wed, 11/18/2009 - 17:07 नवीन
आपण दोघे साधारणपणे एकाच कालखंडात एकाच परिस्थितीमधून वर आलो आहोत. (मी तेवढा वर आलो नाही आणि बाहेरचे जग कमी पाहिले आहे असे असले तरी). त्यामुळे तुझे बरेचसे अनुभव मला माझेच वाटले इतके चांगल्या प्रकारे ते मांडले आहेस. त्यामुळे मी ३००० शब्द एका दमात वाचू शकलो. पण मला असे वाटते की पालकांच्या मनात मुलांबद्दल असलेल्या प्रेमापेक्षा असुरक्षिततेच्या भावनेपोटी आजकाल भारतात बालसंगोपनाला जरा जास्तच महत्व मिळू लागले असावे. आपल्या लहानपणी एवढी असुरक्षिततेची भीती नव्हती आणि पालकवर्ग 'देवावरी भार' ठेऊन निर्धास्त रहायचा. मुलाला सक्षम आणि सुसंस्कृत बनवण्यावर त्यांचा भर असे, त्याच्या करीअरवर तेवढा नसे. पाश्च्यात्य देशात अनएंप्लोयमेन्ट अलाउन्स वगैरे असल्यामुळे पालक निश्चिंत असतात आणि मुलेही पालकांवर अवलंबून नसतात. ज्या पिढीमधील मुलांनी कधी एकत्र कुटुंब पाहिलेच नसेल अशी मुले वृद्ध झाल्यानंतर आपल्या पाल़कांचा खूप विचार करतील असे मला वाटत नाही. त्यामुळे नववृद्ध आणि अतिवृद्ध हा फरक मला तरी तात्पुरता वाटतो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

असुरक्षितता विभक्त कुटुंब पद्धती मुळे तर नाहीना?

jaypal
Wed, 11/18/2009 - 18:27 नवीन
हल्ली बिचा-या आजिला नातवाच तोंड पहायला बि.एस.एन.एल. ची जादु सर्विस किंवा वेब कॅम लागतो. म्हातारीचा सुरकुतलेला सायीच्या मायेच हात उघड्या पाठिवरुन फिरणं आणि आटपाट नगराची असंख्य वेळा ऐकलेली गोष्ट ऐकत झोपणं. किती नातवांच्या नशीबी आहे? Image removed. अपत्य संगोपन समाधानानिच केलं पाहीजे.(संगोपनात समाधानच मिळायला हवं) भविष्यातील समस्यांचा विचार करुन ते नेट्के कसे होईल? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

ब्राव्हो!

सुधीर काळे
Wed, 11/18/2009 - 18:39 नवीन
ब्राव्हो! ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

लेख चांगला

स्वाती२
Wed, 11/18/2009 - 18:58 नवीन
लेख चांगला आहे पण मुळात पाश्चात्य समाजात आई वडिल १८ वर्षांनंतर मुलासाठी काही करत नाहीत आणि मुलेही नंतर आई वडिलांसाठी काही करत नाहीत हे गृहितकच चुकीचे आहे. अन्यथा इथे ५२९ प्लॅन, कवरडेल एज्युकेशन अकाउंट, सँडविच जनरेशनचे प्रश्न हे काहीच नसते. सविस्तर प्रतिसाद आजचे अपत्य संगोपन(लेकाचे दात उपटून घेणे) झाले की. :)
  • Log in or register to post comments

