टाळ्या !!!!
=D>
जगाचे उध्दारकर्ते (एकमेव) श्री १००००००८ अमृतांजनबांबाचा विजय असो.... !!!!!
****
टिप :-
ज्यांना देणगी देणे आहे त्यांनी फक्त मलाच व्यनी करा, पुर्ण माहीती दिली जाईल.
धन्यवाद.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
अमृतांजनबाबा? कैच्या कैच राव... या साध्वी/मां वगैरे आहेत. पुरावा हवाय -
असे अनेक प्रश्न मी उकलण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला हेच दिसते...
तुझ्या अनुयायींनी...अशी स्पष्ट सुचनाच मी मांडते व माझे दोन शब्द संपवते.
पुरावा मुद्दाम देतोय. माझा डार्वीन नको व्हायला!!!
बाकी हा प्रस्ताव वाचल्यावर डार्वीन किती थोर होता हे मात्र पुन्हा अधोरेखीत झाले...
=))
=))
च्यामायला हा तर जेनेटिक लोच्या झाला राव =))
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
मूळ लेखात-
असे अनेक प्रश्न मी उकलण्याचा प्रयत्न करतेमाकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते
-
चपलेशिवाय माणूस चालु शकतो.
माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो?
हे सगळे पाश्चिमात्य रोग आहेत. जुन्या संस्क्रूतींच्या देशांत माणसाना फक्त साधा ताप येतो.
माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत?
सगळेच माकडाचे गूणधर्म आले तर मग उत्क्रांती कसली म्हणायची?
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
>>सगळेच माकडाचे गूणधर्म आले तर मग उत्क्रांती कसली म्हणायची?
=))
लै भारी जबरा वाक्य !!!
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
माझा मुद्दा असा आहे की, उत्क्रांत प्राणी निसर्गापासून दूर कसा जाईल?
माकडाला चष्मा लागत नाही. माणसाला लागतो कारण डोळ्यांचे विकार- हे कसले उत्क्रांतीचे लक्षण?
माकडं मिपा वाचत नाहीत... आय मीन्...माकडे टिव्ही.. संगणक असल्या वस्तू बघत नाहीत ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
म्हणूनच मी म्हणते की, मानव हा माकडापासून उत्क्रांत झालाच नाहि मुळी. तो एकतर परग्रहावरुन आलाय किंवा इथेच तयार झाला जसे इतर सजीव निर्माण झाले.- वेगवेगळे.
मानवच एखाद्या दुसर्क्ष्या प्राण्यासासून तयार झाला असे का मानावे? तसे दुसरे प्राणी निसर्गात का नाही?
अरे वा ह !
म्हणजे तुम्ही पण माझ्याप्रमाणे युफओवादी आहात तर....
च्यामायला मी जेव्हा जेव्हा लोकांना म्हणतो की युफओ असतो तेव्हा ते मला म्हणतात जास्त पीऊ नका रात्री... व निवांत झोपा...
परवा रात्री टेलीस्कोप मधून बघताना पण युफओ दिसला होता मला.. मी मिपावर लेख टाकणार होतोच.. पण नंतर कळाले ते काही तरी चिकटले होते माझ्या टेलीस्कोपच्या काचेवर ;)
त्यामुळे मिपावर एका महान लेखाला मुकले... !
बाय द वे,
तुम्ही युफओ बघीतला आहे काय ?
माझ्या मानलेल्या भावाच्या मानलेल्या मामाच्या मानेसर मधील फॉर्म हाऊस वर या कधीतरी तुम्हाला पाजू... व आपण युफओ शोधू बसून ...
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
>>मी तुमच्यावर सोडते
आधी तुम्ही ती आहात काय तू आहात ते स्पष्ट करा !
मग मुद्दे व गुद्दे काढता येतील ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
हे बघा... काही गोष्टी क्लियर करणे चांगले असते.. !
त्यामुळे नंतर होणारा दाहि दिशेने हल्ला मी थोपवू शकेन ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
अवांतर :--- माझ्या खव मधेअख्खा इडियो आहे त्यांचा...
बघा किती मोजता येतात तुम्हाला ते !!! ;)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
होतं असं कधी कधी ;)
माकडाचे काही गुण राहिले आहेत माणसात =))
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
अमृतांजनरावांचे/बाईंचे मुद्दे विचार करण्याजोगे आहेत खरे.
क्षमतेचा र्हास हे देखील एक कोडेच आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
>>>क्षमतेचा र्हास हे देखील एक कोडेच आहे.
