मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेंगदाण्याची आमटी

प्रभो · · पाककृती
मागच्या आठवड्यात दसर्‍यानिमीत्त घरी गेलो होतो. अष्टमीच्या दिवशी आमच्या मातोश्री आजारी पडल्या.वडिलांचं ऑफिस आणी बहिणाबाईचे कॉलेज यामुळे उपवासाच्या अर्ध्या स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर पडली. बहिण कॉलेजला जायच्या आधी खिचडी आणी भगरीच्या भाकरी करून गेली. मग जेवणाआधी माझ्यासाठी आणी आईसाठी मी शेंगदाण्याची आमटी व बटाट्याची भाजी करायचे ठरवले. त्याच्या या पाकृ. टीप : गणपाने तुम्हा सगळ्यांना लाडावून ठेवलंय. या पाकृच्या शेवटी सजवून ठेवलेला आमटीचा फोटो नाहिये. १. शेंगदाण्याची आमटी कच्चा माल : जिरं, आमसूल, तिखट Image removed. मिक्सरमधे बारीक फिरवलेलं शेंगा कूट, याव्यतिरिक्त कोथिंबीर, मीठ (चवीप्रमाणे) Image removed. एका कढईत जिर्‍याची फोडणी करावी. त्यात आमसूल टाकावे. १०-२० सेकंदाने त्यात गरजेनुसार पाणी घालावे. Image removed. थोडी उकळी आल्यावर त्यात तिखट आणी कोथिंबीर टाकावी आणी अजून थोडा वेळ उकळावे. Image removed. नंतर त्यात शेंगाकूट आणी मीठ टाकून १०-१५ मिनिटे (आमटीला घट्टपणा कसा हवाय त्यानुसार) उकळावे. तयार झाली ही आमटी. ही साधी भगर,उपवसाचं थालीपीठ, भगरीच्या भाकरीसोबत छान लागते. Image removed. २. उपवासाची बटाटा भाजी कच्चा मालः उकडलेले बटाटे, मीठ, तिखट, कोथिंबीर, जिरं एका कढईत जिर्‍याची फोडणी करा. Image removed. त्यात उकडलेले बटाटे चिरून घाला. Image removed. त्यावर तिखट, मीठ , कोथिंबीर टाका. थोडा वेळ परता. Image removed. असं तयार झालं आमचं फराळाचं ताट. शेंगदाण्याची आमटी, बटाटा भाजी, उपवासाचे लोणचे, शाबुदाण्याची खिचडी आणी वरून तूप सोडलेली भगरीची भाकरी... Image removed. काही अवांतर फोटो..(आईने गौरी गणपतीला केलेलं सोवळ्यातलं जेवण) थोडं उशिरा टाकतोय कारण घरून फोटो उशिरा मिळाले...आणी टाकल्याशिवाय रहावलं नाही. १. सर्व प्रकारच्या कोशिंबिरी Image removed. २. वेगवेगळ्या भाज्या Image removed. ३. मझा सर्वात आवडणारा पदार्थ : पंचामृत Image removed. ४. प्रसादाचे ताट Image removed.

वाचन 20507 प्रतिक्रिया 0