कायस्थी चिंबोरीचे कालवण
काल इंटर्नॅशनल मार्केटमधे ब्ल्यू क्रॅब मिळाले. ते घेऊन इतर खरेदी बाजूला ठेवून तसेच घाईघाईने घरी आलो. तरी तासाभराचा प्रवास होताच. पण काही घोळ न होता चिंबोर्या सुखरूप घरी पोचल्या. तेव्हा संडे स्पेशल चिंबोरीचे कालवण.
साहित्य
६ चिंबोर्या(चांगल्या जिवंत बघून घ्याव्यात)
२ मोठे कांदे बारीक चिरुन
१/४ चमचा हिंग
१/२ चमचा हळद
१ चमचा तिखट
मीठ चवीप्रमाणे
२-३ कोकम
हिरवे वाटण
१/२ इंच आले
५-६ लसूण पाकळ्या
मुठभर कोथिंबीर
१-२ हिरव्या मिरच्या
तळला मसाला
१ कांदा उभा चिरुन
१ वाटी किसलेले सुके खोबरे
४-५ काळे मिरे
२ लवंगा
१ इंच दालचिनीचे दोन तुकडे
१ टी बडिशोप
१ टे स्पून धणे
कृती
चिबोर्यांच्या मोठ्या नांग्या आणि बारीक पाय काळ्जीपूर्वक काढून घ्याव्या. चिंबोर्या साफ करून स्वच्छ धुवाव्या. आमच्याकडे हे काम माझा नवरा करतो. हिरवे वाटण करून मोठे नांगे आणि चिबोरीला चोळावे. हळ्द, तिखट ही घालावे. बारीक पाय मिक्सर मधून काढून त्याचा रस गाळून घ्यावा. उभा चिरलेला कांदा तव्यावर थोड्या तेलावर तपकिरी रंगावर तळून घ्यावा. चांगला परतला की बाजूला काढून सुके खोबरे भाजून घ्यावे. ते तांबुस झाले की धणे, बडिशोप, लवंग, दालचिनी, मिरे परतून घ्यावे. सर्व एकत्र वाटून बाजुला ठेवावे.
आता मोठ्या पातेल्यात २ चमचे तेल मध्यम आचेवर चांगले तापवावे. त्यात हिंगावर कांदा टाकावा. कांदा जरा परतावा. मऊ झाला की हिरवे वाटण लावलेल्या चिंबोर्या घालून परतावे. बाजूला ठेवलेला पायाचा रस घालावा. थोडे पाणी घालून चिंबोर्या शि़जवाव्या. शि़जल्या की लाल होतात. तळला मसाला आणि कोकम घालावे. ज्या प्रमाणात रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी घालावे. चवी प्रमाणे मीठ घालावे. चांगली उकळी आणावी.


वाचने
6509
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त....पाहू
+१
In reply to मस्त....पाहू by प्रभो
+१
पाय सुद्धा
स्वाती ग!!
मस्तच की..
अवांतर ४ -
In reply to मस्तच की.. by सुनील
+१
In reply to मस्तच की.. by सुनील
अरे व्वा!!
अरे!
In reply to अरे व्वा!! by स्वप्निल..
चायनीज
In reply to अरे! by लवंगी
आधी टॅग
क्या बात है !
लेख वाचूनच
सर्वांचे
झकास