Skip to main content

इंग्रजी शब्दांच्या गमती

लेखक सुनिल पाटकर यांनी गुरुवार, 24/09/2009 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या परिचयातील एका बाईला मी सहज विचारलं. तुमचा मुलगा सध्या काय करतो त्यावर त्या म्हणाल्या एका कंपनीत टेंपरवारी (टेंपररी) लागलाय.गाडी चालवणारे अनेक बहाद्दर गाडीचा वेग कमी झाला कि मोसम( मोशन) तुटला असं म्हणतात ,मराठी प्रमाणे इंग्रजीचा विपर्यास्त करणारे महाभागही कमी नाहीत, मुलांना सायकल शिकवतांना पायंडल मार असं म्हणणारेही खूप आहेत.राँकेल भरण्यासठी पुनेल(फनेल) आण अशी घरातील जुनी माणस अजुनही म्हणतात.वाँशरला वायसर..इंजेक्शनला... इंजिक्शन .इन्सपेक्टरला....इनिसपेक्टर म्हणणारे आणि. कंडक्टरला.. कंडाँक्टर असं खूप जण म्हणतात.. आपल्या भोवतीही अशा गंमती होत असतीलच. तुम्हालाही असे शब्द आठवत असतील,चला तर ते शब्द आपल्या मित्रानां सांगू या.

वाचने 18669
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

In reply to by शक्तिमान

कोझिकोड = कोळिकोड?
या स्टेशनात देवनागरीमधे 'कोषिकोड्ड' (किंवा 'कोष्षीकोड' किंवा अशा उच्चाराच्या आसपासचा शब्द) लिहीला आहे. तसंच अलेप्पीचं मूळ नाव आळपुळ्ळा किंवा आळपुष्षा म्हणे! स्पेलिंग आणखी तिसरंच. या अलेप्पी गावाच्या मूळ नावाची एवढी व्हर्जन्स ऐकली की मी शेवटी अलेप्पी हेच नाव डोक्यात फिक्स करून घेतलं. इंग्रजी 'झेड' चा उच्चार केरळी लोकं ष किंवा ळ असा लिहीतात हा माझ्यासाठी सांस्कृतीक, भाषिक, सामाजिक धक्काच होता. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इंग्रजी 'झेड' चा उच्चार केरळी लोकं ष किंवा ळ असा लिहीतात हा माझ्यासाठी सांस्कृतीक, भाषिक, सामाजिक धक्काच होता. हे उलटे असावे! मल्याळममधिल हा विवक्षित उच्चार रोमन लिपीत दर्शविण्यासाठी "Z" चा उपयोग करतात, असे म्हणायचे आहे का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोळिक्कोडऽ (ड चा उच्चार पूर्ण. अवग्रहचिह्नासह) समीपात मी कोळिक्कोडास गेलो होतो, तिथे काढलेले प्रकाशचित्र.
कोझिकोड = कोळिकोड? या स्टेशनात देवनागरीमधे 'कोषिकोड्ड' (किंवा 'कोष्षीकोड' किंवा अशा उच्चाराच्या आसपासचा शब्द) लिहीला आहे.
ह्या स्टेशनात देवनागरीमध्ये कोषिक्कोड असे लिहिले आहे. देवनागरीमध्ये लिहिण्यासाठी पूर्वी उत्तरेकडून कामगार आणावे लागत. तमिऴ 'ழ' = मलैयाळम 'ഴ' असे जे लिहितात, तो उच्चार देवनागरी पाटी बनवून देण्यासाठी उत्तरेकडील कामगारांना कळावा म्हणून मलैयाळी कामगार तो आंग्लभाषेत zh असा लिहून देत. उत्तरेकडील कामगार ते zh ला 'ष' वाचत. त्यांनी एकदा तो पायंडा पाडला आहे, तो अजूनही चालू आहे. आम्ही मात्र zh ला ऴ वाचतो. (ळ चे दोन प्रकार आहेत. एक ळ, दुसरा ऴ. मराठी ळ - गुजराती ળ हा ह्या दोन्ही प्रकारांपेक्षा वेगळा, तिसराच असा आहे.)
तसंच अलेप्पीचं मूळ नाव आळपुळ्ळा किंवा आळपुष्षा म्हणे! स्पेलिंग आणखी तिसरंच. या अलेप्पी गावाच्या मूळ नावाची एवढी व्हर्जन्स ऐकली की मी शेवटी अलेप्पी हेच नाव डोक्यात फिक्स करून घेतलं.
आलप्पुळा़ हे मूळ नांव आहे. ആലപ്പുഴ असे मलैयाळम लिपीत लिहितात, तर ஆலப்புழா असे तमिळ लिपीत लिहितात. आपण मात्र अलेप्पी असेच म्हणावे, कारण त्यातील ऴ हा आपल्याला ह्या जन्मात उच्चारता येणार नाही ह्याची १००००% खात्री आहे. 'ழ'/'ഴ' चा उच्चार मराठीभाषकांना लिहून (अथवा बोलून) समजावून सांगणे केवळ आणि केवळ अशक्यप्राय आहे. तो मराठी ळ च्या आसपास आहे असे काहीसे सांगता येते. त्यामुळे तेवढी सूट आपणांस मिळेल. ;-)
इंग्रजी 'झेड' चा उच्चार केरळी लोकं ष किंवा ळ असा लिहीतात हा माझ्यासाठी सांस्कृतीक, भाषिक, सामाजिक धक्काच होता.
  1. झेड चा नाही, झेडहेच चा. (zh)
  2. zh चा उच्चार ष असे स्वतः मलैयाळी लोक लिहित नाहीत.
  3. zh चा उच्चार ऴ असे मलैयाळी लोक लिहितात.
हैयो हैयैयो!

