Skip to main content

अबू आजमी ची मनसेच्या आमदारांना धक्काबुक्की; मनसेचे बाणेदार प्रत्यूत्तर

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/11/2009 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
अबू आजमी ची मनसेच्या आमदारांना धक्काबुक्की; मनसेचे बाणेदार प्रत्यूत्तर आंतरजाल प्रतिनिघी: (ता. ०९ डिसेंबर २००९) आज महाराष्ट्र विधानसभेत नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी चालू होता. अबू आजमी शपथ घेण्यासाठी व्यासपिठावर चढला. त्याने मनसेच्या आमदारांकडे वाकड्यानजरेने पाहत शपथ घेणे चालू केल्यानंतर मनसेचे आमदार शिषीर शिंदे यांनी त्यास मराठीतच शपथ घेण्याचे आवाहन करणारे पत्रक दर्शविले असतांना त्याने त्या पत्रकाकडे पाहत हातवारे दाखवले. संतापाच्या भरात खडकवासल्याचे आमदार वांजळे यांनी शपथ ही मराठीतच घेण्याचे आवाहन करण्यासाठी व्यासपिठाकडे गेले असता अबू समर्थक आमदारांनी त्यांना शिवीगाळ केली. त्याचा राग येवून आमदार वांजळे यांनी अबू समोरचा माईकच उखडून टाकला. झाल्या प्रकाराने संतापून अबू ने आमदार शिषीर शिंदेंना धक्काबूक्की केली. त्यानंतर मनसेच्या आमदारांनी अबूला गराडा घालून याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अबू आजमीची मनसेच्या आमदारांच्या गराड्यातून सुटका केली. विधानसभेत नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी होण्याआधी सर्व आमदारांना मनसेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरेंनी राज्यभाषा 'मराठीतून'च शपथ घेण्याचे आवाहन करणारे पत्र लिहीले होते. त्यावर अबू ने 'मी राष्ट्रभाषा' हिंदीतच शपथ घेईल' असे वक्तव्य केले होते. भारतीय घटनेतही भारताची 'राष्ट्रभाषा' हिंदी आहे असा कोठेही उल्लेख नाही हे उल्लेखनीय. झाल्या प्रकारानंतर काही पत्रकारांनी अबूला मराठीत प्रश्न विचारले असता त्याने त्यांना उत्तरे दिलीत. म्हणजेच त्यास मराठी समजते. हिंदी व मराठी भाषेची लिपी देवनागरीच आहे. असे असतांना तो शपथ मराठीत वाचू शकत होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2777
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

होय आम्ही भाउ भाउ आहोत. त्याचीच गाडी मी चालवतो. मी त्याच्याकडे नोकरी करतो. त्याने 'स्टारमाझा' च्या कागदात भेळ दिली तर माझा कागद मीच आणला होता. तुम्हाला कोणत्या कागदात भेळ खायला आवडेल? भेळ तर एकच आहे. विचार करू नका लवकर सांगा. गिर्‍हाईकं खोळंबलीत. जय मनसे प्रवृत्ती ! -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

या मराठीद्वेष्ट्यांना असा हिसका वरचेवर दाखवायला हवा.. जय मनसे..! तात्या.

जय भवानी ! जय शिवाजी ! ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

या अबूने याच सभागृहात मनसे च्या नेत्यांना चप्पल दाखवली...अशी चिथवणी दिल्यावर मनसेचे नेते गप्प तरी कसे बसणार ? इथे माय मराठीचा गळा घोटला जात आहे तरी इतर मराठी नेत्यांना विधानसभेच्या अस्मितेची काळजी !!! मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

आमदार वांजळे आपल्याला लै आवडला ... खरंच व्हिलन दिसत असले तरी हिरोची कामं नक्कीच करतात !! विधानसभेत मारामारी नको होती (पण झालं ते बरंच झालं) .. त्याऐवजी अबु हजामा ला चौकात बडवायला हवा होता ! तो महाराष्ट्रातून निवडून येणं हीच एक मोठी आश्चर्याची गोष्ट !

In reply to by टारझन

वांजळेभाऊ जिंदाबाद! :) मनसेचे अभिनंदन! :)

*************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll