आपला देश व आपली संस्कृती व सर्वधर्मसमभाव यांचा प्रत्येक निरुपणात, प्रचार कार्यात उल्लेख केला की तुम्ही जगभर शाखा उघडू शकता!
आणि हो, शिक्षणसम्राट, शिक्षणमहर्षी श्री श्री श्री भडकमकर महाराज की जय!!!!!!
>>आपला देश व आपली संस्कृती व सर्वधर्मसमभाव यांचा प्रत्येक निरुपणात, प्रचार कार्यात उल्लेख केला की तुम्ही जगभर शाखा उघडू शकता!
आणि हो, शिक्षणसम्राट, शिक्षणमहर्षी श्री श्री श्री भडकमकर महाराज की जय!!!!!!
+१ सहमत आहे.. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
मा. श्री^३. गुरूजी भडकमकरशास्त्री यांसी,
साष्टांग प्रणिपात,
शहरी - विशेषतः उच्चवर्गीय मुमुक्षुंसाठी आवश्यक असणार्या गुरूंसाठी विशेष प्रशिक्षण उपलब्ध आहे काय? नसल्यास त्या प्रशिक्षणाचाही अंतर्भाव व्हावा. (अॅडव्हान्स्ड कोर्स अर्थात उच्च प्रशिक्षणातील मुद्द्यांमध्ये भांग,चरस, अफू,गांजा, एलेस्डी, कोकेन इ. पदार्थांच्या सेवनाने होणार्या उन्मुक्त समाधी भावनेचा उल्लेख आढळत नाही. तसेच 'याच्यातून तिच्याकडे' किंवा 'गुह्येंद्रियांतून गुह्यज्ञान' अशा नवनवोन्मेषशाली विषयांचा उल्लेख आढळला नाही. या दोन 'विषयां'शिवाय उच्चवर्गीय मुमुक्षु समाधी अवस्थेत जाऊन ब्रह्मरंध्राशी तन्मय कसे होऊ शकतील?याचा कृपया विचार व्हावा.)
आपल्या प्रशिक्षण वर्गाची गुरूदक्षिणा किती आहे ते कृपया कळवावे. लवकरच सहभागी होत आहे.
गुरूनिर्माण प्रशिक्षण अभिलाषी,
विसुनाना
मास्तरांचा लेख आणि विसुनानांची प्रतिक्रिया बेफाम. =)) :loll:=)) :loll:=)) :loll:=)) :loll:=)) :loll:
(भोचक)
तुम्ही अध्यात्मिक गुरू आहात काय ? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती
लय भारी गुरूदेव.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
मास्तुरे,
पहा बरं, 'ओ सजना बरखा बहार आई'चा कसा उपयोग झाला ;)
सर्रर्रर्रकन (की फॉक्कन) लेख पडला की नाही?
बरं, लेख लिहायचा आळस होता तोही कसा निघुन गेला ना? मस्त फ्रेश वाटायला लागलं की नाही? अहो, ताकदच आहे तेवढी ह्या गाण्यात :P
बरं, मास्तर,
मला आयुर्वेदिक बाबा व्हायची फार फार ईच्छा आहे हो... आहे का काही पेश्शल कोर्स?
-धमालजी पितळे.
मास्तर !
वाक्यावाक्याला माझ्या टाळ्या घेतल्यायत तुम्ही !!
आज आमची book reading club meeting आहे तेव्हा सगळ्यांना तुमचा हा लेख वाचून दाखवीन.
जियो मास्तर ... keep up such excellent writings
>> ( क्लासचा वैधानिक इशारा : चमत्काराच्या चकव्यात फ़ार अडकू नये. ते व्यवसायासाठी धोकादायक ठरू शकते), आम्ही बोलबच्चनगिरीवरच अधिक भर देतो. ते सेफ़ असते.
=D> =D>
ज ह ब ह र्या हा!!
संस्थेची नावे विशिष्ट पद्धतीने द्यावीत..: सिद्ध योगिक सायन्स इन्स्टिट्यूट , सायंटिफ़िक ऍकॅडमी फ़ॉर योगिक रिसर्च ऍंड डेव्हलपमेंट, कॉस्मिक एनर्जी रिसर्च सायन्स लॅबोरेटोरी,
सोसायटी फ़ॉर रिडंडंट एनर्जी फ़्लो स्टडी इन ध्यानचक्राज, रेडिएशन स्टडी इन्स्टिट्यूट फ़ॉर कुंडलिनी अवेकनिंग
हे भयंकर आवडलं!! B)
बा़की जालिंदरबाबांच्या सेवेतून तुमच्यात झालेली अध्यात्मिक उन्नती पाहून मन भरुन आले. हे क्लासेस जोरदार चालणार ह्यात शंका नाही.
(चला माझी अभिमंत्रित चहा घेण्याची वेळ झाली!)
(जंतर्-मंतर)चतुरंग
मास्तर, कमाल केलीत... बर्याच विकेट्स घेतल्यात, जलिंदरबाबाची कृपा, दुसरं काय? आणि तुमचा सखोल अभ्यास आणि विचार पदोपदी दिसतोय.
=)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
लेखाचे जुलाब बंद करण्याविषयी काही करता येईल का मास्तर ?
नाही टार्या, मास्तरांसारख्या रंगकर्मीलाही ते शक्य नाही असं मला वाटतंय.
