Skip to main content

कायस्थी चिंबोरीचे कालवण

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 16/11/2009 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
कायस्थी चिंबोरीचे कालवण काल इंटर्नॅशनल मार्केटमधे ब्ल्यू क्रॅब मिळाले. ते घेऊन इतर खरेदी बाजूला ठेवून तसेच घाईघाईने घरी आलो. तरी तासाभराचा प्रवास होताच. पण काही घोळ न होता चिंबोर्‍या सुखरूप घरी पोचल्या. तेव्हा संडे स्पेशल चिंबोरीचे कालवण. साहित्य ६ चिंबोर्‍या(चांगल्या जिवंत बघून घ्याव्यात) २ मोठे कांदे बारीक चिरुन १/४ चमचा हिंग १/२ चमचा हळद १ चमचा तिखट मीठ चवीप्रमाणे २-३ कोकम हिरवे वाटण १/२ इंच आले ५-६ लसूण पाकळ्या मुठभर कोथिंबीर १-२ हिरव्या मिरच्या तळला मसाला १ कांदा उभा चिरुन १ वाटी किसलेले सुके खोबरे ४-५ काळे मिरे २ लवंगा १ इंच दालचिनीचे दोन तुकडे १ टी बडिशोप १ टे स्पून धणे कृती चिबोर्‍यांच्या मोठ्या नांग्या आणि बारीक पाय काळ्जीपूर्वक काढून घ्याव्या. चिंबोर्‍या साफ करून स्वच्छ धुवाव्या. आमच्याकडे हे काम माझा नवरा करतो. हिरवे वाटण करून मोठे नांगे आणि चिबोरीला चोळावे. हळ्द, तिखट ही घालावे. बारीक पाय मिक्सर मधून काढून त्याचा रस गाळून घ्यावा. उभा चिरलेला कांदा तव्यावर थोड्या तेलावर तपकिरी रंगावर तळून घ्यावा. चांगला परतला की बाजूला काढून सुके खोबरे भाजून घ्यावे. ते तांबुस झाले की धणे, बडिशोप, लवंग, दालचिनी, मिरे परतून घ्यावे. सर्व एकत्र वाटून बाजुला ठेवावे. आता मोठ्या पातेल्यात २ चमचे तेल मध्यम आचेवर चांगले तापवावे. त्यात हिंगावर कांदा टाकावा. कांदा जरा परतावा. मऊ झाला की हिरवे वाटण लावलेल्या चिंबोर्‍या घालून परतावे. बाजूला ठेवलेला पायाचा रस घालावा. थोडे पाणी घालून चिंबोर्‍या शि़जवाव्या. शि़जल्या की लाल होतात. तळला मसाला आणि कोकम घालावे. ज्या प्रमाणात रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी घालावे. चवी प्रमाणे मीठ घालावे. चांगली उकळी आणावी.

वाचने 6509
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

मस्त....पाहूनच भूक लागली.... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

मस्त....पाहूनच भूक लागली.... --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

=P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ खेकडा/चिंबोर म्हणजे जिव का प्राण. अगदी अशिच बनवतात आमच्य कडे पण.

खूप खूप भुक लागली फोटो बघून . जेवायला कधी बोलवतेस? चिंबोर्‍या जीव कि प्राण ग. वर्षे लोटली ताज्या चिंबोर्‍या पाहून. मीपण शोधते आता..

खायला जरा जास्त वेळ लागतो म्हणून अप्रतिम चव असली तरी, निगुतीने खाण्यास वेळ असेल तरच हा प्रकार करावा, खावा आणि तृप्त व्हावे! किंचित वेगळी, उत्तम पाकृ. अवांतर १ - चिंबोर्‍या, खेकडा, कुर्ल्या अशा विविध नावांनी हा प्राणी ओळखला जातो. अवांतर २ - शीर्षकावरून असे वाटते की, चिंबोर्‍यांनादेखिल जात असते! तेव्हा शीर्षक कायस्थी चिंबोरीचे कालवण असे ठेवण्याऐवजी चिंबोरीचे कायस्थी (पद्धतीचे) कालवण, असे ठेवल्यास गैरसमज होणार नाहीत! अवांतर ३ - सोमवारी ही पाकृ वाचल्याबद्दल आता मला पाप लागणार!! अवांतर ४ - पौर्णिमेच्या दिवशी चिंबोर्‍या अधिक भरलेल्या असतात, हा समज खरा की खोटा? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

अवांतर ४ - पौर्णिमेच्या दिवशी चिंबोर्‍या अधिक भरलेल्या असतात, हा समज खरा की खोटा? अगदि खरा..

In reply to by सुनील

खायला जरा जास्त वेळ लागतो म्हणून अप्रतिम चव असली तरी, निगुतीने खाण्यास वेळ असेल तरच हा प्रकार करावा, खावा आणि तृप्त व्हावे! असेच म्हणते. छान पाककृती. किंचित वेगळी, उत्तम पाकृ. तुम्ही वेगळे कसे करता?

माझ्या मित्राची आई यु.एस. ला आल्यामुळे मला आजच खायला मिळाले :) (फक्त तमीळ पद्धतीचे पण एकदम झक्कास होते हे नक्की) स्वप्निल

In reply to by स्वप्निल..

तुम्हाला कुठे मिळताहेत ताज्या चिंबोर्‍या??

In reply to by लवंगी

चायनीज स्टोअर मध्ये मिळतात .. फिनिक्स मध्ये स्वप्निल

आधी टॅग बंद करतो. ह्मम्म चिंबोर्‍या म्हणजे अंमळ कष्टच असतात खायला..

लेख वाचूनच कायस्थ तृप्त झाला/झाली असेच म्हणते........ चिंबोरी खाणे म्हणजे सगळी कामे आटपुन निवांतपणे फडशा पाडणे यात आमचा देखिल हातखंडा आहे एक प्रश्न -हॉटेलात चिंबोरी लोक कशी खाऊ शकतात बुवा? :? "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

सर्वांचे आभार! @लवंगी शेजारीच आहात तेव्हा केव्हाही या जेवायला! यावेळी चिंबोर्‍या खायला फार वेळ लागला नाही. वालमार्ट मधे नट क्रॅकर मिळाले. नट क्रॅकरच्या कृपेने पटापट फडशा पाडला गेला.

उत्तम पाककृती. जियो!!! आण्णा चिंबोरी