हा मुद्दा विसरला होता, धन्यु पुपे तुमच्यामुळे एका नष्ट होत असलेला मुद्दा लक्ष्यात आला... ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
निदान बुद्धिमत्तेच्या बाबतीत झालेली नसावी असे वाटायला लागले आहे
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
+ १
मला पण असेच वाटत आहे... !
दोनचार बुध्दीवादी माणसं बोलवा चर्चा होऊन जाऊ दे.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
मी डार्विनचा अनुयायी नाही पण तुमचे प्रश्न पटले नाहीत म्हणून लिहित आहे.
तुम्हीही तुमच्या वाक्यांचे स्त्रोत/किंवा पुरावेही द्यावेत.
माकडाला चप्पल घालावी लागत नाही. ती माणसाला घालावी लागते
माणूस विना चप्पल चालू शकतो. त्याने त्याची गरज निर्माण केली असेही म्हणता येईल पण खरं तर त्याने पायांकरीता एक संरक्षण निर्माण केले.
माकडाला होणारे आजार मानवालाही होणे शक्य असले पाहिजे व त्याउलटही. मग स्वाईन फ्य्लु (एक उदा) फक्त मानवालाच का होतो? माकडाला पोलिओ का होत नाही?
होत असेलही, त्याबाबत शास्त्रीय/वैद्यकीय पुरावे शोधावे लागतील.
माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत?
काहींना असतात.
मानवाच्या आरोग्यसेवेत सुधारणा होण्यासाठी माकडांवर प्रयोग का केले जात नाहीत?
ह्यावरून तुम्हाला सहमती असे नाही परंतु काही वेगळे शास्त्रीय/वैद्यकीय प्रयोग आठवले.
अंतराळात प्रयोगाकरीता माकडाला पाठवण्यात आले होते.
शाळा/महाविद्यालयांत बेडूक आणि माणसांच्या शरीरातील साधर्म्य शिकवितात.
तसेच भरपूर औषधांच्या चाचण्यांकरीता गिनीपिग नावाचे प्राणी वापरतात.
बाकी मुद्यांना जमल्यास/काही मिळाल्यास उत्तरे देईन. :)
तुम्हीही तुमच्या वाक्यांचे स्त्रोत/किंवा पुरावेही द्यावेत.
तसे पुरावे नाहीत. मला जे वाटले ते मी येथे मांडले.
माणूस विना चप्पल चालू शकतो. त्याने त्याची गरज निर्माण केली असेही म्हणता येईल पण खरं तर त्याने पायांकरीता एक संरक्षण निर्माण केले.
शोध ही गरजेतून निर्माण होतो असे मानले तर ती गरज का निर्माण झाली? काही निश्चित कारणासाठी चपला, पादुका, बूट वापरले जातात- ते कारण का निर्माण झाले.
आपण अशाही काही वस्त् आज वापरत नाही की ज्या बनवायची गरजच निर्माण झाली नाही.
माकडाला अंगभर केस असतात ते मानवाला का नाहीत?
काहींना असतात
हाच माझा मुद्दा आहे. माकडांच्या बाबतीत हे होत नाही. तसेच इतरही कोणत्याही प्रण्याच्या बाबतीत असे होत नाही. ते सारखेच दिसतात- वर्षानुवर्ष.
ह्यावरून तुम्हाला सहमती असे नाही परंतु काही वेगळे शास्त्रीय/वैद्यकीय प्रयोग आठवले.
अंतराळात प्रयोगाकरीता माकडाला पाठवण्यात आले होते.
शाळा/महाविद्यालयांत बेडूक आणि माणसांच्या शरीरातील साधर्म्य शिकवितात.
तसेच भरपूर औषधांच्या चाचण्यांकरीता गिनीपिग नावाचे प्राणी वापरतात
हेच तर मला म्हणायचे आहे. माकडातून माणूस निर्माण झाला असेल तर त्याला इतर प्राण्यांवर प्रयोग करायची गरजच निर्माण झाली नसती. सगळे प्रयोग माकडावर करुन हवे तसे संशोधन करता आले असते.
आणखी एक महत्वाचा प्रश्न-
माकडापासून उत्क्रांत होतांना माकड आणि माकडीण असे दोन्ही एकाच वेळी कसे उत्क्रांत झाले? की जे मानवी स्त्री आंणि पुरुषात बदलले गेले?
डार्विनची थेअरी बंडल आहे.
