वार - प्रतिवार...
शह - काटशह...,
अरे ला कारे....
नुसतेच सारे...,
शब्दांचे पसारे....!
नखं गळालेला जर्जर वनराज,
त्याच नखांनी परस्परांशी...,
झुंझताहेत छावे...!
सामर्थ्य, सत्ता ...
अनुत्तरित...? प्रश्न अस्मितेचा (?)
विखुरलेले सारे कळप मेंढरांचे!
बलाबलावरुन भांडताहेत ...
अनियंत्रित...,मेंढपाळ भरकटलेले!
त्यांचे राजकारण, फरफट कुणाची?
कुणीही यावे टिकली मारुन जावे
नियती आमची कधी बदलणार?
संतप्त, विव्हल ...
गांधारीचे शाप ...
आम्हालाही कायम भोवणार...!
आमच्याच भांडणात...
सत्तापिपासु लांडगे...
नेहमीच ...,मेजवान्या झोडणार!
आम्ही तसेच उपाशी....
ते मात्र सुखाचा ढेकर देणार !
विशाल
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1649
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा !! व्वा
छान आहे
मस्त
अप्रतिम काव्य
ही तर सगळी