घर
"या, या ,हे घर तुमचच आहे
इथे पाहुण्यांच स्वागतच आहे"
अशा पाट्या लावून आता
म्हणे जागोजागी घरे आहेत
फेंग शुई नि वास्तुशास्त्र
पिऊन मोठी घरे उभे आहेत
रिमोटकंट्रोलवर चालणारे
एक जग त्यामध्ये सज्ज आहे
खा अमेरिकन बर्गर फाईन
घ्या कधी इटलीयन वाईन
जरा चघळा संस्कृतीचे किस्से
शोधा आपल्या भाषेचे हिस्से
लागला जर आसामचा चहा
होईल तयार सेकंदात दहा
सीएनएन पहा रवीशंकर ऐका
तस हे घर ग्लोबल बर का.....
ऐका इथे कशाची उणीव नाही!
दारावरच्या भिकाऱ्याला येथे
प्रवेश नाही ...कारण त्याच्याकडे
हवा तो सिक्रेटकोड नाही!
ही इथली माणस आहेत
त्या जगाच्या चार कोपऱ्यात...
संगणक मोबाईलने जोडलेली
पण मनान कधीच दूर गेलेली...
ऐका हो ऐका..घर हव आहे का?
माणसाला माणूस हवा आहे का?
(तशी प्रत्येक घराला लागली आहे
एक घर घर कायमचीच!)
-सोनाली जोशी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
20543
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही इथली
शेजारी
In reply to ही इथली by राजे (verified= न पडताळणी केलेला)
खरे आहे
In reply to शेजारी by प्रकाश घाटपांडे
साहेब, अश्य
In reply to शेजारी by प्रकाश घाटपांडे
खरं आहे
In reply to शेजारी by प्रकाश घाटपांडे
सहमत आहे
In reply to खरं आहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मर्मिक...
आवडली
छान कविता..
खर सांगू - स्वगत
विचारशील
In reply to खर सांगू - स्वगत by सहज
टकाटक
सांभाळा!
अजीबात कळले नाही
In reply to सांभाळा! by प्रमोद देव
पाहूणा!
In reply to अजीबात कळले नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्वांचे आभार
एक सुन्द्अर कविता ..........
वा वा
करेक्शन! :)
In reply to वा वा by धोंडोपंत