मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उकडहंडी

गणपा · · पाककृती
नमस्कार मंडळी.. आज एका अत्यंत चवीष्ट भाजीची तितकीच सोप्पी कृती घेउन आपल्या सेवेसी हजर आहे. ही भाजी आमच्या गावी साधारण फेब-मार्च महिन्यात होळीच्या आसपास केली जाते. त्यावेळी वाडीत बर्‍या पैकी भाजीपाला असतो. गावी ही भाजी मातीच्या मडक्यात करतात. सगळे जिन्नस एकत्र करुन हे मडके एका खड्यात ठेवुन वरुन जाळ करतात. पण आपल्या शहरात एक वेळ मडक मिळेल पण ते पुरायच कुठे आणि जाळ कसा करायचा ? पण एवढ्याश्या कारणासाठी आपण या चवीष्ट भाजीला का मुकावं बर? म्हणुन आपल्या घरात करता येइल अशी कृती देत आहे. जमल्यास कधी गवी गेलात तर मडक्यात पण करुन पहा.पण तो वर आपली शहरी कृती खालील प्रमाणे..... साहित्य : २५० ते ३०० ग्रॅम. कोनफळ. २ मोठे बटाटे २ मध्यम वांगी. २ कच्ची भाजीची केळी. २५० ते ३०० ग्रॅम पापडी/घेवडा. आसल्यास वाल पापडी चे गोळे/दाणे. ३-४ शेवग्याच्या शेंगा. १ रताळं. १ वाटी किसलेला नारळ. असल्यास पाती कांदा. ३-४ हिरव्या मिरच्या मीठ, हळद, लाल तिखट, मसाला, तेल. कृती : १) एका जाड बुडाच्या भांड्यात भाज्यांचे जरा मोठेच तुकडे करुन घ्या. २) यात चवी नुसार मीठ, हळद, लाल तिखट, मसाला, ३ मोठे चमचे तेल टाका. ३) भज्या टॉस करुन सगळा मसाला,मीठ नीट पसरवुन घ्या. ४) मध्यम आचे वर भांड्या वर झाकण (झाकणावर पाणी) ठेवुन दणदणीत वाफ येउद्या. ही भाजी पुर्ण पणे वाफेवरच शिजवायची. पाणी अजीबात टाकुनये. जर भाजी खाली लागतेय अस वाटल तर आच लहान करा. तवा गॅसवर ठेवुन भांड तव्यावर ठेवा. ५) साधारधा १५-२० मिनिटां नंतर झाकण काढुन एकदा परता. किसलेला नारळ टाकुन परत एक वाफ काढा. कोनफळ शिजल की गॅस बंदा करा. तळटिप : ही भाजी आमच्याकडे खात नाहीत तर जेवतात ;) त्यामुळे सोबत चपाती, भात नसल तरी फरक पडत नाही :)

वाचने 20569 वाचनखूण प्रतिक्रिया 44

प्रसन्न केसकर Mon, 10/26/2009 - 16:16
छान लागते ही भाजी - विषेशतः भाज्या गावरान असतील, हायब्रीड नसतील तर. फोटो बघुनच तोंडाला पाणी सुटलं. आज सकाळीच विषय झालाय. मित्राच्या शेतावर हुरडा-उकडहंडी करायला कधी जायचं असा. वाटच बघतोय प्रोग्राम पक्का व्हायची.

प्रभो Mon, 10/26/2009 - 16:21
छान. >>गावी ही भाजी मातीच्या मडक्यात करतात. सगळे जिन्नस एकत्र करुन हे मडके एका खड्यात ठेवुन वरुन जाळ करतात. हा प्रकार चिकन वापरून पण करतात जनरली कोकणात अलिबाग साईडला.पोपटी म्हणतात त्याला. ह्या पोपटीची स्पेशालिटी म्हणजे हे चिकन बनवल्यानंतर कडक न होता मऊ होत जाते.. भाजीचा प्रकारही मस्त रे गणपा... (पोपटी खा-खा खाल्लेला)प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

गणपा Mon, 10/26/2009 - 16:22
अगदी खरय रे पण त्यात आम्ही फक्त चीकन आणि कडव्या वालाच्य शेंगा टाकतो, भन्नाट प्रकार अस्तो तो. =P~ नुसत्या आठवणीनेच लाळ गळली...

अवलिया Mon, 10/26/2009 - 17:09
जबरा ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मीनल Mon, 10/26/2009 - 17:55
अजून एक शकाहारी पदार्थ. व्वा! ईझी दिसतो आहे करायला. इथे सर्व भाज्या बारमाही मिळतात.फ्रोजन!!! :D मीनल.

