उकडहंडी
नमस्कार मंडळी..
आज एका अत्यंत चवीष्ट भाजीची तितकीच सोप्पी कृती घेउन आपल्या सेवेसी हजर आहे.
ही भाजी आमच्या गावी साधारण फेब-मार्च महिन्यात होळीच्या आसपास केली जाते. त्यावेळी वाडीत बर्या पैकी भाजीपाला असतो.
गावी ही भाजी मातीच्या मडक्यात करतात. सगळे जिन्नस एकत्र करुन हे मडके एका खड्यात ठेवुन वरुन जाळ करतात.
पण आपल्या शहरात एक वेळ मडक मिळेल पण ते पुरायच कुठे आणि जाळ कसा करायचा ?
पण एवढ्याश्या कारणासाठी आपण या चवीष्ट भाजीला का मुकावं बर? म्हणुन आपल्या घरात करता येइल अशी कृती देत आहे.
जमल्यास कधी गवी गेलात तर मडक्यात पण करुन पहा.पण तो वर आपली शहरी कृती खालील प्रमाणे.....
साहित्य :
२५० ते ३०० ग्रॅम. कोनफळ.
२ मोठे बटाटे
२ मध्यम वांगी.
२ कच्ची भाजीची केळी.
२५० ते ३०० ग्रॅम पापडी/घेवडा.
आसल्यास वाल पापडी चे गोळे/दाणे.
३-४ शेवग्याच्या शेंगा.
१ रताळं.
१ वाटी किसलेला नारळ.
असल्यास पाती कांदा.
३-४ हिरव्या मिरच्या
मीठ, हळद, लाल तिखट, मसाला, तेल.
कृती :
१) एका जाड बुडाच्या भांड्यात भाज्यांचे जरा मोठेच तुकडे करुन घ्या.
२) यात चवी नुसार मीठ, हळद, लाल तिखट, मसाला, ३ मोठे चमचे तेल टाका.
३) भज्या टॉस करुन सगळा मसाला,मीठ नीट पसरवुन घ्या.
४) मध्यम आचे वर भांड्या वर झाकण (झाकणावर पाणी) ठेवुन दणदणीत वाफ येउद्या. ही भाजी पुर्ण पणे वाफेवरच शिजवायची. पाणी अजीबात टाकुनये.
जर भाजी खाली लागतेय अस वाटल तर आच लहान करा. तवा गॅसवर ठेवुन भांड तव्यावर ठेवा.
५) साधारधा १५-२० मिनिटां नंतर झाकण काढुन एकदा परता. किसलेला नारळ टाकुन परत एक वाफ काढा.
कोनफळ शिजल की गॅस बंदा करा.
तळटिप : ही भाजी आमच्याकडे खात नाहीत तर जेवतात ;) त्यामुळे सोबत चपाती, भात नसल तरी फरक पडत नाही :)
वाचने
20569
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
मस्त रे भाऊ....
छान. >>गावी
In reply to छान. >>गावी by प्रभो
अगदी खरय
In reply to छान. >>गावी by प्रभो
काशाला हो
सही
In reply to सही by सहज
तो मी नव्हेच!
In reply to तो मी नव्हेच! by बहुगुणी
ओह
मस्तच... फोटो अन् पाककृतीही...
In reply to मस्तच... फोटो अन् पाककृतीही... by sneharani
+१
In reply to मस्तच... फोटो अन् पाककृतीही... by sneharani
हे पहा
अस्सल
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
क्लास!
माझ्या
एस-क्लास !!
जबरा
छान पाकृ.
शाकाहारी
झकास!
आपले मिपा सदस्य
In reply to आपले मिपा सदस्य by रामदास
कधी जायचं
वा वा वा
In reply to वा वा वा by धनंजय
कशी झाली होती?
In reply to वा वा वा by धनंजय
ते 'कोनफळ'
In reply to वा वा वा by धनंजय
फारच छान झाली
In reply to फारच छान झाली by धनंजय
अरे वा!!
In reply to अरे वा!! by निमीत्त मात्र
ओगलेबाईंकडून फक्त वरून-खालून-निखारे=ओव्हन
In reply to ओगलेबाईंकडून फक्त वरून-खालून-निखारे=ओव्हन by धनंजय
क्या बात
क्या बात है.....!!!!
मस्त
मस्त
In reply to मस्त by अश्विनीका
प्राजक्ता
In reply to प्राजक्ता by प्राजक्ता पवार
अवांतर : हॅहॅहॅ
आकर्षक
मस्तच...
उकडहंडी.
आता धागा
In reply to आता धागा by गणपा
म्हणाले तर
गणपाशेठ, फो
In reply to गणपाशेठ, फो by निमीत्त मात्र
एवढ्या
In reply to एवढ्या by पर्नल नेने मराठे
जाऊ दे ग
अरे तो
कोनफळाला Yam म्हणतात
या
वाचुनच भुक