Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निमीत्त मात्र on Wed, 11/11/2009 - 00:30
  • Log in or register to post comments
  • 29090 views

प्रतिक्रिया

Submitted by निमीत्त मात्र on गुरुवार, 11/12/2009 - 03:08

In reply to छान प्रस्ताव! by समंजस

Permalink

छान

छान प्रस्ताव मांडला आहे.
धन्यवाद!
मात्र ह्या भांडणात नेहमी प्रमाणे दोन गट आहेत. मनसे आणि सपा. नुकसान भरपाई ची अपेक्षा फक्त मनसे कडुनच का?? मनसेशी राजकीय वैर आहे म्हणून?? की आणखी इतर काही कारण??
अबू वाईट त्याची माणसे वाईट हे सगळे कबूल आहे. पण मग "चांगल्या" लोकांनी कसे वागावे ह्याविषयी चर्चा अपेक्षीत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 11/12/2009 - 10:24

In reply to छान by निमीत्त मात्र

Permalink

अबू वाईट

अबू वाईट त्याची माणसे वाईट हे सगळे कबूल आहे. पण मग "चांगल्या" लोकांनी कसे वागावे ह्याविषयी चर्चा अपेक्षीत आहे.>>> इथे मुड चर्चेचा कमी एखाद्याला शिक्षा करण्याचा जास्त वाटतोय. बरं असं म्हणायचाय का? तो तर वाईटच आहे, त्याच्या कशाला नादी लागताय, त्याला घालायची ती काशी घालु द्या. ह्या चांगल्याने त्या वाईटपणाला जशास तसे प्रत्युत्तर दिलेय तर त्याबद्दल चांगल्याला मात्र शिक्षा व्हायलाच हवी. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on गुरुवार, 11/12/2009 - 10:44

In reply to अबू वाईट by विशाल कुलकर्णी

Permalink

ह्या

ह्या चांगल्याने त्या वाईटपणाला जशास तसे प्रत्युत्तर दिलेय तर त्याबद्दल चांगल्याला मात्र शिक्षा व्हायलाच हवी.
पुण्यात ३० बसेस फोडल्या.कोथरुडात लहान मुलांच्या बसेसवरही दगडफेक केल्याचे वाचले. हे अगदी जशास तसे प्रत्युत्तर आहे नाही? तसेही तुमचे आजवरचे प्रतिसाद बघता असल्या गोष्टींना तुमचे समर्थन असणे स्वाभाविकच आहे. चालू द्या..
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 11/12/2009 - 10:50

In reply to ह्या by निमीत्त मात्र

Permalink

३० बसेस? पण

३० बसेस? पण त्या फ़ोडणारे फ़क्त मनसेचेच लोक होते याला काही पुरावा आहे. त्यात मनसेचे अधिकृत कार्यकर्ते किती होते. आणि वाहत्या गंगेत हात धुवुन घेणारे किती होते? सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on गुरुवार, 11/12/2009 - 11:53

In reply to छान by निमीत्त मात्र

Permalink

दगडफेक

दगडफेक, जाळपोळ हे प्रकार चांगली लोकं करत नाही असं तुमचं म्हणणं आहे तर :? मी तरी लहाणपणा(माझ्या) पासुन हे असेच प्रकार पाहत आलो आहे. सर्वच पक्षांना/लोकांना असले प्रकार करताना बघत आलोय. म्हणजे जसे की, १.पुतळ्याची विटंबना झाली म्हणून, दगडफेक, जाळपोळ २.एकाच पक्षातल्या, एका नेत्यानी दुसर्‍या नेत्यावर आरोप केल्यामुळे, दगडफेक, जाळपोळ. ३.विधानसभेचं/लोकसभेचं तिकीट नाही मिळालं म्हणून, दगडफेक, जाळपोळ ४.नेत्याला हत्येच्या आरोपाखाली अटक झाली म्हणून, दगडफेक, जाळपोळ. ५.नेत्याची हत्या झाली म्हणून, दगडफेक, जाळपोळ. आणि इतर. अश्या प्रकारच्या घटना बघत आल्या मुळे मला वाटायचं की, फक्त हेच प्रकार योग्य आणि समाज मान्य आहेत विरोध/निषेध व्यक्त करण्याकरीता. मात्र तुम्ही म्हणत आहात तर, असतील काही वेगळे आणि चांगले प्रकार विरोध/निषेध व्यक्त करण्याकरीता आणि काम करवून घेण्या करीता. मी तरी त्याबाबतीत अज्ञाणी आहे. तरीही, आपण चर्चा प्रस्तावक म्हणून विनंती करू इच्छीतो की आपणांस माहित असण्यार्‍या काही चांगल्या क्रुती (विरोध/निषेध व्यक्त करून, तसेच मागणी मान्य करून घेण्याकरीता), चांगल्या लोकांकरीता सांगाव्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 11/12/2009 - 12:08

