Skip to main content

मुजरा

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 29/09/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंभु मी, मुजरा घालत कुणाच्या सदरेत नाही वगळले मलाच, नाव माझे कुठल्याच बखरेत नाही हरहुन्नरी मी, बिलंदर होउन जगलो पण खासा कुणाच्या भरलो नजरेत नाही सगळे दिवस काळ्या आमावस्याच माझा चंद्र अजुन माझ्या नजरेत नाही सगळ्या वरवरच्या मलमपट्या अंतरीच्या तारा छेडणारी नशा मदिरेत नाही सजावट एकमेकांना भुलवण्यासाठीच गणेशास बांधेल ती भक्ती कुठल्याच मखरेत नाही
लेखनविषय:

वाचने 1398
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

चांगला प्रयत्न. पुढील लेखनासाठी शुभेच्छा ! साप्ताहिक सकाळ नियमित वाचत चला, फायदा होईल. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मै अकेला, मै अलबेला... ह्या गीताचे भाषांतर ना ? मी जिंकलो ! नान्या, मला जिंकल्याबद्दल उत्तेजनार्थ बक्षिस दे रे ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

कशाचेही भाषांतर नाहीये.. मनात आले ते लिहलय...