✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग २

ज
जे.पी.मॉर्गन यांनी
Tue, 11/17/2009 - 15:40  ·  लेख
लेख

Book traversal links for हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग २

  • ‹ हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....
  • Up
  • हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19793 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

लय

फ्रॅक्चर बंड्या
Tue, 11/17/2009 - 16:09 नवीन
लय भारी... लेखन आवडले
  • Log in or register to post comments

अफलातून!

ज्ञानेश...
Tue, 11/17/2009 - 16:23 नवीन
निव्वळ अप्रतिम लिखाण. मॉर्गनबुवा, या क्रिकेटदैवतांचे दर्शन करून दिल्याबद्दल आभारी आहे. शेवटच्या परीच्छेदातील शब्दाशब्दाशी सहमत आहे! "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

फारच छान

मोहन
Tue, 11/17/2009 - 16:30 नवीन
अप्रतीम. थांबू नका. ( पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत) मोहन
  • Log in or register to post comments

मालक

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/17/2009 - 16:45 नवीन
मालक सर्वांग सुंदर लेखन हो :) फक्त असे 'चटावरचे श्राद्ध' उरकु नका. एकदम येव्हडे 'प्रेक्षणीय फटके' एकाच षटकात मारण्यापेक्षा, एक एक खेळाडु घेउन त्याला 'कुरवाळायचा... थोपटायचा.. क्वचित कधीतरी प्रेमानी एक टपली मारायचा' उपक्रम राबवलात तर खुप आनंद वाटेल. ©º°¨¨°º© परादादा गांगुली ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

परफेक्ट

शक्तिमान
Tue, 11/17/2009 - 16:58 नवीन
प.रा.शी सहमत.. बाकी लेख अफलातून झाला आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परा शी

गणपा
Tue, 11/17/2009 - 20:47 नवीन
परा शी सहमत. सुंदर वर्णन, लाजवाब फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शक्तिमान

+१

झकासराव
Wed, 11/18/2009 - 09:19 नवीन
मस्त सुरु आहे लेखमाला. आता पुढच्या लेखात मॅग्रा येवु दे. त्याने टाकलेला प्रत्येक बॉल नेम धरुन टाकल्यासारखाच. बिलकुल चुकायचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सुंदर्र!!

आशिष सुर्वे
Tue, 11/17/2009 - 17:03 नवीन
सुंदर्र वर्णन! 'मार्क वॉ' चे वर्णन करताना 'व्हायोलिनच्या बो' ची दिलेली उपमा अप्रतिम!! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

मी_ओंकार
Tue, 11/17/2009 - 17:39 नवीन
लेख अतिशय सुंदर. - ओंकार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

सह्ही

मदनबाण
Tue, 11/17/2009 - 17:04 नवीन
सह्ही लिहले आहे...मालिका अशीच सुरु ठेवावी. :) मदनबाण..... The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
  • Log in or register to post comments

लै भारी

नंदन
Tue, 11/17/2009 - 17:08 नवीन
बॉल पायांत असूदे वा शॉर्ट... मधल्या यष्टीच्या रेषेच्या आत पडला की साहेबांची ही अदाकारी बघायला मिळतेच मिळते. उजवा हात डाव्याच्या वर येतो... अफलातून टायमिंग साधत चेंडू मिडविकेटच्या डावीकडून ते यष्टीरक्षकाच्या शेजारून.. अश्या मोठ्या "रेंज"मध्ये मन मानेल तिथे मारला जातो.
--- अगदी, अगदी. यष्टीरक्षकाच्या शेजारून अशाच रवाना केलेल्या एका शॉटचा हा फोटो पहा: Image removed.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

भारीच!!

घाटावरचे भट
Tue, 11/17/2009 - 17:10 नवीन
भारीच!!
  • Log in or register to post comments

वा

श्रावण मोडक
Tue, 11/17/2009 - 17:26 नवीन
लेखन चालू राहू द्या. जमून येतंय.
  • Log in or register to post comments

क्या

सुमीत भातखंडे
Tue, 11/17/2009 - 18:24 नवीन
क्या बात है यार. लक्ष्मणचा रिस्टचा वापरपण अफलातून असतो. स्ट्रेट ड्राईव्ह मारण्यासाठी लेफ्ट एलबोचा परफेक्ट वापर फार महत्वाचा असतो. पण ह्या माणसानी एका मॅचमधे चक्क रिस्टी स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. अ‍ॅक्शन फ्लिकची, आणि बॉल जातो थेट बॉलरच्या मागे सीमापार. बाकी लेखातल्या वाक्या-वाक्याशी सहमत. सचिन काय, वॉ बंधू काय, सनथ काय, किंवा द्रविड काय, क्रिकेट मधले देव आहेत सगळे.
  • Log in or register to post comments