इथं लिहिलेलं बरंचसं मी पाहिलेलं किंवा थेट ऐकलेलं आहे

सुधीर काळे
Wed, 11/18/2009 - 21:06 नवीन
स्वातीताई, इथं लिहिलेलं बरंचसं मी पाहिलेलं किंवा थेट ऐकलेलं आहे. पण मी कांहीं पाश्चात्य देशात राहिलेलो नाहीं. मिलवॉकीची गोष्ट १०० टक्के खरी आहे (माझ्याबरोबर जेवताना झालेल्या चर्चेतली), माझ्या बॉसची गोष्ट त्यानेच मला सांगितली आहे, जोन्सबाईची गोष्ट पण व आमच्या नात्यातल्या icon ची पण खरी आहे (प्रथमपुरुषी-एकवचनी). पण तरी जर कांहीं कमी-जास्त झाले असेल तर जरूर सांगावे. त्याचे स्वागत आहे. भारतातल्या व्यथाही कांही प्रत्यक्ष व कांहीं ऐकलेल्या असतात. पण मला जे दिसले व मी जे ऐकले त्याबद्दल मी प्रामाणिक राहिलो आहे. ५२९ प्लॅन, कवरडेल एज्युकेशन अकाउंट, सँडविच जनरेशनचे प्रश्न याबद्दल आजपर्यंत कधी वाचले नाही. समजावून घ्यायला आवडेल. मूलतः हा लेख पूर्व विरुद्ध पश्चिम असा नाहींच आहे. माझ्या युरोपियन मित्रांच्या बोलण्यातून जे आले त्यानुसार पश्चिमेतल्या लोकांना वृद्धापकाली कमीतकमी आर्थिक ओढाताण होत नसावी. अमेरिकेतही हे कांहीं प्रमाणात खरं आहे. पण भारतात मात्र परिस्थिती अशी नाहीं. सेवानिवृत्तांपाशी फारशी शिल्लक उरलेली नसते. त्यामुळे हा प्रश्न गंभीर होऊ घातला आहे. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

लेख चांगला

प्राजु
Wed, 11/18/2009 - 21:21 नवीन
लेख चांगला आहे. आवडला. यातले काही प्रश्न मी वाचलेल्या "फॉर हिअर ऑर.." मध्येही होते. बृहन्ममहाराष्ट्र मंडळ या अमेरिकेत स्थायिक झालेल्या नव वृद्धांसाठी काही योजना राबवते आहे असं ऐकलं आहे. नक्की माहिती मिळाली की सविस्तर प्रतिसाद लिहिन. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