> मानव हा माकडाची सुधारीत आवृत्ती आहे असे तुमचे म्हणणे जर असेल
असे कोणाचे म्हणणे असेल, तर असेल - ते लोक तुम्हाला उत्तरे देतीलच. परंतु असे डार्विनचे मत नसावे, असे त्याच्या पुस्तकावरून वाटते.
हल्लीची माकडे (त्यांच्या शेकडो जाती एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत हे विसरता कामा नये) आणि हल्लीचे मानव हे सर्व एका पूर्वजातीतून विविध वंशांत उत्क्रांत झालेले आहेत.
ते वंश प्रत्येक त्यांच्या-त्यांच्या जीवनशैलीत टिकून राहाण्यासाठी अधिकाधिक सोयिस्कर अंगे असलेले होत गेले आहेत.
मानवाच्या लिखित इतिहासात अशी बदललेली जनावरे अर्थातच पाळीव आणि शेतकीतली जनावरे आहेत.
आल्सेशिय कुत्रा आणि डाक्स्हुंड कुत्रा हे दोघे जुन्या गावठी कुत्र्यांचे (माणसाळलेल्या लांडग्यांचा एक प्रकार) वंशज आहेत. त्यांची चित्रे (विकिपेडियावरून):
आल्सेशियन - (डोंगराळ प्रदेशात मेंढ्या हाकण्यासाठी याची निपज केली गेली)
डाक्स्हुंड - (बिळात राहाणार्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी याची निपज केली गेली)
पैकी कुठलाही एक दुसर्याची सुधारित आवृत्ती आहे, असे म्हणणे कठिण आहे. आल्सेशियन बिळातल्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी ठीक नाही, तर डाक्स्हुंड मेंढ्या हाकण्यासाठी ठीक नाही. पैकी कुठलाही जंगलात सोडला तर पूर्वीच्या गावठी लांडगा-कुत्र्यांइतका टिकणार नाही. त्यामुळे "सुधारणा" म्हणजे "कुठल्या विशिष्ट जीवनपद्धतीसाठी सोय," इतकेच.
असा विचार करता वरील चर्चाप्रस्तावातले बहुतेक प्रश्न डार्विनच्या सिद्धांताशी फारसे संबंधित नाहीत, असे वाटते.
उदाहरणार्थ : प्रश्न १च्या बाबतीत : मनुष्य-स्त्री आणि मनुष्य-पुरुष यांच्यात थोडाच जनुकीय फरक असतो. परंतु त्यांच्या अंगांमध्ये बराच काही फरक असतो. आल्सेशियन आणि डाक्स्हुंड यांच्यात फारच थोडा जनुकीय फरक असतो १ टक्क्यापेक्षा खूप-खूप कमी. पण वर चित्रे बघितली तर शरिरात पुष्कळ फरक दिसतो. म्हणजे अंग बरेच वेगळे असण्यासाठी फारसा "टक्के" जनुकीय फरक लागत नाही. त्या-त्या अंगावर प्रभाव करणार्या जनुकाचा अत्यंत छोटासा भाग वेगळा असला तरी पुरे. २% म्हणजे म्हटल्यास खूपच फरक आहे.
२. मासे, पक्षी, वगैरे हे सर्व उत्क्रांत आहेत. (डार्विनच्या प्रथम पुस्तकातील एक सुरुवातीचे उदाहरण कबूतरांचे आहे. "फींच"च्या विविध जातीच्या पक्ष्याच्या उत्क्रांतीबद्दल डार्विनचे निरीक्षण प्रसिद्ध असल्यामुळे, काही जातींना "डार्विन्स फिंचेस" असे नाव पक्षी-अभ्यासक वापरतात.) पिसे असलेल्या एका पूर्वीच्या पूर्वज-जीवजंतूपासून वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जाती उत्क्रांत झाल्या. पण कोंबडीपासून मोर उत्क्रांत झाला नाही, आणि मोरापासून कोंबडी उत्क्रांत झाली नाही. घोडे, झेब्रा हे दोन्ही एकच खुर असलेल्या एका पूर्वज जनावरापासून उत्क्रांत झालेत. पण घोडा झेब्र्यापासून उत्क्रांत झाला नाही, की झेब्रा घोड्यापासून उत्क्रांत झाला नाही.
३. भूकंप जाणीव, निसर्गापासून दुरावणे, वगैरे - डार्विनच्या सिद्धांताशी संबंध ठाऊक नाही.
