धावता आढावा आवडला प्राजुताई!
"काठावर बसून गळ टाकून समुद्राच्या तळाबद्दल अंदाज बांधण्याचा प्रयत्न काय कामाचा? समुद्राच्या तळाशी काय काय आहे हे माहिती करून घ्यायचे असेल तर बुडी मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही."फ़ॉर हिअर ऑर टू गो!! म्हणजे अमेरिकेत राहायचे का भारतात परतायचे (हा म्हटला तर दुखरा आणि म्हटला तर स्वतःची समजूत किंवा फसवणूक करणारा) प्रश्न लेखिकेने मांडला आहे की काय असे वाटले.
मराठी एकलव्य
सुरेख ओळख ...!!१
पुस्तक परिचय आवडला, पुस्तक नक्की वाचेन मिळेल तिकडे.
अमेरिका तुम्हाला वेगळे मानत नाही, इथे येणारे तुम्ही स्वत: त्यांच्यापासून स्वत:ला वेगळे समजता. तुमच्या डोळ्यांवरची परिस्थितीची झापडं उतरवायचं काम अमेरिका व्यवस्थित करते. मेहनत करण्याला जवळ करते आणि मेहनतीत कमी पडणार्याला बाहेरचा रस्ता दाखवते. जितकं काम चांगलं तितका मोबदला .. असं सरळ सरळ गणित अमेरिका शिकवते."
:)
मस्त, हा परिच्छेद आवडला.
अमेरिकाच काय पण करियरसाठी एकदा बाहेर पडले की कुठल्याही ठिकाणी हेच लागु होते. मग ते अमेरिका असो की फ्रँकफर्ट अथवा बेंगलोर ...
असो.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
असेच म्हणतो,
प्राजु तै.
मस्त परिक्षण आवडले, पुस्तक मिळाले की वाचण्यास आनंद होईल हे नक्की.
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
असेच म्हणतो,
प्राजु तै.
मस्त परिक्षण आवडले, पुस्तक मिळाले की वाचण्यास आनंद होईल हे नक्की.
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
असेच म्हणतो,
हे पुस्तक नक्की वाचणार.
आपला,
(वाचक) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
४०-४५ वर्षांपृर्वी गेलेली काय आणि गेल्या १०-१५ वर्षांपूर्वी गेलेली काय.. सगळीजणं स्वखुशीनेच नविन वाटा चोखाळायला गेलेली ना? त्यांची का इतकी कवतिकं?
ही असली नको त्यांचा नको तितका उदो उदो करणारी पुस्तकं इथल्या अमेरिका द्वेष्ट्यांच्या हातात कोलित देतात.
पण साधारण ४०-४५ वर्षापूर्वी या ना त्या कारणाने देशान्तर करून आलेली मराठी मंडळी.. यांच्याबाबतीत हा प्रश्न तेव्हा ऐरणीवरचा होता. "फ़ॉर हिअर ऑर टू गो??" "इथेच रहायचं की परतायचं?"
हे आजही तितकंच खरे आहे. आणि मायभुमी सोडून नोकरी धंद्यासाठी बाहेर पडणार्या प्रत्येक भारतीयाला लागू होतं (अमेरिका/इंग्लंड इ. आंग्लभाषिक देशांशिवाय युरोप/पूर्व आशिया इ. ठिकाणी तर अजूनच)
जाता जाता: चांगल्या पुस्तक परि़क्षणाच्या धाग्याचा निवासी वि अनिवासी वादात सापडून विचका होउ नये ही माफक अपेक्षा..
पुस्तक वाचले पाहीजे.
फॉर हिअर ऑर टू गो!! हा प्रश्न आहे खरा. ह्यावर एक वेगळा धागा सुरु करावा का? :-)
बहुतेक एका मिपाकरानी या वेलणकरबाईंची मुलाखत घेतली होती.
सर्वप्रथम, प्राजूताईंचे कौतुक करायला हवे. मिसळपावावरील मालकप्रणीत (आणि बिरूटे, नाना, वगैरे इतर "छोटे" सदस्य प्रतिपादित) अनिवासी भारतीयांविरुद्ध उघडलेल्या आघाडीच्या विरुद्ध जाऊन त्यांनी अनिवासी भारतीयांविषयी लिहिलेल्या ह्या पुस्तकाचे चक्क परीक्षण चक्क मिसळपावावरच चक्क केलेले आहे.
ह्याला धैर्य लागते. ते धैर्य दाखवल्याविषयी प्राजूताईंचे किती कौतुक करावे तेवढे कमीच. इतर लोकांनी, त्यांचा धैर्याच्या बाबतीत कित्ता गिरवावा अशी विनंती करावीशी वाटते. अर्थात, ही विनंती अनिवासी भारतीयाने केली, तर ती फाट्यावर मारण्यात येईल, ह्याची खात्री तेवढीच अधीक वाटते.
