Skip to main content

शोध ....!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 18/09/2009 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
अंधाराच्या साम्राज्यावर दिवटीचा तोरा सुर्य उभा कोपर्‍यात काजवे करताहेत नखरा क्षितीजावर उभे प्रकाशाचे दुत पण आसमंत सारा सावल्यांनी झाकोळलेला मी कुणाला विचारु सुखाचा रस्ता इथे प्रत्येक जण वेदनेने पिळवटलेला कधीचा शोधतोय मी नेहेमीच गोंधळलेला अंधाराच्या दुनियेत प्रकाशालाच अडखळलेला. विशाल
लेखनविषय:

वाचने 3477
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

चांगली कविता.

कविता सुंदर आहे............. :) :)