आलो की जेवायचे कुणाकडे हे हा लेख वाचून मी ठरवून टाकले आहे. कारण 'चवीने खाणार्याबरोबर भोजन केले की मोक्ष मिळतो' असे वेदात (३.अ.२८०९१) मध्ये वाचल्याचे स्मरते.
फारच रुचकर लेख!
अख्ख्या मसूराची उसळ करताना फार शिजवून त्याचे गरगट करणे ही माझी खासियत होती. हल्ली जरा शिजवताना कधी थांबायचे हे कळते आहे. डिंगरी/मुळ्याच्या शेंगांची साधी पटकन होणारी कोशिंबीर हाही छान प्रकार आहे. मुळ्याच्या कोवळ्या शेंगा बारीक चिरून, कच्चे तेल, गोडा मसाला, तिखट, मीठ, साखर, लिंबूरस. बाकी पालेभाज्यांबद्दल काय बोलावे? तो तर अशक्त बिंदू आहे सगळ्यांचा. भारतात असताना कुठली भाजी करू? असा प्रश्न पडत नाही. उलट भाजी रिपिट होत नाही असे वाटते. इथे मेल्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, मग बटाटा हीच पर्यायी भाजी असते. छे बुवा! फारच आठवणी येताहेत भाज्यांच्या!:)
रेवती
आख्ख्या मसुराला लसणाची फोडणी देऊन मस्तपैकी उसळ-वरण करण्यात हातखंडा असल्याचा आपला समज आहे. (तो खरा असल्याचं बायकोचं म्हणणं आहे.)
बाकी लेख नेहमीप्रमाणे रूचकर, चविष्ट.
(भोचक)
इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं!
हा आहे आमचा स्वभाव
मस्त ....सुंदर लेख......
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
रावसाहेब आपल्या खवय्येगीरीला सलाम. सुरेख लिहिलयत.
शेवट पर्यंत लाळ टपकत होती वाचताना.
>>शेवग्याच्या पानाची भाजी आणि ओल्या हरभर्याच्या पानांची भाजी.
आजीची आठवण करुन दिलीत. आजी अशी फक्कड करायची आणि जोडिला त्यांचीच भजी.
>> मुळ्याच्या कोशिंबिरीसारखी कोशिंबीर नाही.
लाखमोलच बोललात. गेल्याच आठवड्यात केली होती.
मुळा न आवडणार्या अनेकांना नंतर बोटं चाटायला भाग पाडलय ;)
हे गणपाभाऊ आले की रेशिपी नाहीतर फटू घेऊनच येतात!
आधीच लेखामुळे वाईट मानसिक अवस्था त्यातून हा फोटू!;)
अवांतर: कोशिंबीर छान सजवलीये. नेत्रसुख म्हणतात ते हेच असेल!:)
रेवती
जेवता जेवता वाचण्यासाठी खास ठेवून दिला होता हा लेख! :) मजा आली.
वर्णन बरेच बारकाईने केले आहेत. पालेभाज्यांची खवय्येगिरी ही मी भरपूर अनुभवली ती मिरजेला शिकायला रहात होतो तेव्हा. मावशीकडे नियमितपणे ताज्या भाज्या येत करडई, मेथी, लाल माठ, तांदुळजा, कांद्याची पात, अळू, हिरवा माठ, शेपू, पालक, घोळ, अंबाडी कितीतरी.
मावशीकडे समाधान की गणेश अशा नावाची एक चूल बांधून घेतलेली होती बर्याचदा त्यावर स्वैपाक होई. चुलीतल्या आगटीत भाजायला घातलेले कांदे आणि वांगी स्वयंपाक होईस्तो मस्त खरपूस भाजून निघत. जेवताना तोंडी लावायला काय मजा यायची वा!
शेंगदाण्याच्या किंवा लसणाच्या झणझणीत चटणीला कच्चं करडीचं तेल मिसळून ज्वारीच्या भाकरीबरोबर हाणणे म्हणजे स्वर्गसुखच. हाच आनंद नुसता कच्चा काळा मसाला (पण हा कांद्याचा हवा) अधिक तेल ही जोडगोळी सुद्धा देते.
