अचूक माहीती अशी: त्याना शिवसैनिकानी मुस्काडवले होते चांगलेच.
अवांतरः पण हे मनसेचे चुकलेच असे वारंवार ठोकून सांगताना वागळे यांचा चेहेरा फुललेला होता. पण मनसेने केले ते योग्य का अयोग्य यावर त्यानी लावलेल्या कौलाला जेव्हा ९७% लोकानी योग्य असे उत्तर दिले तेव्हा त्याचा चेहेरा बघण्यासारखा झाला होता. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
डानराव, रोखठोक प्रतिसाद. आवडला !
मला वाटते कर भरला, मतदान केले की आपले कर्तव्य संपले का?
ज्यांना आपण निवडून दिलेय, प्रतिनिधी म्हणुन तिथे पाठवलेय ते आपले काम व्यवस्थित करताहेत की नाही? करत नसल्यास ते करावे म्हणुन किंवा का करत नाही म्हणून आपण त्यांना जाब विचारतो का?
तेही आपले कर्तव्यच नाही का?
जाब विचारायचा झाल्यास तो कुठल्या मार्गाने.....
पाकिस्तानी राज्यकर्ते आणि आपले राज्यकर्ते यांच्यात एक मुलभुत साम्य आहे ते म्हणजे गेंड्याची कातडी . त्याना निषेधपत्रे पाठवून चालत नाहीत कारण अशा पत्रांची काही दखलच घेतली जात नाही, त्यांना सरळ केराची टोपली दाखवली जाते. (अपवादाबद्दल क्षमस्व)
अशा लोकांचे कानांपर्यंत आपली बाजु मांडायची असेल तर हुतात्मा भगतसिंगांनी म्हटल्याप्रमाणे मोठा आवाजच (उदा. स्फोटाचा आवाज) करावा लागतो. इथे अबु आझमीच्या कानाखाली वाजवल्याचे निमीत्त झाले. पण असे काही होणार याची अबु आझमी आणि सरकार यांनाही कल्पना होती. मग सरकाराने याला अटकाव करण्याचा काहीच प्रयत्न का केला नाही? की असे काही व्हावे याचीच सरकार वाट पाहात होते.
तसे असेल तर मनसे जर दोषी ठरत असेल तर अबु आझमी आणि सरकार हे ही तितकेच दोषी ठरतात. मग रोख एकट्या मनसेवरच का?
या सगळ्या प्रकरणात मनसे आमदारांना आधी चप्पल दाखवणारे अबु आझमी कुणालाच का दिसत नाहीत?
गेली कित्येक वर्षे आपण ही श्री. निमीत्तमात्र यांच्या शब्दात वैचारीक नंपुसकत्वाचीच भुमिका घेवुन जगतो आहोत म्हणुन आज त्यांची एवढी हिंमत होते. आज नवाब मलिक सारखे मुस्लीम आमदार्/खासदार मराठीत बोलतातच ना, मग यांनाच काय समस्या आहे.
अवांतर : आजची मटाची बातमी "अबू, शिक रे... अ आ ई!"
वीस वर्षाच्या राजकारणाने जे शिकवले नाही ते अबुला एका थपडेने शिकवले. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
सहमत!
मनसे वर आणि आधी शिवसेने वर आग पाखड करणार्यांना दुसर्यांच्या चुका का दिसत नाहीत/नव्हत्या हे माझ्या करता एक आश्चर्य आहे.
ज्या दिवशी विधानसभेतली घटना घडली त्याच दिवशी सपाच्या कार्यकर्त्यांनी भिवंडीत कित्येक बसेस वर दगडफेक केली होती. त्या क्रुती बद्दल, त्या नुकसाना बद्दल बोलावसं वाटलं नाही? का? कारण ते कार्यकर्ते मनसे नव्हते म्हणून? की
सपा ची ती क्रुती आवडली म्हणून?
(कुठलाही आजार बरा करायचा असेल, तर आजाराच्या मुळ कारणाचा शोध धेऊन त्या वर उपचार करायचा असतो. आजाराच्या वर वर दिसण्यार्या लक्षणांवर नाही).
त्याचे अमृततुल्य काही विचार इथे टंकु शकाल काय?
चर्चेतुन काही निष्पन्न झाले का?
बाकीह्या मनसेअच्या राडेबाजी मुळे एका प्रामाणिक करदात्याला एकदिवस अंधारात उपासपोटी राहावे लागले.बाकी उर्वरित महाराष्ट्रात त्यावेळी प्रकाशात अगदी न्हाउन निघाला होता. अतिसामान्य लोक स्वस्ताईमुळे तुडुंब जेवुन कामधाम न करता,कर न भरता झोपी गेली होती. ह्याची ह्या मनसेवाल्याना काही फिकिरच नाही.
