Skip to main content

मध्यल्या वेळचे खाणे (ब्रेड रोल्स)

मध्यल्या वेळचे खाणे (ब्रेड रोल्स)

Published on बुधवार, 30/09/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
काल सकाळी न्याहारीचा ज्याम कंटाळा आला होता. (अहो स्वतः बनवाव लागत. आयत गिळायला मिळत आसेल आमची ना कशाला?) दुपारी ऑफिस मध्येपण फळांवर वेळ मारुन नेली. संध्याकाळी खास जेवण बनवायचा मुड न्हवता, त्यामुळे प्रयोगशाळेला कुलुप. (कोण रे तो म्हणाला सुटलोSSSS ? :W बर इतक्या लवकर सोडीन >:) ). रात्री ९ ला पोटात कावळे ओरडायला लागलेच. मग आता आयत्या वेळी काय कराव बर :? झटपट खिचडी करावी का? पण माझ्या जिभेचे चोचलेच फार त्यामुळे ती आयडिया रद्द [( . फ्रिज उघडुन कच्च्या मालाचा अंदाज घेतला. ब्रेड दिसला. काही तरी असेच मध्यल्या ( ? ) वेळचे खाणे बनवावे ठरवले. पटपट तयारीला लागलो. एक लहान कांदा,टॅमेटो बारीक चिरुन घेतला. नारळ खवलेला होता तो काढला. १ चमचा बडीशेप घेतली/ला. (बडीशेप च लिंग काय ब्वॉ? काही जण खाल्ली म्हणतात तर काही खल्ला. मरो त्याच्याशी काही देणे घेणे नाही.) फ्रिजर मधली मसाला, हिरव वाटण (कोथींबीर + हिरवी मिरची + आल +लसुण) लावुन ठेवलेली कोलंबी काढली. तिचे लहान (अंदाजे १ से.मी. लांबीचे) तु़कडे केले. त्यावर थोड लिंबु पिळल. कढईत थोड तेल तापवुन त्यात कांदा गुलाबी होइस्तव परतला. मग त्यात मसाला लावलेल्या कोलंबीचे तु़कडे टाकुन मस्त परतुन घेतेल. लगेच त्यात टॅमेटो, नारळ, बडीशेप,मीठ टाकुन ५-७ मिनिटे खमंग परतुन सारण तयार केल. ब्रेडच्या कडा कापुन घेतल्या. एका थाळीत थोड मिठाच पाणी घेतल. एक ब्रेडची स्लाइस त्या पाण्याय बुडवुन लगेच तळ हातावर दाबुन त्यातल पाणी काढुन टाकल. त्या स्लाइस वर तयार सारण टाकुन ब्रेडचा रोल वाळला. ब्रेडच्या कडा दाबुन बंद केल्या. तव्यावर थोड्याश्या तेलावर हे तयार रोल्स मध्यम आचेवर झटपट तळुन घेतले. लवकर लवकर एका रोलचा समस्त मिपाकरांना नैवेद्य दाखवुन बाकीच्यांवर ताव मारला. :D

याद्या 25864
प्रतिक्रिया 56

न वाचता आणि न पाहता थेट या बॉक्समध्ये आलोय, यावरूनच प्रतिसाद समजून घ्यावा.

In reply to by श्रावण मोडक

गणपाशेठला प्रतिसाद द्यायला वन हॅज टू थिंक आउट ऑफ द बॉक्स?

In reply to by सहज

गणपाशेठला प्रतिसाद द्यायला वन हॅज टू थिंक आउट ऑफ द बॉक्स? हाहाहाहाहा... यू थिंक टू मच, सहजराव!!! हे बॉक्स वगैरे तर आमच्यालेखी लई लांबचं. आम्ही पदार्थ आणि चव याच्यापुरता मतलब ठेवतो. तो आज्जीकडून येवो किंवा आज्ज्याकडून किंवा मार्गारेट, एलिझाबेथ, जॉन, डॉन कोणीही... कसे :)

In reply to by श्रावण मोडक

(सहमत)बेसनलाडू गणपाशेठचा स्वयंपाकातील उत्साह वाखाणण्याजोगा (नि स्फूर्तीदायक) आहे खरा! (उत्साही)बेसनलाडू

नाव सांगणार तुझं!!!!! X( बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लहानपणी याच्यापाई खूप बोलणी खाल्लीत मी आईची., कारण मला किचनमध्ये जायचा कंटाळा, आणी हे साहेब एका पायावर तयार. :(

In reply to by लवंगी

नाव तुला नाही सांगणारे... त्याच्या बॉसलाच सांगणारे... हा कंपनीत बसून असल्या पाकृ लिहित असतो म्हणून... मी ओळखतो त्याच्या बॉसला... :D बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गणपा तुझ्या बॉसला ओळखत नाही ना ह्याची खात्री करुन मग कळव! ;) (कौंटर अ‍ॅटॅक)चतुरंग

In reply to by चतुरंग

अहो रंगाशेठ, बॉसचे काय सांगता ? अश्या एक से एक पाकॄ ( आणि त्याचे फोटो) पाहुन बॉसच गणपाला म्हणले "बॉस आहात" ! ------ (सिसीलियन डिफेन्स) छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by चतुरंग

लै भारी, दोघेपण! -गुमान एका जागी उभा राहुन समोरच्या राणीची मजा पाहणारा राजा. ;)

In reply to by चतुरंग

आता यापुढे काही बोलण्यासारखे शिल्लक नाही (क्वीन्स गँबिट अ‍ॅक्सेप्टेड) खालिद

=D> छानच...

तुझा पत्ता दे रे लवकर... वहिनी परत येईपर्यंत तुझ्याकडंच मुक्काम ठोकतो. रोज प्रयोग कर निरनिराळे...मी आहेच हादडायला :)


श्री. गणपा यांची मिपावर फोटो चढवण्याची सुविधा काढून घेण्यात यावी असा प्रस्ताव मी मांडतो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

संपादकांना पुर्णत: अनुमोदन! - (सदस्य) टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

बिका आणि टिंग्याला अनुमोदन (कंपूबाज) अदिती

गणपाभौ!! खल्लास @) तुमची बायको दुर गेल्या पासुन आम्हा खाद्द प्रेमींची चांगलीच फावली आहे ;) रोज नव्या पाककृती मिळताहेत आणखी काय! :) खाद्दपदार्थांना ताटात सजवण्याच्या तुमच्या कल्पनाशक्तीला तर सलाम!

खल्लास !!! बाकी सब खैरियत है ! ('खुदा गवाह'मधून उधार वाक्य)

ब्रेड रोलचा " एम " छानच ! नवरात्र सम्पलच आहे, बडिशेप सोडुन बाकी सर्व सामान पण घरात आहे ... उद्या करुन बघावे म्हणते ... तुम्ही एकदम ग्रेट आहात ...

आत्ता नक्की खात्रीच पटली की 'गणपा' हा मेल आय डी धारण केलेली ही सुगरण ताई किंवा काकू आहे! :D (बर्‍या बोलाने तुमचे खरे नाव कळवा अन्यथा बंदीहुकूम काढावा लागेल ;) ) अहो वरण्-भात लावला की आमची छाती अभिमानाने वगैरे फुलून येते इथे तर मधल्या वेळचे वगैरे खाणे सुचते आहे आणि नुसतेच नाही तर अत्यंत यशस्वी होते आहे! छ्याऽऽएवढे फ्रस्ट्रेशन कधीच आले नव्हते! ~X( (करपलेला)चतुरंग

In reply to by चतुरंग

गणपा हा 'तो'च आहे 'ती' नाही. मला खात्री आहे. आणि मी लवकरच त्याचा बंदोबस्त करणार आहे. त्याची कंप्लेट करणार आहे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका, तुम्ही प्लीज 'गणपा' यांची कंप्लेट करु नका... आता कुठे त्यांनी बनवलेले पदार्थ मी करुन पाहायला सुरुवात केली आहे. अजुन मला खुप पदार्थ शिकायची इच्छा आहे.... :W

In reply to by बिपिन कार्यकर्ते

'गणपा' आहे का (पाटलांचा) 'गणपत' आहे ते काढा पाहू शोधुन एकदा! :) पाककृती झक्कास!!!

In reply to by निमीत्त मात्र

आरारारारा चार रेशिप्या काय टाकल्या राव, लोक आमच लिंगच बदलायला निघाले.. :O लोकांचा विश्वास बसावा म्हणुन करपलेल्या खिचडीची रेशीपी टाकावी काय :? ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

In reply to by चतुरंग

>>आत्ता नक्की खात्रीच पटली की 'गणपा' हा मेल आय डी धारण केलेली ही सुगरण ताई किंवा काकू आहे! 'गणपा' नावाच्या कुणीतरी अंडरकव्हर काकू/ताई किंवा आजीबाई असणार...मला पहिल्या दिवसापासुन वाटतंय... :? संपादकपदाचा उपयोग करुन तुम्ही जासुसी करु शकता चतरंग... :) दिपाली :)

In reply to by दिपाली पाटिल

गणपाला प्रश्न पडलाय बडीशेपेचं लिंग कोणतं आणि इथे पब्लिक.... जाऊ दे... ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गणपापण ना...एवढं सगळं बनवलं नी त्या बडिशेपेच्या मागे कसले लागताय.. :D दिपाली :)

In reply to by दिपाली पाटिल

छे छे!!! मी गणपाच्या मागे नाही लागणार हो.... मला आपली बडीशेपच बरी. बिपिन कार्यकर्ते

In reply to by दिपाली पाटिल

आता पुढच्या वेळी पाककृती सोबत माझा पण फटु टाकावा काय :? ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

