हे लुटण्या आले अमुच्या देशा, उर्मट सोजीर गोरे
का लोकही अमुचे मिंधे होती, स्वत्व विकुनी सारे?
हे गरीबा शोषून फ़िरती मजेने, मिजास दाविती मारे
का खावी आम्ही मीठ भाकरी? हे भरती ह्यांचे डेरे!
तो नंगा फ़कीर झंझावाती, राष्ट्रभक्तीचे वारे
ही ठोका परतुनी परकी सत्ता, सारा देश पुकारे
तो बापु महात्मा म्हणे अहिंसा, शस्त्र अनोखे घ्यारे
ते शरमेने मान झुकवुनी, पळतील घरा बिचारे
ते घराघरातुनी शूरवीर मग, घेउनी जमले झेंडे
ते शस्त्रहीन अहिंसक “सैनीक”, रक्तही त्यांचे सांडे
ते झुकले नाही, देशभक्तीपर गायन करती तांडे
तो सिंहनाद करी भारत प्यारा, संगीनी संगती भांडे
ते ठोकती जाचक करास, घेती गरीबांकडुनी दंड
ते मीठही खाणे अपमानास्पद, हसती गोरे पुंड
ये बापु धावुनी, उपाय घेउनी पुकारले हो बंड
हे मीठ सागरी धन अमुचे, का आम्हास व्हावे बंद?
ते जमले बापुमागे लाखो, मीठ निर्मीती करण्याला
तो मानवसागर घाम गाळतो, मुक्त कराया नमकाला
हो सागरही लज्जीत जेव्हा, मीठ मिळाले मीठाला
हे मुठीतले ते धन अमुचे, जाउनी सांगा गोऱ्याला
(चाल बदलून)
ते संग्रामी सारे मीठ कराया, मुक्त धावले तटी तटी
ते अश्वसैन्य घातले चिरडण्या, गरीबांच्या उघड्या पाठी
ते गर्जती जयजय भारत, मिटुनी मुठी साहुनी लाठी
त्या खाऱ्या जखमा गाती, होती मिठास मिठास मोठी
त्या खाऱ्या जखमा गाती, होती मिठास मिठास मोठी
काव्यरस
वाचने
8123
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम काव्य..
मस्त!
तो नंगा फ़कीर झंझावाती, राष्ट्रभक्तीचे वारे
गांधी
In reply to तो नंगा फ़कीर झंझावाती, राष्ट्रभक्तीचे वारे by हर्षद आनंदी
त्याकाळच्
In reply to गांधी by अरुण मनोहर
फारच छान
कवितेतील
+१
In reply to कवितेतील by पक्या
क्रांतीका
In reply to +१ by मदनबाण
मनोहर साहेब
In reply to क्रांतीका by अरुण मनोहर
तात्याराव
In reply to मनोहर साहेब by नंदू
.
In reply to +१ by मदनबाण
सुरेख
चांगली कविता
रसि़कांचे
दुर्दैव....
माझे उत्तर
In reply to दुर्दैव.... by अमोल खरे
आणि त्यांच्यासाठी काय केले त्याने
In reply to माझे उत्तर by अरुण मनोहर
मी तर बॉस
In reply to आणि त्यांच्यासाठी काय केले त्याने by अमोल खरे
पुन्हा एकदा
In reply to आणि त्यांच्यासाठी काय केले त्याने by अमोल खरे
न राहवून...
In reply to पुन्हा एकदा by ऋषिकेश
+२
In reply to न राहवून... by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to न राहवून... by बिपिन कार्यकर्ते
न रहावून (माझेही मत)
In reply to पुन्हा एकदा by ऋषिकेश
ज्यांनी
In reply to न रहावून (माझेही मत) by हुप्प्या
आमल्या,
In reply to ज्यांनी by विसोबा खेचर
सहमत
In reply to पुन्हा एकदा by ऋषिकेश
ज्ञ कसा लिहाल?
In reply to आणि त्यांच्यासाठी काय केले त्याने by अमोल खरे
असो.
In reply to आणि त्यांच्यासाठी काय केले त्याने by अमोल खरे
छान
खरं
चांगली
साला,
कविता सुंदर. खूप आवडली.
ह्म्म्म
प्रसंग