असो, ते झाल्यावर, मूळ पुस्तक आणि त्यातील व्यक्तिचित्रे ह्याविषयी थोडासा खेद व्यक्त करावासा वाटतो.
आनंदी-गोपाळ मधल्या आनंदीबाई जोशी पासून ते काल ह्यूस्टनला ल्यांड झालेला समीर जोशी, ह्या सर्वांना एकाच क्याटेगरीत, म्हणजे "अनिवासी भारतीय" ह्या क्याटेगरीत टाकण्याच्या प्रवृत्तीला सदर पुस्तकाने गो-अहेड दिलेला आहे.
बदल, जे सगळीकडे होतात, तसेच इथेही होत आहेत. ह्या बदलांविषयी अधिक लिहायला हवे.
४०-४५ वर्षांपूर्वी आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले लोक, आणि ३-४ वर्षे आपल्या वरिष्ठांशी आणि अमेरिकन कौन्सुलेटशी युद्धे करून, बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स मध्ये कन्वर्ट करून, दहा हजार डॉलर्सचा एक्स्चेंज घेऊन आलेले, ह्या दोघांनाही एकाच पारडीत तोलणे योग्य नाही.
असे माझे मत आहे, एनी वे.
येथे बरेच काका आणि आजोबा "आमच्या वेळी असे नव्हते", "आम्हाला किती झगडावे लागले" असे वारंवार सांगताना मला भेटतात. आणि मी आमच्या झगड्यांची इथ्थंभूत यादी दिल्यावर गप्प बसतात. त्यांचे झगडे वेगळे, आमचे झगडे वेगळे. ते आलेत त्यावेळी, स्वतःच्या आकांक्षा दडपून टाकणारी व्यक्ती इथल्या लोकांना दिसली. अम्ही आलोत, त्यावेळी, त्यांच्या पोटावर पाय येणार ह्याची त्यांना जाणीव झाली.
एवढा मोठ्ठा फरक लेखिकेला दिसू नये, ह्याचा खेद होतो.
बाकी पुस्तक बरे आहे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
सर्वप्रथम, प्राजूताईंचे कौतुक करायला हवे. ...त्यांनी अनिवासी भारतीयांविषयी लिहिलेल्या ह्या पुस्तकाचे चक्क परीक्षण चक्क मिसळपावावरच चक्क केलेले आहे.
कौतुक वाटायचे कारण: एक अमेरिकेचे कौतुक असलेल्या पुस्तकाचे कौतुक आणि तेही ज्या "वेलणकर" नामक व्यक्तीने लिहीलेल्या! ;)
असो. बाकी गंभीर प्रतिसाद सकाळी...
आपण म्हणताहात ते खरे असेलही. पण..
४०-४५ वर्षांपूर्वी आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले लोक, आणि ३-४ वर्षे आपल्या वरिष्ठांशी आणि अमेरिकन कौन्सुलेटशी युद्धे करून, बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स मध्ये कन्वर्ट करून, दहा हजार डॉलर्सचा एक्स्चेंज घेऊन आलेले, ह्या दोघांनाही एकाच पारडीत तोलणे योग्य नाही.
मी अशी तुलना कुठेच नाही केलेली.
या पुस्तकात मला दिसले ते, मूळासकट उपटलेले रोपटे नव्या जमीनीत पुन्हा तग धरून राहिले आणि त्याचा वृक्ष झाला.. असे ज्यांच्याबद्दल म्हणावे अशी लोकं. काही १९४८ च्या गांधी वधानंतर आलेली तर काही दुष्काळानंतर तर काही भारतीय अर्थ व्यवस्था कोसळल्यानंतर.. तर काही भष्टाचारला कंटाळलेली तर काही शिक्षणव्यवस्थेतल्या आरक्षणांना. जी जशी दिसली तशी रेखाटली गेलेली आहेत.
कदाचित आपण म्हणता तशी मी पुस्तकाचा अभ्यास करण्यात कमी पडले असेन. मी एकाच बाजूने विचार केला असल्याची शक्यताही आहे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
श्री मिसळभोक्ता यांच्याशी सहमत. अपर्णा वेलणकर या लोकमतच्या उपसंपादक असतांना मी त्यांना ओळखत असे. त्यांना अनिवासी भारतीयांविषयी कौतुकमिश्रित कुतुहल असल्याचे माहीत असल्याने या पुस्तकाकडून फारशा अपेक्षा ठेऊ नयेत असा माझा समज झाला आहे. (अपर्णा वेलणकर यांनी शोभा डे यांच्या पुस्तकाचा अनुवाद केला होता व मूळच्याच टूकात पुस्तकाचा आणखी टूकार अनुवाद वाचवला गेला नव्हता, हे आठवते.)
श्री मिसळभोक्ता म्हणतात त्याप्रमाणे 'बरेच काका आणि आजोबा' त्यांच्या धडपडींचे पुराण सुरू करतात. एखाद्या नवीन देशात येऊन तेथे स्थिरस्थावर होणे हा अनुभव जरी व्यक्तिगत समाधान देत असला तरी हा अनुभव एका वीराचे स्वगत म्हणून सांगणे हे इतरत्र 'काका-आजोबा' करतात त्याप्रमाणेच आहे. हे लोक आले तेव्हा सुशिक्षित होते, यांच्याकडे असलेल्या कौशल्यांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती तसेच स्पर्धेचा मोठ्या प्रमाणात अभाव होता. थोडक्यात या लोकांच्या आर्थिक प्रगतीस मोठ्या प्रमाणात वाव होता. त्यांची व आजकाल येत असलेल्या भारतीयांची तुलना करणे योग्य नाही. आजकाल येणार्यांनी प्रवासवर्णनाचे क्षेत्र समृद्ध(?) केले आहे. (डिजिटल कॅमेर्याने तर या लिखाणाला फारच बरकत आणली.)
कौशल्य नसतांना, इंग्रजी भाषेचा गंधही नसतांना, आफ्रिकेतून हाकलून दिलेले गुजराथी काका-आजोबा जेव्हा मॅटर ऑफ फॅक्टली आपले अनुभव सांगतात तेव्हा मराठी काका-आजोबांचे रिस्क अॅव्हर्स अनुभव फारच दुबळे वाटतात, प्रेरणा तर अजिबातच देत नाहीत.
टीप: प्राजुतैंचे परीक्षण चांगले झाले आहे, त्यांच्या परीक्षणाबाबत वरील प्रतिसाद नाही.
अवांतर: श्री मिसळभोक्ता यांनी पाच ओळीपेक्षा मोठा प्रतिसाद लिहिल्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. (आधीही लिहिले असतील पण हा विशेष गंभीरपणाने लिहिला आहे, हे विशेष.)
परीक्षण आवडले.
आनंदी-गोपाळ मधल्या आनंदीबाई जोशी पासून ते काल ह्यूस्टनला ल्यांड झालेला समीर जोशी, ह्या सर्वांना एकाच क्याटेगरीत, म्हणजे "अनिवासी भारतीय" ह्या क्याटेगरीत टाकण्याच्या प्रवृत्तीला सदर पुस्तकाने गो-अहेड दिलेला आहे.
हे बर्यापैकी सरसकट विधान आहे. पुस्तक हे मुख्यत्वे साठीच्या दशकात आलेल्या लोकांबद्दल आहे. वर केलेले विधान विपर्यस्त, दिशाभूल करणारे आहे.
पुस्तकामधे अनेक दोष असतील परंतु उपर्युक्त दोष त्यात नाही हे खचित.
माझ्या दृष्टीने , पुस्तकातली पाल्हाळिक भाषा हा एक दोष आहे. अनेक मुद्दे जे सरळसोटपणे मांडता येतात त्यापायी काहीसे आख्यान लावल्यासारखे. (याची प्रचिती प्राजु यानी करून दिलेल्या पुस्तकाच्या ओळखीतल्या उतार्यामधे येते. आणि श्री. दिलीप चित्रे यांची प्रस्तावना याच दोषामधे अडकल्यासारखे मला वाटले. )
दुसरा दोषच म्हणायचा तर असे म्हणता येईल की हा जो दस्तावेज आहे त्याचे स्वरूप "अॅनेक्डोटल" (मराठी शब्द) आहे. अमेरिकेतल्या लायब्ररीमधे अशी शेकड्याने पुस्तके मिळतात की ज्यामधे (उदाहरणार्थ) वीस च्या दशकात बोटीने न्युयॉर्क ला आलेल्या लोकांच्या जीवनमानाचे , त्यांच्यातल्या शारिरीक बदलांचे स्टॅटिस्टीक्स मांडलेले असते. त्यातून काही मार्मिक व ठोस असे निष्कर्ष काढलेले दिसतात. हे सारे किचकट आहे पण दस्तावेजीकरणाच्या दृष्टीने अनमोल. या पुस्तकाचे स्वरूप किस्सेवजा बनते. आकडेवारीचा मागमूस नाही. अर्थात लेखिकेचा तो उद्देश नसावा.