काळे काका ,

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 11/18/2009 - 21:35 नवीन
काळे काका , लेखातील तर्क आवडले ...तरुणानी खरोखरच " फायनास्शंली डिसीप्लीन्ड" रहाण्याची गरज आहे ईतिपासुन ते पालकाचे आणी पाल्याचे कर्तव्य ईथपर्यंत.. तिकडे काय होत आणी काय होत नाही ह्यात मुळातच अजिबात रस नाही ?? पण सरसकट भारतीय जीवनपध्दतीला एक प्रकारे दादच द्यावी लागेल. पुणे शहर तरी अजुनही बरे आहे, पण मुंबईत सर्रास पानवाल्यांकडेही असले अमली पदार्थ सरसकट मिळू लागले आहेत असे मी वाचले-ऐकले आहे.>>> पुण्यात मिळायचे !!! मी सहसा ज्या कंजारभाटचा उल्लेख करतो ..तिथेच..बंद झाली....पण गांजा नावाचा अमली पदार्थे तिथे अजुनही मिळतो असा माझा अंदाज आहे कारण रात्रीच्या(१.३० ते ३.३० च्या दरम्यान) खुप पॉवर बाईक्स फिरतात... मला स्वत:ला तरी माझ्या वयाच्या भारतीयांची लागेल तेवढा त्याग स्वत: करून पुढच्या पिढीसाठी जगण्याची, दोन्ही दिशांची जीवनपद्धतच जास्त योग्य वाटते>>>> ह्या वाक्यासाठी टाळ्या !! दोन्ही दिशांच्या जीवनपध्दतीत दोषही आहेत ..आपल्या जीवनपध्दतीत सर्वात मोठा दोष म्हणजे केवळ मौज करण्याच्या स्टाईलचे अंधानुकरण...बाकी तिकडचे दोष आपण जाणताच अगदी अलिकडे - चारेक वर्षांपुर्वी - ३१ डिसेंबरच्या रात्री सिंहगडाच्या पायथ्याशी तरुण-तरुणींनी असे अंमली पदार्थाचे सेवन करून नववर्षाचे स्वागत करण्याचा घातलेला घाट पोलिसांनी उधळून लावला त्यावेळी झालेल्या विद्यार्थ्यांच्या धरपकडीत अनेक शिकल्या-सवरलेल्या, सुशिक्षित व प्रतिष्ठित घरातली मुलेही पोलिसांच्या हाती लागली होती व त्यांना स्वगृही परतण्याआधी काही दिवस बिनखर्ची सरकारी पाहुणचारही घ्यावा लागला होता. >>>. तो दिवस मला आजही आठवतो , सिहंगड वरुन आम्ही चार मित्र " नाईट आउट" करुन साधारण दोनच्या सुमारास परतत होतो.ही पार्टी जेथे चालु होती ..त्याच रेस्टांरट मध्ये बसलो...पार्टी आतल्या उसाच्या मळ्यात गार्डनमध्ये आणी आम्ही बाहेरच्या विभागात बसलो...पलीकडे नुसता गोंगाट होता..डी.जे. चा नाही बरका..नुसतेच बायकांचे आणी माणसांचे आवाज... आम्ही वेटरला बियर मागिवली ..त्याच्या कडे माझा ब्रॅन्ड नव्हता..त्यातलाच एक मित्र ..तो पण त्या ब्रॅन्डशिवाय पितच नाही ...वेटर ने आम्हाला दुसरे रेस्टॉरंट सुचविले.आम्ही दुसर्‍या रेस्टाँरट मध्ये गेलो ...तिथे बियर आणी जेवण संपेपर्यत बसलो...बाहेर गाडीला किक मारायच्या आत...आमच्या समोरुन तिन पोलीस जीप आणी दोन पिंजरे गेले...आम्ही दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये हे वाचले.....मला आज अजुनही कळत नाही की काय म्हणु...त्या ब्रॅण्ड ला धन्यवाद देऊ का ...त्या वेटरच्या समयसुचकतेला..तुम्ही म्हणाल तु बियरच नसती पिली तर...माहीत नाही..एका झोपडपट्टीच्या मुलाला(म्हणाल तर गुंडाला) तेव्हा एक बियर कधीतरी म्हणजे कॉमन आहे असे वाटायचे...अजुन ही वाटते...काही विशेष वाटत नाही...पण कालच माझे आणी धम्याचे (आपला धमाल मुलगा बर का !!) ह्या विषयावर की दारुने थोडा मेमरीवर परिणाम होतोय ..कमी करायला पाहिजे...सोडायला पाहिजे आणी त्यावर हा लेख...अजुनही नीटपणे कळत नाही ....सोडली तर सुधरला म्हणुन टोमणे बसायचे...कधीतरी ठीक आहे.... शेवटी :: ती पकडल्या गेलेली मुलांमध्ये बहुतांशी मुंबई आणी बैंगलोरची होती ...त्या पार्टीस रेव्ह पार्टी म्हणतात्...जरा गुगल केल्यास असल्या पार्टीची भरपुर चित्रे बघावयास मिळतील...पुण्यात दोन-एक-वर्षापुर्वी "फायर अ‍ॅन्ड आईस" च्या आडबाजुला असाच पार्टी करण्याचा प्रयत्न झालता ..खुद्द फायर अ‍ॅन्ड आईसच्या चालकांनी तो हाणुन पाडला... सू हा स...
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लेख!

संजय अभ्यंकर
गुरुवार, 11/19/2009 - 00:15 नवीन
काळे साहेब, एका सुंदर लेखाने मिपाच्या ज्ञानभांडारात भर घातल्याबद्दल धन्यवाद! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान

ऋषिकेश
गुरुवार, 11/19/2009 - 00:29 नवीन
सगळ्या बाबतीत अनुभव जुळत नसले तरी लेख आवडला मराठीतून टंकल्याबद्दल श्री अक्षय यांचेही आभार ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments

काळेकाका,

रेवती
गुरुवार, 11/19/2009 - 03:41 नवीन
काळेकाका, लेख आवडला. एका बैठकीत वाचूनही काढला.......इतका काही मोठा नाही झालेला.:) आपली सगळी मते पटली असे म्हणता येणार नाही तरीही लेख आवडला असेच म्हणीन्.सध्याची संक्रमणावस्थेतली पिढी घाबरून गेलीये असे आपण म्हणता त्यात थोडेफार तथ्य आहे पण प्रत्येक पुढची समजली जाणारी पिढी ही थोडी साशंक असते असे मला वाटते.:) आईवडीलांचा वृद्धपणीचा सांभाळ हा एक बागुलबुवा करून ठेवलाय्.....सगळ्यांनीच! त्यातून जर अनिवासी भारतीय असतील तर प्रश्न त्या कुटुंबापेक्षा शेजारीपाजारी यांनाच गहन वाटायला लागतो की काय असा प्रश्न पडतो. मुलांना वाढवणे हे आईवडीलांचे स्वभाव, अनुभव यावर अवलंबून असते. जसे आपण इंजिनियरिंग्/मेडीसिनबद्दल म्हणता तसेच आहे. या शाखांचे महत्व आपणच वाढवून ठेवले आहे, मग शिक्षणसंस्थांनी त्यावर त्यांचे खिसे भरले तर कुठे बिघडले? माझ्यामते आधी आपली म्हातारपणीच्या मीठभाकरीची सोय व्यवस्थित केल्याशिवाय मुलांना पैसे वाटणे हा वेडेपणा ठरेल. त्यांना अडीअडचणीला थोडे पैसे (बजेटप्रमाणे) देणे हे आपले कर्तव्य आहे पण शारीरिक्/मानसिक कष्ट त्यांनाही करू दिले तर मिळालेल्या गोष्टींचा आनंद त्यांनाही जास्त मिळेल. तो त्यांच्यापासून हिरावून घेण्यात हाशील नाही. (आता कसं मला जबाबदार व्यक्ती झाल्यासारखं वाट्टय!;)) रेवती
  • Log in or register to post comments

छान------

वैशाली हसमनीस
गुरुवार, 11/19/2009 - 07:17 नवीन
लेख आवडला.पण आपणच संस्कारित केलेली मुले आपल्याला विचारणार नाहीत असा नकारात्मक विचार आपण कां करावा ?दुर्दैवाने तसे झालेच तर आपले संस्कार कमी पडले असे समजावे,असे मला वाटते.आपल्याहातून अपत्यसंगोपन नीटपणे पार पडले नाही असे मानावे.आपण अनेक पाश्चिमात्य उदाहरणे दिली आहेत्,मला मात्र येथे मलेशियात अनेक मलाइ,चिनी,हिन्दु कुटुंबात तीन पिढ्या सुखाने नांदताना दिसतात्.असो.चांगल्या विषयाला वाव दिल्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

