माझ्या संस्थळाच्या ओपनिंगच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवर लिहिलेला हा लेख.... जसाच्या तसा इथे!
स्वतःची वेबसाईट असावी अशी प्रत्येकाची इच्छा असती, माझीदेखील होती,त्यामुळे ११वीत गेल्यावर जेव्हा घरी संगणक आला तेव्हा साईट कशी करता येईल हाच विचार मनात होता. मात्र ,मी १६ वर्षाचा असल्याने आणि कमाईचा कोणताही मार्ग नसल्याने जे काही करायचे ते फु़कटच करावे लागणार होते. अशातच मग हुडकाहुडकी सुरु झाली आणि एक साईट सापडली ,मग काय माझ्या परीक्षेसाठी बनवलेल्या फाईलमध्ये त्या साईटचे नाव दिमाखात विराजमान झाले. लोकांना मी माझी साईट बघा असे ओरडुन ओरडुन सांगु लागलो, एव्हाना माझे ऑर्कुटींगही सुरु झालेले होते, तेव्हा चारी बाजुंनी मी या साईटचा डंका वाजवला आणि मग ती फेमस करायचा प्रयत्न केला. तर ही झाली माझ्या पहिल्या साईटची गोष्ट.
पण नंतर लक्षात आले की अरे आपली साईट तर फारच बाळबोध आहे, नवीन काही केले पाहिजे, मग काय पुन्हा नवी साईट हुडका जिथे हे सगळे मोफत करता येईल. झाले नवीन साईट सुरु ,इतके दिवस गमभनही माहित नव्हते ,त्यामुळे ब्लॉगर ,बराहा मध्ये लिहायचे आणि साईटवर टाकत बसायचे ,पुन्हा पुन्हा तेच चक्र,अशा मी किती साईट सुरु केल्या माझे मलाच माहित. दरवेळेला जाहिरात करायची आणि पुन्हा काही चांगले बघितले कि जुनी साईट बंद करुन नवीन काढायची, नेटवर बसले की तोच उद्योग ,त्यात माझे डायल अप होते त्यामुळे फोन एंगेज राहिला म्हणून वर घरातल्यांच्या शिव्या,आणि हो नवीन काहितरी करायचे ही खाज मात्र प्रचंड त्यामुळे अगदी दिवाळीत एक नवा उपक्रमही सुरु केला होता. अगदी सहजच .कॉम वाल्या पिळणकरांपासुन सगळ्यांना मेल केला आणि सगळ्यांनी मदतीचे हातही पुढे केले मात्र काही कारणानी ते सगळे तिथेच राहिले. एव्हाना मी आता कागदावर लिहिलेले ब्लॉगवर उतरवायला लागलो होतो ,बर्यापैकी ब्लॉगरही बनलो होतो. मग सारखे तेच , ब्लॉगवर जाऊन किती नव्या हिट्स आल्या ,कुणी नवीन काही कॉमेंट लिहिला का? सारखी धुकधुक .तो कडेचा आकडा कसा आणि किती वाढेल एवढाच फक्त विचार मनात होता. आणि एक गंमत झाली.
थोड्याच दिवसात मला मिसळपाव या संस्थळाचा शोध लागला आणि माझे लेख मी तेथे प्रकशित करु लागलो तेथे ही गलथानपणा केला खरा !पण लोकाना माझे लिखाण बर्यापैकी आवडले,मग काय्,तिथे आणखी काही ब्लॉगर भेटले त्यांनी ब्लॉग किती भारी सजवला आहे ते पाहिले आणि आपणही तसेच करायच्या पाठिमागे लागलो. मग काय कोठेतरी जा ,नवीन टेंप्लेट डाऊनलोड कर. ते आवडले नाही तर पुन्हा तिसरे, त्यात एच टी एम एल मधले ओ का ठो कळत नव्हते त्यामुळे मग आणखीनच प्रॉब्लेम व्हायचा ,पण माझा आपला प्रयत्न चालुच होता, एव्हाना नवा उपक्रम चालु करायचे पुन्हा डोक्यात आले होते आणि अशातच 110mb.com चा वापर करुन मी जुन्या लेखकांचे लिखाण एकत्र करायचा प्रयत्न चालु केला. तो बर्यापैकी चालला. पण जसे जसे माझे ज्ञान वाढत होते तसे तसे मला अधिकाधिक काही करावेसे वाटु लागले मग काय नवनवीन विजेट हुडक किंवा मग नवीन सद्स्य मिळवण्यासाठी माझ्या साईटचे मेंबर व्हा असे जगाला ओरडुन सांगणे ,हे सगळे करण्यासाठी मी किती ई मेल अकाउंटस काढले असतील ते मलादेखील माहित नाही. पण अगदी घरातल्याना सांगुन मीच नेट बंद केल्यावर देखील माझे हे व्यसन जात न्हवते त्यामुळे मग मी यात पुढे जायचे ठरवले ,आपले आपण मराठी टायपींग शिकलो आणि लिहायला लागलो आणि मीच माझा प्रायोगीक डीझायनर बनत गेलो. काय चालले होते काही कळत नव्हते पण काहीतरी चांगले करत होतो इतके मात्र नक्की . आणि याच काळात मी अनेकाना भेटत गेलो माझ्या स्वतःच्यात अनेक वैचारीक बदल होत गेले मी चारीबाजुनी प्रगल्भ होत गेलो आजही होत आहे.
आणि या सगळ्यात माझी एक सुप्त इच्छा होती की माझी अशी एक वेबसाईट हवी होती की ज्यात लोकाना सदस्य होता येईल आणि मलाही समाधान लाभेल म्हणून मी छानसे वाचलेले हे माझे जुने संस्थळ नव्या जागी हलवले आणि तेथे सद्स्यनोंदणी ची सोय घेतली ,पण हा मात्र माझा प्रयोग फसला आणि येथे मला काही प्रतिसाद मिळाला नाही .सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी डीझाईन,मराठी लिखाण ,लोगो डीझायनिंग सगळे माझे मीच करत होतो ,आणि त्यात मला आनंददेखील मिळत होता आणि हो या सगळ्या वेळी माझे .tk हेच डोमेन असायचे कारण फ्री मिळणार्या पैकी सर्वात छोटे तेच होते हे वेगळे सांगणे न लगे. आणि हो माझ्या अजुन काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या त्या अशा की मराठीत एकही पुर्णवेळ ओपन फोरम नव्हता. मग काय हुडकली जागा आणि सुरु केला फोरम .चर्चा नावाचा आणि हो मध्ये सांगायचेच विसरलो ते हे की डीसेंबर महिन्यात माझ्या घरी ब्रॉडबँड आले होते त्यामुळे तसा प्रॉब्लेम नव्हता पण ते मशीन पण फॉल्टी त्यामुळे अजुन दंगा, पण या सगळ्यातुन मार्ग काढत साईट काढली .आणि याचे हळू हळू मेंबरही वाढत गेले .पण हा आकडा १५ च्या वर गेला नाही .असे झाले तरी या सगळ्या साईटसाठी मी केलेले वर्क आजही जसेच्या तसे मी जपुन ठेवलेले आहे आठवण म्हणून.
आणि अशातच मी एक मोठा निर्णय घेतला. माझ्या अभ्यासावर या नेटचा मोठा परिणाम होऊ लागला. आणि अभ्यास ही माझी पहिली प्रायोरीटी होती त्यामुळे ३१ मार्च रोजी मी पुर्णपणे नेटसन्यास घेतला. माझे लिखाण बंद केले.ब्लॉग उडवला आणि साईट लोकांच्या स्वाधीन करुन टाकल्या. अर्थातच कागदावर लिहिणे चालु होतेच. मग मी महिन्यातुन एखादा लेख मिसळपाववर टाकु लागलो आणि त्याचवेळी वेगवेगळ्या साईट पाहु लागलो ,खुप शिकलो आणि ३ महिन्यांच्या गॅप नंतर पहिल्यांदा मी माझी नवीन ईग्रजी साईट www.pvinayak.tk सुरु केली .त्याची जास्त पब्लिसिटी केली नाही . पण ज्यांनी पाहिली त्याना ती प्रचंड आवडली आणि मग मी माझा ब्लॉगही माझे मनाच्या कुपितले हे जुने नाव टाकुन देऊन वॉंट टु टॉक या नव्या नावाने सुरु केला आणि पुन्हा काही प्रमाणात नेटीझन झालो.
