✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्ट्रेटड्राईव्ह तेंडूलकरस्य

ज
जे.पी.मॉर्गन यांनी
गुरुवार, 10/15/2009 - 18:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13533 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

लेख ठिक

टारझन
गुरुवार, 10/15/2009 - 18:42 नवीन
लेख ठिक आहे , लेख ज्यांच्यावर आहे ... त्या महान व्यक्तिबद्दल नितांत प्रेमही आहे . म्हणूनंच तो "साहेब" हा शब्द खटकला ... प्रेमाने "सच्या" किंवा "तेंडल्या" म्हंटलेलं भारी वाटतं उलट. ते साहेब ऐकलं की कानात घड्याळाच्या गजराचा किर्रर्ररर्र आवाज अंमळ पॅनिक करतो . -(तेंडल्याचा फॅन) टार्‍या
  • Log in or register to post comments

दडपण...

प्रशान्त पुरकर
गुरुवार, 10/15/2009 - 18:42 नवीन
आणि हेच आमचे लाडके राजे जेव्हा सन्घाला नेमकि गरज असते तेव्हा आपले दुसरे रूप दाखवतात..........
  • Log in or register to post comments

कसोटी व

शैलेन्द्र
गुरुवार, 10/15/2009 - 22:53 नवीन
कसोटी व एकदीवसीय सामन्यात मिळुन त्याने साधारन ३०००० धावा केल्या, त्यावेळी अजीबात धावा करु नकोस ,त्यांची गरज नाही असे संघातर्फे आपण लिहुन दिले होतेत का त्याला? आगावच आहे मग "साहेब".. मुद्दा सचिनच्या बॅटींगच्या रसग्रहनाचा आहे, उपयुक्ततेचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशान्त पुरकर

हे पाहा आणि स्वत:चे अज्ञान दूर करा.....

भारद्वाज
Tue, 05/04/2010 - 00:55 नवीन
आणि हेच आमचे लाडके राजे जेव्हा सन्घाला नेमकि गरज असते तेव्हा आपले दुसरे रूप दाखवतात..........
हे पाहा आणि स्वत:चे अज्ञान दूर करा..... http://sachinandcritics.com/ जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशान्त पुरकर

अप्रतिम

मेघवेडा
Tue, 05/04/2010 - 01:01 नवीन
अप्रतिम वेबसाईट आहे हो!! :) मस्तच!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज

हाण तिच्या

विशाल कुलकर्णी
Tue, 05/04/2010 - 10:11 नवीन
हाण तिच्या मारी, भारद्वाजसाहेब त्वांडंच बंद केलीत की वो.. लै झ्याक, धंकू बर्का.. बाकी टार्‍याशी सहमत... त्याला सच्या किंवा तेंडल्या हीच नावं वापरायला हवीत. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज

जबर्‍या वेबसाईट आहे

जे.पी.मॉर्गन
Tue, 05/04/2010 - 17:35 नवीन
जबर्‍या वेबसाईट आहे ही. आधीही माहिती होती पण कधी तेंडुलकरवरच्या टीकेला आपण उत्तर द्यावं असं वाटलंच नाही. ज्यांना सचिन आवडत नाही, वा त्याच्यावर जे टीका करतात त्यांच्याबद्दल "जाऊदे बिचारे... देवा त्यांना माफ कर.. ते काय म्हणतात त्यांचं त्यांनाच कळत नाही" ह्या पलिकडे कधी विचार केला नाही. पण ह्या इसमानी त्या सगळ्या टीका ऑलमोस्ट पर्सनली घेऊन त्यांना उत्तरं दिली आहेत :). मधूनच लाल, मधूनच बोल्ड फाँट.... ह्या गड्याची तळमळच दिसते ही वेबसाईट बघून. सचिनपंथाचा एक सच्चा माळकरी ! ! !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज

सचिनपंथाच

भारद्वाज
Tue, 05/04/2010 - 19:40 नवीन
सचिनपंथाचा एक सच्चा माळकरी ! ! !
अगदी खरं आहे ते. ज्या भक्ताने हे केले तो आणि इतर भक्तांनी मिळुन orkut वर आपल्या देवाची community लै जबरदस्त पद्ध्तीने हाताळलीये. http://www.orkut.co.in/Main#Community?cmm=23803
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

क्या बात है !