मला वाटते, तुमचा वाद डार्विनशी किंवा त्याच्या अनुयायांशी नसून दुसर्याच कोणाशी आहे. पण डार्विनचे नाव बघून ते लेख वाचणार नाहीत, आणि तुम्हाला उत्तर द्यायला येणार नाहीत. आणि तुमच्या लेखात डार्विनच्या सिद्धांताचा संबंध फारसा दिसत नसल्यामुळे डार्विन-अनुयायी उत्क्रांतीचे अभ्यासकही फारसे उत्तर देणार नाहीत.
मला वाटते, चर्चा फलदायी व्हावी तर चर्चाप्रस्ताव आमूलाग्र बदलून लिहिला पाहिजे. अर्थात मजामजेसाठी प्रतिसाद येतच राहातील. त्यातही गंमत आहे. तसे हवे असल्यास अर्थातच चर्चाप्रस्तावात काही फरक करायची गरज नाही.
श्री. धनंजय, उत्तम प्रतिसाद. माझी काही संक्षिप्त उत्तरे-
१. ते वंश प्रत्येक त्यांच्या-त्यांच्या जीवनशैलीत टिकून राहाण्यासाठी अधिकाधिक सोयिस्कर अंगे असलेले होत गेले आहेत
न्याचरल सिलेक्षन- मानवाच्या बोलण्याच्या आणि विचार करण्याच्या जाणीवा त्याला निवडाव्याशा वाटल्या हे त्याने कसे ठरवले? असे त्याला काय वाटले की जे इतर कोणत्याच उत्क्रांत प्राण्याला वाटले नाही व ते नुसते नैसर्गिक वातावरणात जगणे त्यांनी निवडले? ते जर नैसर्गिक वातावरणात जगू शकतात तर मानवाल असे का वाटले की ते अशा वातावरणात जगू शकणार नाहीत त्यामुळे त्यांना कपडे पाहिजेत, घर पाहीजे? मुळातच ह्या गरजा निर्माण झाल्या कारण मानवाला कळून चुकले की, पृथ्वीवर त्याला अशा वातावरणा पेक्षा जास्त सुरक्क्षित पाहिजे. थंडीत राहणार्या एस्किमोला अंगभर पांढरे केस का नाहीत तेथील अस्वला सारख??
२. परंतु असे डार्विनचे मत नसावे, असे त्याच्या पुस्तकावरून वाटते.
हा मुद्दा थोडा पटला कारण असे म्हणले जाते की, त्याने ह्याबद्दल (मानवाच्या उत्क्रांती बद्दल) लिहिणे टाळ्ले. असे मी आताच वाचले. पण मला आजपर्यंत मानवाच्या उत्क्रांतीबद्दलच्या लिखाणात नेहमीच डार्विनचा उल्लेख दिसला व माझा त्याबाबत समज तसा होण्यास तेच कारणीभूत आहे.
३. मासे, पक्षी, वगैरे हे सर्व उत्क्रांत आहेत. (डार्विनच्या प्रथम पुस्तकातील एक सुरुवातीचे उदाहरण कबूतरांचे आहे. "फींच"च्या विविध जातीच्या पक्ष्याच्या उत्क्रांतीबद्दल डार्विनचे निरीक्षण प्रसिद्ध असल्यामुळे, .....
त्या-त्या जातींमधे जे ईंन्सटंन्सेस निर्माण होतात ते एकासारखेच दिसतात. दोन चिमण्यामधे, कबुतरांमधे, सिंहामधे, झेब्र्यामधे काहीच फरक नसतो. माणसाच्या रंग, नाक, डोळे, उंची, आरोग्य, ई मधे प्रचंड तफावत असते. (ऑन लायटर साईड- त्यांच्या जन्मवेळेनुसार ते बदलते).
४. ३. भूकंप जाणीव, निसर्गापासून दुरावणे, वगैरे - डार्विनच्या सिद्धांताशी संबंध ठाऊक नाही.
न्याचरल सिलेक्षन मधे ह्या जाणीवा मानवाने टाळल्या असे म्हणता येईल का?
५. मला वाटते, तुमचा वाद डार्विनशी किंवा त्याच्या अनुयायांशी नसून दुसर्याच कोणाशी आहे. ..... अभ्यासकही फारसे उत्तर देणार नाहीत.
उत्क्रांती ह्या विषयावर ज्यांनी-ज्यांनी लिखाण-संशोधन केले त्या सर्वांशी ह्याचा संबंध आहे. खरे आहे की, फक्त डार्विनशी नाही.
असे त्याला काय वाटले की जे इतर कोणत्याच उत्क्रांत प्राण्याला वाटले नाही व ते नुसते नैसर्गिक वातावरणात जगणे त्यांनी निवडले?