वेताळ
मनसेअच्या राडेबाजी मुळे एका प्रामाणिक करदात्याला एकदिवस अंधारात उपासपोटी राहावे लागले>>>>
बघा ना वेताळभाऊ, एक दिवस अंधारात उपासपोटी राहावे लागले तर एवढा त्रास झाला. देशाची साठ टक्के जनता गेली कित्येक वर्षे अंधारात (लोड शेडिंग वगैरे) उपासपोटी दिवस काढतेय त्याचे काय? की स्वतःला त्रास झाल्यावरच फक्त सामान्य जनता, लोकशाही वगैरे गोष्टी आठवतात?
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
आपल्या अनुभवाबद्दल वाईट वाटलेच. स्त्रीया, वृद्धांची, आजारी माणसांचे अशा प्रसंगी हाल होतात याच्याशी सहमत आहे. मराठी भाषा प्रेमासाठी दंगे,हाणामार्या, हे योग्य नाही. विधानसभेच्या पवित्र मंदिरात झालेली घटना योग्य नव्हे, सनदशीर मार्ग होता, प्रतिनिधींना जवाबदारीचे भान नाही. भाषेचा मक्ता कोणा एकाचा नाही. अशा वैचारिक गप्पा मारल्या म्हणजे आपले वैचारिक प्रौढत्व सिद्ध होते, त्याची काहींना गरजही असते म्हणा.
पण का कोणास ठाऊक 'आझमी चोपल्याचा' ज्या लोकांना आनंद झाला. त्यापैकी आम्ही एक. कदाचित असा आनंद कोणाच्या दृष्टीने विकृतही असेल. आबू आझमी मस्तवाल माणूस आहे, आणि त्याची मस्ती उतरलीच पाहिजे होती. झाले ते योग्यच झाले. दुसरी गोष्ट 'एक राज्य एक भाषा' असा आग्रह कोणी धरत असेल तर त्यांच्या सोबत राहण्याऐवजी अशा लोकांना गुंड वगैरे म्हणायला आपण मो़कळे, हे काही पटणारे नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस कॉग्रेस सोडून सर्व पक्ष एकत्र झाले होते, तसे सर्व इतर पक्ष मराठी भाषेचे समर्थन करण्याकरिता एकत्र यायला पाहिजे होते. पक्षभेद दूर ठेऊन एक संदेश दिल्या गेला असता, तर काय बिघडले असते. पण जिथे तिथे राजकीय पोळी भाजून घेणारे आपल्या ताटात किती पडणार याचाच विचार करणार आणि आपण काहीतरी करणा-यांच्या विरोधात कण्हत राहू... हे तर नेहमीचेच आहे.
-दिलीप बिरुटे
'एक राज्य एक भाषा' असा आग्रह कोणी धरत असेल तर त्यांच्या सोबत राहण्याऐवजी अशा लोकांना गुंड वगैरे म्हणायला आपण मो़कळे, हे काही पटणारे नाही.
+१
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
सहमत!
(नशीब त्यांचं, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला आणि त्यावेळेस
जे काही आवश्यक होतं ते केलं अश्या लोकांना गुंड नाही म्हटल्या गेलं. सध्याच्या ह्या पुरोगामी काळात, पुरोगामी लोकांनी तर नक्कीच त्यांना गुंड/समाजकटंक ठरवलं असतं)...
डॉनराव, विशालभाऊ, आणि सर्व दगडफेकी, जाळपोळीच्या काही प्रमाणातल्या समर्थकांसाठी:
कोणालाही मारण्याची काय अपरिहार्यता असते? ही दगडफेक सामान्य नागरीकांवरच का झाली, सपाच्या कार्यालयावर का नाही झाली? मोर्चातून होणारे ट्रॅफिक जॅम्स आणि त्यातून होणारी चिडचिड आणि जाळपोळ, संतप्त जमाव यांना पाहून वाटणारी भीती यात काही फरक आहे का नाही? मी मुंबैत प्रवास करायचे तेव्हा काही वेळा नर्मदा बचाववाल्यांमुळे अनेकदा मलाही उशीर झाला आहे, उपाशीपोटी, गाडीला लटकून दीड तास प्रवास करावा लागला आहे; पण तेव्हा कधी भीती वाटत नव्हती. शांतपणे ते लोकं रस्त्यावर, सब-वेमधे निदर्शनं करीत होते; सामान्य माणसाची चिडचिड झाली असेल माझ्यासारखीच, पण कधी कोणी फोन करून, प्रत्यक्ष भेटून 'काळजी घे' असं सांगितलं नाही. या राड्याच्या वेळी, नंतर लोकं 'काळजी घे, जप स्वतःला' असं का सांगत आहेत?
