मस्त.. अबूला तसाही लई माज आला आहे. धुतला ते बरे झाले. पण सरसकट सगळ्याना धुवू नका म्हणावं.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
लै म्हणजे लै भारी वाघांनो ...
मस्त दणका दिला त्या मस्तवाल अबु आझमीला, आता घेऊन ये म्हणावं आझमगढवरुन ज्याला आणयचे आहे त्याला.
अवांतर :
ह्या प्रकरणी गॅलरीतुन अर्वाच्च आणि अश्लिल शिवीगाळ केल्याबद्दल फरहान आझमी ( अबु आझमीचा सु(?)पुत्र) ह्यावर कारवाईची शक्यता ;)
जय हो .. !!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
काय डॉणराव कसल्या अपेक्षा करताय तुम्ही.... आझमी च्या पुत्रावर कसची कारवाई... उलटे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, आणी भाजपा ह्यांनी मनसे आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे.
जर मनसे आमदाए निलंबीत झाले तर........
बाकी अबुला आधी पासुन मी हिंदितुनच शपथ घेणार हे ओरडुन सांगायची काय गरज होती
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
तुझे खरे आहे निख्या.
निलंबन वगैरे होऊ शकते मनसे आमदारांचे, मात्र अजुन त्यांना शपथच न घेतल्याने व पर्यायी ते अजुन ऑफिशियल सभागॄहाचे सभासद न झाल्याने त्यांच्यावर संबंधित नियम कितपत लागु होतात हे पहायला हवे.
जाणकारांनी मत द्यावे ...
बाकी भाजपाचे आम्हाला आश्चर्य वाटले.
चालायचेच, एकदा घराचे वासे फिरायला लागले की असेच होते. भाजपाच्या नेत्यांनी शेजारच्याच कर्नाटकात साधारणता १ वर्षापुर्वी एका मंत्र्याला त्याला व्यवस्थित कन्नड येत नाही म्हणुन पद सोडावे लागल्याच्या घटनेवर भाष्य करावे ...
त्याचीही अपेक्षा आपण कशाला ठेवायची म्हणा ?
असो.
बाय द वे, फरहान आझमी म्हणजे तोच ना एकदा मागे अमली पदार्थाच्या केसमध्ये अरब देशांनी ज्याला धरला होता व उच्चस्तरिय हस्तक्षेपामुळे सुटला होता.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
सहमत. विधानसभेत असे घडावे हे वाईटच पण या बाबतीत अबु आझमी आहे म्हणुन समर्थन करावे वाटले. आणि सभागृहाचे अवमुल्यन याहूनही जास्त इतर पक्षांनी केले आहे.
बाकी तो फरहान आझमी तोच तो. दुबईमधे पकडला गेला होता तो, त्याचे ३ मित्र होते म्हणे त्याच्या सोबत, हा आणि अजून दोन उच्चपदस्थपुत्र सुटले, चौथा मात्र अडकला होता.
बिपिन कार्यकर्ते
त्यांच्यावर संबंधित नियम कितपत लागु होतात हे पहायला हवे.
हे खरेच तपासुन पहाणे आवश्यक आहे.... त्या अबु ने तर पाच वर्ष निलंबनाची मागणी केली आहे.... पाच वर्ष जाउ द्या पाच महिने जरी झाले तरी नुकसान ना... पण ह्यावर खरेच जाणकारांनी प्रकाश टाकावा.
मंत्र्याला त्याला व्यवस्थित कन्नड येत नाही म्हणुन पद सोडावे लागल्याच्या घटनेवर भाष्य करावे ...
राज ने सुद्धा हाच मुद्दा पत्रकार परिषदेत मांडला होता....
बाय द वे, फरहान आझमी म्हणजे तोच ना एकदा मागे अमली पदार्थाच्या केसमध्ये अरब देशांनी ज्याला धरला होता व उच्चस्तरिय हस्तक्षेपामुळे सुटला होता.
हो हा तोच.... ईथे एक दुवा
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
बोले तसा चाले त्याची वंदावी पाउले.
एकदम मस्त काम झाल आहे. आता हिंदि आणी इंग्रजी पिलावळ उटेल आणी आपल्या नावाने भुंकेल. भुंकेल, भुंकेल आणी गप्प बसेल..
