Skip to main content

एक फॅशन : दिपावलीच्या शुभेच्छा

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 15/10/2009 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम सर्वाना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. (फटाकेप्रेमी)पुण्याचे पेशवे (पणतीप्रेमी)पुण्याचे पेशवे असो. तर मुख्य मुद्दा हा की. दिवाळीच्या शुभेच्छांचा महापूर आला आहे. आता याला कारण म्हणजे तशी फॅशनच आहे. मिपावरील आमच्या उण्यापुर्‍या दिड वर्षाच्या वावरात आम्ही काही फॅशन मिपावर येऊन गेलेल्या आणि काही अजूनही असलेल्या ज्यात आम्ही स्वतः हौशीने उतरलो होतो. आजची दिवाळीच्या शुभेच्छांचा पाऊस बघून आम्हाला फॅशनवर लिहावेसे वाटले. शुभेच्छा देण्याची फॅशन शुभेच्छा घेण्याची फॅशन जिकडे पहावे तिकडे अवघी वाहे फॅशन इकडे एक फॅशन तिकडे एक फॅशन ज्याच्या त्याच्या वकूबाने ज्याची त्याची फॅशन कौल पाडण्याची फॅशन कौल फोडण्याची फॅशन चारोळ्या लिहीता लिहीता कविता पाडण्याची फॅशन कविता लिहीता लिहीता विडंबनाची फॅशन दवा-दारू ज्यादा होई विडंबन निषेधाची फॅशन गजलांची फॅशन कधी वृत्तांची फॅशन जोतिषाला लाथ बसता निषेधाची फॅशन स्वदेशाची फॅशन कधी परदेशाची फॅशन Resident * NRI करता करता हिरव्या नोटांची फॅशन वाढदिवसांची फॅशन कधी लग्नाची फॅशन अपत्यप्राप्ती झाल्यानंतर अभिनंदनाची फॅशन जोतिषाची फॅशन कधी गूढ शक्तींची फॅशन श्रद्धाश्राद्ध करताना मूढ उत्तरांची फॅशन डांबिसाखाँची फॅशन कधी एलियनाची फॅशन खोबार खोबार होता होता खोब्र्याची फॅशन सेनेची फॅशन कधी काँग्रेसची फॅशन राज राज म्हणताना अर्जुन होण्याची फॅशन रामाची फॅशन कधी गणपतीची फॅशन मोदक खाता खाता हलीम खाण्याची फॅशन अश्रद्धेची फॅशन देव तुडवायची फॅशन 'शब्द संपले' म्हणून डोके झुकवायची फॅशन पाकृची फॅशन कधी कॉकटेल ची फॅशन तिखट दारू पिताना व्यनि करण्याची फॅशन धागे उडण्याची फॅशन फाट्यावर मारण्याची फॅशन भीमटोले हाणताना विरजण लावण्याची फॅशन लाळ गळण्याची फॅशन हसून लोळण्याची फॅशन मॉनिटरवर कॉफी उडवून फुटण्याची फॅशन खपण्याची फॅशन कधी वारण्याची फॅशन जुन्या गोष्टी आठवून हळवे होण्याची फॅशन कूटप्रश्नांची फॅशन कधी समुपदेशनाची फॅशन दोन घोट घेता घेता दाणे चरण्याची फॅशन निषेधाची फॅशन कधी लोकशाहीची फॅशन सांगोपांग चर्चा करत वैचारिक लिहीण्याची फॅशन पुरोगामी फॅशन कधी प्रतिगामी फॅशन बाया पाहून चळताना पुरुष पाहण्याची फॅशन क्रातिकार्‍यांची फॅशन कधी गांधींची फॅशन तात्यारावांची फॅशन कधी आंबेडकरांची फॅशन धागे काढण्याची फॅशन जाहिरात करण्याची फॅशन प्रतिसादलोलूप होऊन काड्या टाकण्याची फॅशन प्लीज प्लीज म्हणून प्रतिसाद मिळवायची फॅशन प्रतिसादकाना वंदून धागा वर आणण्याची फॅशन जाता जाता एक बोलण्याची फॅशन अवांतरातून वार करण्याची फॅशन खुद के साथ बाता करण्याची फॅशन लक्ष ठेऊन चांदणी देण्याची फॅशन पाहून पटे सत्य एकच फॅशन करावे जसे चालू असेल फॅशन विचाराने कधी करा एक फॅशन करावी कधी अविचारानेही फॅशन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6156
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

गुरूवार फळला म्हणायचा का बुधवार संध्याकाळ? पेशवे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!! ;-) (फॅशनला घाबरणारी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कालचा बुधवार शेवटी... आमच्या पण वाढदिवसाच्या शुबेच्छा!!!! निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बुधवारी कवितांची फॅशन दोन शब्दी कौलांची फॅशन विरजणाची फॅशन सामुपदेशनाची फॅशन रूपकाची फॅशन शेअर बाजारची फॅशन तस्ले ल्हिले असे म्ह्नाय्ची फॅश्न्न हे असले ल्ह्यायचिही फॅशन पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्रतिसाद द्यायची फॅशन !! -(एफ.टी.व्ही. प्रेमी) टारोबा मॉडल

In reply to by टारझन

आयला "प्लीज प्लीज म्हणून प्रतिसाद मिळवायची फॅश" हे न करताच प्रतिसाद. अहो भाग्यम्! पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

आणखी फॅशन्स राहिल्या ना लिहायच्या इथे.... बुधवार नि गुरूवारच्या कवितांची!!!!! खव उचकपाचक करण्याची!!!!! :D बाकी.... मिपा फॅशन्सचा अभ्यास दांडगा आहे हो..... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा! बाकी खालील ओळ थोडी बदलाविशी वाटते... स्वदेशाची फॅशन कधी परदेशाची फॅशन Resident * NRI करता करता हिरव्या नोटांची फॅशन या ऐवजी: स्वदेशाची फॅशन कधी परदेशाची फॅशन Resident * NRI म्हणत "अ"-निवासींना झोडण्याची फॅशन ;) चला आता पळतो....

In reply to by विकास

खरे आहे. पण अजून बर्‍याच फॅशन बाकी आहेत. सर्व लिहायच्या तर कविता क्रमशः लिहावी लागेल. अर्थात क्रमशः ही सुधा एक फॅशनच आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

+१ सहमत ची फॅशन तिरक्या प्रतिसादाची फॅशन निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

व्वा... आपला हल्लीचा वावर पाहुन मत द्यायची फॅशन आवडली... ;) (ट्रेंडी) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

छान रे! :) आपला, (फॅशनेबल) तात्या.

अच्छा अशी असते होय ... फॅशन. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दिवाळीच्या शुभेच्छा! पेशवे आता जरा स्वामी कडे सुध्दा बघा. नुसते फॅशन करत राहु नका. संजीव

In reply to by संजीव नाईक

हो का? बरं बरं ! पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

पेशवे! जन्मदिवसाच्या व दिपावलीच्या मनःपुर्वक शुभेच्छा! मी शुभेच्छा निव्वळ फॅशन म्हणुन दिलेल्या नाहीत. :> "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।