मी एक सामान्य माणूस, मनसेला मत देण्याची शक्यताही आहे. पण याच पक्षाच्या राडेबाजीमुळे माझ्यावरही वेळ वाईट येऊ शकते हे मला दिसलं तर मी का या लोकांना मत द्यावं? प्रत्येकाला आपापला जीव प्यारा नाही का? मराठी लोकं या राड्यांमधेच खपले तर मराठी भाषा टिकणार कुठून? कोणी आजारी माणूस, कोणी गर्भार स्त्री, कोणी तान्हुलं जन्माला यायच्या आधीच या असल्या ट्रॅफिक जॅम्समुळे दगावलं असतं तर? हुतात्मा म्हणवले जाणार होते का ते??
असाच काहीसा 'लक्षवेधक' प्रकार विधानसभेच्या समोर/जवळ नसता करता का आला? अनेक सामान्यांनी त्यांना दुवाच दिला असता. प्रसिद्धीही मिळाली असती. पण जसं अतिरेक्यांसाठी भारत हे सॉफ्ट टार्गेट आहे, तसं आपण सामान्य नागरीक हे राजकीय राडेबाजांचं सॉफ्ट टार्गेट आहोत का? अबू आझमींना फटकावून पुरेशी प्रसिद्धी नाही का मिळाली.
अदिती
मी मुंबैत प्रवास करायचे तेव्हा काही वेळा नर्मदा बचाववाल्यांमुळे अनेकदा मलाही उशीर झाला आहे, उपाशीपोटी, गाडीला लटकून दीड तास प्रवास करावा लागला आहे; पण तेव्हा कधी भीती वाटत नव्हती.
कीती उपयोग झालाय नर्मदाबचाव वाल्यांच्या निदर्शनाचा आज पर्यंत? खरं तर त्यांनी आता हाच मार्ग वापरायला हवा आहे असा सुर दिसतोय लोकांचा.
वा, कल्पना करा, आज अ राजकीय पक्ष आणि त्यांचे समर्थक आ कारणासाठी बसेस फोडताहेत, उद्या नर्मदा बचाव वाले. परवा .... वा वा! काय मजा येईल नाही सामान्यांना त्रास होत असेल तर त्यांनी गपचुप घरी बसुन टीव्ही पहावा, जसे ते मतदानाच्या दिवशी करतात त्याच प्रमाणे. :)
>>कोणालाही मारण्याची काय अपरिहार्यता असते?
मारहाण झाली आहे ती अबु आझमीला, त्यात अपरिहार्यता होते असे आम्हाला वाटते, दुसरी मते असु शकतात.
बाकी त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन "सामान्य माणसाला" पकडु पकडु धुतल्याचे माझ्या पहाण्यात नाही. सपाच्या लोकांनीही तसे केले असल्याची शक्यता नाही.
>>ही दगडफेक सामान्य नागरीकांवरच का झाली,
सामान्य नागरिकांवरच झाली ह्या वाक्याला आक्षेप आहे. काही अनावश्यक उत्साही कार्यकर्त्यांनी "बस"वर दगडफेक केली हे सत्य आहे, मात्र सामान्य माणुस हुडकुन त्याला त्रास दिला गेला असे नाही. त्या दंग्याच्या गदारोळात जे चुकुन त्यात सापडले त्यांना त्रास झाला हे सत्य असले तरी त्यात मुद्दामुन त्यांनाच टार्गेट केले गेले नाही.
सामान्य माणसालाच त्रास द्यायचा असता तर ते बसमधुन उतरल्यावरही त्यांना मारता आले असते, रस्त्याने जाणार्या गाड्या अडवुन त्यांनाही त्रास देता आला असता पण असे घडले नाही व कधीही घडत नाही अर्थातच जातीय दंग्यांचा अपवाद वगळता.
>>सपाच्या कार्यालयावर का नाही झाली?
सपा कार्यालयांवर ठिकठिकाणी योग्य ती कॄती केली आहे आंदोलकांनी. जास्त डिटेल्स पेपरमध्ये मिळु शकतील.
मोर्चातून होणारे ट्रॅफिक जॅम्स आणि त्यातून होणारी चिडचिड आणि जाळपोळ, संतप्त जमाव यांना पाहून वाटणारी भीती यात काही फरक आहे का नाही?
आहे, त्यात फरक जरुर आहे. पण अशावेळी तुमची काळजी घ्यायची जबाबदारी पोलिसांची नाही का ?
बाकी मी पुन्हा एकदा सांगतो की जातिय दंगलींचा अपवाद वळगता कुठल्याही पार्टीच्या आंदोलनात सामान्य माणसाला रस्त्यावर खेचुन त्याला मुद्दामुन त्रास दिला गेला नाही. ते समजा बसमध्ये असतील तर बसवर दगडफेक होऊ शकते पण बसमधुन उतरल्यावर कोणी त्यांना खानी कानफाटात मारत नाही अथव अनु काही करत नाही.
