श्री गणपा, या लेखकांची नावे घेण्याचे कारण म्हणजे ही मंडळी मराठी संकेतस्थळांवर सातत्याने दर्जेदार आणि संवेदनशील लेखन करतांना दिसतात. विनोदी खुसखुशीत लिहिणारे, प्रवासवर्णन लिहिणारे, वैचारीक लिहिणारे तसेच वाचनीय असे अनेक लेखक येथे आहेत. या चर्चाविषयाची मर्यादा लक्षात घ्यावी. तरीही आपल्याला इतर लेखकांविषयी लिहायचे असल्यास जरूर आपले मत मांडावे.
सिद्धहस्त लेखक आणी उत्क्रांत????
अक्षय (आपल्या-माझ्या खवतील संवादाप्रमाणे श्री न लावता),
सिद्धहस्त लेखकांच्या लेखनशैलीबद्दल मी पामराने शब्द काढणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे....सिद्धहस्त आपण त्यांनाच म्हणतो ज्यांच्या भात्यात सर्व प्रकारचे बाण आहेत आणी ते सोडायचे कसे हेही ते जाणतात...
स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व...पण माझ्या मते तुमचा टारगेट लेखक वर्ग चुकलाय. सिद्धहस्त लेखकांना उत्क्रांतीची गरजच काय???
उत्क्रांतीची गरज असते सर्वसामान्य लेखाकास जो काळपरत्वे उत्क्रांत होउन सिद्धहस्त व्हावा....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रतिक, लेखक सिद्धहस्त आहेत याविषयी संशय नाही. उत्क्रांतचा अर्थ त्यांच्या लेखनात सुधारणा होत आहे का असा नाही. त्यांच्या लेखनातील अनुभवचित्रण, शैली यात सूक्ष्म बदल होत आहेत का याविषयी चर्चा व्हावी.
म्हणून तर म्ह्टलय ना "सिद्धहस्त आपण त्यांनाच म्हणतो ज्यांच्या भात्यात सर्व प्रकारचे बाण आहेत आणी ते सोडायचे कसे हेही ते जाणतात"
बाकी त्यावर चर्चा हा गहन विषय आहे...तेवढं समजायची ताकत असती तर लेखन ही केलं असतं. त्यावर सिद्धहस्त वाचकच लिहू शकतील असे वाटते (उदा: एका सिद्धहस्ताने दुसर्याबद्दल लिहिणे)
बाकी .....चालूद्या.....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
काही जण आजकाल फारसे लिहित नाहीत तर काहीजण अजिबातच लिहितांना दिसत नाही
मिपाच्या व्यवस्थापनावर पडणारा ताण कमी करण्यासाठी लेखकांना आवर घालण्याचा प्रयत्न एकदा झाला होता. कदाचित त्याचा परिणाम असेल.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
प्रतिक्रिया
ही
मिपाच्या
तुमच्या आवडीच्या लेखकांविषयी लिहा
सिद्धहस्त लेखक आणी उत्क्रांत????
उत्क्रांती म्हणजे सुधारणा नाही
म्हणून तर
लेखकू उदंड झाले होते
लेखक होवो
यावर नवीन