Skip to main content

अचानक....

लेखक नेहमी आनंदी यांनी मंगळवार, 27/10/2009 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
अ्चानकच तूला अस समोर बघितलं आणि काय झालं न कळे शुष्क असलेल्या जिवनात एक कोम्बं अंकुरलं..... निगा राखावी तर कशी कळेना पाऊस प्रेमाचा कधी पडेना रान वाळवंट झाले.... ग्रिष्माचे रण माजले.... मग केले हद्दपार पावसाला या जिवनातून तुझ्यासकट...... आणि पुन्हा अचानक.... हो अचानकच..... तू समोर आलास.. ठरवलं होत थेंब हे पडु द्यायचे नाहित तरी उगाच पाणी तरळले झिरपु नकोस म्हंटल तरी हा पाऊस कोसळलाच प्रसन्ना जीके
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1706
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

ठरवलं होत थेंब हे पडु द्यायचे नाहित तरी उगाच पाणी तरळले झिरपु नकोस म्हंटल तरी हा पाऊस कोसळलाच ... वा!! छान आहे कविता ..

उत्तम कविता. अचानक वाचली आणी अचानक आवडली. ©º°¨¨°º© अचानक प्रतिसादकर्ते ©º°¨¨°º© आमचे राज्य

छान कविता.. फ़क्त एक शंका.. एक कोम्बं अंकुरलं...>> इथे कोंब अंकुरला असं हवं होतं बहुदा. :-) पुलेशु. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"