ह्या मुद्द्यामधला बेसिक फरक समजुन घ्यावा.
भर समुद्रात समजा आपण प्रवास करत असलेल्या जहाजाला भोक्पडले तर आत घुसणारे पाणी आपल्याला मारायला नसुन जहाज बुडवायला आत घुसत असते, आपण त्यावेळी तिथेच असल्याने आपले जे नुकसान होते ते केवळ आपण तिथे असल्याने होते. आपण समजा जीव वाचवुन जहाजातुन खाली उतरलो तर पुन्हा कोणी खेचुन आपल्याला जसे जहाजात टाकत नाही तसेच इथे घडते.
पण कधी कोणी फोन करून, प्रत्यक्ष भेटून 'काळजी घे' असं सांगितलं नाही. या राड्याच्या वेळी, नंतर लोकं 'काळजी घे, जप स्वतःला' असं का सांगत आहेत?
मुद्दा बरोबर आहे ...
पण एक सांगु का की त्या वेळी जी आंदोलने व्हायची ( अर्थात आपल्या नमर्दा आंदोलनाचा अपवाद वगळुन ) ती आजच्या एवढीच तीव्र व खतरनाक असायची, उलट कार्यकर्ते जरा जास्तच भडकु होते. मात्र त्यावेळी दुरसंचार साधनांची ( पक्षी : फोन , समस, ई-मेल्स वगैरे ) एवढी रेलचेल नसल्याने तेवढे पॅनिक होत नव्हते.
आज जरा कुठे खट्ट झाले की लाखो समस, फोन्स आणि मेल्सचा पाऊस पडतो व अनावश्यक घबराट निर्माण होते. अर्थात हे सगळेच अनाठायी आहे असे नाही पण बर्याच वेळा आपण पॅनिक निर्माण करतो हे सत्य आहे. आपल्या लोकांची काळजी आपण घ्यायलाच हवी पण ह्या सर्वामुळे उगाच क्रेझ निर्माण होऊन अजुन माणसे नक्की काय चाल्ले आहे ते पहायला रस्त्यावर उतरतात व मागनं ओरडत असतात त्याचे काय ?
शिवसेनेची गत दशकातली आंदोलने आणि त्याची तिव्रता व त्यात झालेला सामान्य माण्सला त्रास हा ताळेबंद काढल्यास मी काय म्हणतोय ते आपल्याला लक्षात येईल.
पण याच पक्षाच्या राडेबाजीमुळे माझ्यावरही वेळ वाईट येऊ शकते हे मला दिसलं तर मी का या लोकांना मत द्यावं?
तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे.
पण ठराविक एखादाच पक्ष हा "राडेबाज" आहे असा निष्कर्ष काढण्याआधी थोडे बाकीच्यांच्या चालीकडे पाहुन मग निर्णय घ्यावा ही विअनंती.
अर्थात मी इथे "मनसे"चे समर्थन करण्या अथवा न करण्याचा प्रश्न नाही.
>>प्रत्येकाला आपापला जीव प्यारा नाही का?
आहे, जरुर आहे ...
मग अशावेळी जेव्हा अशी बातमी येईल तेव्हा कॄपा करुन गाड्या घेऊन रस्त्यावर न येता सध्या आहात तिथेच सुरक्षित राहण्यात हित आहे असा निर्णय घ्यावा. सध्या बाहेर काय चालले आहे हे माहित असुनसुद्धा सधयच्या सुरक्षित ठिकाणाहुन बाहेर पडुन स्वतःचय घराकडे जाण्याचा निर्णय स्वतःच घेणे हे अट्टाहास आहे व तो निर्णय तुमचा आहे.
अखेरीस जीव ही तुमचाच आहे व तो तुम्हाला प्यारा आहे हे आहेच ना ?
कोणी आजारी माणूस, कोणी गर्भार स्त्री, कोणी तान्हुलं जन्माला यायच्या आधीच या असल्या ट्रॅफिक जॅम्समुळे दगावलं असतं तर?
करेक्ट ...
ह्या बाबतीत आपल्याशी सहमत आहे, इनफॅक्त ह्याच एका गोष्टीमुळे आम्ही नेहमी अशा रस्त्यावरच्या आंदोलनांना बाकी इतर सर्व अपरिहार्यता लक्षात घेऊनसुद्धा विरोध करतो.
असाच काहीसा 'लक्षवेधक' प्रकार विधानसभेच्या समोर/जवळ नसता करता का आला?
म्हणजे नक्की काय करायचे होते ?
मुळात ही कार्यकर्त्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया असते नेहमी. काही अपवाद वगळता नेहमीच पक्षाकडुन "राडा नको, शांत रहा" असे आदेश कार्यकर्त्यांना येतात. जो काही दंगा होतो तो पक्षाच्या बांधणीत अतिशय खालचय कक्षेत असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांकडुन होतो, त्यात पक्षश्रेष्ठींचा अपवादानेच हात असतो.
आंदोलने, मोर्चे वगैरेचे आदेश वरुन येतात पण त्यात "१० बसेस, २० गाड्या फोडा" असा आदेश वगैरे नसतो. एखादी घटना घडुन जमाव अनावर होतो व काही दु:खद घटना घडतात. बेकाबु जमावाला कोणीच नेता नसतो व तो कोणत्याही नेत्याचे ऐकतही नाही हे सत्य आहे.
अर्थात ह्यालाही अपवाद आहेत पण तो आपला विषय नाही.
पण जसं अतिरेक्यांसाठी भारत हे सॉफ्ट टार्गेट आहे, तसं आपण सामान्य नागरीक हे राजकीय राडेबाजांचं सॉफ्ट टार्गेट आहोत का?
तुलनेत प्रचंड गल्लत होते आहे,.
भारतातल्या कुठल्याच राजकिय अथव बिगरराजकिय पक्षाने सामान्य माणसाला टार्गेट करुन दंगा केल्याचे स्मरणात नाही.
( अर्थातच काही हत्यांनंतरचे पडसाद व त्यानंतरच्या दंगली वगळता )
आंदोलन हे व्यवस्थेविरुद्ध होते व त्यात ह्याच व्यवस्थेचा दुरचा दुवा असलेला सामान्य माणुस सापदतो व त्याला त्रास होतो.
अबू आझमींना फटकावून पुरेशी प्रसिद्धी नाही का मिळाली.
तो मुद्दा इथे नाही, तरीही योग्य ती आणि योग्य तितकी प्रसिद्धी मिळाली असे आम्हाला वाटते.
अवांतर : माझ्या माहितीप्रमाणे "मनसेचे ४ आमदार निलंबीत होऊनही महाराष्ट्र अजुन शांतच होता पण जेव्हा काही भागातुन सपाच्या राड्याच्या न्युजेस आल्या व मग इतर लोक ह्यात उतरले".
असो.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !------
मारहाण झाली आहे ती अबु आझमीला, त्यात अपरिहार्यता होते असे आम्हाला वाटते, दुसरी मते असु शकतात.
माझं वाक्य थोडं संदिग्ध होतं, कोणालाही मारण्याची किंवा कुठेही तोडफोड करण्यात अपरिहार्यता कसली? ही अगदीच लेम एक्सक्यूज आहे. राग योग्य ठिकाणी आणि योग्य माणसा(सां)वर काढता नाही आला की फोडा सरकारी, पर्यायाने समाजाच्या, मालकीच्या गोष्टी!
माणसावर दगडफेक झाली नसेलही, पण नाडलं कोण गेलं, सामान्य माणूसच ना? कोणाचा पोटावरचा रोजगार गेला, कोणाला कर भरल्याबद्दल निराशा दाटून आली. काय मिळवलं नक्की यातून?
बसेस का फोडल्या, आस्थापनांवर हल्ला का होतो, प्रतिकार करत नाहीत म्हणूनच ना? कोणी सैनिकी तळाच्या जवळ रहाणार्यांनी दंगा केल्याचं ऐकलं आहे का?
बर्याच वेळा आपण पॅनिक निर्माण करतो हे सत्य आहे.
१००% मान्य की आपणच पॅनिक तयार करतो. पण त्याचं मूळ कशात असतं? कधीही कोणीही आजतागायत फोन केलेला नाही की आज तुझ्या नेहेमीच्या रस्त्यावर 'नर्मदा बचाव'वाले आंदोलन करत आहेत, काळजी घे. ('नर्मदा बचाव' हे एक उदाहरण. माझा त्यांना पाठिंबा आहे का नाही हा मुद्दा इथे महत्त्वाचा नाही.)
कुठूनतरी हिंसक निदर्शनं सुरू आहे, ठिणगीचा वणवा व्हायला किती वेळ लागतो हे माझ्यासारख्या सुरक्षित शहरी वातावरणात राहिलेल्या माणसांनी सांगायची गरज नाही; पण समाजकंटकांनी याचा फायदा घेतला असता, परिस्थिती पोलिसांच्याही हाताबाहेर गेली असती तर याची जबाबदारी कोणाची?
भडकाऊ परिस्थितीत सामान्य कार्यकर्ते नेत्यांचं ऐकत नसतीलही, अगदी गांधीजीही त्याला अपवाद नव्हते. पण एकदा झालं, दोनदा झालं, किती वेळा लोकांनी हे सहन करायचं? पुण्यात काय, राज ठाकरेंना अटक झाली तेव्हा बस जाळली, आता काय पुन्हा काहीतरी झालं पुन्हा बसेस फोडल्या! मधल्या दिवसांत काही होमवर्क झालं का नाही?
हे सगळं मी मुद्दामच सपाच्या विरोधात लिहीत नाही आहे. कारण त्यांचा जो काही मुद्दा आहे, तोच मला मान्य नाही. अबू आझमींनी मराठी न येण्याचा माज करू नये हा मुद्दा १००% मान्य आहेच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी चार शब्द मी का खर्च करावेत. चांगल्या मुद्द्यासाठी, विकासासाठी लढत आहेत असं वाटत आहे, म्हणून मी मनसेला मत देण्याची शक्यता आहे असं लिहीलं आहे. इतरही काही कारणं असतील आणि इतरही काही पक्ष असतील पण मला त्यांच्याबद्दल सहानुभूती नसताना मी त्यांच्याबद्दल का लिहू? "ते लोकं ना, तसलेच आहेत", असं म्हणून बाहेरच्यांना सोडून देऊ शकते. पण माझ्या घरातल्या लोकांना मी किंवा आणखी कोणीही असं सोडून देऊ शकते का?
आंदोलन हे व्यवस्थेविरुद्ध होते व त्यात ह्याच व्यवस्थेचा दुरचा दुवा असलेला सामान्य माणुस सापदतो व त्याला त्रास होतो.
आणि ह्या नाडल्या गेलेल्या लोकांकडूनच पुन्हा मतं मागायची? का मतांच्या व्यवस्थेवरही रागच आहे?
अवांतर : माझ्या माहितीप्रमाणे "मनसेचे ४ आमदार निलंबीत होऊनही महाराष्ट्र अजुन शांतच होता पण जेव्हा काही भागातुन सपाच्या राड्याच्या न्युजेस आल्या व मग इतर लोक ह्यात उतरले".
म्हणजे सपा आणि मनसे यांच्यात काहीच फरक नाही का? "त्यांनी दोन बसेस फोडल्या काय, आम्ही जास्त पराक्रमी आहोत, आम्ही चार फोडून दाखवू", हा 'विचार' या राड्यांमागे होता का?
एरवी राज ठाकरे मिडीया गाजवतात, मनसेच्या लेटरहेडवर एक पत्रक (मागेच) नाही काढता आलं की या दगडफेकींना, जाळपोळींना, हिंसेला, सामान्यांना त्रास देणार्या घटनांना राज ठाकरे व्यक्तीशः आणि पक्षस्तरावरही निषेध करतात म्हणून! हेच 'पेटून' उठणारे लोकं सगळे नाहीतर किमान पन्नास टक्केतरी या राड्यापासून लांब नसते राहिले? मान्य आहे सामान्य कार्यकर्ते नाही एवढा विचार करू शकत, पण मग नेत्याचं काय काम?
अतिरेक्यांच्या गोळ्यांना मरणार्याचा धर्म समजत नाही, तसंच या आततायीपणामुळे होणार्या जाचालाही नाडल्या गेलेल्या माणसाची भाषा, विचारधारा समजत नाही. एक-दोन माणसं नाही काही शे माणसांना याचा त्रास होतो, पाच-पन्नास लोकांच्या भडक डोक्यांमुळे! का या सामान्य लोकांनीही कुठे काही खुट्ट झालं की स्वतःची मुंडी सोडवून घ्यायला पर्समधे वॉलेटऐवजी पिस्तुल ठेवायचं?
घाबरवणारे लोकं जेवढे सामान्य असतात, पिडीत सामान्यही तेवढेच सामान्य असतात. पण तरीही हे नाडले जाणारे लोकं जास्त चांगले वाटतात, असतात, कारण तेही आण्णासाहेबांप्रमाणे कायदा हातात घेत नाहीत.
अदिती
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांशी एकदम सहमत
वेदातै,
सुक्याबरोबर ओले जळ्णारच. औषध जरी कडु असले तरी आरोग्य सुस्थीतीत ठेवण्यासाठी जबरदस्ती करावीच लागते. लाडका मुलगा असला तरी योग्य वळण लावण्या साठी अधुनमधुन धपाटे घालावेच लागतात. कर्क रोगाची गाठ असल्यास ती कापुनच काढवि लागते नाईलाज(हा एकच ईलाज) आसतो.
बाकी आपल्याच सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान कधिही समर्थनिय ठरणार नाही."सामाजीक बहिष्कार" या अस्त्राचा उपयोग करुन पहायला हरकत नसावि. मी सुरु केला आहे.
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
ते सगळं हुच्चभ्रु, "माझ्या पोटातलं पाणी न हलता सुधारणा हवी" वगैरे छापाच्या गोष्टी कळल्या!