मुलाला

स्वाती२
Sat, 11/21/2009 - 04:12 नवीन
मुलाला जन्म देणे, वाढवणे हे सर्व करताना प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार खर्च करावा. बरेचदा पालक मुलांवर कुवतीबाहेर खर्च करतात आणि मग मुलांकडुन अपेक्षाभंग झाला की पस्तावतात. पण आपणच मुलांना अवाजवी लाड करून बिघडवले हे मान्य करत नाहीत. भारतात आपण जेव्हा एकत्र कुटुंब पद्धत आहे, मुले आई वडिलांजवळ राहातात असे म्हणतो तेव्हा त्यातले प्रेमाने एकत्र राहाणारे किती आणि नाईलाज म्हणून किती हे ही पहायला हवे. मला स्वतःला आजी आजोबा नव्हते त्यामुळे मित्र मैत्रिणींचे आजी आजोबा हेच माझेही आजी आजोबा होते. यातील बरेचसे आजी आजोबा इतर जी एक दोन मुले आहेत ती कशी अजिबात विचारत नाहीत, या मुलावर कसा सगळा भार पडतो, ओढाताण होते वगैरे ऐकवायची. काही काकू आपल्याला किती सासुरवास झाला हे ऐकवायच्या. काही ठिकाणी वडिलोपार्जीत घरात तीन वेगळ्या चुली हा ही प्रकार बघितला. तेव्हा वृद्ध आईवडिलांचा प्रश्न काही नवा नाही. तुम्ही दिलेले भारतीय तरुणाचे उदाहरण कौतुकास्पद पण सर्वांनाच हे जमेल असे नाही. आमच्या अगदी जवळच्या मराठी मित्राची आई इथे त्यांच्या बरोबर राहाते. भारतातला भाऊ जबाबदारी घेत नाही. मध्यंतरी त्यांना स्ट्रोक आल्यानंतर प्रश्न होता तो म्हणजे पूर्ण बर्‍या झाल्या नाहित तर....? या मित्राचे दुकान आहे. नवरा बायको सकाळ पासून रात्री पर्यंत दुकानात. घरी १२ तास आईजवळ पगारी माणूस ठेवणे परवडणारे नाही. दोघांपैकी एकाने घरी राहाणेही शक्य नाही. सुदैवाने त्या बर्‍या झाल्या पण अन्यथा नर्सिंग होम शिवाय पर्याय नव्हता. गेली १५ वर्षे मी अमेरिकेत राहातेय. सर्व काळ मिडवेस्टमधेच गेलाय. त्यामुळे ईस्ट किंवा वेस्ट कोस्टच्या राहाणीमानाबद्दल मला माहिती नाही. इथले आईवडिल मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवतात. सध्या असे करण्यासाठी ५२९ प्लॅन आणि कवरडेल असे दोन चांगले पर्याय आहेत. ५२९ मधे आजी आजोबाही पैसे घालू शकतात आणि बरेच आजी आजोबा असे करतात. मात्र इथे शिक्षण खूप महाग आहे. त्यामुळे जोडीला स्कॉलरशिप मिळवणे, लोन काढणे हे करावे लागते. खेळात चमकल्यास चांगल्या स्कॉलरशीप मिळतात म्हणून आईवडिल बराच पैसा आणि वेळ खेळात प्राविण्य मिळावे म्हणून खर्च करतात. इथे श्रमाला प्रतिष्ठा आहे. १४व्या वर्षापासून मुल नोकरी करु शकते. कॉलेज अ‍ॅडमिशन साठी मार्कांबरोबर नोकरी-धंद्याचा अनुभव, समाजकार्य वगैरे गोष्टींनाही महत्त्व असते. कॉलेजमधे रोजच्यारोज अभ्यास करावा लागतो. कट्ट्यावर बसून दिवस घालवला परीक्षेला तोंड दाखवले असे चालत नाही. पैसे भरुन डिग्री विकत मिळत नाही. त्यामुळे कुवत नसेल तर मुल कॉलेजला जात नाही. पण त्याला जॉब मिळवायला बापानेच मदत केलेली असते. युनियन शॉप्स मधले जॉब हे कुटुंबातल्या कुटुंबात भरले जातात. बरेच पालक मुलाने कार पैसे साठवून घ्यावी अशी अपेक्षा करतात. काही पालक कार घेऊन देतात पण गॅस आणि इंशुरन्सचा खर्च मुलगा करतो. यात मुलाला स्वावलंबी बनवणे एवढाच हेतू असतो. इथे विभक्त कुटुंब पद्धत आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ मुलगा लग्न झाले की वेगळे बिर्‍हाड थाटतो. म्हणजे तो आईवडिलांना विचारत नाही असा नव्हे. शक्यतो घर आई वडिलांच्या घराजवळ घेतात. घराच्या डाऊन पेमेंट साठी आईवडिलांनी मदत केलेली असते. रविवारी चर्च नंतर आईवडिलांकडे किवा आजीआजोबांकडे जेवायला जातात. आई वडिल दोघेही नोकरी करत असतील तर शक्य असेल तर मुलं आजी आजोबा, काही ठिकाणी पणजी, आत्या आजी वगैरे सांभाळतात. म्हातारे आईवडिल शक्य तोवर स्वतंत्र राहातात. शक्य ती कामे स्वतः करतात. हळूहळू गवत कापणे वगैरे कामे मुलं करायला लागतात. आठवड्यातून एकदा येऊन लेकीसुना घराची सफाई करणे, जेवण फ्रीजर मधे भरणे करतात.शेवटी बरीच रस्सीखेच होऊन काहीजण मुलाकडे राहायला जातात काही खास वृद्धांसाठी असलेल्या अपार्टमेंट मधे राहायला जातात. माझ्या माहितीत बर्‍याच कुटुंबात वृद्ध आई किंवा वडिल राहातात. माझ्या एका शेजार्‍याचे वडिल त्याच्या बरोबर राहायचे ते नुकतेच वारले. दुसरी शेजारीण म्हातारी आहे. तिच्या मदतीला सारखे कुणी ना कुणी येत असते. नवर्‍याच्या मित्राचे वडिल त्याच्या कडे राहायचे. आता दिवसभर एकटे ठेवणे शक्य नाही असे झाले तेव्हा नर्सिंग होम मधे ठेवले. असे करणे त्याच्या साठी अतिशय दु:ख्खाचे होते. आज ४० ते ६० वयोगटातील आठातील एक अमेरिकन हा मुले वाढवतोय आणि म्हातार्‍या पालकांची काळजी घेतोय. त्यांना sandwich generation म्हणतात. वृद्धांचे प्रश्न सगळीकडे आहेत आणि जसजसे आयुष्य मान वाढतेय तसे तसे ते बिकट होतायत हे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments

माहितीबद्दल धन्यवाद.