संदीप चित्रे
गुरुवार, 10/15/2009 - 19:44 नवीन
>> आणि बापानी खांद्यावरच्या पोराला बागेत खेळायला सोडताना त्याच्या ढुंगणावर हलकेच चापट मारावी तसे साहेब त्या भयानक चेंडूला चापट मारतात.... आणि ते कार्टं सुद्धा वारं प्यायल्यागत सुसाट बाउंड्रीलाईनकडे धावत सुटतं. हे फारच आवडलं... एकदम पर्फेक्ट उपमा दिलीय. बाकी टार्‍या म्हणाला तसं 'तेंडल्या'मधे जे प्रेम आहे ते 'साहेब'मधे दिसत नाही राव !
  • Log in or register to post comments

खल्लास!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 10/15/2009 - 20:34 नवीन
साहेब एकदम कडक! >>"सच्या" किंवा "तेंडल्या" म्हंटलेलं भारी वाटतं उलट हॅ हॅ हॅ....आम्ही देवाला टोपणनावाने हाक मारत नाही! तुम्ही मारता इतकचं :)
  • Log in or register to post comments

हॅ हॅ

टारझन
गुरुवार, 10/15/2009 - 20:47 नवीन
हॅ हॅ हॅ....आम्ही देवाला टोपणनावाने हाक मारत नाही! तुम्ही मारता इतकचं
टिंगु, तुझं म्हणजे अगदी "विरोधाला विरोध" असं आहे बघ. असो , तुझा मला राग येत नाही. चालु दे तुझे चड्डीछाप धंदे. बाकी ? आजवर फक्त पवर्‍याला साहेब म्हणतात असं ऐकत होतो , तेंडल्याला साहेब म्हणनारे एकामागे एक दोन नग सापडले. असो - मंदिर चाळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

'साहेब'च!

बेसनलाडू
गुरुवार, 10/15/2009 - 22:40 नवीन
साहेबांना साहेब म्हणण्यात काही गैर नाही. मग ते ठाकरे असोत, पवार किंवा तेंडुलकर. साहेब ही व्यक्ती नाही तर प्रवृत्ती आहे, इतकेच. बाकी सचिन'साहेबां'बद्दल काय बोलावे. ईश्वराने त्याची करामत दाखवावी आणि आम्हा भक्तगणांनी मंत्रमुग्ध होऊन ती पाहत बसावे, इतकेच. (सचिनभक्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

वा हे दोन स्ट्रेटड्राईव्ज मी इतक्या वेळेला बघितलेत की बस!

चतुरंग
गुरुवार, 10/15/2009 - 23:29 नवीन
केवळ अशक्य मारलेत! लागोपाठ तीन वेळा ब्रेट ली तुफानी चेंडू टाकतो आणि एकदाही चेहेर्‍यावरची रेषाही हलू न देता साहेब त्या चेंडूला सणसणत सीमापार धाडतात! पहिला कवर्समधून आणि पुढचे दोन स्ट्रेट! त्याच्या बॅटचा फॉलोथ्रूसुद्धा इतका नेटका आणि देखणा असतो की हृदयात आनंदाने अक्षरशः कळ येते! कुठेही बोलरला डोळे दाखवणं नाही, हातवारे नाहीत, बॅट दाखवणं नाही, काही गरजच नाही केवळ उच्च दर्जा!! हॅट्स ऑफ!! ज्याला मारलं आहे त्या बॉलरने सुद्धा आनंदाने मान डोलवावी की मीच तो भाग्यवान बोलर ज्याचा चेंडू सचिनने असा सीमापार केला! :) (तेंडल्याचा एसी)चतुरंग
  • Log in or register to post comments

वा जे. पी.

सनविवि
Fri, 10/16/2009 - 07:51 नवीन
वा जे. पी. मॉर्गन 'साहेब', माझी सकाळ एकदम झकास केलीत! सचिनबद्दल जितके लिहावे तेवढे कमीच आहे. :) हा घ्या त्याचा अजूनेक प्रसिद्ध शॉट - http://www.youtube.com/watch?v=5A3PSnEUJWw&feature=related
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Fri, 10/16/2009 - 08:02 नवीन
एखाद्या संगीतप्रेमीला "टप्पा", "ठुमरी", "पुरिया धनश्री", "तीव्र मध्यम" वगैरे शब्द ऐकून जे काही "कुछ कुछ होता है" फीलिंग येतं ते आम्हाला "शॉर्ट ऑफ गुड्लेंग्थ", "हुक", "स्मॅश", "बॅकहँड क्रॉसकोर्ट", "स्लॅमडंक" वगैरे ऐकून येतं ! :-) सही!
  • Log in or register to post comments

क्या बात है!

नंदन
Fri, 10/16/2009 - 08:21 नवीन
सुरेख लेख. सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह लताबाईंच्या गायकीसारखा - मिनिमल फस, मॅक्झिमम जॉय.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

सचिनचा स्ट्रेटड्राईव्ह

हर्षद आनंदी
Fri, 10/16/2009 - 09:11 नवीन
हा बघणे म्हण्जे.. म्हणजे..... पोर्णिमेच्या रात्रीचा तेजोमहालया (ताजमहाल), कोकणकड्यावरचा सुर्यास्त, दीदींचा षड़्ज, अण्णा (भीमसेन जोशींचा) यमन, पहिल्या चुंबनाची गोडी, आणि आणि ..... या सर्व गोष्टींचा अनुभव एकाच वेळी घेणे, त्या आनंदात अखंड डुंबुन जाणे.
  • Log in or register to post comments

आमचे "साहेब" एकच !

जे.पी.मॉर्गन
Fri, 10/16/2009 - 11:06 नवीन
प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अहो 'सच्या', 'तेंडल्या', 'भाई'.. सगळी नामावळी वापरून झाली. इतकी वर्षं झाली आमच्या भक्तीला की हे सगळे शब्द थिटे वाटतात. पांडुरंगाला जसे 'विठू' 'माऊली' वगैरे म्हणतात तसे हे 'सच्या', 'तेंडल्या' वगैरे झाले. त्याचं काय आहे की ह्या देवाची आमची भक्ती गेल्या काही वर्षात जरा जास्त वरच्या पातळीवर गेली आहे. त्यामुळे आम्ही ह्या पांडुरंगाला विठू न म्हणता 'परब्रह्म' म्हणतो इतकेच ! आमच्यासाठी वानखेडेवर (खरंतर जगात कुठेही) चाललेला 'सचिन....सचिन' हा गजर वारीतल्या 'जयजय रामकृष्ण हरी' इतकाच पवित्र ! म्हणून 'साहेब' म्हटले.. बाकी काही नाही ! हा आता हा 'साहेब' शब्द अजून कोण आणि कोणासाठी वापरतात ह्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. (त्या 'साहेबांना' एका शुभेच्छुकाने "जाणता राजा" संबोधल्याचे ... आणि तेव्हा एक मनुष्यवधाची अतीव इच्छा झाल्याचे पण स्मरते.) जे. पी.
  • Log in or register to post comments

खुलाश्याब

टारझन
Fri, 10/16/2009 - 11:13 नवीन
खुलाश्याबद्दल धन्यवाद ! तात्या ... सॉरी ... टार्‍या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

तेंडल्या

निशांत५
Fri, 10/16/2009 - 11:38 नवीन
एकदा कुणितरी म्हंट्ल्याच आटवत ..... मला जर कुणि विचारल देवाच अस्तित्व कुटे आहे? तर मी सांगेन, त्याच एक घर लताजिंच्या गळ्यात आहे, तसच एक घर सचिनच्या Bat मध्ये आहे.
  • Log in or register to post comments

नुस्त सचिन म्हटल तर ???

