काही केल्या चित्रं चढत नव्हती. पण चतुरंग यांच्या चतुर सल्ल्यामुळे अखेर "गंगेत घोडं न्हालं"
सलामतान (जो जावा लोकांच्य़ा रूढीतला एक समारंभ आहे व ज्याला मी गमतीने जावानीज स्टाईलची "सत्यनारायण पूजा" म्हणतो) हा एक निमधार्मिक विधी आहे. तो साधारणपणे देवाचे आभार मानण्यासाठी किंवा देवाचे आशिर्वाद किंवा अनुग्रह मागण्यासाठी केला जातो. पण घरातल्या एकाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा एकाद्या अपत्याच्या जन्मानंतर ४० दिवसानी किंवा लग्नानंतरसुद्धा केला जातो.
ही रूढी इंडोनेशियात इस्लाम धर्म यायच्या आधीपासूनची आहे व यावर काहीशी हिंदू धर्मात "शांत" करण्याची जी रूढी आहे तशी छाप मला दिसते.
एकाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ ठेवलेले खास भोजन ही सुद्धा एक जावानीज रूढी आहे व तिलाही सलामतान म्हणतात. (आपण श्राद्ध करतो त्यातलाच हा प्रकार असावा). मृत व्यक्तीला आपण तिला विसरलो आहे असे वाटू नये म्हणून जेवणाच्या वेळी एक जादा ताटही ठेवले जाते.
जसा आपल्याकडे शिरा प्रसाद म्हणून केला जातो तसा "नासी तुंपेंग" नावाचा भात जेवणात नक्की असतो. पण इतर जेवण मांसाहारी असते.
पण सलामतान फक्त मृत्यूनंतरच करतात असे नाहीं. लग्नविधीनंतर जी "पार्टी" दिली जाते ती जर छोट्या प्रमाणावर असेल (म्हणजे फक्त घरच्या लोकांसाठी आणि जवळच्या मित्रमंडळींसाठी) तर त्या छोट्या पार्टीलाही "सलामतान" म्हणतात.
नवीन घर घेतले किंवा नव्या घरात प्रवेश केला, पदोन्नती झाली, कुणी जवळचे माणूस दीर्घकालीन आजारातून बरा होऊन नॉर्मल झाला तरही सलामतान केले जाते. त्याचा मुख्य हेतू देवाचे आभार मानणे किंवा देवाकडून आशिर्वाद किंवा अनुग्रह मागणे हेच असते.
अर्थात यातली माहिती माझ्या इंडोनेशियन मित्रांच्या सांगण्यातून कळलेली व वाचलेली आहे. अर्थात लक्ष्मी मित्तल यांच्या सुरबाया येथील इस्पातच्या कारखान्यात व इथे जकार्ता चक्रातुंगल कारखान्यात मात्र माझ्या हस्ते हा विधी ३-४ वेळा झालेला आहे तो thanksgiving and seeking blessings च्या स्वरूपातलाच होता.
म्हणूनच जेंव्हा दरमहा १७,०००/१८,००० टन बनवणार्या कंपनीत आमच्या भारतीय चमूने ३०,००० टनाचा पल्ला गाठला तेंव्हा मी खास माझ्या साहेबांना (प्रेसिडेंट डायरेक्टरना) सांगून हा समारंभ करवला होता. या आधी आमच्या साहेबांनी स्वत:हून हा समारंभ केला होता कारण माझ्या आगमनानंतर सहा महिन्यातच एक मोठा अपघात होता-होता टळला होता.
मुस्लिम धर्मात मूर्तिपूजा बसत नसल्याने या "पूजा" म्हणजे प्रार्थना करणे (साधारणपणे कुराण या मुस्लिम पवित्र ग्रंथातील काही भाग वाचण्यात येतो), स्वागत करणे व ज्यासाठी सलामतान केले त्याबद्दल बोलणे. माझ्या भाषणात १७,००० टनावरून आम्ही ३०,००० टनापर्यंत कसे आलो याचा गोषवारा थोडक्यात घेतला व त्याबद्दल देवाचे आभार मानले. (इंडोनेशियन भाषेत "तुहान Tuhan" हा शब्द सर्व देवांना लागू आहे) तसेच आगामी नजीकच्या भविष्यात आमची कंपनी काय करणार (new investments etc) हेही सांगितले. सांगायला अभिमान व आनंद वाटतो की आज आम्ही दरमहा ४०,००० टन आकड्याच्या आसपास आहोत व ५०,०००चा आकडा आमच्या डोळ्यासमोर नाचतोय व येत्या दोन वर्षात तो आकडाही देवाच्या कृपेने आम्ही गाठू!
आता पहा खालील फोटो:
उस्ताद झैनुद्दिन प्रार्थना करत आहे व देवाचे आशिर्वाद मागत आहे.
आमचे ऑफिस मॅनेजर स्वागत करीत आहेत. मांडी घालून बसणे इथेही प्रचलित आहे.
आम्ही काही वरिष्ठ अधिकारी आपापसात चर्चा करीत असताना.
आमचे पर्यवेक्षक (supervisors) व कामगार वर्ग पूजेला आला आहे.
प्रसाद तयार आहे.
आमच्या कंपनीतील गौरांगना प्रसादवाटपासाठी सज्ज आहेत.
मी यश दिल्याबद्दल देवाचे आभार मानत असताना.
इथल्या रूढीप्रमाणे जो सलमतान करतो त्याला प्रसादाचा शंकू कापून वरचा भाग एका "द्रोणा"त घालून त्याच्या ज्यूनियरला द्यायचा असतो. त्यासाठी आपल्याकडे गवंडी वापरतात तसली 'थापी' वापरली जाते. मी भाताचा शंकू कापताना.
माझ्या डावीकडे उभी असलेली मुलगी बालीची वायान नावाची हिंदू मुलगी आहे.
मी द्रोणात प्रसादाचा भात ठेवून तो द्रोण माझ्या उजवीकडे उभ्या असलेल्या श्री अगुस पातमोनो यांना द्यायच्या तयारीत आहे.
प्रसादाचा द्रोण श्री अगुस पातमोनो यांना देताना.
माझे सहकारी संचालक श्री योहनेस प्रसाद रोलिंग मिलचे डीजीएम श्री अंतोन याना देताना

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4368
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्पादनवाढ नफ्यापेक्षा हे वैयक्तिक तोट्याचे यश जास्त महत्वाचे
मस्त फोटो.
वाsssssssssssव!
आणि हो..
(बाकी
In reply to आणि हो.. by सुबक ठेंगणी
काहीच "कट्टर" नसल्याने हे प्रकार काहीसे 'undercurrents' सारखेच!
In reply to (बाकी by Nile
साकीने पाजलेली 'साके' जास्त प्राशन केली की "जे-वॉकिंग" होते खरे!
सत्यनाराय
धन्यवाद
In reply to सत्यनाराय by JAGOMOHANPYARE
यथासांग
आपल्या
In reply to यथासांग by एकलव्य
प्रसादाचे
अगदी अस्सल प्रतिसाद
In reply to प्रसादाचे by पर्नल नेने मराठे
अग बबो चुचु
In reply to अगदी अस्सल प्रतिसाद by सुधीर काळे
फोटो चढविता आल्याबद्दल अभिनंद्नन
Executive summary
In reply to फोटो चढविता आल्याबद्दल अभिनंद्नन by ऋषिकेश
वा
पौर्वात्य मुस्लिमांविषयी
खरंच पौर्वात्य मुस्लिमांबद्दल लिहायचा विचार आहे!
In reply to पौर्वात्य मुस्लिमांविषयी by भोचक
खरंच पौर्वात्य मुस्लिमांबद्दल लिहायचा विचार आहे!
In reply to पौर्वात्य मुस्लिमांविषयी by भोचक
काळेसाहेब
कल्पना मस्त
In reply to काळेसाहेब by प्रसन्न केसकर