In reply to दगडफेक by समंजस

Permalink

+१

अगदी सहमत ! तसे असेल तर गेली चाळीस वर्षे बंगालमध्ये कम्युनिस्टांनी जे केलय ते नक्की कशात मोडतं? सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by आशिष सुर्वे on Wed, 11/11/2009 - 11:05

Permalink

संवाद

इथे मला 'फास्ट अ‍ॅन्ड फ्युरीयस-टोकियो ड्रिफ्ट' चित्रपटातला एक संवाद उध्दॄत करावासा वाटतो.. There's an old saying - ''For want of a nail...the horseshoe was lost. For want of a horseshoe, the steed was lost. For want of a steed...the message was not delivered. For want of an undelivered message.....the war was lost.'' मतितार्थ असा की कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात छोट्या छोट्या घटनांपासून होते आणि असल्या छोट्या छोट्या घटना, छोट्या छोट्या गोष्टी, मोठ्या बदलांची नांदी असतात.. शिवरायांचे स्वराज्य मावळ्याच्या बलिदानांवर उभे राहिले होते हे विसरता कामा नये! असो, तरीही,
काल कोथरुडात लहान मुलांच्या बसेसवरही दगडफेक केल्याचे वाचले.
ह्या घटनेचे समर्थन मी मुळीच करणार नाही. - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

Submitted by दिलीप वसंत सामंत on Wed, 11/11/2009 - 22:30

Permalink

चांगल्या माणसांनी कसे वागावे

मराठी संतांनी पूर्वीच सांगितले आहे कसे वागावे ते. "भले तरी देऊ कासेची लंगोटी || नाठाळाचे काठी हाणूं माथा ||" " तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा" का हो हे भरपाई वगैरे सारे मराठी माणसाच्या बाबतीतच का??? यापूर्वीच्या आंदोलनांचे काय ? यापुढे होणार्‍या आंदोलनांचे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on गुरुवार, 11/12/2009 - 09:53

Permalink

ऑ....पुण्यात बसेस चालतात होय?

कधीपासुन?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 11/12/2009 - 11:58

In reply to ऑ....पुण्यात बसेस चालतात होय? by कुंदन

Permalink

मनसेच्या

मनसेच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करता यावी म्हणुन स्पेशल सोडल्या होत्या.. सोलापुर डेपोमधुन! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on गुरुवार, 11/12/2009 - 09:53

Permalink

ऑ....पुण्यात बसेस चालतात होय?

कधीपासुन?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशु on गुरुवार, 11/12/2009 - 17:08

Permalink

माफी मागा..

सुहास ने जे स्पष्टीकरण दिले आहे ते पुरेसे बोलके आहे. स्वतः काहि करायचे नाहि आणी इतरांनी काहि केले कि म फालतु तत्व चिवडत बासायची हा. कालच्या लोकसत्त्तात पण टाकसाळ नामक कुणी तरी असलचं काहि तरी लिहिलं होतं लहान मुलांच्या बस बद्द्ल काहिहि शहानिशा न करता सरळ मनसे वर आरोप केल्या बद्द्ल माफी मागा... जय महाराष्ट्र....
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com