माझा एकमेव मुद्दा आहे, त्यावर कोणी उत्तर दिलं तर फार फार उपकार होतील.
सर्वसाधारण माहितीनुसार, आधी निदर्शनं, अबुचा पुतळा जाळणं इ.इ. प्रकार करायला जमलेल्या लोकांना पोलिसांनी विरोध केल्यावर बर्याच ठिकाणी बसवर दगडफेक(! हो असं म्हणायची पध्दत आहे, खरी दगडफेक म्हणजे काय हे दरोडा अनुभवताना कळतं...त्याशिवायच्या अनुभवावर ४ दगड इकडंतिकडं ह्यालाही दगडफेक म्हणतात!) झाली, त्या जमावात म.न.से.चे अधिकृत कार्यकर्ते किती होते? सगळॅच असतील तर इतर पक्षाच्या नेत्यांना त्या त्या भागात शिरणंही मुश्किलच असेल, नाही का? :)
बरं, प्रवासी लोकांना बसमध्ये तसेच बसवुन दगड मारले की आधी उतरु दिलं आणि मग 'दगडफेक' झाली?
"स.पा.च्या 'कार्यकर्त्यांनी' नव्या मुंबईत रेल-रोको करण्यासाठी जे दगड मारले त्यात मोटारमन घाबरुन खाली उतरला, रेल्वेतील प्रवाशांमध्ये हल्लकल्लोळ उडाला आणि जो तो जीव वाचवत पळु लागला" असं वाचलेल्या संयत बातम्यांमधुन कळते!
मग स.पा.च्या ह्या कृत्याबद्द्ल 'सामाजीक चाड/जाणिव' वगैरे वगैरे असलेल्यांनी जसं मनसेला जबाबदार धरुन दोष दिला तसं स.पा.बाबत होताना का नाही दिसत आहे?
:?
"स.पा.च्या 'कार्यकर्त्यांनी' नव्या मुंबईत रेल-रोको करण्यासाठी जे दगड
मारले त्यात मोटारमन घाबरुन खाली उतरला, रेल्वेतील प्रवाशांमध्ये
हल्लकल्लोळ उडाला आणि जो तो जीव वाचवत पळु लागला" असं
वाचलेल्या संयत बातम्यांमधुन कळते!
मग स.पा.च्या ह्या कृत्याबद्द्ल 'सामाजीक चाड/जाणिव' वगैरे वगैरे
असलेल्यांनी जसं मनसेला जबाबदार धरुन दोष दिला तसं स.पा.बाबत होताना
का नाही दिसत आहे?
धमु साहेब, मला एक कारण माहित आहे. (व्यक्तीगत अनुभवा वरून सांगतोय, कोणाला वाईट वाटू नये)
आम्ही मराठी मंडळी (बरीचशी) ही पापभिरू, सुसंस्कृत, कायदा मानणारी, भांडणाला घाबरणारी, भांडणापासून चार हात दुर राहणारी (खरंतर कायद्याला घाबरणारी) अश्या प्रकारची आहोत. तसंच आम्हाला हे माहित आहे की, घरच्या मुलांना दरडावणं, वेळप्रंसगी दोन धपाटे घालणं हे सोपं आहे. मात्र दुसर्यांच्या मुलांशी असं नाही वागता येत(इच्छा असून सुद्धा). त्यामुळे जेव्हा केव्हा आमच्या मुलाचं दुसर्यांच्या मुलाशी भांडण होतं तेव्हा, आमच्या मुलाची चुक नसताना सुद्धा, आम्ही आमच्या मुलाला आधी रागावतो, एकाध धपाटा सुद्धा घालतो, कारण हेच आम्हाला शक्य असते. काय शक्य नसते तर असे दुसर्याच्या मुला सोबत वागणे. आमच्या मुलाने जर त्याची चुक नाही, आधी दुसर्या मुलाने खोडी काढली असे कितीही सांगीतले तरी ते समजून न घेता आम्ही उलट त्याला मनाचा मोठेपणा काय, सुसंस्कृतपणा काय, आमचे विचार किती उच्च, भांडण/मारामारी किती निरर्थक हे सांगतो. मग बिचार्या आमच्या मुला कडे गप्प राहण्या वाचून काही पर्याय नसतो. तसंच पुढे भविष्यात जेव्हा केव्हा त्याच्यावर भांडण लादलं जातं, किंवा कोणी खोडी काढतं तेव्हा आमचा मुलगा चुकुनही ते प्रकरण घरापर्यंत जाउ देत नाही. मग वेळप्रसंगी तडजोड करावी लागली (दुसर्या मुला सोबत, जसे की त्याच्या खोड्यां कडे दुर्लक्ष करणे, बोलणी ऐकून घेणे, वगैरे) तरी गत्यंतर नाही. (माझा लहाणपणाचा अनुभव)
तर हे सांगण्याचं कारण की, का काही लोक मनसे/शिवसेनेला दोष देतात आणि सपा / इतरांना नाही. कदाचीत अशीच काही कारणं असावीत. काही लोकांची कदाचीत आणखी काही कारणं असावीत.