अंबाडीची भाजी आणि वरून चरचरीत लसणाची फोडणी मारलेलं तेल असं भाकरीबरोबर खाताना जगातल्या समस्त गोष्टी यःकश्चित वाटायला लागतात.
शेवग्याच्या शेंगांबद्दलही मीही असाच अशिष्ठ आहे. शेंग सोलून दाताने गर काढून खाल्ल्याखेरीज काय मजा आहे राव? उगीच आपलं पंगतीचा नसता आब-बीब राखण्याच्या भानगडीत मी पडत नाही, मस्त सोलून, चाखून बिखून खातो शेंगा (मग माझं बघून इतरही चार जण हळूच इकडे तिकडे बघत शेंगा सोलायचा प्रयत्न करतात! ;) )
चतुरंग
अंबाडीची भाजी आणि वरून चरचरीत लसणाची फोडणी मारलेलं तेल असं भाकरीबरोबर खाताना जगातल्या समस्त गोष्टी यःकश्चित वाटायला लागतात.
+१००००
लेख तर नेहमी प्रमाणे चवीष्टच.
सुजय
अळू तर पात्रता फेरीतून एकदम फायनललाच जावे तसा श्राद्धापक्षांतून एकदम लग्नाच्या पंगतीतच जाऊन बसला आहे. =)) =)) =))
हे वाचून एकदम फस्सकन् हसू आलं. सॉल्लिड!! एकदम पटलं.
लेख छान ,सुंदर च्या पलिकडे गेला आहे. चमचमीत तर आहेच पण.. बर्यापैकी झणझणीतही आहे.
सुंदर लेखाबद्दल रावसाहेब तुमचं अभिनंदन!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
लहानपणी समजायला लागलं तेव्हापासूनचा काळ असा एखाद्या माँटाजसारखा डोळ्यापुढे तरळून गेला. आई आणि हयात असलेल्या व नसलेल्या सर्व आज्या, मावश्या, काकवांच्या हातच्या स्वयंपाकाच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलं (क्षणभर वाटलं की एखादा थेंब चुकून डोळ्यांतही आला असावा), आणि भारतात पळून जावंसं वाटलं...
धन्यवाद रावसाहेब!!
- भटोबा
हा भाग उल्लेखनीय. वाचनखुण साठवली आहे.
असे पुण्यात हॉटेल आहे का? जिथे यातील बर्यापैकी पदार्थ ते देखील चांगल्या चवीचे नियमीत मिळतात?
तश्या बर्यापैकी भाज्या लक्षात आहेत पण भारतदौरा करताना परत एकदा लक्षात ठेवायला आयती लिस्ट दिल्याबद्दल धन्यवाद.
लेखन आवडले.
>बीट बाकी स्वतःचे काहीही अस्तित्व नसलेले. केवळ 'लोह' हा विचार करुनच खायच्या लायकीचे.
हे विशेष पटले नाही. स्वतःचे खूप अस्तित्व नसले तरी इतर गोष्टींबरोबर छान "जाते". उकडून चिरलेल्या बिटाची थोडे दही, कच्चा कांदा मध्यम आकाराचा चिरून थोडे मीठ- थोडी हवी असल्यास साखर घालून केलेली कोशिंबीर छान लागते.
बीट आवडत नसल्यास एका प्रकारे अजून खाऊन पहावे - बिटाचे उकडून मध्यम लांबी/जाडीचे काप करावेत. कांदाही तसाच उभा चिरावा. बिट/कांद्यात ऑलिव्ह ऑईल, व्हिनेगर आणि किंचित मीठ घालून मुरवावे.
>आमसुलाची चटणी तिला लाभलेल्या संदर्भाने एरवी अस्पर्श झाली आहे, पण तीही एक वेगळीच खमंग चव.
खरे आहे.
ह्याला थोडा वेगळा पर्याय म्हणजे जिरे आणि आमसुले एकत्र वाटून (खूप बारीक नाही) गोळी करायची, आणि ती पिठीसाखरेत घोळवून जेवणानंतर खायची. लहानपणी मला पाट्यावर करू द्यायचे असा हा एकच पदार्थ होता.
आणि खाद्योपजीवीये| विषेशी लोकी इये|दृष्टादृष्टविजये होआवे जी||
आम्ही नेहमीच म्हणतो, मस्त दुपारचे असेच मस्त जेवण आणि मग तास दोन तास झोप. मग जगी सर्व सुखी असा दुसरा कोण आहे?
क्या बात है ! खुपच छान
आपल्या या लेखाने आता कुठलिही भाजी चवीने ( लेख आठवत ) खाल्ली जाईल यात शंका नाही.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
कांद्याच्या पातीची पीठ पेरुन केलेली भाजी आणि तव्यावरुन डायरेक्ट पानात आलेली भाकरी हे कसे न मोजता खायचे काम आहे. सोबत शेंगदाण्याची जाडसर वाटलेली चटणी असली तर क्या कहने!
खल्लासच ! :)
हाही लेख चवदार झालाय. रविवारच्या दुपारी जेवणात जर गरम गरम मटकीची, चवळीची आमटी असेल तर चपात्या भराभर संपतात. मस्त टम्म जेवून झाल्यावर झोपण्यापेक्षा हृषीदांचा ’गोलमाल’ किंवा 'चुपके चुपके' पाहत बसायच.
अस्सल कढीला असले काही नखरे लागत नाहीत. कढी, खिचडी, तूप, मेतकूट, पापड .. फारफारतर लिंबाचे लोणचे. 'माणसाला किती जागा लागते?' या धर्तीवर 'जगात सुखी व्हायला फार काय लागते?' असा प्रश्न पाडणारे हे जेवण .
मराठी खाद्यपदार्थाच्या संपन्न साम्राजाची सफर खुपच आवडली.
कोवळ्या हरभर्याची सकाळी खुडुन आणलेल्या कोवळ्या पानाची भाजी,त्यात शेंगदाणे व चवीसाठी खरडा घालुन केलेली भाजी काय चवीची असते ते खाल्याशिवाय लक्षात येणार नाही.
सुंदर लेखाबद्दल परत एकदा धन्यवाद.
वेताळ
लेख चांगला झालायं
आमच्या कोकणात डाळिंब्या नावाचा एक प्रकार असतो म्हणजे वालाला मोड आणुन मग साल काढुन कांदा लसुण घालुन केलेली उसळ. (चापुन खावी अशी लागते.)
चेतन
भूक चाळवली हे वाचता वाचता..! =P~
हादग्याच्या फुलांची भाजी आमच्याकडे बर्याचदा होते! खूप चविष्ट असते. प्रॉब्लेम एवढाच की खूप सार्या फुलांची थोडीशीच भाजी बनते!
:(
"Great Power Comes With Great Responsibilities"
विश्वास ठेवा . वाचुन खरोखरीच "निशब्द" झालो.
गावच्या आठवणी ताझ्या झाल्या. थंडीत सकाळी पाखरं राखताना भुक लागल्यावर खालेला गरमागरम हुरडा,मक्याची कोवळी कणसं, शेणात आंड लपेटुन ते चुलीत टाकावं आणि शेकल्यावर गट्कन मटकवाव. आह्हाहाहा......
खयालोंमे, खयालोंमे, खयालोंमे मझा मुंगेरीलाल झाला आणि तो केल्या बद्द्ल लक्ष लक्ष धन्यवाद
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
लेख सकाळीच बघितला होता. पण जेवण झाल्याशिवाय वाचायचा नाहि हे ठरवून आत्ता उघडला.. माझ्याच निर्णयाचे मला कौतूक वाटते :)
या अप्रतिम रेचचेलीत माझी अत्यंत आवडीची भरपूर ओले खोबरे घालून केलेली सागरमेथी (वाळूतील मेथी) विसरल्याबद्दल णिशेध! ;)
याच बरोबर पावसाळ्यात शेवळं, करवं वगैरे पावसाळी पालेभाज्यांची आपलीच एक वेगळी मजा आठवली.