काही जीवजंतू एकलकोंडे असतात, आणि काही सामाजिक असतात. सामाजिक जीवजंतू स्वतःसाठी वेगळी स्थिती निर्माण करतात. काही मुंग्या वारुळातच राहातात, बाहेर क्वचित येतात. मधमाशांचे पोळेसुद्धा वातानुकुलित असते. असे सगळे नसल्यास हे जीवजंतू लवकर मरण पावतात. त्यामुळे नैसर्गिक/कृत्रिम वातावरण काय आहे, हे मला नीट कळलेले नाही.
"हर्मिट क्रॅब" हा संरक्षणासाठी मेलेल्या सागरी गोगलगायींचे शिंपले अंगावर घेऊन फिरतात. (काही मनुष्य मेलेल्या अस्वलांचे कातडे संरक्षणासाठी घालतात.) काही का असेना - या सगळ्या उदाहरणांचा उत्क्रांतीशी "जीववैविध्य आहे" असा संबंध आहे.
नॅचरल सिलेक्शनचा अर्थ तुम्ही म्हणता त्यापेक्षा वेगळा वापरला जातो. अंगामध्ये आजूबाजूच्या वातावरणात तगण्यासाठी सोयी तसेच गैरसोयी असलेली अपत्ये, दोन्ही जन्माला येतात. आपोआप जन्मलेल्या अपत्यांत हे जे वैविध्य दिसते, त्यांच्यापैकी सोयी असलेल्या अपत्याचेच जीवन 'नैसर्गिकपणे' वंशवाढीपर्यंत चालू राहायची शक्यता जास्त. जर वैविध्यामुळे त्याच्या अंगात गैरसोयी असल्यात, तर ते अपत्य बहुधा वंशवृद्धी होण्याआधीच 'नैसर्गिकरीत्या' मरते. अशा प्रकारे 'नैसर्गिक'पणे वंशवृद्धीच्या वयाच्या आधी त्यातल्या-त्यात सोयीस्कर अपत्यांची 'निवड' होते. या घटनाक्रमाला "नैसर्गिक निवड" म्हणतात.
त्याने (डार्विनने) ह्याबद्दल (मानवाच्या उत्क्रांती बद्दल) लिहिणे टाळ्ले.
टाळले नाही. "डिसेंट ऑफ मॅन" हे पुस्तक मानवाच्या उत्क्रांतीबद्दल आहे.
दोन चिमण्यामधे, कबुतरांमधे, सिंहामधे, झेब्र्यामधे काहीच फरक नसतो.
असे वाटण्यात यात कदाचित दुर्लक्षाचा वाटा असावा. चालायचेच - माझेही बहुतेक जनावरांकडे फारसे लक्ष नसते. ज्या जनावरांकडे अधिक लक्ष असते - यात पाळीव प्राणी अधिक - यांच्यात पुष्कळ फरक दिसतो. ("सगळे चिनी लोक अगदी एकमेकांसारखे दिसतात", असे अधूनमधून कोणाकडूनतरी ऐकायला मिळते. चिनी लोकांना मात्र एकमेक अगदी वेगळे दिसतात.)
माणसाच्या रंग, नाक, डोळे, उंची, आरोग्य, ई मधे प्रचंड तफावत असते.
वर जे दोन कुत्रे दाखवले आहेत, तेवढी तफावत माणसात क्वचितच दिसते! (अर्थात पाळीव प्राणी म्हणून लक्षात येते. माकडांमध्ये विविध प्रकार असतात, पण तुमच्या चर्चेत "सर्व माकडांची तोंडे काळी असतात" असा काही उल्लेख आहे. फारशी पाळीव माकडे नसल्यामुळे तुमचे त्यांच्या वैविध्याकडे दुर्लक्ष होत असावे.) कपिला, कृष्णा, धवला, ठिपक्यांची गाय... गायीच्या रंगांत किती फरक असतात, शिंगांच्या किती तर्हा, उंच गायी, बुटक्या गायी... गायीच्या आरोग्यांत फारसा फरक नसता तर गुरांच्या डॉक्टरांना कोण विचारणार? मला वाटते, थोडा विचार करून, गावाकडील स्मृती आठवल्यास, तुमचे वरील वाक्य तुम्हीच अयोग्य मानाल.
न्याचरल सिलेक्षन मधे ह्या जाणीवा मानवाने टाळल्या असे म्हणता येईल का?