सुधीर काळे
Sun, 11/22/2009 - 15:34 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. सध्या मी प्रवासात आहे. नंतर सविस्तर उत्तर देईन. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

विचारप्रवर्तक

भोचक
Sat, 11/21/2009 - 17:45 नवीन
हम्म. विचार करायला लावणारा लेख. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

लेख अपत्य

नीधप
Sat, 11/21/2009 - 17:49 नवीन
लेख अपत्य संगोपनाबद्दल आहे की वृद्धांचे संगोपन याबद्दल की इथले आणि तिथले जीवन याबद्दल? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

लेख अपत्यसंगोपनातून झालेले समाधान/समस्या यांच्यावर आहे.

सुधीर काळे
Sun, 11/22/2009 - 15:30 नवीन
लेख आई-वडिलांना अपत्यसंगोपनाने झालेले समाधान किंवा त्यांच्यामुळे उद्भवणार्‍या समस्या यांच्यावर आहे. ------------------------ सुधीर काळे, जकार्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

ह्म्म्म

नीधप
Sun, 11/22/2009 - 15:56 नवीन
ह्म्म्म मला तरी तिन्ही मुद्द्यांची सरमिसळ झाल्याने कुठलंच म्हणणं स्पष्ट झालं नाही. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

बहुआयामी लेख..

उपास
Mon, 11/23/2009 - 21:29 नवीन
नमस्कार काळेकाका, एकूणात लेख आवडला पण बर्‍याच मुद्द्यांना हात घातलाय आपण, प्रत्येक मुद्दा हा स्वतंत्र उपमुद्दा होऊ शकतो.. तसेच गोर्‍यांविषयीचे काही तर्क काळा चष्मा लावून काढलेले वाटले :) स्वाती२ यांचे स्पष्टीकरण आणि अनुभवकथन विशेष आवडले. प्रत्येक समाजाच्या, वयोगटाच्या समस्या आहेत पण दुसर्‍याचे स्वातंत्र्य जपून (त्याला गृहीत न धरता) त्यावर तोडगा काढण्याची अमेरिकन वृत्ती मला तरी निश्चित अपिल करते. उदा. द्यायचे तर, तुमच्या आयकॉन प्रभृतींबद्दल. एका दृष्टीकोनातून (जो तुम्ही मांडलाय) छान चित्र दिसते, पण.. १. त्या माणसाबरोबर त्याच्या कुटुंबाची ससेहोलपट होते त्याचं काय? त्या व्यक्तिने आई वडिलांसाठी परत जाणं पत्करलं तर त्यासाठी त्याच्या बायकोने तिच्या करिअर वगैरेंच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी सोडायचं का? मुलीने इतक्या लहान वयात अमेरिका-भारत्-पुन्हा अमेरिका अस संक्रमण अंगावर घ्यायचं का? विचार करा, मुंबईला शिकणार्‍या एखाद्या विद्यार्थ्यास वडिलांच्या बदलीमुळे कुठेतरी चिखलवाडीत जाऊन शिकायला लागतय आणि मग पुन्हा मुंबईत येतोय काही काळाने, कसं असेल त्याचं आयुष्य, कसे जोडले जातील मित्र? काय मिळेल शैक्षणिक स्थैर्य? २. दुसरं म्हणजे आयकॉनच्या ह्या केस मध्ये वडिलांना अमेरिकेत उतार वयात येऊन, इथल्या मेडिकल तसेच सगळ्या सिस्टीमशी जुळवून घेणं, तिथले मित्र, नातेवाईक सोडून इकडे येणं सोप्प असेल का? ह्यावर तिन्ही पिढ्यांनी दाखवलेले सामंजस्य हा एकच उपाय आहे, आणि हे इतके व्यक्तिसापेक्ष प्रश्न आहेत की सगळ्यांना एकच उपाय लागू होणे नाहीच पण परांजपेंच्या अथश्री चा किंवा इथल्या रीटायर्ड होम्स चा पर्याय व्यवहार्य आहे हे नक्की. पुन्हा एकदा चांगली चर्चा घडवून आणल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला.. - माझा ब्लॉग - उपास, मार आणि उपासमार
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा