सकाळी सकाळी एक चांगला लेख वाचायला दिल्याबद्दल विजुभाऊंचे आभार.
अशी काही 'सेल्फ हेल्प' प्रकारची पुस्तके आधी वाचली होती, आणि त्यातला फोलपणाही जाणवला होता.
हे बहुचर्चित पुस्तक मात्र वेगळे असावे, असे आपल्या लेखावरून वाटते. उर्वरित चार सवयींचाही परिचय करून द्यावा, ही विनंती!
"Great Power Comes With Great Responsibilities"
चांगले समिक्षण केले आहे तुम्ही.
"एका अंधार्या रात्री एक जहाज समुद्रात सफर करत असते. अंधारात नीट दिसत नसते जहाजाच्या कप्तानाला दूरवर एक दिवा दिसतो. बहुतेक दुसरे जहाज असावे. कप्तान रेडीओवर संदेश पाठवतो. आपन एकाच मार्गावर आहोत. धदक होईल तुम्ही मार्ग बदला.
दुसर्या बाजूने उलट उत्तर येते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण तुम्हीच दिशा बदला. कप्तान चिडून पुन्हा संदेश पाठवतो. आम्ही लढाऊ जहाक आहोत. तुम्ही मुकाट्याने मार्ग बदला. उलट बाजूने उत्तर येते " आम्ही दीपस्तंभ ( दीपगृह)आहोत"
...आणि ते जहाज त्यावर आपटून फुटते
हे उदाहरण मी "मुल्ये इतकी घट्ट असतात की, त्यावर कशाचाही हल्ला झाला तरी ती जागची हलत नाहीत." अशा आशयाच्या बद्दल ऐकले होते.
पुण्यात मला अशी एक व्यक्ति माहित आहे की, स्टीफन कोवीला समक्ष भेटून आली आहे. हे पुस्तक वाच्ल्यानंतर तो इतका भारला गेला की, पदरचे पैसे मोडून फक्त त्याला भेटण्यासाठी अमेरीकेला जाऊन आला.
त्यानेच सांगितले की, स्टीफन कोवी इ-मेलला कधीच उत्तरे देत नाही - त्याचा सहकारी देत असे. त्याला गमतीने म्हणालो की, ही त्याची कदाचित आठवी सवय असावी!
त्याने आठव्या सवयीबद्दल वेगळे पुस्तक लिहिले आहे.
एट्थ हॅबीट :फ्रॉम एफेक्टीव्हनेस टू ग्रेटनेस.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
एका ईमेल ग्रुपवरील सदस्याची खालील स्वाक्षरी येथे सर्मपक वाटते.
Management is dropping last character...Manage-men
Still Better, drop one more.... Manage-me
ह्या Manage-me वर स्टिफन कोव्ही ने सांगीतलेल्या काही सवई आधारीत आहेत असे मला वटते.
सुमारे दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा वाचलं. मग मित्राने भेट दिल. तेव्हापासून अनेकदा वाचलं.
हे पुस्तक एका दमात वाचता येत नाही. एकेक पान डोक्यात मुरवत जावे लागते . पुस्तक वाचताना आपण स्वतःलाच वाचत असतो.
वाचक एक वेगळाच अनुभव घेत जातो. पानागणीक तो संपन्न होत जातो.
हे अगदी खरं आहे. तसंच एक दोन वेळा वाचून कल्पना स्पष्ट झाल्यावर, कुठलाही भाग (हॅबिट) काढून वाचायला छान वाटतं. एक एक मुद्दा पटत उमजत जातो. आपल्या आयुष्याशी, विचारांशी संबंध जुळत जातात.
महत्त्वाचा मुद्दा जो सुरुवातीला मांडला आहे - पर्सनॅलिटी एथिक आणि कॅरॅक्टर एथिक - की हे पुस्तक इतर सेल्फ हेल्प पेक्षा खूप वेगळं आहे.
या मूलभूत गोष्टींना क्विक फिक्स नाही. ही वेळ घेणारी आणि प्रयत्नाने करण्याची बाब आहे. यात टेक्निकस नाही विचार आहेत.
प्रत्येक सवय आणि त्यामागचे मुद्दे असे स्वतःशी विचार करण्याचे आहेत.
एका उत्तम पुस्तकाचा चांगला परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद. काही अजून संदर्भ दिले तरी उत्तम.
हे पुस्तक अनुभवायचे आहे. केवळ वाचन या पुस्तकाच्या बाबतीत अशक्य ठरते.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
प्रतिक्रिया
छान लेख.
चांगले
त्याने
झालय वाचुन
मॅनेजमेंट
छान ओळख. या
पुस्तक ओळख
छान
नविन पुस्तकाची ओळख
पुस्तकाचा
उत्सुकता
माझ्याकडे...आहे..
चांगला
चांगला
+१
हे पुस्तक