पुस्तकाची जमेची बाजू ही, की त्यामधे अनेक पैलूंचा धांडोळा घेतला गेला आहे. यशाबरोबर अपेशाची नोंद घेतली गेली आहे. एकच एक दृष्टीकोन, पूर्वग्रहदूषित अनुमाने यांना टाळण्यात पुरेसे यश आलेले आहे. पुस्तक थोडे "रगेड" (मराठी शब्द) हवे होते असे मला वाटले इतपतच.
पुस्तक हे मुख्यत्वे साठीच्या दशकात आलेल्या लोकांबद्दल आहे. वर केलेले विधान विपर्यस्त, दिशाभूल करणारे आहे
श्री. सुनीत, माझे विधान पुन्हा एकदा वाचा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे.
(आणि नंतर विपर्यस्त, दिशाभूल असे शब्द वापरण्याविषयी पुन्हा एकदा विचार करा.)
- निश्चय केळामात्रे
प्रस्तुत पुस्तकात सर्वाना एकाच कॅटेगरीत टाकण्याबद्दल तुम्हाला जे वाटते त्याचे तुम्ही दाखले द्यावेत. पुस्तकाबद्दलच्या माझ्या आकलनानुसार , तुमचे विधान मला चुकीचे वाटले. मी तसे म्हणालो. तुम्ही तुमची बाजू सप्रमाण सिद्ध करा. मी आनंदाने मुद्दा मान्य करेन.
- दर्शन हेळामात्रे.
श्री सुनीत, आनंदीबाई १८८३ मध्ये अमेरिकेत आल्या आणि १८८६ मध्ये भारतात परतल्या. पुस्तक वाचले नसल्याने आनंदीबाई व साठीच्या दशकात आलेल्या भारतीयांमध्ये काही समान सूत्र (अमेरिकेत येणे याखेरीज) लेखिकेने दाखवले आहे काय? याविषयी कृपया माहिती द्यावी.
पुस्तकामधे आनंदीबाई जोशी, डॉ. केतकर यांचे उल्लेख आहेत. त्यांच्या सारख्या लोकांची अमेरिकायात्रा म्हणजे ज्ञानार्जनासाठी अज्ञात प्रदेशामधे , दळणवळणाची नि संप्रेषणाची साधने उपलब्ध नसताना केवळ हिमतीच्या जोरावर केलेले असामान्य प्रवास अशा अर्थाचे वर्णन लेखिका करते ; जे माझ्या मताने अगदी योग्य आहे.
अमेरिकेची दारे महायुद्धानंतर किलकिली झाली नि साठीच्या दशकाच्या सुरवातीला तर ती सताड उघडली. याच घटनेच्या सुमाराला , भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला पंधराएक वर्षे उलटल्यानंतर, भारतातल्या नवीन वास्तवाबद्दल ज्यांचा भ्रमनिरास झाला ती पीढी अमेरिकेकडे वळली. "ब्रेन ड्रेन" हा शब्द १९६५ च्या सुमारास अस्तित्त्वात आला. तर , या पीढीमधे जे लोक इथे आले त्यांचा प्रवास , त्यांन्ची आयुष्ये, त्यांची यशापयशे , त्यांचे तिढे नि प्रश्न याबद्दल हे पुस्तक आहे. हा सगळा लेखाजोखा घटनाक्रमानुसार सविस्तर मांडला गेला आहे. भूमिका नीट विशद केली गेली आहे.
नव्वदीच्या नि त्यानंतरच्या लोकांची ही स्टोरी नाही. तसा कुठे उल्लेखही नाही.
माझ्या सौ.ने हे पुस्तक वाचले आहे, मी अद्याप वाचायचे आहे. पण त्यातल्या "म्हातारपणी तिथं रहायचं कीं परत यायचं" या विषयाची चर्चा तिला खूप आवडली व "थेट उपयुक्त" वाटली.
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
पुस्तकाविषयी घरातल्यांकडून ऐकलेले आहे, पण आधी वाचावेसे वाटले नाही हे कबूल करते. एकतर अनिवासी भारतीय म्हणून अशा पुस्तकांमधील काही गोष्टी जरा अधिक भिडतात, काही तितक्याश्या रूचत नाहीत, यामुळे इच्छा झालेली नाही. पण प्राजूचे परिक्षण वाचून हे पुस्तक वाचावेसे वाटते आहे. त्यामुळे पुस्तक परिचयाबद्दल मनापासून धन्यवाद.
तरी काही गोष्टी अपर्णा वेलणकरांना खरेच समजल्या आहेत का असे वाटले (त्यासाठी अर्थातच पुस्तक वाचावे लागेल) .
