नेहमीच्या चायनिज फ्राईड राईस पेक्षा आमच्या घरी थाई फ्राईड राईस जास्त आवडतो. करायला सोपा आणि झणझणीत.
साहित्य
१ १/२ कप तांदुळ (थाई मिळाला तर उत्तम नसेल तर आपला नेहमीचा कोलम पण बासमती नको. )
२ टे. स्पून तेल+ १ टे. स्पून तेल
१ कांदा, चिरून
१ लाल ढब्बू मिरची चिरून (हिरवी चालेल)
२ बोनलेस स्कीनलेस चिकन ब्रेस्ट बारीक तुकडे करून
२-३ लसुण पाकळ्यांची पेस्ट ( मी नुसत्या बारीक चिरून घेते)
१ टे. स्पून रेड थाई करी पेस्ट(mae ploy ब्रँड छान आहे), झणझणीत हवे असेल तर जास्त वापरा.
करी पेस्ट घरी करणार असल्यास http://www.misalpav.com/node/9844
१/२ टी स्पून हळद
२ टे. स्पून फिश सॉस
२ अंडी फेटून
मीठ आणि मिरेपूड चवीप्रमाणे
बेसीलची पाने, बारीक चिरून (नसली तरी चालेल)
कृती
फ्राईड राईस साठी आवश्यक म्हणजे गार झालेला मोकळा भात. तेव्हा तांदूळ धुवून त्याचा मोकळा भात करून घ्यावा आणि ताटात गार होण्यासाठी पसरून ठेवावा.(मी शक्यतो सकाळी भात करुन संध्याकाळी वापरते म्हणजे भात परफेक्ट मोकळा झाला नाही तरी चालतो)
वॉक किवा मोठी कढई गॅसवर तापत ठेवावी. चांगली तापली की त्यात २ टे. स्पून तेल घालावे. जरा कढईत तेल पसरवून घ्यावे. कांदा आणि ढब्बू मिरचीचे तुकडे टाकून १-२ मिनिटे परतावे. चिकनचे तुकडे, लसूण, करी पेस्ट, हळद घालून २-३ मिनिटे परतावे. आचमध्यम करून गार झालेला भात, फिश सॉस घालावा आणि भात गरम होईपर्यंत परतावे, चवी प्रमाणे मीठ आणि मीरेपूड घालावी. भातामधे मधोमध खड्डा करून १ टे. स्पून तेल घालावे. गरम झाले की त्यात फेटलेली अंडी घालून १-२ मिनिटे शिजवावी. लगेच भातात मिसळून घेऊन भात २-३ मिनिटे परतावा. असल्यास वरुन बेसिलची पाने घालावीत.
बोनलेस चिकन ऐवजी कोलंबी घालू्नही हा भात करता येतो. या भातात ब्रोकोली, बेबी कॉर्न, अॅस्परॅगस पण छान लागते.
वाचने
5070
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्याच आठवड्यात
जबहरा
थाई करी
माझ्याकडे
In reply to थाई करी by विंजिनेर
मस्त सोपी रेसिपी...
फिश सॉस (nam
In reply to मस्त सोपी रेसिपी... by सुबक ठेंगणी
मस्त गं