आमच्या

प्रभो
Tue, 11/17/2009 - 20:08 नवीन
आमच्या आवडत्या खेळावरचा एक नितांत सुंदर लेख.... लिहीत रहा भौ.....लवकर टाक पुढचा भाग... --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

मस्त लेखन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/17/2009 - 20:18 नवीन
मस्त लेखन. अजून येऊ दे..! सच्या केवळ ग्रेटच. डीप थर्डमॅनच्या डोक्यावरुन शोयब अख्तरला थेट प्रेक्षकात भिरकावल्याचे मला स्मरते. त्याचा फोटो आहे का ? पण सच्याच्या फील्डींगवर माझा काय विश्वास नाय राव. म्हणजे हातात येणारे, थोडेफार पळत जाऊन घेणारे झेल, स्लीपमधील झेल तसे अवघडच पण तिथेही तो उत्तमच. पण कधी झेप घेऊन झेल पकडल्याचे स्मरत नाही. पार फरफट जावून चेंडू अडवल्याचेही आठवत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सेंच्युरियन चा धोबीघाट

जे.पी.मॉर्गन
Wed, 11/18/2009 - 12:12 नवीन
हा बघा ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अदाकारी आणि अपर कट

संदीप चित्रे
Tue, 11/17/2009 - 20:40 नवीन
>> मधल्या यष्टीच्या रेषेच्या आत पडला की साहेबांची ही अदाकारी बघायला मिळतेच मिळते. १००% सहमत. बरेचदा आपल्या काळजाचा ठोका चुकतो पण चेंडू सुसाटतो :) अपर कटबद्दल सांगायचं तर तेंडल्या आणि सेहवागने ह्या फटक्याला पूर्णत्व दिलं. विशेषत २००३ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरूद्ध पहिल्या ५ षटकांत ५० ठोकताना ह्यांनी अगदी, "च्यायला ! तुला काय वाटलं रे, तुला एकट्यालाच अपर कट येतो? हा बघ मी कसा सणकवतोअ ते" असं जणू एकमेकांना म्हणत षटकार खेचले. बाकी थर्ड मॅनच्या डोक्यावरून षटकार मारणारा (निदान माझ्या आठवणीतला) पहिला फलंदाज म्हणजे पुण्याचा रियाज पूनावाला :)
  • Log in or register to post comments

रियाज पूनावाला?

जे.पी.मॉर्गन
Wed, 11/18/2009 - 10:23 नवीन
मी ढोपराएवढा असताना क्रिकेट खेळायची सुरुवात पूनावाला सरांकडे केली होती. ते आक्रमक बॅटिंग करायचे आणि नंतर यू ए ई ला स्थाईक झाले हे आठवतंय. सुलतान झरवानीच्या ९६ विश्वचषक संघात ते बहुधा होते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

षटकार

हर्षद आनंदी
Tue, 11/17/2009 - 20:40 नवीन
अगदी प्रत्येक चेंडुवर षटकार.. पहिल्या ओळी पासुन लेख संपुच नये असे वाटत होते...अजुनही त्याच धुंदीत आहोत. पण साहेब, असे तुटक तुटक नका लिहु! द वॉल ला अन्संग हीरो म्हणता आणि तुम्ही पण त्याला उपेक्षित ठेवता... नाही त्याच्यावर पुर्ण भाग टाका .. अगदी कॉपी बुक ड्राईव्ह मारणार, यशस्वी कॅप्टन बॅटसमन, स्लिप मधला उत्कृष्ठ कॅचर, विकेट कीपर अजुन काय काय? मी तर म्हणीन २०-२० मध्ये सचिन \ कुणाही पेक्षा द्रवीड चांगला खेळतो आणि हे त्याच्या क्रीकेटला वाहुन घेण्याचे आणू काळानुसार खेळ बदलण्याचे सर्वात मोठे यश आहे. खरेच येऊ दे द्रविडी स्पेशल ... आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

सुरेख लेखन हो मॉर्गन साहेब!