तुम्हि लक्ष देऊ नका
जय मनसे....
---------------
तुका म्हणे एश्या नरा, मोजुन माराव्या पे॑जरा
नाहीतरी लै माज चढला होता त्या अबुला....
बेश्ट फनकावला त्याला...
च्यामारी! सरळ सांगुन ज्याला कळत नाही, त्याला त्याच्याच भाषेत सांगावं लागतं हे सिध्द झालंच पुन्हा एकदा!
च्यामारी, रमेशभाऊंनी त्या माईकचं डबडंच उचललं राव =)) =)) =))
आता बसा म्हणावं सगळे (राजकारणी+स्युडो आयडिओलोजिस्ट) खेद/संताप्/निराशा/अमुक तमुक...चिवडा अन लाडु व्यक्त करत!!! जो संदेश जायला हवा होता तो बरोब्बर पोहोचला :)
आता कराच म्हणावं काही कारवाई....मंग ते हैत आन आमी हौत!
जे होईल ते पुढचं पुढं! बाझवला तिच्यायला!!!!
>>अरे धमु तु असुन काय उपयोग? ते लोक सिंहगडावर थोडेच येणार आहेत?
हा हा हा..अंमळ गल्लत होते आहे का शेठ?
"आम्ही"ह्या शब्दाचा अर्थ सर्वसाधारण म.न.से.+ मराठी माणुस (ह्यामध्ये बोटचेपे, परधार्जिणे आणि स्युडो आयडिओलोजिस्ट गणले जात नाहीत!) असा सरळसाधा होतो की हो गुर्जी!
शब्दच्छल करुन रेवड्या उडवायला बघता होय सरकार?
बाकी, आम्ही सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या खडकवासला भागातल्याच वांजळेनी हिसका दावला बरं!
लोकनियुक्त प्रतिनिधींनीच सभागृहाची अशी लाज काढल्यावर जनतेने त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवायच्या? लोकसभेत नोटा वगैरे पाहिल्यावर सर्व काही पाहून झालं असं वाटलं होतं, पण नाही. अजून बरेच तमाशी बाकी आहेत असं दिसतंय. या लोकांची जनतेचे प्रतिनिधी म्हणवून घ्यायची पात्रता नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते.
मायमराठीचा उत्कर्ष व्हावा आणि मराठी मुलांना नोकर्या वगैरे मिळाव्यात हा मनसेचा अजेंडा मलाही मान्य आहे. पण एकदा सत्तेच्या सभागृहात प्रवेश केल्यावर मनसे काही वेगळे करेल असे वाटले होते. ते वेगळे काही म्हणजे हे असेल तर, मग कशाला हवी ती मनसे? हे तर गल्लीतले गुंडही राजरोसपणे करतच असतातच की.
लोकनियुक्त प्रतिनिधींनीच सभागृहाची अशी लाज काढल्यावर जनतेने त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवायच्या? लोकसभेत नोटा वगैरे पाहिल्यावर सर्व काही पाहून झालं असं वाटलं होतं, पण नाही. अजून बरेच तमाशी बाकी आहेत असं दिसतंय. या लोकांची जनतेचे प्रतिनिधी म्हणवून घ्यायची पात्रता नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते.>>>>
हे नेमके कोणासाठी म्हणताय ते कळत नाही...सभागृहाची लाज म्हणजे नेमक काय !! ईतर पक्षांनी सभागृहात किती हॅलोजन लावलेत ते तरी कळु दे...आज जे मनसेच्या खासदांरानी केले ते समर्थनीयच आहे...सर्वच जनतेचे प्रतिनीधी आहेत ..कोणत्या जनतेचे मराठी की उत्तर भारतीय ? त्या अति-महा-सभ्य माणसास नीट समजावुन देखील जर तो मुदामुन हिंदीत शपथ घेत असेल तर त्याची काय पंचारती उतरावयाची काय सभागृहात ...आणी गॅलरीतुन त्याच्या लाडक्या लेकाने ज्या शिव्या दिल्या त्या समर्थनीय होतात का , किती दिवस आपण सभागृहाच्या पावित्र्य राखण्याचा नावाखाली उत्तर भारतीयांची दाढी कुरवाळायची !!