जसे -
"ही पिढी म्हणते, "अमेरिका तुम्हाला वेगळे मानत नाही, इथे येणारे तुम्ही स्वत: त्यांच्यापासून स्वत:ला वेगळे समजता. तुमच्या डोळ्यांवरची परिस्थितीची झापडं उतरवायचं काम अमेरिका व्यवस्थित करते. मेहनत करण्याला जवळ करते आणि मेहनतीत कमी पडणार्याला बाहेरचा रस्ता दाखवते. जितकं काम चांगलं तितका मोबदला .. असं सरळ सरळ गणित अमेरिका शिकवते."
काम चांगलं असण्याशी (निदान सद्य परिस्थितीत) मोबदल्याचा संबंध फारसा लावू नये! (उदा. मागच्या वर्षी ज्यांना भरपूर कामाचे भरपूर मोबदले मिळत होते अशा गृहकर्ज आणि विम्याच्या कंपन्यांतील मोठ्या पदांवरचे लोक नक्की काय चांगले काम करीत होते? आणि किती वर्षे असे काम ते करीत होते? )
बाकी डॉनराव म्हणतात ते योग्य, की तुमच्या परिघाबाहेर पडल्यावरच (मग ती गल्ली असो, की गाव किंवा राज्य किंवा देश) तुमच्यातील शक्तींची तुम्हाला जाणीव होते. त्या शक्ती असतातच, त्या परदेश जागृत करतो एवढेच.
परदेशात आल्यानंतर जाणवलेल्या अतिशय एकाकीपणापासून ते गलबल्यापर्यंतचा प्रवास हा खूप ठेचकाळत झालेला असू शकतो. (त्यातही नंतर मजा वाटते, पण त्याबद्दल अमेरिका अशी काही वेगळी काढण्याचे कारण नाही, हे स्थलांतरितांचे कुठेही गेले तरी प्रश्न असावेत).
मिसळभोक्ता म्हणतात "४०-४५ वर्षांपूर्वी आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले लोक, आणि ३-४ वर्षे आपल्या वरिष्ठांशी आणि अमेरिकन कौन्सुलेटशी युद्धे करून, बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स मध्ये कन्वर्ट करून, दहा हजार डॉलर्सचा एक्स्चेंज घेऊन आलेले, ह्या दोघांनाही एकाच पारडीत तोलणे योग्य नाही."
बरोबर आहे, त्यांची एकास एक नग म्हणून (क्वालिटेटिव्ह) तुलना करू नये. पण येथे स्थलांतरित झालेल्या समूहात त्यांचेही स्थान आहे हे विसरू नये. त्यांची अमेरिकेत येण्याची आकांक्षा ही एकाच उद्देशाने प्रेरित झालेली नसली तरी ती किमान एकाच धगीची आहे हे मान्य करायला हरकत नाही. समूहाचा विचार करताना सगळ्या प्रकारच्या नगांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे असे मला वाटते.
विषय रोचक आहे.. परिक्षणही नेटके आणि उत्सुकता वाढवणारे आहे. पुस्तक हातात पडलं तर वाचेनच.. आभार
शेवटी अश्या प्रश्नांची उत्तरे ज्याने त्याने स्वतःच्या प्रायोरिटीजनुसार शोधावीत हे उत्तम
ऋषिकेश
------------------
परदेशी जाणारे बहुतेक जण तेथे सर्व्हाईव्ह होण्याच्या धडपडीत असतात. मिळेल ते काम करायची त्यांची तयारी असते.
मला कौतूक वातते ते कॅनडा / न्यूझीलंड येथे स्थाईक होणारांचे.
नोकरीची कसलीही व्यवस्था नसताना ते तेथे जातात धडपड करतात आणि सुस्थितीत येतात.
भारतात इतरत्र रहाणे आणि यूरोप अमेरीकेत रहाणे यात मुख्य फरकाहे तो रंगभेदाचा. भारतात या समस्येला आपल्याला फारसे तोंड द्यावे लागत नाही.
रंगभेद समस्या अमेरीकेत नाहीच मुळी असेही नाही.
इथून गेलेले लोक त्याला तोंड देत असतील तेथे जम बसवतात. हे कौतुकास्पद नाही का?
परदेशी गेलेले लोक तेथे पैसे कमवायलाच गेलेले असतात. बर्यापैकी उत्तम जीवन जगायला गेलेले असतात. त्यांची धडपड यशस्वी होते याची असूया एतद्देशियानी का बाळगावी.
मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .
पुस्तक ठीकठाक आहे. एवढे काही खास नाहिये.
मागच्या पिढीतील किंवा आपल्या आजोबांच्या पिढीतील लोकांविषयी जास्त लिहीले आहे ...असे लोक की ते आता अमेरिकामध्ये व्यवस्थीत स्थिरस्थावर झाले आहेत. 'फॉर हिअर ऑर टू गो ?' हा प्रश्न सध्या आपल्या सारख्या पिढीतील लोकांना नेहमी भेडसावत असतो त्यां लोकांबद्द्ल, त्यांच्या झगडण्याबद्द्ल , त्यांच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याबद्द्ल लेखिकेने खूपच कमी (किंबहुना नाहिच) लिहिले आहे.
तरी बरंय, लेखिका या दशकातच अमेरिका हिंडली आणि लोकांचे अनुभव गोळा केले. तरीही एक मोठा समूह - आयटी आणि आयटी शी संलग्न क्षेत्रातील आताच्या पिढीतले लोक ह्यांच्या अनुभवाविषयी लेखिकेने फारसे काही लिहीलेले नाही.
पण ४०-४५ वर्षापूर्वी जे लोक अमेरिका मध्ये स्थलांतरीत झाले त्यांच्या अनुभवाविषयी , झगडण्याविषयी वाचायचे असेल तर अवश्य वाचावे.
>> तरीही एक मोठा समूह - आयटी आणि आयटी शी संलग्न क्षेत्रातील आताच्या पिढीतले लोक ह्यांच्या अनुभवाविषयी लेखिकेने फारसे काही लिहीलेले नाही.
कारण माझ्या माहितीप्रमाणे हे पुस्तक जे लोक साठच्या दशकात किंवा त्याच्या आसपास प्रामुख्याने अमेरिकेत आले त्या पिढीबद्दल आहे.
मस्त पुस्तक आहे. ओळख करुन दइल्याबद्दल धन्यवाद
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
पुस्तक परिक्षण चांगलं लिहिलं आहेस प्राजु.
एकूण पुस्तक लिहिण्यासाठी अपर्णा वेलणकरांनी बरेच कष्ट घेऊन माहिती गोळा केली आहे. काही अपवादाचे भाग वगळता मलाही पुस्तक आवडलं.
>> त्यांचे झगडे वेगळे, आमचे झगडे वेगळे.
एकदम बरोब्बर बोलालास मिभो ! 'फॉर हिअर्....'मधे आदराने उल्लेख केल्या गेलेल्या आमच्या एका स्नेहींनी मला एग्झॅक्टली हेच वाक्य सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "अरे, आमचे झगडे वेगळे होते. तुमचे झगडे वेगळे आहेत."
---------
योगायोगाने मी 'फॉर हिअर्...'नंतर काही दिवसांत लगेच जे पुस्तक वाचायला घेतलं ते म्हणजे 'सामन्स ऑफ नर्मदा' (Salmons of Narmada). डॉ. भूषण केळकर ह्याने NRI व्यक्तींकडून मागवलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. फक्त फरक इतकाच की इथे NRI म्हणजे Nest Returned Indians ! जे अनिवासी भारतीय काही वर्षे भारताबाहेर राहिले आणि मग काही ना काही कारणाने कायमचे भारतात परतले त्यांनी स्वत:च्या अनुभवांबद्दल लिहिलेले हे लेख आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे भारतात हे पुस्तक सहज उपलब्ध असावं.
स्थलांतर आणि झगडा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्थलांतर कुठून कुठे होते त्यावर त्या झगड्याचा प्रकार आणि तीव्रता ठरते. शिवाय ते कुठल्या काळात झाले आहे ह्यावरही त्याचे मूल्यमापन करावे लागेल.
वरती मिभो म्हणतात तसे ४०-४५ वर्षांपूर्वी अनेक गोष्टी वेगळ्या होत्या. संधी, स्पर्धा ह्यांची गणितं आजच्या काळापेक्षा वेगळी होती.
गेल्या १५-२० वर्षात इकडे आलेल्या लोकांना चढत्या क्रमाने स्पर्धा, संधींची उपलब्धता, वीसा वगैरे तांत्रिक बाबींचे सतत बदलणारे नियम इ. ना तोंड द्यावे लागले असणार.
सगळ्यांना एकाच पारड्यात मोजणे अयोग्य ठरेल.
मानसिक पातळीवरचा झगडा तर अनिवार्यच असतो.
एकूणच स्थलांतर ह्या विषयाबाबत वेलणकरबाई किती खोल पाण्यात आहेत आणि पुस्तकाचा एकूण वकूब कसा असेल ह्याबद्दल मी साशंक आहे, तरीही चाळून बघायला हरकत नाही.