इंग्रजीतल्या H चा उच्चार दक्षिणेत(विशेष करुन आंध्र्/कर्नाटक) 'हेच' असा का करतात हे कळत नाही.circuit चा उच्चार सर्क्युट असाही केला जातो. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

H ने चालु होणार्या बहुतांश शब्दांचा उच्चार हा "ह" ने केला जातो. उदा. हॅन्ड,हर्ट,हट इ.इ. त्यामुळे बहुदा दाक्षिणात्य लोक H चा एच असा उच्चार न करता "हेच्च" असा करत असावेत.

In reply to by कानडाऊ योगेशु

आमच्या न्यूयॉर्कमधील हापिसात २ कर्नाटकी मुली होत्या. त्या बरेच वेळेला 'H' चा उच्चार 'A'सारख्या करायच्या. उदा.'Hairfall' चा उच्चार एयरफॉल. 'Horn' ला 'ऑर्नं'. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

मला इन्ग्रजी-मराठी तील शब्द वापरातील अनेक मजेशीर किस्से अनुभवास आले आहेत. त्यातील एक किस्सा असा : एखादा मराठी नाव/आडनावा चा कोणी कधी भेटला /भेटली तर मी हमखास मराठित बोलतो. जगभर फिरताना कुठल्याहि देशात मराठि माणुस मी ओळखु शकतो , हि माझी खासियत आहे. बरेच मराठि लोकं एक "अ‍ॅक्सेन्ट" घेवुन बोलतात, मग ते किती हि वर्ष अमेरीकन इन्ग्रजी बोलण्याचा प्रयत्न करोत किंवा अन्य कोणती हि भाषा... असो. एकदा टेनीस खेळताना ,शेजारील कोर्ट वरुन ,एक भारतीय मुलगी सारखी , नोकरी -नोकरी असे काहितरी म्हणत होती असे मला ऐकु आले. ( बहुतेक हि मुलगी पहिल्यांदाच टेनीस खेळत होती ) मला काहि समजले नाहि. काहि वेळा नंतर तिच्या पार्टनर मुलीला मी विचारले कि हि मुलगी नोकरी कर... मी नोकरी करते... वैगरे का म्हणते आहे ? तेव्हा मला त्या मुलींच्या मराठि बोलण्यातले गुढ कळाले. त्या मुली पहिल्यांदाच टेनीस खेळत होत्या व सर्विस करणे चा अनुवाद नोकरी करणे असा करत होत्या. ( बहुतेक ह्या दोघि अमेरीकेत नुकत्याच आल्या होत्या आणि अस्खलित मराठि शाळे मधे शिकलेल्या होत्या !). मला माझे हसु आवरत नव्हते .. पण त्या मुलींच्या मराठि भाषांतरा ची मजा वाटत होती. ह्या गोष्टिला आता बरीच-बरीच वर्ष झाली तरी हे "नोकरी करणे" भाषांतर नेहमी आठवते आणि हसु येते. अजुन एक भाषांतर जे मला नेहमी ऐकु येते .. ते म्हणजे जवळ जवळ ८०% मराठि लोकं टेनिस ला "लॉन्ग टेनिस" म्हणतात !

बिझी ला ( व्यस्त) असणे याचा उच्चार मी कार्यालयात बुझी असा करत असे. सर्व सहकारी करपल्लवी करत आहे असे मला जाणवले आणि प्रयत्नपुर्वक बिझी म्हणण्याचा प्रयत्न करी, तरी कधी बुझी असताना बुझी असे म्हणत असे. ( मनात म्हणे, हसा लेकानो)...