वयोमानापरत्वे दीदींच्या आवाजातला गोडवा कमी झालाय असं अनेक विद्वानांचं मत आहे. हैदराबादमध्ये काही वर्षांपूर्वी लतादीदींचा कार्यक्रम झाला होता, त्यानंतर दीदींचा लाईव्ह कार्यक्रम झाल्याचं ऐकिवात नाही. आवाजातला नाजुकपणा पूर्वीपेक्षा कमी झाला असला, तरी गोडवा अजूनही तितकाच कायम होता असं त्या कार्यक्रमातली गाणी ऐकल्यावर लक्ष्यात येतं.
दीदींच्या आवाजाच्या गोडव्याबद्दल बोलण्याची माझी लायकी नाही. पण मला त्यातलं जे काही झेपलंय त्यानुसार दीदींच्या या सो कॉल्ड "जाड" आवाजाबद्दल -
दीदींच्या आवाजात समुद्राच्या निळ्या रंगातलं गहिरेपण आहे.
एखाद्या वस्तूवर पोतलेला निळा रंग आणि जलाशयाला भव्यतेमुळे लाभलेला निळा रंग यात जो फरक आहे तोच इतर जाड आवाजांमध्ये आणि दीदींच्या आवाजामध्ये फरक आहे असं मला वाटतं. पोतलेला रंग हटवता येतो, समुद्राचा रंग हटवता येत नाही.
दीदींची पूर्वीची गाणी ऐकल्यावर त्यांच्या आताच्या आवाजात तीच गाणी ऐकवत नाहीत असंही अनेकांचं मत आहे. त्यांच्या मताचा आदर करतो. मूळ गाण्यांपेक्षा आताच्या आवाजातली त्यांची गाणी कधीकधी कितीतरी पटीने आनंददायक आणि गोड वाटतात असं मला वाटतं. उदाहरणार्थ, हैदराबादच्या कार्यक्रमातलं हे गाणं.
"जो वादा किया वो निभाना पडेगा"मध्ये पहिल्या कडव्याच्या शेवटी "जान-ए-वफा छोडो तरसाना हमको" नंतर "आना पडेगा....जो वादा किया वो...."च्या वेळी दीदींनी व्होकल काँट्रा दिलाय तो केवळ अप्रतीम. मूळ गाण्यात तो काँट्रा नाही. मूळ गाण्यात न घेतलेल्या पण प्रत्यक्ष मैफलीत घेतलेल्या या जागेवर जीव ओवाळून टाकावा असं वाटतं. "परमानंद" वगैरे मोठ्या शब्दांचा अर्थ कळत नाही आपल्याला (म्हणजे मला). पण उपरोक्त काँट्रामध्ये परमानंदाचा एक अंश असावा असं वाटतं.
वाचने
2589
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
मूळ गाण्यात न घेतलेल्या
क्रांती,
In reply to मूळ गाण्यात न घेतलेल्या by क्रान्ति
जो वादा
बेस्ट!! -
हे आणि
हे आणि
हे आणि
आमची पिंक