मायमराठीचा उत्कर्ष व्हावा आणि मराठी मुलांना नोकर्या वगैरे मिळाव्यात हा मनसेचा अजेंडा मलाही मान्य आहे.>>>
धन्यवाद !!! हा विषय ईथेच संपला
पण एकदा सत्तेच्या सभागृहात प्रवेश केल्यावर मनसे काही वेगळे करेल असे वाटले होते. ते वेगळे काही म्हणजे हे असेल तर, मग कशाला हवी ती मनसे? हे तर गल्लीतले गुंडही राजरोसपणे करतच असतातच की. >>>>
ही फक्त सुरुवात आहे ..कृपया आपल्याला त्रास होत असेल तर यापुढे "विधानसभेचे अवलोकन " करणे सोडुन द्यावे हि विनंती...
पण यानिमीत्ताने दोन आमदारांची आठवण झाली...
१)चंद्रकांत छाजेड ::: दर अधिवेशनाला सामान्य जनतेचे प्रश्न असलेली टोपी घालुन सभागृहात बसायचा...साध तिकीट देखील नाकारल त्याला रा.कॉ ने...
२) छगन भुजबळ :: शिवसेनेत असताना हा शिवसेनेचा एकुलता एक आमदार ईतका गोंधळ घालायचा की सुरक्षारक्षक त्याला सभागृहातुन उचलुन बाहेर नेत असत...
भट साहेब, आपल्याविषयी नेहमीच आदर वाटत राहिला पण आज मनसे च्या आमदांराची गोंधळ घालण्याविषयीच्या भावना समजुन न घेतल्याबद्दल मन कसेसेच झाले !!!
सू हा स...
संपादकांना ईशारा ::: ह्याच्यापेक्षा संयत भाषा वापरणे मला शक्य नाही...आणी आडुन -आडुन बोलने तर अजिबात शक्य नाही...च्या - मारी मनात एक आणी लेखनीत एक ....करायचा तर करा संपादित...
भटोबा!!! तुमचे म्हणणे मान्य आहेच. फक्त वर म्हणले तसे इथे अबु आझमीला चोपल्यामुळे नाही म्हणलं तरी मला अंमळ बरे वाटले हेही मी प्रांजळपणे कबूल करतो. मराठीचा आदर करतात, मग इतकी वर्षे केवळ शपथ घेण्यापुरती का होईना, शिकता नाही आली? सगळे ढोंग. असो. झाला प्रकार विधानसभेसारख्या सभागृहात शोभत नाही हे खरेच पण याहूनही वाईट प्रकार घडत असतात तिथे. (अर्थात एकाने गाय मारली तर दुसर्याने वासरू मारणे असे समर्थन नाही करत मी) पण सभागृहाचे पावित्र्य राखणे हे सगळ्यांचेच कर्तव्य आहे. मनसे / शिवसेना उघडपणे गुंडगिरी करतात, पण २६/११ सारख्या भयानक घटनेचा अहवाल ज्यारितीने दडपला गेला ते कृत्य केवळ देशद्रोही म्हणण्यालायक आहे. छुपे गुंड जास्त खतरनाक. त्याबद्दल आपण काय बोलणार?
बिपिन कार्यकर्ते
श्री भट यांच्याशी सहमत आहे. मला अबू आझमीसारख्या समाजकंटकांचा तिरस्कार वाटतो आणि मनसेची काही धोरणे पटतात. तरीही विधानसभेत केलेल्या या कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही. इतरांनी यापुर्वी अनेकदा सभागृहाचा अवमान केलेला आहे. त्या सर्व कृत्यांप्रमाणेच मनसेच्या आमदारांचे कृत्य निंदनीय आहे. अबू आझमीला हिंदीत शपथ घेण्याचा गवगवा करून जे मिळवायचे होते, त्यापेक्षा अधिक लाभांश त्याला या घटनेतून मिळालेला आहे, असे वाटते.
अबु आझमीला फटकवला हे चांगले झाले परंतु हा प्रकार विधानसभेत झाला हे मात्र निंदनीय!
सहमत...
कालच्या नवाकाळला वाचले होते की मनसेचे लोक काय तो राडा विधानसभेच्या बाहेर करतील, कारण निलंबन होईल इ.इ....
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
की आम्ही मराठीचा आणि महाराष्ट्राचा सन्मान करतो. अबू आझमी महाराष्ट्राचे आमदार असल्याने त्यांनी मराठी शिकायला पाहिजे याबाबत दुमत नाही. मात्र केवळ राज ठाकरेंच्या दबावाखाली त्यांनी मराठी शिकण्याची गरज नाही..... मग अजून कोणाकडेतरी शिकवणी लाव म्हणावं... पण मराठी न शिकता तोंड उघडायची हिंमत नाही झाली पाहिजे !
महाराष्ट्रात मराठीच्या हट्टासाठी जाणून-बुजून रान उठविले जात असून मनसेच्या गुंडगिरीला तेथील सरकारकडून कुठलेही उत्तर दिले जात नसल्याने हा वाद भविष्यात आणखी चीघळण्याची शक्यता आहे. भाषिक वादावरून देशाचे विभाजन झाले तर त्याला महाराष्ट्रच जबाबदार असेल, असे प्रतिपादन माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी केले आहे.
=)) =)) =))
त्या ललवाला वाईच इच्चारा की कुणी... "सायेब, आसामातुन बिहारी जाळुन त्यांच्या पाठीवर 'आम्हाला बिहारी नको' अश्या आशयाचा मजकूर लिहुन परत पाठवले तेव्हा देशाचं विभाजन नाही होऊ शकत का?
बंगळुरुसाठी दिलेली पटन्याची रेल्वे कन्नडिंगांनी विरोध करुन चालुच होऊ दिली नाही..का तर तिथे ह्यांचा बकालपणा वाढेल..तेव्हा नाही देशाचं विभाजन होण्याची शक्यता दिसली?
खुद्द दिल्लीमध्येही ह्यांना कुठवर हातपाय पसरु देतात तेही स्पष्ट दिसतं..अधिक प्रकाश दिल्लीकर..गेला बाजार ८-१० दिवस दिल्ली फिरलेला कोणिही टाकू शकेल. मग तिथे नाही देशाचं विभाजन होण्याचा प्रश्न उद्भवत?
पंजाबात ह्या भैय्या बिहार्यांना शेतमजुर आणि इस्त्री करणं ह्यापलीकडं फारस कोणी उठुच देत नाही तेव्हा नाही होत देशाचं विभाजन?
च्यायला..कुणीही लुंग्यासुंग्यानं उठावं आणि महाराष्ट्राबद्दल-मायमराठीबद्द्ल काहीही बरळावं ??????
ते...अमरसिंह...काय तर नावातच सिंह! ते म्हणे..ईंट का जवाब पथ्थरसे देणार....च्यायला..इथं काय सगळेच रा.कॉ. आणि सोनियामाईचे बाशिंदे आहेत काय?
एकतर, ह्यांच्या अनागोंदीपायी स्वतःच्या राज्यांत नोकर्या/कामं नाहीत म्हणुन तिथले लोक पोटं भरायला इकडं तिकडं फिरतात...ती परिस्थिती सुधारायची तर ते सोडुन हे साले सत्तेचे दलाल जिथं ह्यांची जनता जाईल तिथं उमेदवार उभे करुन त्या त्या प्रांताचा यु.पी.-बिहारचा बकालपणा करायला पाहतात.....
आता ह्यांना आवरायचं नाही तर काय पाया पडायचं?
बाकी, हे लालु आणि अमरसिंह, शिवराज चौहानांच्या भुमिकेवर नुसतीच एखादी नाराजीची पुंगी वाजवुन गपगुमान पडले... का बॉ? तिथं का शेपटं घातली? तिथे नाही होत वाटतं देशाचं विभाजन?
लालू, मुलायम आणि अमरसिंह??
हे सर्व तर आपल्या भारताच्या राजकारणातील सर्वश्रेष्ठ विदूषक आहेत.. तेव्हा त्यांच्या ह्या माकडचाळ्यांना एकच उत्तर..
:D
-
कोकणी फणस
मुद्द्याची गोष्ट राहिलीच वाटतं! एवढी कानाखाली वाजवल्यानंतर त्या नालायकाने शेवटी शपथ कुठल्या भाषेत घेतली?
विधानसभेत वा लोकसभेत जे कांहीं होतं त्याच्यावर कायद्याने इलाज करता येत नाहीं असं वाचलं होतं. (खरं-खोटं मला नक्की माहीत नाहीं.)
फक्त सभापतीच त्यांच्यावर कारवाई करू शकतात असं वाटतंय!
खरं तर शिवसेनाही जर त्यात मनसेच्या बाजूने उतरली असती तर लय बेश झालं असतं! (भाजपला या 'राष्ट्रीय' पक्षाला द्या आता सोडचिठ्ठी.)
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!
विधानसभेत वा लोकसभेत जे कांहीं होतं त्याच्यावर कायद्याने इलाज करता येत नाहीं असं वाचलं होतं. (खरं-खोटं मला नक्की माहीत नाहीं.)
आपल्याला कायद्याने म्हणजेच कोर्टात काही करता येते का नाही हे अपेक्षीत असेल तर ते योग्यच आहे. सभासदाच्या संबधीत अधिकार सभापतींनाच आहेत.
ह्या दुव्यातील मुद्दा क्रमांक २१२
212. Courts not to inquire into proceedings of the Legislature.—(1) The validity of any proceedings in the Legislature of a State shall not be called in question on the ground of any alleged irregularity of procedure.
(2) No officer or member of the Legislature of a State in whom powers are vested by or under this Constitution for regulating procedure or the conduct of business, or for maintaining order, in the Legislature shall be subject to the jurisdiction of any court in respect of the exercise by him of those powers.
सभापतींच्या अधिकारा संदर्भात वरील दुव्यातील मुद्दा क्र. १७८ पुढे वाचु शकता....
सभासदांच्या शपथेबद्दल भाषेचा उल्लेख नाही.
188. Oath or affirmation by members.—Every member of the Legislative Assembly or the Legislative Council of a State shall, before taking his seat, make and subscribe before the Governor, or some person appointed in that behalf by him, an oath or affirmation according to the form set out for the purpose in the Third Schedule.
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
आज १३ आलेत पुढिल विधानसभेत १३० आमदार येतिल सावधान रहा लेकानो आज एकाला बद्डलाय उद्या.... लालू, मुलायम आणि अमरसिंह??
अगदि बरोबर
ही एका येऊ घातलेल्या मराठमोळ्या वादळाची नांदी आहे!
मनसैनिकांचे अभिनंदन.
जय मनसे
इतक्या वेळेला सरळ समज देऊन सुद्धा अबू ने त्यांना जे करायचे होते तेच केले आणि त्यामुळे त्याचे योग्य ते फळ आज त्यांच्याच श्रीमुखात उमटले...
जर देश की बहु सोनिया गांधी हिंदीतुन संभाषण करण्यास शिकली तर अबूला मराठी शिकण्यास त्रास का झाला ?
अबू म्हणतो, माझ्या सारखे अनेक लोक मुंबईत मराठी बोलु शकत नाहीत...पण मी मराठी भाषेचा सन्मान करतो !!!
इतके वर्ष हा इथे राहतो आहे आणि याला मराठी येत नाही हाच काय मराठी भाषेचा सन्मान ???हिंदीतुन शपथ घेण्याचा अट्टहास हा कुठला मराठी भाषेचा सन्मान???, जर त्यांनी मराठीतुनच शपथ घेतली असती तर मात्र वरील विधानाचा अर्थ आम्हाला पटला असता.
इथे या महाराष्ट्रात लाठ्या काठ्या वाटण्याची भाषा करण्याची यांची हिंमत होतेच कशी? कारण यांना इथे त्यांचीच संस्कृती जोपासायची आहे.
आज प्रत्येक शहरातुन मराठी माणुस बाहेर फेकला जात आहे..मुंबई,ठाणे,पुणे यांची जी अवस्था झाली आहे तीच आता महाराष्ट्रातील इतर शहरांची करायची हीच अशा मंडळींची इच्छा आहे.
मराठी लोकांना विनंती :---- आता तरी मराठीतुनच बोला...म्हणजे अबू सारख्या नेत्यांना असा माज करायची संधी भविष्यात मिळणारच नाही.
(आर.ठाकरे समर्थक)
मदनबाण.....
आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
सहमत !
मराठी भाषेचा सन्मान करतो म्हणता तर मराठीत बोलायचा निदान प्रयत्न तरी करा. ही मुजोरी कशाला?
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
लै भारी बोधकथा...
नान्या जबरा
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
अरे कुणीतरी नगारे वाजवा, हत्तीवरुन नाही तर निदान बाईकवरुन साखर वाटा आणि त्यांनाही सांगा....
तुमचे नाही आमचे, मराठियांचे राज्य येणार आहे ही त्याची नांदी आहे...
जय महाराष्ट्र ! जय भवानी ! जय शिवाजी ! जय मराठी !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
एक नंबर प्रतिसाद!
साला नळा गळल्यासारखं पानपानभर काय लिहावं आणि समोरच्यानं ते समजुन घ्यावं?
हे असं सगळ्या भावना पोहोचवणारं एकच वाक्य प्रचंड आवडलं :)
विशालभौ, मस्तच रे!
मुळात चार ओळींची शपथ उपरा अबु मराठीतही घेऊ शकलाच असता......आणि मराठी बोलता येत नाही हे मान्य पण हिंदी व मराठी मुळाक्षरांमधे ९९.९९% साधर्म्य असताना शपथ मराठीतुन वाचुन दाखवायला त्या अबुला खरे तर काहीच हरकत नव्हती.....इतकी वर्षे महाराष्ट्रात आणि ते देखिल मुंबईत राहुन किमान मराठी बोलता येणार नसेल तर जा म्हणाव आझमगढला निघुन..!पण या माणसाला माजच जास्त!......बरी त्या मग्रूर माणसाला अद्दल घडवली......
शिशिर शिंदे यांनी म्हणे पेकाटात लाथ हाणली आणि राम कदमांनी श्रीमुखात भडकवली .........पार फोडायला हवे होते खरे तर......असो हे हि नसे थोडके!
आणि हा सगळा प्रकार घडत असताना सभागृहात हा भ्याड अबु मिनाक्षी पाटिल यांच्या आधाराने स्वतःचा बचाव करताना दिसला.........
मनसेच्या शिलेदारांचे मनसे अभिनंदन!
"लातों के भुत बातों से नही मानते हेच खर'
आत्ताच समजलेल्या वृत्तानुसार सभागृहात मराठीचा आग्रह धरणार्या मनसेच्या आमदारांपैकी चार आमदारांना राज्यसरकारने निलंबनाचा ठराव मांडुन आजच्या अबु आझमी शपथ प्रकरणात अन्याय मार्गाने दोषी ठरवुन निलंबित केल्याबद्दल त्यांचा व या ठरावाला संमती देत ठरावाच्या बाजुने मतदान करत अनुमोदन देणार्या सेनाभाजपाचा जाहिर निषेध!
अवांतर-काही दिवसांपुर्वी पंजाब सरकारने देखिल पंजाबी भाषेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्व स्तरांवर पंजाबी भाषा सक्तीचि केल्याचे वृत्त वाचले .....भाषावार प्रांतरचनेनंतर हे काहि वर्षांनी होणे अपेक्षित......त्यांना शहाणपण सुचवायला कुणी जात नाहि अक्कल शिकवतात फक्त महाराष्ट्रालाच.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
प्रतिक्रिया
मनसे
आणी भाजप
सहमत
मस्त..
प्रकाटाआ.
व्हीडीओ
हा हा हा ...
काय डॉणराव
खरे आहे ...
+१
त्यांच्या
बोले तसा चाले...
लढ बाप्पू लढ!
मंग ते हैत
>>अरे धमु तु
ह्या
मायमराठीच
मनसे रॉक्स.
वाईट वाटले
हा हा हा....
निंदनीय कृत्य!!
माननीय भट साहेब...
भटोबा...
सहमत
+१
अबु आझमीला
लालू, मुलायम आणि अमरसिंह
अमर सिंह म्हणाले,
चाराखाऊ लालु म्हणे...
लालू, मुलायम आणि अमरसिंह ??
व्वा राज
सूहास
जय हो, बर
पण शेवटी शपथ कुठल्या भाषेत घेतली?
विधानसभेत
माननीय राज साहेब...
मनसे
मनसे
योग्य दणका !!!
सहमत
आमचं गाव
हाहाहा!!!
लै भारी
+२
+३ लई भारी
अरे
हाण्ण तिच्यायला!!!
लातों के भुत बातों से नही मानते.
सहमत आहे.
आणि असा
Pagination