निव्वळ अप्रतिम लिखाण.
मॉर्गनबुवा, या क्रिकेटदैवतांचे दर्शन करून दिल्याबद्दल आभारी आहे.
शेवटच्या परीच्छेदातील शब्दाशब्दाशी सहमत आहे!
"Great Power Comes With Great Responsibilities"
सह्ही लिहले आहे...मालिका अशीच सुरु ठेवावी. :)
मदनबाण.....
The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
बॉल पायांत असूदे वा शॉर्ट... मधल्या यष्टीच्या रेषेच्या आत पडला की साहेबांची ही अदाकारी बघायला मिळतेच मिळते. उजवा हात डाव्याच्या वर येतो... अफलातून टायमिंग साधत चेंडू मिडविकेटच्या डावीकडून ते यष्टीरक्षकाच्या शेजारून.. अश्या मोठ्या "रेंज"मध्ये मन मानेल तिथे मारला जातो.
--- अगदी, अगदी. यष्टीरक्षकाच्या शेजारून अशाच रवाना केलेल्या एका शॉटचा हा फोटो पहा:
क्या बात है यार.
लक्ष्मणचा रिस्टचा वापरपण अफलातून असतो.
स्ट्रेट ड्राईव्ह मारण्यासाठी लेफ्ट एलबोचा परफेक्ट वापर फार महत्वाचा असतो.
पण ह्या माणसानी एका मॅचमधे चक्क रिस्टी स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे.
अॅक्शन फ्लिकची, आणि बॉल जातो थेट बॉलरच्या मागे सीमापार.
बाकी लेखातल्या वाक्या-वाक्याशी सहमत.
सचिन काय, वॉ बंधू काय, सनथ काय, किंवा द्रविड काय, क्रिकेट मधले देव आहेत सगळे.
आमच्या आवडत्या खेळावरचा एक नितांत सुंदर लेख....
लिहीत रहा भौ.....लवकर टाक पुढचा भाग...
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
मस्त लेखन. अजून येऊ दे..!
सच्या केवळ ग्रेटच. डीप थर्डमॅनच्या डोक्यावरुन शोयब अख्तरला थेट प्रेक्षकात भिरकावल्याचे मला स्मरते. त्याचा फोटो आहे का ?
पण सच्याच्या फील्डींगवर माझा काय विश्वास नाय राव. म्हणजे हातात येणारे, थोडेफार पळत जाऊन घेणारे झेल, स्लीपमधील झेल तसे अवघडच पण तिथेही तो उत्तमच. पण कधी झेप घेऊन झेल पकडल्याचे स्मरत नाही. पार फरफट जावून चेंडू अडवल्याचेही आठवत नाही.
-दिलीप बिरुटे
>> मधल्या यष्टीच्या रेषेच्या आत पडला की साहेबांची ही अदाकारी बघायला मिळतेच मिळते.
१००% सहमत. बरेचदा आपल्या काळजाचा ठोका चुकतो पण चेंडू सुसाटतो :)
अपर कटबद्दल सांगायचं तर तेंडल्या आणि सेहवागने ह्या फटक्याला पूर्णत्व दिलं. विशेषत २००३ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरूद्ध पहिल्या ५ षटकांत ५० ठोकताना ह्यांनी अगदी, "च्यायला ! तुला काय वाटलं रे, तुला एकट्यालाच अपर कट येतो? हा बघ मी कसा सणकवतोअ ते" असं जणू एकमेकांना म्हणत षटकार खेचले.
बाकी थर्ड मॅनच्या डोक्यावरून षटकार मारणारा (निदान माझ्या आठवणीतला) पहिला फलंदाज म्हणजे पुण्याचा रियाज पूनावाला :)
मी ढोपराएवढा असताना क्रिकेट खेळायची सुरुवात पूनावाला सरांकडे केली होती. ते आक्रमक बॅटिंग करायचे आणि नंतर यू ए ई ला स्थाईक झाले हे आठवतंय. सुलतान झरवानीच्या ९६ विश्वचषक संघात ते बहुधा होते !
अगदी प्रत्येक चेंडुवर षटकार..
पहिल्या ओळी पासुन लेख संपुच नये असे वाटत होते...अजुनही त्याच धुंदीत आहोत.
पण साहेब, असे तुटक तुटक नका लिहु!
द वॉल ला अन्संग हीरो म्हणता आणि तुम्ही पण त्याला उपेक्षित ठेवता... नाही त्याच्यावर पुर्ण भाग टाका .. अगदी कॉपी बुक ड्राईव्ह मारणार, यशस्वी कॅप्टन बॅटसमन, स्लिप मधला उत्कृष्ठ कॅचर, विकेट कीपर अजुन काय काय? मी तर म्हणीन २०-२० मध्ये सचिन \ कुणाही पेक्षा द्रवीड चांगला खेळतो आणि हे त्याच्या क्रीकेटला वाहुन घेण्याचे आणू काळानुसार खेळ बदलण्याचे सर्वात मोठे यश आहे.
खरेच येऊ दे द्रविडी स्पेशल ...
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
ही शोकेससुद्धा मनासारखी झाली आहे.
अझ्झूभाई आमचाही आवडता खेळाडू होता. लोभापायी करियर घालवून बसला बिचारा, दैवदुर्विलास!
ह्या दुव्यावर १९९८ साली न्यूझीलंड विरुद्ध काढलेलं त्याचं शतक पहाता येईल.