मस्त लेख!
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
संजोपरावांच्या लेखणीतुन उतरलेला आणखी एक फक्कड लेख!
बस्स..ह्यापलिकडे संजोपरावांच्या लेखनाबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावे?
बाकी संजोपराव,
ह्या सरंजामात मिरचीचा ठेचा/खर्डा आला असता तर मजा आली असती :)
ह्या सरंजामात मिरचीचा ठेचा/खर्डा आला असता तर मजा आली असती
खरे आहे. मिरचीचा खर्डा, वर्हाडी ठेचा, चिंचेची चटणी आणि कर्नाटकी चटणी पूड राहून गेले...
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
श्री. संजोप राव साहेब,
तुम्ही शेपूची भाजी आणि हुलग्याची उसळ या अनुक्रमे पालेभाजीची राणी व कडधान्यांचा राजा असलेल्यांना का वगळले हे कळले नाही.
मुळ्याप्रमाणेच शेपूचीही टेस्ट डेवलप करावी लागते... मुगाची भिजवलेली डाळ घालून ठेचलेला भरपूर लसूण घालून केलेली शेपू कुठल्याही अमेरिकन बर्गर-पिझ्झ्याच्या मुस्काटीत मारुन जाते. हुलग्याची उसळ तर क्या कहने. त्यावर एक लेखच लिहावा लागेल.
मिपाची टिमकी वाजवायची असं नाही, परंतु मिपाच्या निमितानं संजोपला योग्य ते कोंदण मिळालं असं म्हणू इच्छितो..
संजोपने असंच सुंदरतेने येथे मनमुराद लिहावंन असंच मनापासून वाटतं..
शुभेच्छा..
खाद्ययात्रेचा पुढला भाग येऊ दे लौकर..
(सजोपचा चंचीमित्र) तात्या.
प्रतिक्रिया
पुण्यात
पुलंच्या
बट...बट
नेहमीप्रम
फारच रुचकर
रूचकर
मस्त
रावसाहेब
हे गणपाभाऊ
नेहमीप्रन
उत्तम लेख
छान लेखन!
अंबाडीची
अळू तर
पीठ पेरुन
अत्यंत सुंदर
भारी
लेखन आवडले
आणि
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
काल तर
पोट भरले..
छान
क्या बात
परत परत वाचावासा लेख
अगागागा..
- बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, लेकुरवाळी भाजी, लोणी आणि ताजे ताक
- बटाट्याच्या रसभाजीत फ्लॉवर
- कांद्याच्या पातीची पीठ पेरुन केलेली भाजी आणि तव्यावरुन डायरेक्ट पानात आलेली भाकरी
- भरल्या वांग्याची शेंगदाण्याचे कूट, काळा मसाला, कांदा, कोथिंबीर, मीठ, गूळ आणि लालभडक तिखट घालून केलेली भरली भाजी
- गवारीची शेंगदाणे घालून केलेली सुकी भाजी
- तुरीच्या डाळीच्या आमटीतल्या शेवग्याचा शेंगा
- कटाच्या आमटीबरोबर पुरणपोळी
- भगरीच्या जोडीला येणार्या शेंगदाण्याच्या आमटी
- कढी, खिचडी, तूप, मेतकूट, पापड
8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8>मस्त
सुखी माणसाचे जेवण
सन्जोपराव......एकदम जबरदस्त......
लेख छानच.
सूंदर लेख..
नेहमीसारख
आधिच्या
लेख चांगला
सुंदर!
श्री.रा.रा. रावसाहेब सा.न.वि.वि,
मस्तच लेख
चवदार
मस्त
वाह!!!!! काय
मस्त
चांगला लेख
खल्लास!
मिरचीचा खर्डा
स्वतंत्र
शेपूची भाजी
झ क्का स ! ! !
मिपाची
असेच म्हणतो
सुंदर-
Pagination