(मला कवितेतले काहीही कळत नाही त्यामुळे मी कधीही काव्य विभागात फिरकत नाही. आमचे मित्र ही आणि ही सम्राट टारोबा ढेकर यांनी आम्हाला शरदिनी यांच्या कवितांचा खजिना दाखवला आणि आमचा कमी झोपेचा त्रास अजूनच वाढला. मागील २-३ रात्री जागून अथक परिश्रम करून आम्ही त्यांच्या कविता वाचल्या आणि अथक परिश्रम करून अर्थ समजण्याचा प्रयत्न केला. त्यांची पूल ही कविता पाहून एक विडंबन आमच्यातल्या सुप्त विडंबन्कारास स्फुरले. आम्हाला आमच्या आयुष्यातली पहिली कविता लिहीण्यास कच्चा माल दाखवल्याबद्दल टारोबा चे विशेष आभार ;) )
उतरत्या लिफ्ट्मधले निष्फळ उसासे
अन नाभीखाली डुचमळणारे खाद्य भरपूर
टुर्र टुर्र
इवल्याशा जागेतली अस्वस्थ तगमग
पण अत्तराच्या वरताण ठरलेले कालचे तंदूर
टुर्र टुर्र टुर्र
असतोच दडलेला काहींच्या पोटात
आतल्या आत ठुसठुसणारा उग्रगंधित धूर
टुर्र टुर्र टुर्र टुर्र
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3022
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा!!
आमचे मित्र
In reply to हा हा!! by चतुरंग
-
लंबुशेट, हा
जरा बाहेर भेट
In reply to लंबुशेट, हा by टारझन
हाहाहा!
In reply to जरा बाहेर भेट by मिसळभोक्ता
पुर्णतः
In reply to हाहाहा! by सहज
चालु द्या !
जहबहर्या..