ऑफसाईडच्या ३ स्लिप्स, पॉइंट, कवर्स मधून ह्या अवलियाने जे काही स्क्वेअरकट, लेटकट आणि ड्राईव्जचे अफलातून दर्शन दिले आहे ते केवळ नयनरम्य! प्रत्येक वेळी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या जवळून खिजवत खिजवत, जमिनीशी लगट करत सीमारेषेकडे आणि टायमिंग असे की क्षेत्ररक्षकाला आशा लागून रहावी की आत्ता गाठेन, मग गाठेन, आत्तातरी गाठेन पण नाहीच! केवळ लाजवाब.
मला आणखी एक आवडणारी गोष्ट म्हणजे ह्याचा सिंगल अॅक्शन फील्ड आणि थ्रो. अझ्झू एक उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक होता. चेंडूवर नजर इतकी पक्की की वेगाने मारलेला चेंडू एका हाताने अडवून, उचलून त्याच वाकलेल्या अवस्थेत यष्टींवर किंवा यष्टिरक्षकाकडे अचूक फेकणे हे येरागबाळ्याचे काम नोहे!
तुमचा संपूर्ण लेखच इतका सुंदर आहे की काय काय म्हणून वर्णन करु?
(पण लिखाण अजून थोडे मोठे चालेल राव! हे म्हणजे एक पुरणपोळी खाऊन पुढच्याची वाट बघत बसावं तर एकदम उठून आंचवायलाच गेल्यासारखं वाटतं! ;) )
चतुरंग
ही इनिंग तर ग्रेटच. शिवाय अझ्झूभाईंनी पाकिस्तानविरुद्ध टोरोंटोच्या मालिकेत २ मॅचेस मध्ये अक्रम वकार ला फोड फोड फोडला होता. शिवाय एकदा डर्बन ला भाई आणि साहेबांनी ५ बाद ५८ वरून ६ पेक्षा जास्त रनरेटनी २३० धावांची भागीदारी केली होती. डोनाल्ड, क्लूसनर, पोलॉक, मॅकमिलन, अॅडम्स.. कोणीच दोघांच्या तडाख्यातून सुटलं नव्हतं. अझर ११० चेंडूंत ११५ आणि सच्या २५३ चेंडूंत १६९. हाहाकार माजवला होता !
तेव्हाचा एक किस्सा आठवतो. अझरने अॅडम्सला फ्लिकची फोर मारली तेव्हा समालोचक म्हणाला Can’t understand how he can play that shot with such a light bat. आणि पुढच्या ओव्हरला सच्यानी फ्लिक मारल्यावर म्हणाला Can’t understand how he can play that shot with such a heavy bat !
द्रवीड आणी लक्ष्मण प्रमाणेच सदागोप्पन रमेश नावाचा कसोटी खेळाडू होता.
लेझी बॅट्समन म्हणता येइन त्याना,पण अक्रम ,अख्तर सारख्या द्रुतगती गोलंदाजांना रडू आणलेले त्याने...:-)
पू भा प्र......:-)
बैलोबा ६+४ = १० डुलकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
तुमच्या प्रतिसादांनी मिपा किती क्रिकेट आणि क्रीडाप्रेमी आहे हेच दाखवून दिलं. विस्ताराने लिहिण्याची सर्वांची सूचना सर आँखोंपर ! खरंच हे सगळेच खेळाडू इतके महान आहेत की प्रत्येकावर एक पुस्तक लिहून होईल. असे अनेक सामने, प्रसंग असे आहेत की जे काल घडल्यासारखे आठवतात. त्यातल्या काहींबद्दल लिहायला नक्कीच आवडेल. अजून लाराचा पुल, मॅक्ग्राचा गुडलेंग्थ बॉल, मुरलीचा दूसरा... लई मोठी लिस्ट आहे राव ! नक्की लिहायचा प्रयत्न करीन.
हा प्रयत्न तुम्हाला आवडला ह्याचा आनंद आहे. पुनश्च धन्यवाद !
जे. पी.
डोनाल्ड आणि आर्थरटन यांच्यासंदर्भात एक महत्वाचा उल्लेख म्हणजे ट्रेंट ब्रिज टेस्टमध्ये डोनाल्डचा बॉल आर्थरटनच्या ग्लोव्हला लागून गेला होता आणि बाऊचरने एकदा कॅच घेतला होता! डोनाल्डने जोरदार अपिल केल्यावरही अंपायर स्टीव्ह डन याने आर्थरटनला नॉटाऊट दिल्यावर डोनाल्डचा विश्वास बसला नाही. आर्थरटन जागचा हललाही नव्हता.
डोनाल्डच्या मते तो आर्थरटनला म्हणाला, "You better be f****** ready for what's coming because there'll be nothing in your half."
आर्थरटनच्या मते डोनाल्ड म्हणाला, "You f****** cheat."
या सर्वाचं साद्यंत वर्णन करणारा मार्टीन विल्यमसनचा लेख - http://www.espncricinfo.com/magazine/content/story/144135.html
प्रतिक्रिया
लय
अफलातून!
फारच छान
मालक
परफेक्ट
परा शी
+१
सुंदर्र!!
हेच म्हणतो
सह्ही
लै भारी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
भारीच!!
वा
क्या
आमच्या
मस्त लेखन.
सेंच्युरियन चा धोबीघाट
अदाकारी आणि अपर कट
रियाज पूनावाला?
षटकार
सुरेख लेखन हो मॉर्गन साहेब!
टोरोंटो - वि. पाकिस्तान आणि डर्बन वि. दक्षिण आफ्रिका
दिल खुश
स्सही !!
खतरनाक
आवडला
मस्त
धन्यवाद मंडळी
मस्त
संदीप
निव्वळ अफलातून
सचिन / द्रविड
एकदम बरोबर
डोनाल्ड आणि आर्थरटन