नॅचरल सिलेक्शनचे वर्णन वर बघावे - "जी अपत्ये अंगांच्या कमी-अधिक फरकाने 'नैसर्गिकपणे' जन्मतात, ती अपत्येच वंशवृद्धीच्या वयापर्यंत तगलीत, तर निसर्गाने त्यांची 'निवड' केल्याचा आभास" = नॅचरल सिलेक्शन. येथे "टाळणे" कल्पनेचा संदर्भ लागत नाही. गायीच्या कुठल्याही अपत्याला लांब नाके उपजली असतीत, तर लहान नाकाच्या गायींपेक्षा ती आधिक्याने तगली नाहीत. यालाच "गायींनी सोंड हे इंद्रिय टाळले" असे तुम्ही म्हणता का? हे गमतीदार आणि वैचित्र्यपूर्ण वाक्य आहे. पण त्याबाबत विचार फारसा पुढे नाही. आणि उत्क्रांतीच्या मुद्द्यापासून हा विचार फारच दूर गेलेला आहे.
काही जीवजंतू एकलकोंडे असतात, आणि काही सामाजिक असतात. सामाजिक जीवजंतू स्वतःसाठी वेगळी स्थिती निर्माण करतात. काही मुंग्या वारुळातच राहातात, बाहेर क्वचित येतात. मधमाशांचे पोळेसुद्धा वातानुकुलित असते. असे सगळे नसल्यास हे जीवजंतू लवकर मरण पावतात. त्यामुळे नैसर्गिक/कृत्रिम वातावरण काय आहे, हे मला नीट कळलेले नाही.
उन्हात तासभर उभे राहिले तर लहान मुले चक्कर येऊन पडतात. काहींना उष्माघात होतो. त्यामुळे मानव उन्हात काम करायचे असेल तर डोक्यावर वस्त्रावरण ठेवतो. हे झाले कृत्रिम वातावरण.
जनावरे कधीच टोपी घालत नाहीत. व त्यांना उन्हाचा त्रास होत नाही. अर्थात ते सावलीत बसायला जातात हे ही तितकेच खरे. हे झाले त्याच्या नैसर्गिक वातवरणात तग धरुन राहण्याच्या क्षमतेचे उदाहरण.
तासभर पावसात भिजले की, मानवाला छानपैकी सर्दी-खोकला होतो तसा प्राण्याना होत नाही.
"हर्मिट क्रॅब" हा संरक्षणासाठी मेलेल्या सागरी गोगलगायींचे शिंपले अंगावर घेऊन फिरतात.
छान मुद्दा दिलात.
प्राणी बहुतेक वेळा असे जीव वाचवण्यासाठी- भक्ष होऊ नये म्हणून- करतात. कोणी रंग बदलतो, कोणी काळा रंग सोडतो, कोणी चावा घेतो व विष सोडतो. मानवाकडे असे काय स्वसंरक्षणाचे साधन आहे?
>>त्या-त्या जातींमधे जे ईंन्सटंन्सेस निर्माण होतात ते एकासारखेच दिसतात. दोन चिमण्यामधे, कबुतरांमधे, सिंहामधे, झेब्र्यामधे काहीच फरक नसतो. माणसाच्या रंग, नाक, डोळे, उंची, आरोग्य, ई मधे प्रचंड तफावत असते. (ऑन लायटर साईड- त्यांच्या जन्मवेळेनुसार ते बदलते).
<<
हे खरे नाही. प्रत्येक प्राणी हा अद्वितीय असतो. अगदी माणसाप्रमाणे. प्रत्येक झेब्र्याचे, वाघाचे पट्टे वेगळे असतात. ह्या वैशिष्ट्याचा प्राण्यांची शिरगणती करताना उपयोग केला जातो. शिवाय गंध, आवाज ह्या बाबतीतही प्राणी एकमेवाद्वितीय असतात. पण आपली इंद्रिये तितकी विकसित नसल्यामुळे आपल्याला हे फरक काही वेळा कळत नाहीत. त्या त्या प्राण्यांना ते ते फरक कळतात.
जाता जाता: मला चिनी व जपानी लोकांतला (दिसणे) फरक कळत नाही. किंवा चिनी व कोरियनही. पण हे चिनी लोकांना अगदीच चमत्कारिक वाटते. त्यांना हा फरक लगेच कळतो. तसे काहीसे होत असावे.
प्राण्यांना भूकंपाची जाणीव होणे हे इतके शास्त्रशुद्ध रित्या सिद्ध झालेले आहे का?
मला वाटत नाही. असल्यास त्यांना कसे कळते हे सांगावे. माणसाला भूप्रस्तराचा अभ्यास, उपग्रहांनी पाठवलेल्या विविध प्रतिमांचा अभ्यास केल्यावर ह्या विषयात इतकी अफाट माहिती झाली आहे की त्या तुलनेत ही उपजत जाणीव किरकोळ वाटेल.
उत्क्रांती ही अत्यंत मंद चालणारी प्रक्रिया आहे. एखादा जीव जाणीवपूर्वक उत्क्रांत होत नाही. तर जशी परिस्थिती असेल तिला पुरून उरणारा गुण ज्या वंशात असतो ते वंश टिकतात उरलेले नाही. उदा. वेगात पळू शकणारी हरणे (ते जर त्यांना खाणार्या श्वापदांच्या संगतीत रहात असतील तर) आणि त्याचा वंश टिकणार. ज्यांना जमत नाही ते नष्ट होणार. अशी ही थियरी आहे.
ह्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसली तरी काहींची नक्कीच मिळतात.
प्राण्यांप्रमाणे ह्या थियर्याही काळाच्या कसोटीवर घासल्या जातात आणि त्यातले हिणकस नष्ट होते आणि सकस ते उरते. कदाचित उद्या आणखी नवी थियरी मांडली जाईल ज्यात डार्विनची थियरी हा एक छोटा भाग असेल. आणि ती जास्त पटणारी असेल.
श्री. धनंजय आणि श्री. हुप्प्या,
तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद खूपच पटण्यासारखे आहेत. काही प्रश्नांची उत्तरे पटली काहिंची धुसर आहेत. अधिक माहिती मी गोळा करत राहिनच.
मला पटलेले विचार असे आहेत-
१. इतर सजीवातही वैविध्य असते; काही ज्ञात आहे तर काही अज्ञात (अंदाजने म्हणता येते). तरीही मी जेव्हा फुलपाखरांकडे पाहते तेव्हा मला त्यांच्या जाती-जातीत वैविध्य दिसते पण एका ठराविक जातीच्या फुलपाखराच्या पंखावरील रंग व संगत तेच असते असे वाटते- त्यात जराही बदल नसतो- असा माझा समज आहे.
२. उत्क्रांती ही स्लो प्रोसेस आहे.
३. न्याचरल सिलेक्षनचा माझा घोळ कळला.
आता पुढचे मुद्दे-
खालील चित्रातील डोळा पहा- तो इतका जबरद्स्त इंजनिअर्ड आहे की, अशी इंजनिएरिंग "सहजतेने" नैसर्गिकतेने तयार होत असावी ह्यावर माझा अजिबात विश्वास नाही. लेन्स, फोकल लेंग्थ, डोळ्यांवर पाणी मरणाऱ्या ग्रंथी, ते पाणी सर्व डोळ्यावर पसरवण्यासाठी पापणी अधून-मधून मिटवण्याचा प्रोग्रॅम, अंधार-उजेडात रेटीनात होणारा बदल, जवळचे-लांबचे पाहतांना बुब्बुळाची होणारी मागे-पुढे हालचाल, हे नैसर्गिकपणे डेव्हलप होत असेल?
कदाचित असे असावे- मंथली रिव्ह्यु मिटींगमधे, कुठेतरी लांब-
"मागे आपण डोळा बसवला होता त्यातून मिळणारा डाटा अनलिसिस सांगते की, ...."
"मग त्यात सुधारणा कर आणि सुधारीत मॉडेल पुढच्या पिढीत टाक"
"ओ. के. सर"
"तो मासा खोल पाण्यात गेल्यावर त्याला काहिच दिसत नाही"
"ठिक आहे, त्याला वीज निर्माण करण्याची ग्रंथी बसवून टाका"
"त्या नव्या पोरांचे ओरिएंटेशन पुढच्या महिन्यात आहे. त्यांच्या साठी काय नवा केला प्रोजेक्ट आहे?"
"सर, पानांचे आकार कापुन झाल्यावर तयार होणाऱ्या वेस्टेज मधून काही करता येईल का पाहत आहे"
"चांगला विचार आहे, आगे बढो"
"सर मला प्रमोशन पाहिजे"
"हे बघ बाळा, आधी तो पक्षी तू तयार करायला घेतलायस, तो ऊडाला की, माझ्याकडे ये"
मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत.
असा "वेल एंजिनिअर्ड" डोळा जेव्हा नेत्रदानात एका शरीरातून दुसर्या शरीरात बसवला जातो तेव्हा तो त्या नवीन शरीराचा भाग म्हणून व्यवस्थित काम करायला लागतो आणि ही शस्त्रक्रिया माणसेच करतात! :)
अवांतर - "ते" प्रयोगशाळा म्हणून पृथ्वीचा वापर करताहेत! हे एका झकास विज्ञानकथेचे कथाबीज होऊ शकते!
चतुरंग
असा "वेल एंजिनिअर्ड" डोळा जे.....
अगदी खरे!
अवांतर - "ते" प्रयोगशाळा म्हणून पृथ्वीचा वापर करताहेत! हे एका झकास विज्ञानकथेचे कथाबीज होऊ शकते!
कथा तयार आहे! एक चांगला हॉलिवूड चित्रपट काढू....
मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत.
हे हे.. मजा आली हे वाचून.. तुम्हाला काय म्हणायचय हे कळतंय मला.. माणसाचं design खरंच खूप वेल-एंजिनियर्ड आहे!! तुमच्यासारखेच प्रश्न मलाही पड्तात. :)
सुवर्णा
http://www.suvarnam.blogspot.com/
आभारी आहे सुवर्णा.
डिव्हाईन नंबर १.६ वगैरे लॉजिकही मन थक्क करतं.
[डिव्हाईन नंबर= In mathematics and the arts, two quantities are in the golden ratio if the ratio of the sum of the quantities to the larger quantity is equal to (=) the ratio of the larger quantity to the smaller one. The golden ratio is an irrational mathematical constant, approximately 1.6180339887.]
हे पहा डिव्हाईन नंबर किंवा गोल्डन रेशो चा वापर कुठे-कुठे झाला आहे-
माणसाचाच नव्हे तर पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूत, जीवात तुम्हाला गणिताचा पूर्ण वापर दिसेल. तुम्ही साधा झाडांच्या पानाचा विचार केला तर त्यात तुम्हाला ऑब्जेक्ट ओरीयंटेशन दिसेल.
हे पहा त्याचे ईंटर्नल स्ट्रक्चर कसे असते-
ह्या लेखानंतर (मिपावरील चर्चे नंतर) दोन लिडींग न्युजपेपरच्या वीकएंड पुरवण्यांमधे ह्या विषयीचे लेख आले.
तुमच्या ब्लॉगस्पॉटवरील हे सुभाषित आवडले-
उद्यमेन हि सिद्धन्ति कार्याणि न मनोरथै: ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृग: ॥
अर्थ - प्रयत्न केल्यानेच कार्ये पूर्ण होतात. केवळ स्वप्ने बघून (मनोरथे करुन) नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप प्रवेश करत नाही. (त्यासाठी त्याला शिकार करावीच लागते).
प्राण्यांप्रमाणे ह्या थियर्याही काळाच्या कसोटीवर घासल्या जातात आणि त्यातले हिणकस नष्ट होते आणि सकस ते उरते. कदाचित उद्या आणखी नवी थियरी मांडली जाईल ज्यात डार्विनची थियरी हा एक छोटा भाग असेल. आणि ती जास्त पटणारी असेल.
आणि अशा रितीने तुम्ही त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाला आहात!
बरं ते जावु द्या ...मला सांगा डार्विन कोण आहे... :?
मागे काही तरी कुणीतरी कविता केली होती ब्वा ! ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
माकड मराठी संकेतस्थळांवर आले असते, तर चपलांची निकड भासली असती.
त्यामुळे हा प्रश्न पास !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
प्रतिक्रिया
टाळ्या !!!! =D>
राजे...
च्यामायला
राजे, राजे,
सुधारणा
>>सगळेच
..तर मग
माझा
माकडं मिपा
म्हणूनच मी
अरे वा ह
नाही मी
>>मी
शी! कुठे
हे बघा...
तुम्ही युफओ बघीतला आहे काय ?
मान्साच
माझ्या
होतं असं
काहीसा सहमत
>>>क्षमतेचा
खरेच उत्क्रांती झाली आहे काय?
काय बोलणार?
+ १ मला पण
मी
तुम्हीही
बघा
मेन्केनला
आणखी एक
डार्विन मताबद्दल काही गफलत दिसते आहे
अमृतांजन
बिसलेरी
श्री.
बहुतेक प्रश्न उत्क्रांतीच्या बहुमान्य सिद्धांताशी संबंधित नाहीत
काही
एका जातीतल्या दोन प्राण्यातला फरक
श्री.
अजून एक पायरी पुढे जाऊयात!
असा "वेल
कथा
हे हे..
आभारी आहे
तुमच्या
प्राण्यां
फरक!
बरं ते
+१
उत्तर!
चपला माकड आणि मानव
तुमचे