Skip to main content

भिंगोरी..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 14/10/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणांत खाली क्षणांत वरती श्वास झुलतो झुल्यावरी आभासांच्या मागे भिरभिर मन झाले गं भिंगोरी.. खळबळ मनांत धडधड उरांत चाहूल ही हृदयांतरी कधी आकाशी कधी जळाशी पाऊल माझे अधांतरी कशी आवरू कशी सावरू साद घालते कुणीतरी क्षणांत येथे क्षणांत तेथे चित्त नसे थार्‍यावरी किती करावे नवे बहाणे नशा चढावी मनावरी उगा रूसावे उगा हसावे राग लटका कधीतरी ओढ लागुनी स्पंद रूजावे माझ्या उरीचे तुझ्या उरी सोन स्वरांनी गीत सजावे प्रित फ़ुलावी जन्मांतरी - प्राजु
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3154
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

मस्त आहे .... :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

छान छान. मस्त आहे कविता. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

मस्त... :) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो|

मस्त. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

In reply to by सहज

प्राजुतै चाल लावून ह्या गाण्याची फीत डकव.
अहो सहजराव/सहजदादा/सहजकाका/सहजअजोबा, ते डिपार्टमेंट प्राजुतैकडे नै कै! देवकाकांकडे आहे. ;) त्यांना सांगा चाल लावून इथे फीत डकवायला. :) आपला, (सुरेख बोलीचा आणि चालीचा) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

छान अल्लड कविता आहे. आवडली. शेवटचे कडवे विशेष आवडले. माझ्या उरीचे स्पंद तुझ्या उरी रुजणे ही कल्पना भारी! ओढ, तळमळ/अस्वस्थता ओळींमधून जाणवते आहे. (बागायतदार)बेसनलाडू