Skip to main content

व्यथा

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 24/09/2009 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा ------------------------------------ जरी वाटतो नवाच आहे ऋतु कालचा तसाच आहे.. प्रतिबिंबासही रोज वाटते मीही देखील खराच आहे.. रामासाठी सीता होणे खरा दोष हा तिचाच आहे.. इथे थांबलो घटकाभर मी प्रवास अजुनि बराच आहे.. किती भरावे सूख तरिहि अर्धा प्याला रिताच आहे.. मला नकोसा शेवट झाला किती कथांची व्यथाच आहे..! - योगेशु
लेखनविषय:

वाचने 2070
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सुंदर लिहिलेत. आवडले. प्रतिबिंबासही रोज वाटते मीही देखील खराच आहे.. रामासाठी सीता होणे खरा दोष हा तिचाच आहे.. इथे थांबलो घटकाभर मी प्रवास अजुनि बराच आहे.. किती भरावे सूख तरिहि अर्धा प्याला रिताच आहे.. हे चारही शेर खूप आवडलेत. विशेषतः प्रतिबिंबाची कल्पना. मीही देखील खराच आहे 'मीही' अन् 'देखील' हे दोन्ही वापरणे जरा चुकतंय. पुन्हा वर 'प्रतिबिंबासही' हे आलेलेच आहे. थोडे बदलले तर बरे पडेल. नाही? :) असो. छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व. पुलेशु. राघव

सहावं , तिसरं , पाचवं , पहिलं , दुसरं आणि चौथं कडवं आवडलं !! केवळ अप्रतिम !! झकास - डोकंखाऊ टारझू

इथे थांबलो घटकाभर मी प्रवास अजुनि बराच आहे.. व्वा... :) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. Frankly Speaking with Raj Thackeray http://www.timesnow.tv/videoshow/4328082.cms

काय आवडलं ते सांगायचं झालं तर सगळी कविताच इथे परत पोस्टावी लागेल. लगे रहो ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"