टप, टप, टप करत बाजुच्या खिडकिवरचे पावसाचे थेंब जुन्या आठवणींत ओढताहेत.
परवा माझ्या नवीन फ्लॅट चा ताबा मिळनार, नवीन फ्लॅट बराच मोठा आणी मस्त सोसायटीत आहे म्हणुन घरचे सर्व जण खुष, आनंद आहे, पण काय माहीत माझ्या सध्याच्या घराला काय वाटत असावे!
--------------
खर्रर खर्रर खच्च, घरासमोर ४०७ टेंपो येवुन थांबला, बोलल्याप्रमाणे आज घराचा ताबा घेण्यासाठी दशरथ आला होता. मोठ्या भावाने पडदा थोडासा बाजुला सरकवुन बघितले.
गेले काही दिवस त्याच्यासाठी खुपच तणावात गेल्याने तो निघुन गेला, छोटा भाउ पण वडीलांना फोन करायला बाहेर.
पडदा बाजुला सारत दशरथ आत आला, आ़ज मामाची (त्याच्या) आणी सामान उचलायला ५ मजुरांची साथ होती
मामा -- थोडा मळकट सदरा आणी ढगाळ लेंगा नेसलेली व्यक्ती, जिला बघुनच मला धसकी भरायची.
मुलीला पाहण्याच्या कार्यक्रमात जशी वरपक्षाला वागणुक देतात, त्याप्रमाणे वागवत मी त्यांना चटई अंथरुण बसा म्हट्ले,
आतमधे जावुन आईला पाहिले, ति पण बरीच भेदरलेली होती, तिच्या चेहर्यावरचे भाव पाहीले आणी काही न बोलता परत बाहेर आलो.
तंबाखु चा बार लावत मामा "काय रे, तुझा बाप आला का गावावरुन?"
"नाही आले, फोन पण लागत नाही आहे"
"ते आपल्याला काही माहीत नाही, चला घर खाली करा आणी तुम्ही पण जा गावाला. कुठल सामान पहिल उचलायच?"
"मामा, अस काही करु नका, थोडा वेळ द्या, बाबा तुमचे पैसे परत देतील"
आईने बाहेर येवुन त्यांना स्पष्ट सांगीतले कि कुठ्ल्याही कागद पत्रांवर तिची सही नाही आहे आणी घर सोडुन आम्हाला जायला दुसरे कुठले ठिकाण नाही.
बर्याच वादावादीनंतर अजुन आठवड्याभराची मुदत मिळाली.
बाहेर गेलो, आणी दोन्ही भावाना शोधुन आणले.
वर्षाभरापुर्वी बाबांचा धंदा येवढा जोरात चालु होता कि घरी नवीन कार घ्यायचा विचार सुरु झाला, पण दिवस एवढे पटकन बदलले कि बाबा कर्जात बुडाले आणी पैश्यांची व्यवस्था करायला गावी गेले होते.
दिवस मावळला, दुकानदाराच्या शिव्या खावुन थोडे तांदुळ आणी डाळ आणली.
रात्र झाली पण मला काही झोप येत नव्हती, अजुन एकच आठवडा आणी त्यानंतर घर सोडावे लागणार म्हणुन विचारात होतो.
बाहेर पाउस सुरु झाला, सिमेंटच्या पत्र्यावर (छत) टप, टप, टप आवाज येवु लागले आणी थोडा शांत झालो.
पडल्यापडल्या जेव्हढी नजर फेरता येइल तेव्हढ घर पाहील. १०-१२ वर्षे काढलेल्या घराला आठवड्यानी सोडावे लागणार
माझ्या एवढेच ते पण सुन्न वाटत होते, काहीतरी अतुट नाते जाणवले.
बाहेरुन पावसाचा मार आणी आतुन माझ्या विचारांचा भार सोसावत ते गळु लागले.
आई उठली आणी जिथे जिथे गळत होते तिथे स्टिल ची भांडी लावली.
"झोपला नाहीस का रे अजुन?" आवाजाला स्तब्ध राखत तिने विचारले.
मि गप्प.
थोड्या वेळाने परत आई जवळ गेलो तर ति अजुन रडतच होती. जस जमेल त्या प्रमाणे तिला समजावत होतो.
छतातुन आणी डोळ्यातुन एकत्र पाणी , पण एक आवाज करत होत तर दुसर मुकं.
स्टिल च्या भांड्यात पडणार्या थेंबांना एकत पहाटे पहाटे झोपलो.
आठवडा भुर्रकन गेला, मामा परत हाजीर, परत अजुन एक मुदत..... पण घर काही जावु दिले नाही
----------------------------------------------
वर्ष गेली, खुप शिकलो आणी घराबाहेर (देशाबाहेर) एकटा पडलो.
अजुनही पाउस तसाच आवाज करत आहे, ना तो बदलला ना मी, मग घर बदलन जरुरी आहे का?
-- मिपाच्या मातब्बर मंडळी समोर अस्मादीक कुठेच नाहीत, त्यामुळे काही चुका आढळल्यास सांभाळुन घ्या --
वाचने
5627
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिल्या, छान
भारी रे ...
सहमत !!
In reply to भारी रे ... by छोटा डॉन
खूप सुरेख
असेच
In reply to खूप सुरेख by यशोधरा
एकदम झकास
सुरेख लिहिलय
छान रे!
सुरेख
In reply to छान रे! by सहज
मस्त रे
खूप
चांगलं
सुंदर लेखन
फारच छान
माफ करा
In reply to फारच छान by नंदू
टुकुल
टुकुल
मस्त सुरेख
अतिशय
खरंच
खरच मनापासून उतरलय
In reply to खरंच by क्रान्ति
छान
अरे काय भावा, आज रडवलंस!
मनापासून लिहलयं.....
वाचन