आणि हो मी देवल क्लब या संस्थेतर्फे नाटकाना म्युझीक देतो हे तर तुम्हाला माहितच आहे ,आणि त्यामुळेच मी पुर्ण रंगकर्मी झालेलो आहे ,अशातच साधारण जुलै महिन्यात लोकसत्तात नाटकावर काही लेख आले. आणि नेहमीप्रमाणे ते पुणे/ मुंबई केंद्रबिंदु धरुन लिहिलेले होते ,अर्थात त्याला मी खणखणीत उत्तर पाठवले पण ते काही छापुन आले नाही.आणि यातुनच आमच्या काही जेष्ठ लोकांच्या मनात नाटकावर एखादे संस्थळ का असु नये अशी कल्पना आली , आणि त्यांनी मध्यंतरी झालेल्या एका कार्यक्रमात ती सांगितल्यावर सुरु कराच असे अनेक लोकानी सांगितले अर्थातच आमच्या गृपमध्ये वेब साईट काढायला जमणारा मी एकटाच त्यामुळे मी ते शिवधनुष्य उचलले ,आणी ब्लॉगरवर साईट करायचे ठरवले आणि मग वेगवेगळी टेंप्लेट धुंडाळुन ,थोडेफार HTML शिकुन एक साईट बनवली www.rangkarmi.com अर्थातच यावेळी साईट पुर्ण प्रोफेशनल असल्याने आम्ही मंदार वैद्य(www.onlinekolhapur.com) यांच्या मदतीने डोमेन तर मयुर कुलकर्णी यांच्या मदतीने लोगो तयार केला व एक उत्तम संस्थळ जन्माला आले.
कळसाध्याय म्हणजे एका विशेष कार्यक्रमात मा .डॉ गिरिष ओक यानी त्या संस्थळाचे उद्घाटन केले आणि आज ते जोमात सुरु आहे. योगायोग असा की मला अभ्यासासाठी अनेक बक्षिसे मिळाली पण सातवीत राज्यात चौथा आल्यावर मला पहिल्यांदा मोठ्या हस्तीकडुन बक्षीस मिळाले आणि ते होते गिरीष ओक.आणि या प्रयोगाचे उद्घाटकही तेच. आता मी या संस्थळाचा टेक्नीकल ऍडव्हायजर म्हणून कम पाहत आहे. अर्थातच संपादक व लेखक दुसरे आहेत. अशारीतीने माझा हा डीझायनींग प्रवास मध्यावरच सुफळ झाला आहे. अजुन अनेक विषय डोक्यात आहेत पण ते काही दिवसानी ..मग खरा तो संपुर्ण होईल. पण शेवटी काही का होईना.... मी डीझायनर झालो...................
विनायक
www.rangkarmi.com (अपडेटेड)
वाचने
7469
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
अधिकाधिक धडपड
अभिनंदन.
आणि हो ....
+१
In reply to आणि हो .... by टारझन
उप्स
In reply to आणि हो .... by टारझन
अभिनंदन पण...
तो आय डी
छान, छान!
खटपटी आहेस खरा...!
खूप शिक
शाहरुख,
In reply to खूप शिक by शाहरुख
हे एक्दम
In reply to शाहरुख, by चतुरंग
:)
खूप
अभिनंदन!
विन्या!!!
अभ्यासाकरता शुभेच्छा!
अहो काय
In reply to अभ्यासाकरता शुभेच्छा! by सहज
:)
In reply to अहो काय by निमीत्त मात्र
हाहाहाहा
In reply to :) by सहज
छान खटपट
खटपट बरीच
In reply to छान खटपट by निमीत्त मात्र
वेबसाईटवर
In reply to खटपट बरीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
अभिनंदन...
अभिनंदन विनायका...
छान
सर्वांचा आभारी आहे.
छान प्रयत्न आहे.
धडपड
मोजक्या
In reply to धडपड by नीधप
पण आपण जे