कुणालाही दुखावणं हा या धाग्याचा उद्देश नाही. किंबहुना कवितेच्या व्याकरणाच्या आणि वृत्तांच्य्या क्लिश्टतेत न शिरता ढोबळमानाने तिची सौंदर्य स्थळं समजावून घेणं हाच आहे.
आपल्या मिपावरील एका कवितेला मिळालेल्या प्रतिसादांकडे पाहता एकंदरीत ही कविता जवळ जवळ सर्वांनाच नादमाधुर्यामुळे आवडली आहे. नादमय रचना हे उत्तम काव्याचं एक लक्षण आहे हे मान्य पण केवळ नादमय शब्द रचनेमुळे कविता आवडली असं खरच म्हणता येतं का? असंच जर असेल तर कुठल्याही नादमय पण निरर्थक शब्द किंवा अक्षरांच्या रचनेला चांगली कविता म्हणावं का? उदाहरणार्थ हिंदुस्थानी अभिजात संगितातील तराणे अतिशय नादमधुर असतात पण त्यात कविता कुठे असते?
सदर कविता तर सोडाच पण कवितेतील अनेक शब्दच मला कळले नाहीत. दुर्बोधता हा आणखी एक वादाचा विषय आहे. असो.
माझ्या समजुती प्रमाणे चांगल्या कवितेचे काहि मुख्य निकष खालील पैकी एक किंवा अधिक असु शकतात.
१. सोपी प्रासादिक रचना ( संतांचे अभंग)
२. परिणामकारक विषय मांडणी
३. विषयाशी सुसुत्रता
४. प्रसंगाचं किंवा घटनेचं मोजक्या शब्दांत रेखाटन ( वेडात मराठे )
५. वाचकाशी connectivity.
६. शब्दापलिकडलं सांगण्याची क्षमता (गालिब)
कवितांच्या या आणि इतर सौंदर्यस्थळांबाबत या विषयावरील जाणकार आणि तज्ञ मंडळी आपली मतं मांडतील या अपेक्षेत.
चु.भू. द्या. घ्या.
नंदू
वाचने
5656
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
दहावी होउन
+१
In reply to दहावी होउन by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
सौदर्यस्थ
त्यात निराशा कसली नाना?
In reply to सौदर्यस्थ by अवलिया
सौंदर्य स्थळं
चांगला धागा...
कवी ग्रेस
व्यक्ती