In reply to by दिपाली पाटिल

संपादक कुठले जासूसी करायला? आम्हाला तो अधिकार नसतो आम्ही आपले नामधारी! (खरं तर सफाई कामगारच ~X( ) (काटेरी मुकुटधारी)चतुरंग

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यालाच 'उंदराला मांजर साक्ष' म्हणतात का हो प्राध्यापक साहेब? (आयला मग ते कोण? ) ;) -अबकडेरिअन

बडीशेप च लिंग काय ब्वॉ? काही जण खाल्ली म्हणतात तर काही खल्ला. आम्ही बडीशेप खाल्लं म्हणतो! :D (पुल्लिंगी)चतुरंग

बनव !! बनव !! आणी दाखव !! दाखव आणी जळव !! जळव !! सू हा स...

आम्ही गणपाचे लेख न पाहण्याची शपथ घेत आहोत X( *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

>>संध्याकाळी खास जेवण बनवायचा मुड न्हवता, त्यामुळे प्रयोगशाळेला कुलुप. मुड नसताना एव्हढं भारी बनवता, मुड असताना किती भारी बनवाल...

सध्या आम्ही मॅगी बनवण्याचा प्रयोग करतोय...कधी पाणी जास्त होतं तर कधी काय! एकदा मॅगी नीट जमली की मग तुमच्या पाकृ करायला घेउ, कसं? हाय काय अन नाय काय! ;)

ओह!!! नॉट अगेन!!! (यांचं सदस्यत्व रद्द करण्याची तजवीज केली पाहिजे. ) :W - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

ओह!!! नॉट अगेन!!! (यांचं सदस्यत्व रद्द करण्याची तजवीज केली पाहिजे. ):W दिपाली :)

In reply to by दिपाली पाटिल

ठ्या: करुन फुटलो!!! फुर्रर्रर्रकन कॉफीनं कळाफलकाला आंघोळ घातली ना राव!!! च्यायला, ही दिपाली आजकाल लैच दंगा करायला लागलीये :)

या गणपारावांच्या सासरची मंडळी मिपावर आहेत वाटतं. बायकोला तु गेलीस तर बघ कसली मजा करतोय असं दाखवताहेत, नाहीतर इतका उत्साह कुठला आलाय बाप्यात? ;) -बाप्या.

कंटाळा आलाय असून सुद्धा ही अशी भन्नाट रेसीपी? कमाल आहे तुमची गणपा. इथे कंटाळा आल्यावर कोण ते किचनात उभे रहाणार वर ते इतके नीट फोटो घेत रेसीपी बनवणार. कोण हे रोल्स खायला घालतील काय? मला पाहून भूक ही लागलीय. असे तळलेले वगैरे खूप आवडतात... (मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरे म्हणून किचनात घुसलेली मी) चित्रा देव. :)

आणखी एक गणपाजी, तुमची बायको माहेरी गेलीय तरी तुमची भांडी, ताटं,गॅस वगैर चकचकीत. अजुन पांढरा रंग दिसतोय गॅसचा... :) (बायकांची नजर ती मेली...तिकडेच जाणार)...

In reply to by चित्रादेव

चित्रातै, गेला १.५ महीना स्वतः भांडी घासायचो, पण तुम्हा सर्वांच्या आशिर्वादने गेल्या १० दिवसां पासुन घर कामासाठी कामवाली मिळाली आहे. :) म्हणुन गेल्या एका रेसीपीतला डिसक्लेमर हल्ली टाकत नाही. ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

आणखी एक गणपाजी, तुमची बायको माहेरी गेलीय तरी तुमची भांडी, ताटं,गॅस वगैर चकचकीत. अजुन पांढरा रंग दिसतोय गॅसचा आहाहा...काय बरोबर बोललातं चित्राताई.रेशिपी आधी लक्ष गॅस एवढा पांढरा शुभ्र कसा दिसतोय ह्याकडे. आम्ही आपले कंटाळा आला की कोणीतरी बनवून द्यावंच्या अपेक्षेत असतो. मस्त आइडीया,कोलंबीचे ब्रेड रोल्स. (हाफीसात अती काम असलं की ५ दिवसांचा स्वयंपाक एकत्र करुन ठेवणारे उत्साही) -मयुरा

घर कामासाठी कामवाली मिळाली आहे म्हणजे अगोदर नव्हती .. बायको माहेरी गेली की लगेच बरे मिळाली... :? चांगले आहे

क्लास फोटो आणि रेसिपी.. मस्त.. स्वाती

पण एक प्रश्न्न :? कोळम्बी चे तुकडे न परतताच घातले का :O आनि ते शिजाव आस तुमी त्याला डीप फ्राय देखिल केल नाय @) मग ते कच्च वगैरे तर लागल नाही ना :/ आसो दिसत तर चान आहे..मी त्यात बटाटायाचि भाजि वपरली होति... :)