काळा मिट्ट अंधार.
अजुनही दहा मिनिटे होती तासिका संपायला.
(आजकाल तास म्हणत नाहीत)
विज कधी येणार ते माहीत नव्हते.
मुले अंधारात कशी काय अभ्यास करतात कुणास ठाउक.?
समोर बसलेला मास्तर तरणा होता.
चेहेरा तरारलेला.
मास्तरकीची चमक स्पष्ट दिसत होती.
नेहेमीच्या विझलेल्या डोळ्यानी यंत्रवत काम करणार्या शिक्षकापेक्षा वेगळा.
शाळा गोलमेज परिषदेच्या काळातली.
अजुनही तशीच.
१२ फुटावर छत.
पत्र्याचे
मोडके पंखे
तुटकी बाके.
माझ्या खुर्चीतल्या ढेकणाची चंगळ चालली होती.
शाळेच्या कंपाउंड ला लागुन १७ माळ्याची टॉलेजंग इमारत दिसत होती.
ही कुठली आपटे बुद्रुक गावातली शाळा नव्हती.
अगदी मुंबईच्या १२००० स्क्वेअर फुट दराच्या उपनगरातील मराठी शाळा.
आजुबाजुच्या प्रगतीचा मागमुस ह्या मराठी माध्यमाच्या शाळेला नव्हता.
इतक्यात वर्ग शिक्षिका ९ वी मधील ३ मुलांना घेउन आली.
झाला प्रकार सांगितला.
मास्तर भडकला.
फटाक....(कानाखाली)
धपाक.....(पाठीवर)
शारिरीक समुपदेशनाचे जवळ जवळ १५ मिनिटाचे अगदी जवळुन दर्शन.
तो जे काही बोलत होता त्यावरुन एवढे नक्की होते की..
मास्तरमधला मास्तर अजुनही मेला नव्हता.
त्यातल्या एका मुलाचा मोठा भाउ गेल्या वर्षीचा दहावीला१ ला नंबर.
त्याची शाब्दिक आणि शारीरीक धुलाई अगदी कडक चालली होती.
झाला प्रकार असा.
मुलांनी शक्कल लढवली.
मॉल मधील खर्च फायनान्स करायची.
रस्त्यावर उभे राहायचे गणवेशात.
छातीवर तिरंगा.
डब्यावर तिरंगा.
आल्यागेल्याला छातीवर तिरंगा लावायचे.
डबा पुढे करायचे.
असे सुमारे २ महीने चालु होते.
रोज त्याच मुलांना मॉलमधे बघितल्यावर एका डोरकिपरने सामाजिक बांधिलकी बाळगली आणि प्रकार उघडकीस आला.
मास्तर धुलाई संपवुन माझ्या कडे वळला.
आता तो माझे दही करणार ह्याची मला खात्री झाली होती
" काय करायचे या मुलांचे ?" मास्तर
इतक्यात बोलावणे आले आणि मी सुटलो.
जाता जाता त्याला म्हणालो,
" मास्तर फार मनावर घेउ नका"
तुम्ही रिटायर होईपर्यंत ह्यातलाच कुणीतरी यम्.यल्.सी. यम्.यल्.ये. ,यम्.पी होउन शाळेतल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होइल.
त्याचा गुच्छ देउन तुम्हालाच आदर सत्कार करायला लागेल"
वाचने
3999
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ ...
तुम्ही
+१
In reply to तुम्ही by अवलिया
शेकडो
In reply to तुम्ही by अवलिया
+१
In reply to शेकडो by विनायक प्रभू
विदारक पण
हा हा
आता तो
In reply to हा हा by सहज
फुकट दही
In reply to आता तो by परिकथेतील राजकुमार
लेका
In reply to आता तो by परिकथेतील राजकुमार
लेका
In reply to लेका by टारझन
चीज झाले
In reply to लेका by टारझन
....
कळले नाही
+१
In reply to कळले नाही by सुनील
यू सेड इट, अदिती !
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
१०१% सहमत
In reply to यू सेड इट, अदिती ! by संदीप चित्रे
बरोबर
अहो पण
In reply to बरोबर by विनायक प्रभू
च्च!
शाळेच्या
मुलांना