अंतरीच्या कळा
नभी आसवांचे तळे दाटलेले
मुक्यानेच डोळ्यात पाणावलेले
निघालाच त्या आठवांचा फुलोरा
कधी साठताना मनी टोचलेले
.
असे मीलनाने खुशीच्या महाली
तरी अंतरीच्या कळा सोसलेले
,,
सुखाची करू कामना मी कितीही
नशीबात दुःख असे साचलेले
न चिता मनी ना जिवाची खुशाली
तुला आज मी प्राण हे वाहलेले
प्रसन्ना जीके
वर्गीकरण
मात्रांचा घोळ नाहीसा करता येईल जर
कविता
छान आहे