तुम्ही रिटायर होईपर्यंत ह्यातलाच कुणीतरी यम्.यल्.सी. यम्.यल्.ये. ,यम्.पी होउन शाळेतल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होइल.
किंवा लोकांना मरणाची भिती दाखवुन विमा काढायला लावेल
किंवा लोकांना नस्त्या बलामती दाखवुन समुपदेशक बनेल
किंवा दलालस्ट्रीट वरच्या कंपन्यांचा एजंट बनुन आयपीओतुन पैसा लाटेल
किंवा मराठीचा प्राध्यापक बनुन संस्कृत शिकणे कसे चुकीचे आहे हे सांगेल
किंवा इथल्या स्पर्धेला भिवुन परदेशात दुय्यम दर्जाची नोकरी करेल
किंवा...............!!!!!!!!!
अक्षरशः शेकडो शक्यता आहेत मास्तर... तुम्ही फक्त एकच शक्यता धरत आहात.
असो. सध्या भारतातील राजकारण्यांना काही करुन नावं ठेवायची आणि आपण किती धुतल्या तांदळाचे आहोत हे सांगायची फ्याशन आंतरजालावर आहे... तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल.
ग्रेट !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
मराठी मिडीयममधली का? वा वा लै भारी आहेत हो पोरं!
मास्तर धुलाई संपवुन माझ्या कडे वळला.
आता तो माझे दही करणार ह्याची मला खात्री झाली होती
का बरे गेस्ट लेक्चररनी शिकवली होती का ही जुनी ट्रीक? ;-)
लेका पर्या ... तुला एवढाही माहित नाही का ? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला "विरजण वाला काका" होता !!
-- ऊकळहप्ता
आमच्या येथे सर्व मास्तरांचे "खात्रीशीर" दही करून मिळेल.
मुले जर शाळेच्या वेळात, तास बुडवून हे करीत असतील, तर त्यांच्या पालकांना ह्याबद्दल कळवणे, हा उपाय योग्य. पण जर का, मुले शाळा न बुडवता हे करीत असतील, तर त्यात अयोग्य ते काय, ते समजले नाही. (म्हणजे, मिळालेल्या पैशाचा विनियोग ते उधळपट्टीत करीत असतील, तर त्यांना योग्य ती शिकवण जरूर द्यावी, पंणं मुदलात अशा तर्हेने पैसे कमवणे हेच अयोग्य आहे काय?)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
घरचे उधळपट्टीला पैसे देत नसणार याबाबतीत +१.
मुलांनी डोकं चालवलं यासाठी +१
तास बुडवत नसतील तर +१
आणि झेंडे विकणं चूक नसेल तर +०
पोरांनी किमान डोकं चालवलं याचा तरी विचार व्हावा. पोरांना डोकं आहे, ते योग्य त्या ठिकाणी चालावं यासाठी हा तक्रारखोर शिक्षक काही करणार का नुस्ती हाणामारी?
अदिती
किती हुशार आहेत पोरं!
डोक नको तिकडे चाललय हे खर.. पण अशी हाणामारी करून त्यांना चुक कळणार आहे का? हेच प्रेमाने समजावल तर हीच अक्कल योग्य ठिकाणी वापरून चीज ( नाहितर किमान दहि-चक्का तरी नक्कीच) करतील
शाळेच्या शिक्षकांनी मारायला नको होते. मॉलसंस्कृतीकडे मोठे लोक (म्हणजे वयाने) ही आकर्षीत होतात तर अश्या विचित्र वयातील मुलांना फारसा दोष देता येणार नाही. त्यांना तिथले नक्की काय आवडते? फूडकोर्ट? चकचकीत दुकाने? कि वरवर दिसणारा भरपूर पैसा? प्रत्येक मुलाच्या स्वभावानुसार/वयानुसार प्रश्न वेगळ्याप्रकारे सोडवता येइल. पालकांना विश्वासात घेऊन सांगता येइल. मार्ग भरपूर आहेत पण आजकालची मराठी शाळांची परिस्थिती बघता (प्रभू मास्तरांनी वर्णन केल्यानुसार्....ढेकूण वगैरे) त्या शिक्षकांनी तरी काय काय करायचं? न मारता पालकांना सांगणे एवढे तरी ते नक्कीच करू शकतात. सुजाण पालक परिस्थिती ओळखून वागतील.
रेवती
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ ...
तुम्ही
+१
शेकडो
+१
विदारक पण
हा हा
आता तो
फुकट दही
लेका
लेका
चीज झाले
....
कळले नाही
+१
यू सेड इट, अदिती !
१०१% सहमत
बरोबर
अहो पण
च्च!
शाळेच्या
मुलांना