Skip to main content

कवी

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 24/09/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
कवितांचा एक कारखाना चालवतो मी एकाच साच्यातल्या कविता छापतो मी आठवणींचा बाजार , प्रेमाचा आजार वेड्यागत असच काहीतरी , बरळतो मी गावरान गोडवा न ठाउक मला उगाच शब्दांचे काना मात्रा, चुकवतो मी हवे ते, जेंव्हा नाही गवसत मारुन मुटकुन शब्दांना, घुसडवतो मी विषयाची गरज, प्रसंगाची मागणी अशा- गोंडस नावाखाली शिवराळ शब्द, पेरतो मी टिकाकारांना त्यांच्याच भाषेत प्रत्युतर कुठल्याही व्यासपिठावर, भुंकतो मी
लेखनविषय:

वाचने 1591
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

फारच `विषयांतर' होतंय!

गावरान गोडवा न ठाउक मला उगाच शब्दांचे काना मात्रा, चुकवतो मी हा.हा.हा... छान. :) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.