चतुरंग
पुस्तक कदाचित परिपूर्ण नसेलही पण मुळात 'अमेरिका म्हणजे काय बॉ, मज्जाच आहे तुमची' इतकाच विचार करू शकणाऱ्या लोकांना हे वाचून इतका तरी कळेल ना कि इथे आलं म्हणजे सगळं छानच असतं असं नाही. अमेरिकेत काही म्हणता काहीही 'कमी' नाही काही अडचणीच नाही असं विचार करणारे लोक आहेत अजूनही. तेव्हा अशा पुस्तकाचं स्वागतच व्हावं.
"तुमचे झगडे वेगळे ... आमचे वेगळे होते " हेच खरं ! या पुस्तकात काय नाही यावर जी चर्चा चालू आहे त्यातूनच कदाचित ते नसलेलं असेल असं एक पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळेल कुणालातरी :)
प्राजू ताई, हे पुस्तक वाचायचं असं ठरवलं होतं खरं पण अजून हाती आलं नाहीये ... बर झालं लिहिलंत याबद्दल ते ...
सर्वप्रथम प्राजूचा लेख आणि पुस्तक परीक्षण नेहमीप्रमाणेच आवडले. पुस्तक नक्कीच वाचायला आवडेल. पुस्तक वाचले नसताना त्यावर टिका करणे हे मला पटत नाही म्हणुन खालील स्फूट विचार हे या विषयाशी संबंधीत आहेत इतकेच समजावे. :-)
फॉर हीअर टू गो प्रमाणेच त्याच्या बरेच आधी शोभा चित्रे यांचे "गोठलेल्या वाटा" हे पुस्तक भारतातच असताना वाचनात आले होते. त्यातील सूर हा अनिवासी भारतीयाचा होता हा एक मुख्य फरक. पण "टू गो" चे "हीअर" कसे आणि कधी झाले हे समजले नाही असे त्या लेखिकेचे म्हणणे होते. अमेरिकेसंदर्भात अनेक मराठी लेखकांनी लिहीले आहे. त्यात पुल असतील तसेच वपू पण आहेत ज्यांना खड्डे विरहीत रस्ते पाहून अस्वस्थता आली (आणि बर्फानंतर असे वपूंनी कुठे पाहीले हे खड्ड्यातून गाडी चालवताना आम्हाला अस्वस्थता येते ;) ). अनिल अवचटांच्या अमेरिका पुस्तकातील अमेरिका वाचल्यास अमेरिका म्हणजे शिक्षाच वाटेल. वर संदीपने सांगितलेले सामन्स ऑफ नर्मदा वाचलेले नाही पण तसेच त्याचे मराठी पुस्तक वाचले आहे. पण तो वेगळा विषय होईल म्हणून "टेम्प्टेशन" टाळतो. :) तरी थोडक्यात भारताप्रमाणेच ह्यातील प्रत्येकच लेखन हे एका हत्तीचे सात आंधळ्यांनी केलेले वर्णन वाटते. असो.
असे जेंव्हा विषय येतात तेंव्हा खेड्यातून शहरात रहायला आलेल्या माणसाच्या मनातील (कोरडी?) व्यथा दाखवणारी बा.सी. मर्ढेकरांची "किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो" ही कविता आठवते. या कवितेच्या नायकाला एकीकडे बालपणचे मोकळे रान, नदीमधे डुंबणे वगैरेने गावाची ओढ लागलेली असते. पण आता सवय गेल्याने "आज अंतरात भिती खुल्या चांदण्याची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी" असे म्हणत शेवटी तो, "बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पार्याचा, बरी तोतर्या नळाची शिरी धार मुखी ऋचा" असे म्हणत परत कामाला लागतो...
थोडक्यात माणूस लहानपणी घडत असताना जे काही अनुभवतो ते जसजसे कामानिमित्ताने अथवा इतर कशाने दुरावते तेंव्हा ह्याच अवस्थेतून जातो. मग कोणी मुंबईत राहून "आमच्या कोकणातील देवगड मधे..." सांगतो तर कोणी बॉस्टनमधे येऊन, "आमच्या भारतात..." सांगतो :-)
म्हणलं तर यात गैर काहीच नाही. उद्या आमच्या मुलांनी आमच्यामुळे अथवा स्वतःच्या इच्छेने भारतात आली तर त्यांना अमेरिका, बॉस्टन, ह्युस्टन, बे एरीया वगैरे जे काही "मिस" होईल ते त्यांच्या बालपणातील आठवणीमुळे असेल (तसे ही झालेले पाहीले आहे - पहीली पिढी अमेरिकेत आणि दुसरी पिढी कामाने आणि नंतर आवडल्याने भारतात!).