चतुरंग
Tue, 11/17/2009 - 21:26 नवीन
ही शोकेससुद्धा मनासारखी झाली आहे. अझ्झूभाई आमचाही आवडता खेळाडू होता. लोभापायी करियर घालवून बसला बिचारा, दैवदुर्विलास! ह्या दुव्यावर १९९८ साली न्यूझीलंड विरुद्ध काढलेलं त्याचं शतक पहाता येईल. ऑफसाईडच्या ३ स्लिप्स, पॉइंट, कवर्स मधून ह्या अवलियाने जे काही स्क्वेअरकट, लेटकट आणि ड्राईव्जचे अफलातून दर्शन दिले आहे ते केवळ नयनरम्य! प्रत्येक वेळी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या जवळून खिजवत खिजवत, जमिनीशी लगट करत सीमारेषेकडे आणि टायमिंग असे की क्षेत्ररक्षकाला आशा लागून रहावी की आत्ता गाठेन, मग गाठेन, आत्तातरी गाठेन पण नाहीच! केवळ लाजवाब. मला आणखी एक आवडणारी गोष्ट म्हणजे ह्याचा सिंगल अ‍ॅक्शन फील्ड आणि थ्रो. अझ्झू एक उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक होता. चेंडूवर नजर इतकी पक्की की वेगाने मारलेला चेंडू एका हाताने अडवून, उचलून त्याच वाकलेल्या अवस्थेत यष्टींवर किंवा यष्टिरक्षकाकडे अचूक फेकणे हे येरागबाळ्याचे काम नोहे! तुमचा संपूर्ण लेखच इतका सुंदर आहे की काय काय म्हणून वर्णन करु? (पण लिखाण अजून थोडे मोठे चालेल राव! हे म्हणजे एक पुरणपोळी खाऊन पुढच्याची वाट बघत बसावं तर एकदम उठून आंचवायलाच गेल्यासारखं वाटतं! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

टोरोंटो - वि. पाकिस्तान आणि डर्बन वि. दक्षिण आफ्रिका

जे.पी.मॉर्गन
Wed, 11/18/2009 - 10:46 नवीन
ही इनिंग तर ग्रेटच. शिवाय अझ्झूभाईंनी पाकिस्तानविरुद्ध टोरोंटोच्या मालिकेत २ मॅचेस मध्ये अक्रम वकार ला फोड फोड फोडला होता. शिवाय एकदा डर्बन ला भाई आणि साहेबांनी ५ बाद ५८ वरून ६ पेक्षा जास्त रनरेटनी २३० धावांची भागीदारी केली होती. डोनाल्ड, क्लूसनर, पोलॉक, मॅकमिलन, अ‍ॅडम्स.. कोणीच दोघांच्या तडाख्यातून सुटलं नव्हतं. अझर ११० चेंडूंत ११५ आणि सच्या २५३ चेंडूंत १६९. हाहाकार माजवला होता ! तेव्हाचा एक किस्सा आठवतो. अझरने अ‍ॅडम्सला फ्लिकची फोर मारली तेव्हा समालोचक म्हणाला Can’t understand how he can play that shot with such a light bat. आणि पुढच्या ओव्हरला सच्यानी फ्लिक मारल्यावर म्हणाला Can’t understand how he can play that shot with such a heavy bat !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

दिल खुश

उमराणी सरकार
Wed, 11/18/2009 - 10:47 नवीन
अझहर चे स्क्वेअर कट्स निव्वळ बिनतोड आणि कलाईचा सुरेख उपयोग करुन केलेले फ्लिक्स म्हणजे ब्रह्मानंदी टाळीच बघा. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

स्सही !!

अनिल हटेला
Tue, 11/17/2009 - 21:45 नवीन
द्रवीड आणी लक्ष्मण प्रमाणेच सदागोप्पन रमेश नावाचा कसोटी खेळाडू होता. लेझी बॅट्समन म्हणता येइन त्याना,पण अक्रम ,अख्तर सारख्या द्रुतगती गोलंदाजांना रडू आणलेले त्याने...:-) पू भा प्र......:-) बैलोबा ६+४ = १० डुलकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments

खतरनाक

भडकमकर मास्तर
Wed, 11/18/2009 - 00:03 नवीन
खतरनाक जमलाय लेख... अजून येऊद्यात... शिवाय डोनाल्ड आथरटन लढाई , किंवा गूचचे मार्क वॉबद्दलचे वाक्य या गोष्टींनी तर फार मजा आली
  • Log in or register to post comments

आवडला

फारएन्ड
Wed, 11/18/2009 - 04:01 नवीन
हा ही लेख एकदम आवडला. मजा आली वाचायला. फोटोंची निवडही एकदम अचूक!
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Wed, 11/18/2009 - 06:38 नवीन
मॉर्गनसर मिपाचे स्पोर्ट्स डायरेक्टर!!! [ पिटी मास्तर ] जय हो!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी

जे.पी.मॉर्गन
Wed, 11/18/2009 - 10:34 नवीन
तुमच्या प्रतिसादांनी मिपा किती क्रिकेट आणि क्रीडाप्रेमी आहे हेच दाखवून दिलं. विस्ताराने लिहिण्याची सर्वांची सूचना सर आँखोंपर ! खरंच हे सगळेच खेळाडू इतके महान आहेत की प्रत्येकावर एक पुस्तक लिहून होईल. असे अनेक सामने, प्रसंग असे आहेत की जे काल घडल्यासारखे आठवतात. त्यातल्या काहींबद्दल लिहायला नक्कीच आवडेल. अजून लाराचा पुल, मॅक्ग्राचा गुडलेंग्थ बॉल, मुरलीचा दूसरा... लई मोठी लिस्ट आहे राव ! नक्की लिहायचा प्रयत्न करीन. हा प्रयत्न तुम्हाला आवडला ह्याचा आनंद आहे. पुनश्च धन्यवाद ! जे. पी.
  • Log in or register to post comments

मस्त

चेतन
Wed, 11/18/2009 - 11:10 नवीन
मस्त लेख अजुन काही स्टायलिश खेळाडु (जरुर वाचायला आवडेल) भारतीयः के श्रिकांत, सिद्धु , युवराज ऑस्ट्रेलियनः गिली, हेडन, ब्रेट ली, सायमंड्स वेस्टंडिजः चंद्रपॉल, गेल, लारा न्युझिलंडः अ‍ॅस्ट्ल, केर्न्स, हॅरिस श्रिलंका: जयवर्धने, अरविंद डिसिल्व्हा, रणतुंगा, दिलशान, मलींगा, वास साउथ आफ्रिका: कॅलिस, क्लुसनर, कर्स्टन,पोलॉक इग्लंड: पिटर्सन्,फ्लिंटॉफ पाकिस्तान: अन्वर, अक्रम, इंजमाम चेतन
  • Log in or register to post comments

संदीप

विजुभाऊ
Wed, 11/18/2009 - 13:22 नवीन
संदीप पाटील हा भारतीय क्रिकेट मधला सर्वात स्टायलीश खेळाडू. त्याच्या बद्दल थोडे लिहिता आले तर बघा ना बॉ Image removed. जय महाराष्ट्र.....
  • Log in or register to post comments

निव्वळ अफलातून

सुमीत
गुरुवार, 11/19/2009 - 16:40 नवीन
काय खुमासदार फटकेबाजी वाचायला मिळाली आहे आज :) हा लेख, प्रतिसाद आनी अजून काही पूरक जोडून एक नवी कोष बनवता येईल क्रिकेट साठी मिपा वर.
  • Log in or register to post comments

सचिन / द्रविड

बाबा पाटील
Wed, 07/15/2015 - 20:51 नवीन
एकच वाक्य बोलाव वाटतय्,सचिन जन्माला आला आणी राहुल घडत गेला.स्वतःला घडवत गेला.__/\_
  • Log in or register to post comments

एकदम बरोबर

राघवेंद्र
Wed, 07/15/2015 - 21:08 नवीन
एकच वाक्य बोलाव वाटतय्,सचिन जन्माला आला आणी राहुल घडत गेला.स्वतःला घडवत गेला.__/\_
एकदम बरोबर मित्रा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

डोनाल्ड आणि आर्थरटन

स्पार्टाकस
गुरुवार, 07/16/2015 - 06:21 नवीन
डोनाल्ड आणि आर्थरटन यांच्यासंदर्भात एक महत्वाचा उल्लेख म्हणजे ट्रेंट ब्रिज टेस्टमध्ये डोनाल्डचा बॉल आर्थरटनच्या ग्लोव्हला लागून गेला होता आणि बाऊचरने एकदा कॅच घेतला होता! डोनाल्डने जोरदार अपिल केल्यावरही अंपायर स्टीव्ह डन याने आर्थरटनला नॉटाऊट दिल्यावर डोनाल्डचा विश्वास बसला नाही. आर्थरटन जागचा हललाही नव्हता. डोनाल्डच्या मते तो आर्थरटनला म्हणाला, "You better be f****** ready for what's coming because there'll be nothing in your half." आर्थरटनच्या मते डोनाल्ड म्हणाला, "You f****** cheat." या सर्वाचं साद्यंत वर्णन करणारा मार्टीन विल्यमसनचा लेख - http://www.espncricinfo.com/magazine/content/story/144135.html
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा