आमचाही प्रयत्न. - प्रेरणा १ आणि २
अता झोप येईल नक्की अकाली, बरेका बरेका
शिणलीत गात्रे अर्ध्या दुपारी, बरेका बरेका
मला गाठुनी ती अशी काही घेरी, कुणा काय सांगू
हापिसातूनी मज नेई घरी ती, बरेका बरेका
तिचे बुद्धिवंतांशी होतेच तंटे कळता मला अन
जमले मला होणे तिच्या हवाली, बरेका बरेका
नवे स्वप्न येता सहार्यास माझ्या म्हणाले स्वत:शी
जुन्या पांघरूणास नवी शान आली, बरेका बरेका
जुन्या त्या उशीला डोके मिळाले अखेरीस माझे
चला रात्रीची हीच सुरूवात झाली, बरेका बरेका
तिच्या गर्दडोहातल्या त्या स्थळी फसले अशी मी
उठूनी बसावे अशी बुद्धी गेली, बरेका बरेका
जरी वेळ माझा गेला बरासा, खरे सांगते मी
तुझ्या ओरड्यानेच जाग आली, बरेका बरेका
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3156
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा!!
जबरदस्त!!!
काय
धन्यवाद,
मस्त ग चित्राताई
झोप उडाली
दंडवत
जरी वेळ
वा!
मस्त...
हिहिहिहि !
बापरे !!!!
पिंडदान -२
नाही
In reply to पिंडदान -२ by कानडाऊ योगेशु
मस्त विडंबन
यू टू!!!!!!!!