मग अशा पुस्तकांची वर प्रतिसादांमधे आल्याप्रमाणे गरज नाहीच आहे का? मला तसे वाटत नाही. कुणाचे उदात्तीकरण होऊ नये या बद्दल मी सहमत आहे पण म्हणून त्यांच्या कथाच येऊ नयेत याच्याशी नाही. किंबहूना मी आत्ताच्या ज्येष्ठ नागरीकांना (घरापासून) सांगायचा प्रयत्न करतोय की तुमचे अनुभव लिहून काढा. अनुभव हे काही केवळ प्रसिद्ध व्यक्तीसच आलेले नसतात. ते प्रत्येकालाच येत असतात. मधे येथेच, चतुरंग ने सावरकरांबद्दल (त्याला भेटलेल्याआजोबांबद्दल) लिहीले अथवा स्वातीदिनेश ने तिच्या सासर्यांकडून लिहून घेतले तसेच काहीसे...
------------------
बाकी मिभोच्या तेव्हांचे आणि आत्ताचे संदर्भात:
भारतीय लोंढे (आडनाव नाही!) येण्याच्या सुरवातीच्या काळात अमेरिका ही तसे मर्यादीत भारतीयांपुरतेच स्थलांतराचे स्थान होती. परीणामी अमेरिकेचे सामान्य भारतीयांना अप्रूपही होते आणि तसे अप्रूप वाढवत ठेवणार्यांची सगळेच नसले तरी संख्या देखील होती. कालांतराने, विशेष करून ऐंशीच्या शेवटाला आवक वाढत गेली आणि एकविसाव्या शतकाच्या सुरवातीस तर काय भारतीयांचे माथेरान-महाबळेश्वरला जाण्याप्रमाणे अमेरिकेत अथवा इतर प्रगत, प्रगतशील देशात जाणे वाढले. सर्वच घरोघरी अमेरिकेत गेलेला नसला तरी जवळचा कोणीतरी (२, ३ डिग्री सेपरेशनमधेच) कोणीतरी नक्कीच दिसू लागला. थोडक्यात अमेरिकेचे अप्रूप राहीले नाही. शिवाय झगागाटाशिवाय बाकीच्या वास्तवाचे पण दर्शन होऊ लागले.
जाता जात अजून एक ("बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स...," च्या संदर्भात) : दिडदोन वर्षांपूर्वी मॅनहॅटनच्या एका रेस्टॉरंटमधे एका विशेष कार्यक्रमात एक एकदम उमदा दिसणारा तरूण (२५+) मुलगा भेटला. आम्ही गप्पा मारत होतो. एकीकडे व्यवस्थित बोलत होता तर दुसरीकडे अंगभूत माज दिसत होता. स्वतःची भारतातील श्रीमंती सांगत होता. पण स्वतःच्या नावापेक्षा अधिक (आडनावपण) सांगायचे टाळत होता. नंतर टोकल्यावर कळले की मोठ्या राजकारण्यांच्या जवळचा होताच पण आजोबा हे नको त्या काळ्या अध्यायात देशामधे प्रसिद्ध झालेले असल्याने लपवालपवी चालली होती. पण सर्व माज दाखवत असताना देखील शेवटी तुमच्या-आमच्यासारखे व्हिसाच्या लाईनीतच उभे रहावे लागले आणि इथे न्यूयॉर्कमधे नेटवर्कींगने का होईना पण जॉब शोधत बसावे लागले होते...
प्रतिक्रिया
धावता
चांगले पुस्तक...
मस्त ....
असेच
असेच
असेच
प्राजु ताई
अमेरिकाच
अमेरिकाच
४०-४५
चांगला
चांगला आढावा
एक चुकीचे गृहीतक
अजूनच
आपण
प्राजूताईंना उद्देशून नसावे!
अर्थातच
गांधी
माफ
+१
परीक्षण आणि प्रतिसाद
विधान पुन्हा एकदा वाचा
पुन्हा विचार केल्यावर..
स्पष्टीकरणासाठी विनंती
प्रतिसाद
धन्यवाद
सहमत
पुस्तक
अगदी हेच
छान
रोचक
परदेशी
छान.
पुस्तक ठीकठाक
कारण माझ्या माहितीप्रमाणे
प्राजु तै
मस्त
पुस्तक
'फॉर हिअर...' आणि 'सामन्स ऑफ नर्मदा' !
परीक्षण चांगले केले आहेस प्राजू.
वाचायला हरकत काय ?
कितीतरी दिवसात..
परीक्षण
आवडले.
लेखक आपल्या भेटीला...
तरीच
उत्कृष्ट
उलट आय एम
पुस्तक