मग फक्त एकाच पक्षाला वेठीला धरुन कंठशोष का?
जर त्या पक्षाच्या मुख्यालयातून शाखांमध्ये आदेश गेलेले होते की 'रस्त्यावर उतरु नका' त्या पक्षावरच का सगळे एकांगी आरोप?
ह्याला उत्तर नाही कुणाकडे!
असो, यशो तुझ्या भावना समजु शकतो, पण फुक्काटची कृतीशुन्य तोंडपाटिलकी करणारी धेंडं पाहीली की संताप अनावर होतो!
लोकांची पायापुरती खेटरं कापण्याची वृत्ती काही नवी नाही म्हणा, "मला त्रास नको, बाकी काय क्रांत्या बिंत्या करायच्या त्या खुशाल करा! आम्ही मागाहुन फायदे लाटायला सगळ्यात पुढे येऊ" असली वृत्तीच जास्त बोकाळलीये त्याला कोण काय करणार?
>>"मला त्रास नको, बाकी काय क्रांत्या बिंत्या करायच्या त्या खुशाल करा! आम्ही मागाहुन फायदे लाटायला सगळ्यात पुढे येऊ"
हे मात्र अगदी पटलं रे धम्या! अगदी खर आहे.
ऐकून सगळेच बरोबर आहेत असे वाटायला लागले आहे. :(
पण तेही खरे नव्हे. श्री. प्रकाश घाटपांडे यांच्या प्रतिसादाशी सहमत. सार्वजनिक मालमत्ता ही सर्वांची असते, म्हणूनच तिच्या नुकसानाचा अधिकार कोणालाही नाही. खरे तर मराठी/हिंदी असा हा प्रश्नच नाही, प्रश्न आहे प्रसिद्धीचा - ती देखील जितक्या लवकर मिळवता येईल त्याचा.
बाकी वेदश्रीताईंना झालेल्या त्रासाबद्दल वाईट वाटले. तरी असे दंगलीसारखे काहीही घडलेले नसताना पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक सोयीची नसल्याने, एकही रिक्षा थांबत नसल्याने, रात्रीच्या वेळी, पुलाच्या खाली, झीब्रा क्रॉसिंगवरही रस्त्यातले एकही वाहन बाजूला अडकलेल्यांची दया येऊनही थांबत नसल्याने लहान मुलांसकट तब्बल पंधराहून अधिक मिनिटे अडकण्याचे सुख (!) अनुभवलेले असल्याने हे जे सामान्यांना वेठीस धरणे आहे, ते अगदी दंगल होत नसतानाही घडल्याचा, तेही सामान्यांनीच सामान्यांना वेठीला धरण्याचा अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे वेदश्रीताईंच्या भावना कळू शकतात. (यात कुठच्याही शहराला नावे ठेवण्याचा उद्देश नाही, ही कृपया ध्यानी घ्यावे, नाहीतर चर्चा भलतीकडे जाईल).
तरीही (मुंबईकर असल्याने असाच सपाटून पडणार्या पावसाच्या वेळी अडकण्याचा अनुभव असल्याने) एक न मागता सल्ला - गडबड चाललेली असताना लवकरात लवकर घरी सुखरूप पोचावे अशी इच्छा असणे अगदी योग्य आहे, पण त्यासाठी आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरू नये (हे स्वतःच्या अनुभवावरून).
ऑफिसमध्ये थांबण्यासाठी जागा असल्यास किंवा मूलभूत सोयी (बाथरूम, पाणी, सुरक्षा, किंवा वीज इ. )असल्यास काही विश्वासार्ह व्यक्तींबरोबर तेथेच बाहेरची स्थिती बदलेपर्यंत थांबणे चांगले. नसल्यास जवळ राहणार्या मित्रांच्या/नातेवाईकांच्या घरी जाणे/ थांबणे चांगले.
(पुणेकर/मुंबईकर/मध्य रेल्वेकर) चित्रा
प्रतिक्रिया
अचूक
तेच ते...
डानराव,
सहमत!
महान विचारवंत निखिल वागळे साहेब त्यात सहभागी होते का?
मनसेअच्या
आपल्या
'एक राज्य
सहमत!!
डॉनराव, विशालभाऊ....
मी मुंबैत
तुला
जमेल तसे स्पष्टीकरण ...
मारहाण
भाषा आणि स्थानिकांना नौकर-या या विषयावर कोणी तरी बोलतंय
बरं
एक कारण!
धमु,
सहमत,पण...
>>"मला त्रास
दोन्हीकडची मते
छान