माज ...!
उजळलेला अंधार आणि चांदणे डागाळलेले
माज मला आयुष्याचा, असे जरी दृष्टावलेले !
बघ पोसतो अहंकार...., दारिद्र्याचा सुखाने
दशावतार आयुष्याचे, मी अहंकारे झाकलेले !
कसे चांदणे पुनवेचे, हलकेच अंधारात बुडाले
साम्राज्य हे तिमीराचे, अन तारेही मातलेले !
उदासवाणे सखे चांदणे, गातो गाणे अंधाराचे
चंद्र बापुडा केविलवाणा, नभ ही कळवळलेले !
असेच गाईन जीवनगाणे, जगेन आनंदाने
जिवनाचे सारीपाट, मीच कधीचे उधळलेले !
विशाल
लेखनविषय:
याद्या
2417
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
झकास...
चला ५८
गप रे
In reply to चला ५८ by विशाल कुलकर्णी
ही आमची
अरे वा
In reply to ही आमची by अवलिया
छान कविता.
सुंदर...
छान