मी-सौरभ
Sat, 10/17/2009 - 00:52 नवीन
जास्त जवळीक पण नही आणी जास्त आदर पण .............. सौरभ
  • Log in or register to post comments

भन्नाट

फारएन्ड
Sat, 10/17/2009 - 05:18 नवीन
मस्त वर्णन आहे!
  • Log in or register to post comments

"लेट-कट"चं वर्णन फारच "सही"

सुधीर काळे
Sat, 10/17/2009 - 06:22 नवीन
माझी अशी समजूत आहे की सचूचा मीच "चमचाप्रमुख" आहे, पण आज लक्षात आले कीं मला बरेच 'टोकाचे' स्पर्धक आहेत. पण "लेट-कट"चं वर्णन फारच "सही"! जीते रहो! सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments

काय

शुचि
Tue, 05/04/2010 - 01:28 नवीन
काय चित्रदर्शी मोहमयी वर्णन आहे ... गरुडासारखी नजर ....'हा - ये' अश्या अर्थाची वाटावी अशी साहेबांची मानेची हालचाल .....गदेच्या ताकदीने गदेइतकीच जड बॅट हातात धरलेली - पण आवेश मात्र तो अजिबात नाही वगैरे वगैरे. कोणी योद्धाच जणू. मस्त! आवडलं. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments

द्वारकाना

जयंत कुलकर्णी
Tue, 05/04/2010 - 08:52 नवीन
द्वारकानाथसाहेबांच्या पोटावर पाय देणार बहुतेक ! :-) सुनील गावसकरांबद्दल वाचायला आवडेल. तसेच ज्यांना क्रिकेट मधले कळते त्यांच्यातली ब्रॅडमन "साहेब" आणि सचिन यांची तुलना वाचायला आवडेल. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments

खरेच जेपी..

विशाल कुलकर्णी
Tue, 05/04/2010 - 11:09 नवीन
खरेच जेपी.. अगदी तुलना नको पण सर डॉन ब्रॅडमन, विक्टर ट्रंपर, क्लॅरी ग्रिमेट, रे लिंडवॉल, बिल ओ'रेली यांच्याबद्दल काही माहिती असेल तर लिहा की. विशेषतः ट्रंपर बद्दल जाणून घ्यायला खुप आवडेल. त्याच्या भन्नाट खेळाबद्दल खुप ऐकलेय पण निस्चित अशी माहिती नाही. अर्धवट तुटलेल्या बॅटने ओल्या, घसरड्या पिचवर त्याने मारलेल्या एका शतकाची गोष्ट ऐकलीय मी. ती खरी आहे का? काय जबरद्स्त माणुस असेल तो. तसेच रणजीतसिंहजी, दुलीपसिंहजी यांच्याबद्दलही वाचायला आवडेल. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

ब्रॅडमन, ट्रंपर, हॉब्ज, गावसकर.. इत्यादी !

जे.पी.मॉर्गन
Tue, 05/04/2010 - 17:55 नवीन
नक्की प्रयत्न करीन लिहीण्याचा. फकस्त प्राब्लेम येकच हाये म्हंजी आपन कधी त्यांला खेळताना पघितलं न्हाईयेना.... तेंडल्या म्हंजे कसं.... गुढघ्यायेवडा असल्यापासून बघतोय (त्यो बी न मी बी) :) पण खरंच ट्रंपर, वूली, लारवूड बद्दल बरंच वाचलंय... पण तुम्ही म्हणता तसं आता लिहिण्याच्या दृष्टीनी परत वाचीने. "हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा" मालिकेत आजच्या खेळाडूंच्या वैशिष्ट्यांचा वेध घ्यायचा प्रयत्न केला होता... आता ह्या कालच्या खेळाडूंबद्दलही लिहीण्याचा प्रयत्न करीन ! जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

धन्स, वाट

विशाल कुलकर्णी
Wed, 05/05/2010 - 12:55 नवीन
धन्स, वाट बघतोय... अर्थात तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या पण जरुर लिहा ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

मास्टर ब्लास्टर

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 05/06/2010 - 02:36 नवीन
सचिन तेंडुलकर यांना एकच नाव देता येईल.. मास्टर ब्लास्टर! -- इंटरनेटप्रेमी.
  • Log in or register to post comments

...

भारद्वाज
गुरुवार, 05/06/2010 - 03:09 नवीन
झोपा की हो आता... गुडनाईट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा