तसे बाबा नवाथे जॉली होते. वयस्करच होते. ८० प्लस म्हणा ना! अलिकडेच वारले!
सोसायटीत सर्वांशी तसे मिळून मिसळून वागायचे. गच्चीत जायच्या जिन्यावर नेहमी बसलेले असायचे. पण सोसायटीतलं पब्लिक नेहमी त्याची थट्टा-मस्करीच करायचं. आणि ती करताना बर्याचदा त्यांच्या वयाचा मुलाहिजा राखला जात नसे. पण बाबा नवाथे कधी कुणावर रागावायचे नाहीत! पुढे पुढे तर लोकं त्या म्हातार्याची जास्तच भंकस करू लागले, टेर उडवू लागले.
नाही, तसं बाबांचही चुकायचं. म्हातार्याला बसण्या-उठण्याची जराही आदब नसे. उघडेबंब, आत लंगोट नसलेली चट्टेरीपट्टेरी हाफ चड्डी घालून बघावं तेव्हा म्हातारा गच्चीत जायच्या जिन्यात बसलेला असायचा. आमचा गोविंदा भोसडीचा महा-हलकट! आत लंगोटी नसल्यामुळे जरा बाबांनी पायांची पोझिशन बदलून मांडी बदलली की साजहिकच त्या अघळपघळ चड्डीतून पब्लिकला विश्वरूप दर्शन व्हायचं. ते झालं की गोंद्या चेकाळायाचा आणि टाळ्या पिटत आनंदाने ओरडायचा,
"हर हर महादेव,
लंगोटीत तीन देव!
बाबा नवाथे की जय!":)
हजर असणारं पब्लिक मनमुराद हसायचं आणि आपापल्या कामाला निघून जायचं. मला मात्र त्याबद्दल मनात कुठेतरी वाईट वाटायचं. आमचा माधवही तसाच. बघावं तेव्हा बाबांची टेर उडवायचा. मी म्हणायचाही त्यांना की 'जाऊ दे रे, वयस्कर माणूस आहे! त्याची अशी सारखी थट्टा बरी नव्हे.'
मी बाबांनाही म्हणायचा, "काय बाबा, सगळीजण तुमची खेचतात ते मला आवडत नाही." त्यावर बाबाच हसून म्हणायचे, "जाऊ दे रे. चलता है!"
अलिकडेच बाबा नवाथे वारले. दहावा झाला, तेरावा झाला आणि चौदाव्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास बाबा पुन्हा तसेच जिन्यात बसलेले लोकांना दिसले! बाबांचं भूत झालं. हो, बाबांचं भूत झालं!
पण बाबांच्या भुतालाही कुणी घाबरेना. बाबांच्या भुताचीही थट्टामस्करी होऊ लागली. रात्रीचे साडेदहा-अकरा वाजले की बाबांचं भूत त्या गच्चीत जायच्या जिन्यात येऊन बसायचं ते अगदी पहाटेपर्यंत. तसेच उघडेबंब, विनालंगोट चट्टेरीपट्टेरी हाफ चड्डी घातलेले बाबा नवाथे!
महिन्याभरापूर्वीची गोष्ट. मी आणि गोविंदा गच्चीत विड्या फुंकायला गेलो होतो. विड्या फुंकून झाल्या. बारा वगैरे वाजले असतील. परतीच्या जिन्यातच बाबा नवाथे बसले होते.
"चल, जरा बाबांची खेचू! तेवढाच जरा टीपी!" गोंद्या म्हणाला.
"जाऊ दे रे. उगाच त्यांची मस्करी नको. लेको, जिवंतपणी त्यांना दिलात तेवढा त्रास पुरे नाही का झाला? निदान त्यांच्या भुताला तरी आता स्वस्थ बसू दे की!" मी.
तेवढ्यात बाबांनी मांडी बदलली. विश्वरूप दर्शन झालं! गोंद्या खदाखदा हसत, टाळ्या पिटत ओरडला,
"हर हर महादेव,
लंगोटीत तीन देव!
बाबा नवाथे की जय!":)
"हम्म! जा आता घरी चुपचाप. आगीशी खेळू नकोस गोंद्या!" बाबा थोडं दटावून म्हणाले.
"अरेच्च्या, बाबा भडकले वाटतं!"
"हर हर महादेव,
लंगोटीत तीन देव!
बाबा नवाथे की जय!":)
एवढं बोलून गोंद्या फिदिफिदी हासला.
पुढच्याच क्षणी दिवे गेले. मिट्ट अंधार झाला आणि आमच्या डोळ्यासमोर खणकन काजवे चमकावे तशी खालील आकृती जिन्यात उभी राहिली!
काही सेकंदांनंतर दिवे आले. जिन्यात आता कुणीच नव्हतं. मी कसाबसा भानावर होतो. माझ्या बाजूलाच गोंद्या पडला होता. मी धावाधाव केली, डॉक्टरांना बोलावलं. गोंद्या जागीच संपला होता. कार्डीअॅक अॅरेस्ट! डॉक्टरांनी निदान केलं!
गोंद्याची अंतयात्रा निघायला दुसर्या दिवशीची रात्र उजाडली. आम्ही इमारतीपासून थोडे दूर गेलावर माझी नजर सहजच वरती गच्चीकडे वळली. उघडेबंब बाबा नवाथे फिदिफिदी हासत कठड्यापाशी उभे होते!
पुढे आठच दिवसांनी माधवही वारला.
कार्डिअॅक अॅरेस्ट. डॉक्टरांनी निदान केलं..!
वाचने
8949
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्यानु,
हुच्च...
चुचु
चुचु
बापरे तात्या!!
साम्भलून बोला..........
भूतबाधा !
गंडलो रे
+१ असेच
In reply to गंडलो रे by संदीप चित्रे
बाकरवडी
कथा ठिकठाक
+१
In reply to कथा ठिकठाक by प्राजु
भारीच्चे कथा.
+१
In reply to भारीच्चे कथा. by भोचक
हॅलोवीन
हीहाहाहाहाहाहाहाहा!
In reply to हॅलोवीन by रेवती
हाहा!
हेच
In reply to हाहा! by धनंजय
हा हा
In reply to हेच by सहज
इथं
हा हा हा....
+१
In reply to हा हा हा.... by गणपा