'त्यांना समजून घ्या' किंवा 'त्यांना आपलं म्हणा' एवढे दोनच उपाय शक्य आहेत! ;)
(समजूतदार)चतुरंग
मास्तर लईच भारी हान्लाय. (अंनिस वार्तापत्राला हा लेख पाठवायला हवा. )
आता काही ठिकानी ल्वॉकच बाबा बनीवत्यात. कारन लोकांची ती गरज हाय. हल्ली प्रशिक्षना अभावी चांगले बाबा/बुवा मिळत नाही. एखाद्या बाबा बुवाचा अंनिस ने केल्यावर भंडाफोड केल्यावर लोकांना दुसरा बाबा/बुवा शोदावा लागतोय. आपन असे वर्ग चालु करुन एक प्रकारे समाजशेवाच करीत आहात. आमाला मंगेश पाडगावकरांचा उदासबोध आठवला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
आमचे प्रश्न तुम्ही आंतर्ज्ञानाने जाणून घ्या आणि फी मध्ये थोडे कन्सेशन द्या.
बाबा प्रत्येक भक्ताला फी आंतर्ज्ञानाने सांगतात.
१०वीच्या गणीताचा पेपर बाबाना आंतर्ज्ञानाने जाणुन एका भक्ताला दिला. त्या भक्ताने त्याच्या शेकडो प्रती आश्रमाच्या जीर्णोद्धारासाठी देणग्या घेऊन सर्वाना वाटला आणि समाज सेवा केली.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
या मास्तरांनी आधीच लय डिटेलवार अभ्यासक्रम वगैरे पण तयार करून ठेवलाय. लय भारी.
१. हा श्रद्धेचा मार्ग आहे त्यामुळे चिकित्सा नाही., श्रद्धा असेल तर प्रचीती येइल.
२. विश्वास लागतो, श्रद्धेचा पुराव देता येत नाही.
३. कुठेतरी श्रद्धा ठेवावी लागते. ( तुम्ही आईन्स्टाईनला मागता का पुरावा?)
४.न दिसणार्या मनाच्या आजारांचा देता का पुरावा?
५.जिथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते.
६. तुम्हाला आमचा धर्म बुडवायचा आहे म्हणून तुम्ही आमच्या पाठी धावता आहात.
७.(शंकेखोर माणसाची जात शोधून काढावी ) ती जर तुमच्यापेक्षा वेगळी असेल तर जातिभेदामुळे द्वेषातून हे प्रकार होत आहेत असे म्हणावे.
तुमचा या विषयाचा अभ्यास परिपूर्ण आहे आणि तुम्हाला भडकमकरबुवा नावाचे स्वत्।चे दुकान काढायला अजिबात हरकत नाही.
फक्त २ गोष्टी या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हव्यात. एक म्हणजे एन. आर. आय. बाबा कसे व्हावे, की ज्या योगे गोरे शिष्य-शिष्यिणी तथा डॉलर्स मिळतील. आणि एखाद्या राजकीय पुढार्याबरोबर संधान बांधून त्याचा गुरू कसा व्हावे, म्हणजे दोघांचेही उखळ पांढरे होईल.
बस्स. वत्सा तुजप्रत कल्याण असो.
मान गये मास्टर मोशाय.
आणखी महत्वाचे एक राहून गेले की काय ?
.... अतिशय श्रीमंत लोकांना आपल्या अमाप संपतीचा मरणानंतर स्वतःला (परलोकात) काहीही उपयोग नाही, याचे टेन्शन असते. तस्मात आमच्या मठाला/ट्रस्टला मोठी रक्कम देऊन त्याची हुंडी घ्या, म्हणजे ती रक्कम मेल्यानंतर तुम्हाला परलोकात मिळेल ...
आश्चर्य वाटेल पण यावर विश्वास ठेवणारे लोक प्रत्यक्षात आहेत, आणि त्यांनी दिलेल्या पैशातून ऐश करणारे, मोठमोठी मंदिरे उभारणारेही.
फार वर्षांपूर्वी यावर एक लेख वाचला होता, त्यात त्या स्वामींचे नावही दिलेले होते, परंतु आता ते नेमके कोण हे विस्मृतीत गेले आहे.
बुवाबाजीचे हे फ़ार उत्कृष्ट करिअर आहे.]
या पेक्षाही " देउळ टाकणे" हे मस्त करियर आहे.
१९७४ ची गोष्ट. पुण्याच्या फर्गसन मधून बी एस सी झालेल्यांच्या एका गटाबरोबर सहलीस गेलो होतो. जाता जात पुढे काय करणार ? अशा गप्पा त्यांच्या चालू झाल्या. प्रत्येकाने आपापले बेत सांगितले एक " जोश्या" नावाचा पंटर त्यात होता. तो म्हणाला" तुम्ही काहीही म्हणा मला मात्र एक देउळ टाकावेसे वाटते.!" त्यानंतर डोंबीवलीच्या गणेश मंदिराची, शिरर्डीच्या साईबाबांची इतकेच काय आमच्या शिरगाव येथील प्रति शिर्डीची प्रगति पहाता " त्या" जोशाचे विचार किती द्रष्टेपणाचे होते हे समजते .
प्रतिक्रिया
बोला
+१
अत्यंत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण
मास्तरांच
अध्यात्मिक गुरू
जय हो
लय भारी
सर्वे सुखिनःसंतु
अशक्य
निशब्द !
प्रातःस्मरणीय
वाक्या वाक्याला टाळ्या
धन्य आहात
अगदी
<
हा हा हा!!
हाहाहा!!!
आरारारारा
मिपावर फडतूस लेखन करणार्यांचे
लै भारी!
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मास्तर
जालींदरबा
आमचे
आयला...
साष्टांग दंडवत
एव्हढ सगळ लिहायला कुठल्या
काय लेख मास्तरसाहेब वा!!!
मान गये मास्टर मोशाय.
!!
करियरच्या आयडियाची कल्पना