सुबक ठेंगणी Mon, 10/26/2009 - 18:02
पोपटी आणि उकडहंडी दोन्ही करून बघायलाच पाहिजेत! :) फक्त लाल तिखट, शेवग्याच्या शेंगा, पातीचा कांदा, खोबरं सोडल्यास उंधियुची आठवण झाली. ह्या उकडहंडीच्या भाजीतही मेथीचे मुठिये सही लागतील! :)

रामदास Mon, 10/26/2009 - 18:23
ब्रिटीश यांच्या रिसार्टात पोपटी चा कार्यक्रम नित्यनेमाने होतो.अलीबाग जवळ चौलला रिसॉर्ट आहे.

धनंजय Mon, 10/26/2009 - 21:42
यात भाज्यांच्या निवडीत बरेच स्वातंत्र्य आहे का? थोड्या पिठूल भाज्या, थोड्या शेंगा, थोड्या ओल्या शेंगांच्या बिया... आज घरी वरीलपैकी काही भाज्या आहेत पाकृ करून बघतो.

In reply to by धनंजय

धनंजय Wed, 10/28/2009 - 06:51
पाककृतीत केलेले फरक : १. माझ्याकडे होत्या त्या भाज्या घेतल्या. मुद्दामून कोनफळ आणले. बरोबर पांढरे रताळे (गोड नाही), भाजीचे केळे, बटाटा, फरसबी, मटार, पातीचा कांदा हे प्रकार घेतले. २. भांड्यावर चांगले बसणारे झाकण ठेवून ओव्हनमध्ये पदार्थ शिजवला. ("वर-खाली निखारे ठेवा किंवा ओव्हनमध्ये भाजून घ्या", असा पर्याय कमलाबाई ओगले देतात.) गणपांचा पदार्थ म्हटला तर काय, चवीला मस्तच झाला - त्यात काय सांगायचे :-)

In reply to by धनंजय

निमीत्त मात्र Wed, 10/28/2009 - 07:21
अरे वा!! फोटू कुठाय???? आणि हे काय आमच्या गणपाने कृती दिलेली असताना तुम्ही शेवटी ओगलेबाईंचीच कृती वापरलीत? बरं नुसतीच खाल्ली की भात/चपातीला लावून? त्याविषयी ओगले बाईंनी काही टिप्पणी केली आहे का? मीही करुन पाहावी म्हणतो...

In reply to by निमीत्त मात्र

धनंजय Wed, 10/28/2009 - 07:36
ओगलेबाईंकडून फक्त वरून-खालून-निखारे=ओव्हन ही कल्पना घेतली. बाकी पाकृ गणपा यांचीच (कोनफळ + घरच्या भाज्या वापरून हा फरक केला). तयारी : तयार : भाताशी खाल्ली.

दिपाली पाटिल Mon, 10/26/2009 - 22:05
मस्त दिसतेय उकडहंडी...मी पहिल्यांदाच पाहीली, इकडे केरळी दुकानांत मातीची हंडी मिळते, ते आणुन घेइन, मातीच्या मडक्यातल्या अजुन काही पाकृ असतील तर नक्की द्या.... दिपाली :)

अश्विनीका Mon, 10/26/2009 - 23:45
मस्त रेसिपी. करून बघायलाच हवी. कोनफळाला इंग्लीश मध्ये काय म्हणतात? अमेरिकन स्टोअर मधे मिळेल का? काय नावाने? - अश्विनी

In reply to by प्राजक्ता पवार

भडकमकर मास्तर Wed, 10/28/2009 - 14:59
कोनफळाला इंग्रजीत हूफ्रुट / हूजफ्रुट असे म्हणत असावेत. _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

गणपा Tue, 10/27/2009 - 21:40
आता धागा आलाच आहे वर तर सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार मानुन घेतो. नाही तर लोक म्हणायचे लेकाने आभाराच्या निमित्ताने धागा वर खेचला ;)

In reply to by गणपा

प्रभो Tue, 10/27/2009 - 21:55
म्हणाले तर म्हणाले...तुला ऐकू आलं का भावा??? --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

निमीत्त मात्र Wed, 10/28/2009 - 01:41
गणपाशेठ, फोटो वगैरे नेहमीसारखेच भारी असले तरी एकूणच पाककृती उठवळ वाटत आहे. भाज्या चिरुन, फोडणी करुन, वाफाऊन, परतुन रीतसर बनवायचा कंटाळा आलेल्या माणसाने ही रेसिपी शोधलेली दिसते.

In reply to by पर्नल नेने मराठे

गणपा Wed, 10/28/2009 - 13:50
जाऊ दे ग चुचु, जर मात्रसाहेबांनी ही भाजी कधी चाखली असती तर ते असे म्हणाले नसते. ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. या 'निमित्ता'ने का होइना आपला प्रतिसाद आला बरे वाटले. :)

दशानन Wed, 10/28/2009 - 09:05
अरे तो भाजी कापायचा चाकू कुठे आहे रे :? जरा दे बघू... च्यामायला स्वतःच्या हातानेच आता... पोटात घुसवतो ;) च्यामायला ! अरे कोणी तरी ह्या गणपाला किडनॅपतरी करा काही दिवस.... =))